डेटॉल आणि तत्सम महागड्या क्लिनर्सपेक्षा घरातल्या “ह्या” गोष्टी स्वस्तात मस्त स्वच्छता करतील!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

जगात सुरू असलेल्या करोना महामारीमुळे सगळेच जण त्रस्त आहेत. हा कोरोना घालवण्याचा उपाय आहे जागोजागी स्वछता ठेवण ज्यामुळे हा आजार आपल्या आसपास येणार नाही.

त्यामुळे आता प्रत्येकाला गरज पडतेय ते वेगवेगळ्या स्वछतेच्या साधनांची. मागच्या काही महिन्यांमध्ये भारतात सगळ्यात जास्त खप हा हँडवॉश आणि सेनीटायईजर याचा.

आणि त्याच बरोबर घरच्या साफसफाई साठी लागणार्‍या क्लिनर्स चा. पण जर तुम्ही बाजारात या गोष्टी खरेदी करायला गेलात तर तुम्हाला लक्षात येईल की याच्या किंमती काही दिवसात गगनाला भिडतील.

अशा वेळेस आपण काय करू शकतो? याला काही पर्याय शोधू शकतो का?

 

house cleaning inmarathi
medium.com

 

तर याला उत्तम पर्याय आहे. घरच्या घरीच काही सोप्या कृतींद्वारे आपण पैशाची बचत करू शकता आणि कायम स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करू शकता.

आपल्याकडे घरात आधीपासूनच बरेच पदार्थ असतात. ज्याचा वापर आपण घरगुती साबण, हँडवॉश किंवा क्लीनर्स तयार करण्यासाठी वापरू शकतो.

या नैसर्गिक साफसफाईच्या टूलकिटमध्ये पांढरा व्हिनेगर, बेकिंग सोडा, बोरॅक्स, लिंबूवर्गीय फळ आणि रिकाम्या स्प्रेच्या बाटल्या सहज येतील.

आपल्याला सुगंधासाठी हायड्रोजन पेरोक्साईड, कॉर्नस्टार्च, कॅस्टिल साबण, चहाच्या झाडाचे तेल आणि इतर आवश्यक तेल देखील चालतील.

त्यामुळे दुकानात खरेदी केलेल्या साफसफाईच्या वस्तु या कधीकधी पर्यावरण आणि आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात.

लिंबू आणि व्हिनेगरसारख्या वस्तु वापरुन बनवलेले घरगुती पर्याय हे कमी खर्चात टाकतील आणि स्वच्छता सुद्धा देतील.

असेच काही घरगुती पर्याय पुढीलप्रमाणे :

 

१. व्हिनेगर :

 

vineger inmarathi
stanleysteemer.com

 

व्हिनेगर हे एक नैसर्गिक जंतुनाशक आहे आणि साफसफाईच्या बाबतीत त्याचा विचार केला तर बरेच उपयोग आहेत. ते अॅसिडिक असल्यामुळे ते चिकट डाग, गंज आणि पाण्याचे डाग काढून टाकण्यासाठी उत्तम आहे.

आपल्या कॉफीच्या भांड्यातले चिकट डाग काढण्यासाठी व्हिनेगर वापरुन पहा.

लिंबाचा रस सुद्धा व्हिनेगर प्रमाणेच वापरू शकता, पण तो लगेच खराब होतो त्यामुळे आपण काही दिवसांपेक्षा जास्त लिंबाचा रसाने बनवलेल क्लीनर साठवू शकत नाही.

 

२. बेकिंग सोडा :

 

baking soda inmarathi
amylovesit.com

 

बेकिंग सोडा हवेतले गंध शोषून घेतो. उत्तम स्वच्छता घरात ठेवायची असेल तर हे साधन १००% योग्य आहे. कचरापेटी असेल किंवा डायपर पेल इथले दुर्गंध कमी होण्यासाठी बेकिंग सोडा वापरा.

किचन काउंटर, सिंक, ओव्हन, स्टोव्ह यावर हे क्लीनर वापरण्यासाठी ओलसर कपड्यावर ते शिंपडा. आणि मग या गोष्टी कशा चमकू लागतात याचा अंदाज तुम्हाला येईल.

आणि बेकिंग सोडा जर घरात नसेल तर तो तुम्हाला किराणामालाच्या दुकानात हमखास मिळेल.

 

३. गरम पाणी :

 

warm water inmarathi
drawingthehouse.com

 

जर स्वतःच घरी साफसफाईच मिश्रण तयार असाल तर तेव्हा स्प्रे बाटल्या किंवा कंटेनर वापरा. जर कंटेनर वापरला तर त्याला लगेच क्लीनरच लेबल लावा. जेणेकरून पुढे काही प्रॉब्लेम होणार नाही.

आता हे तयार कस कराल? तर पहिले गारपेक्षा गरम पाणी घ्या कारण बहुतेक ठिकाणी जिथे तेलमय दाग आहेत तिथे गरम पाणी स्वच्छतेच काम करत.

इतकच नाही तर या गरम पाण्यामध्ये स्वतःच्या घरचा थोडासा साबण किंवा क्लीनर घाला आणि अलगद भांडी घासा. सगळे डाग आणि भांड्यांना असलेलं तेल पटापट जात.

 

४. बोरॅक्स :

 

borax inmarathi
diybunker.com

 

बोरॅक्स, किंवा सोडियम बोरेट, बेकिंग सोडासारखच आहे, पण अधिक हार्ड आहे. हे एक नैसर्गिक ब्लीच आहे आणि कपडे धुण्यासाठी अतिशय फायद्याचं आहे.

कपड्यांवरील किंवा जमीनीवरील एकूण एक डाग याने सहज जातो. जरी हे नैसर्गिक असले तरी बोरेक्स आपली त्वचा, डोळे आणि श्वास घेतांना त्रासदायक ठरू शकते!

म्हणून त्याचा वापर काळजीपूर्वक करा. मुल आणि पाळीव प्राण्यांपासून दूर ठेवा. बोरॅक्स सुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये लॉन्ड्री भागात नक्की मिळेल.

 

५. मिरर क्लीनर :

 

mirror cleaning inmarathi
shutterstock.com

 

३ चमचे व्हिनेगर ४ कप पाण्यात एकत्र करा. किंवा १/४ कप व्हिनेगर, २ चमचे कॉर्नस्टार्च घेऊन ते गरम पाण्यात एकत्र करा. फवारणीपूर्वी कॉर्नस्टार्च विरघळल आहे का हे एकदा नीट बघा.

मायक्रोफायबर असलेल्या कपड्याने याचा स्प्रे पुसून टाका आणि नंतर काचेवर येणार्‍या रेषा घालवण्यासाठी कोरड्या कपड्याने शेवटी पुसा.

 

६. मायक्रोवेव्ह क्लीनर :

 

microwave cleaning inmarathi
thestatesman.com

 

मायक्रोवेव्हमध्ये गरम केलेल्या अन्नाचा वास किंवा तशा खाद्यपदार्थांचा वास घालवण्यासाठी ६ चमचे बेकिंग सोडा किंवा १/२ कप लिंबाचा रस मायक्रोवेव्ह मध्ये चालेल अशा काचेच्या कंटेनरमध्ये कपभर पाण्यात मिसळा.

हे मिश्रण गरम होईपर्यंत माइक्रोवेव्ह करा, नंतर थंड होईपर्यंत दरवाजा बंद ठेवा. स्टीम वास किंवा डाग कमी करेल आणि मायक्रोवेव्हच्या आतल्या बाजूस पुसण यामुळे सोप जाईल.

 

७. किचन क्लीनर :

 

kitchen cleaning inmarathi
insearchnow.com

 

साबणाने आणि कोमट पाण्याने स्वयंपाकघरातील पृष्ठभागांवरील घाण सहज साफ होते.

पण काही कठीण डाग आणि हानिकारक जंतूंना नष्ट करायच असेल तर तुम्ही गरम व्हिनेगर किंवा हायड्रोजन पेरोक्साइड वापरु शकता. हे मिश्रण किमान एक मिनिट तरी ठेवावं.

हे तयार कस करणार? तर १/२ कप व्हिनेगर किंवा हायड्रोजन पेरोक्साईड घ्यायचं आणि ते मिश्रण रिकामी स्प्रे बाटलीमध्ये घालायच.

मग हे पृष्ठभागावर फवारणी करा. आणि नंतर कोरड्या फडक्याने पुसून टाका.

८. ऑल पर्पज क्लीनर :

घरातील स्वच्छतेसाठी, जर तुम्हाला माइल्ड क्लीनर हवा असेल तर स्प्रेच्या बाटलीमध्ये १/२ कप व्हिनेगर, १/४ कप बेकिंग सोडा आणि त्यात अंदाजे कपभर गरम पाणी मिसळा.

हार्ड क्लीनर हव असेल तर २ चमचे बोरेक्स, १/४ कप व्हिनेगर आणि २ कप गरम पाणी वापरा. सुगंध देण्यासाठी कोणत्याही मिश्रणामध्ये काही थेंब तेल घाला.

तर हे सगळे घरगुती क्लीनर तुम्ही नक्कीच घरी तयार करू शकता, वापरू शकता. डेटॉल, लाइफबॉय अशा महागड्या स्वच्छता ठेवणारे क्लीनर विकत घेणे टाळू शकता.

तर बघा वरील आठ क्लीनर बनवा आणि कोरोना आणि इतर आजरांपासून लांब रहा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?