' महागड्या क्लीनर्स शिवाय घरातल्या घरात उत्कृष्ट स्वच्छता ठेवण्याच्या ८ टिप्स जाणून घ्या

महागड्या क्लीनर्स शिवाय घरातल्या घरात उत्कृष्ट स्वच्छता ठेवण्याच्या ८ टिप्स जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जगात सुरू असलेल्या कोरोना महामारीमुळे सगळेच जण त्रस्त आहेत. हा कोरोना घालवण्याचा उपाय आहे जागोजागी स्वछता ठेवणं, ज्यामुळे हा आजार आपल्या आसपास येणार नाही.

त्यामुळे आता प्रत्येकाला गरज पडतेय ते वेगवेगळ्या स्वछतेच्या साधनांची. मागच्या काही महिन्यांमध्ये भारतात सगळ्यात जास्त खप हा हँडवॉश आणि सेनीटायईजर याचा झालाय.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

त्याच बरोबर घरच्या साफसफाई साठी लागणार्‍या क्लिनर्सचा सुद्धा! पण जर तुम्ही बाजारात या गोष्टी खरेदी करायला गेलात तर तुम्हाला लक्षात येईल की याच्या किंमती काही दिवसात गगनाला भिडतील.

अशा वेळेस आपण काय करू शकतो? याला काही पर्याय शोधू शकतो का?

 

house cleaning inmarathi

 

तर याला उत्तम पर्याय आहे. घरच्या घरीच काही सोप्या कृतींद्वारे आपण पैशाची बचत करू शकता आणि कायम स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करू शकता.

आपल्याकडे घरात आधीपासूनच बरेच पदार्थ असतात. ज्याचा वापर आपण घरगुती साबण, हँडवॉश किंवा क्लीनर्स तयार करण्यासाठी वापरू शकतो.

या नैसर्गिक साफसफाईच्या टूलकिटमध्ये पांढरा व्हिनेगर, बेकिंग सोडा, बोरॅक्स, लिंबूवर्गीय फळ आणि रिकाम्या स्प्रेच्या बाटल्या सहज येतील.

आपल्याला सुगंधासाठी हायड्रोजन पेरोक्साईड, कॉर्नस्टार्च, कॅस्टिल साबण, चहाच्या झाडाचे तेल आणि इतर आवश्यक तेल देखील चालेल.

दुकानात खरेदी केलेल्या साफसफाईच्या वस्तू या कधीकधी पर्यावरण आणि आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात.

लिंबू आणि व्हिनेगरसारख्या वस्तू वापरुन बनवलेले घरगुती पर्याय हे कमी खर्चात टाकतील आणि स्वच्छता सुद्धा देतील.

असेच काही घरगुती पर्याय पुढीलप्रमाणे :

 

१. व्हिनेगर :

 

vineger inmarathi

 

व्हिनेगर हे एक नैसर्गिक जंतुनाशक आहे आणि साफसफाईच्या बाबतीत त्याचा विचार केला तर बरेच उपयोग आहेत. ते अॅसिडिक असल्यामुळे चिकट डाग, गंज आणि पाण्याचे डाग काढून टाकण्यासाठी उत्तम आहे.

आपल्या कॉफीच्या भांड्यातले चिकट डाग काढण्यासाठी व्हिनेगर वापरुन पहा.

लिंबाचा रस सुद्धा व्हिनेगर प्रमाणेच वापरू शकता, पण तो लगेच खराब होतो. त्यामुळे आपण लिंबाच्या रसाने बनवलेलं क्लीनर काही दिवसांपेक्षा जास्त साठवू शकत नाही.

 

२. बेकिंग सोडा :

 

baking soda inmarathi

 

बेकिंग सोडा हवेतले गंध शोषून घेतो. उत्तम स्वच्छता घरात ठेवायची असेल तर हे साधन १००% योग्य आहे. कचरापेटी असेल किंवा डायपर पेल इथले दुर्गंध कमी होण्यासाठी बेकिंग सोडा वापरा.

किचन काउंटर, सिंक, ओव्हन, स्टोव्ह यावर हे क्लीनर वापरण्यासाठी ओलसर कपड्यावर ते शिंपडा. आणि मग या गोष्टी कशा चमकू लागतात याचा अंदाज तुम्हाला येईल.

आणि बेकिंग सोडा जर घरात नसेल तर तो तुम्हाला किराणामालाच्या दुकानात हमखास मिळेल.

 

३. गरम पाणी :

 

warm water inmarathi

 

जर स्वतःच घरी साफसफाईचं मिश्रण तयार करत असाल, तर तेव्हा स्प्रे बाटल्या किंवा कंटेनर वापरा. जर कंटेनर वापरला तर त्याला लगेच क्लीनरच लेबल लावा. जेणेकरून पुढे काही त्रास होणार नाही.

आता हे तयार कसं कराल? तर पहिले गरम पाणी घ्या. कारण बहुतेक ठिकाणी जिथे तेलकट डाग आहेत तिथे गरम पाणी, थंड पाण्याहूनअधिक उत्तमरित्या स्वच्छतेचं काम करतं.

इतकंच नाही, तर या गरम पाण्यामध्ये घरातला थोडासा साबण किंवा क्लीनर घाला आणि अलगद भांडी घासा. सगळे डाग आणि भांड्यांना असलेलं तेल पटापट निघून जाईल.

 

४. बोरॅक्स :

 

borax inmarathi

 

बोरॅक्स किंवा सोडियम बोरेट, बेकिंग सोडासारखंच असतं, पण अधिक हार्ड असतं. हे एक नैसर्गिक ब्लीच आहे आणि कपडे धुण्यासाठी अतिशय फायद्याचं आहे.

कपड्यांवरील किंवा जमिनीवरील एकूण एक डाग याने सहज जातात. जरी हे नैसर्गिक असलं, तरी बोरेक्स आपली त्वचा, डोळे आणि श्वास घेतांना त्रासदायक ठरू शकतं!

म्हणून त्याचा वापर काळजीपूर्वक करा. मुलं आणि पाळीव प्राण्यांपासून बोरॅक्स दूर ठेवा. बोरॅक्स सुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये नक्की मिळेल.

 

५. मिरर क्लीनर :

 

mirror cleaning inmarathi

 

३ चमचे व्हिनेगर ४ कप पाण्यात एकत्र करा. किंवा १/४ कप व्हिनेगर, २ चमचे कॉर्नस्टार्च घेऊन ते गरम पाण्यात एकत्र करा. फवारणीपूर्वी कॉर्नस्टार्च विरघळलं आहे का हे एकदा नीट बघा.

हा स्प्रे मारलेला भाग, नंतर एखाद्या स्वच्छ कपड्याने पुसून टाका आणि नंतर काचेवर येणारे चप्पे घालवण्यासाठी कोरड्या कपड्याने शेवटी पुसा.

 

६. मायक्रोवेव्ह क्लीनर :

 

microwave cleaning inmarathi

 

मायक्रोवेव्हमध्ये गरम केलेल्या अन्नाचा वास किंवा खाद्यपदार्थांचा वास घालवण्यासाठी ६ चमचे बेकिंग सोडा किंवा १/२ कप लिंबाचा रस मायक्रोवेव्हमध्ये वापरता येईल, अशा काचेच्या कंटेनरमध्ये कपभर पाण्यात मिसळा.

हे मिश्रण गरम होईपर्यंत माइक्रोवेव्ह सुरु ठेवा. नंतर थंड होईपर्यंत दरवाजा बंद ठेवा. त्यामुळे निर्माण झालेली वाफ, वास किंवा डाग कमी करेल आणि मायक्रोवेव्हच्या आतल्या बाजूस पुसणं यामुळे सोपं जाईल.

 

७. किचन क्लीनर :

 

kitchen cleaning inmarathi

 

साबणाने आणि कोमट पाण्याने स्वयंपाकघरातील पृष्ठभागांवरील घाण सहज साफ होते.

पण काही कठीण डाग आणि हानिकारक जंतूंना नष्ट करायचं असेल तर तुम्ही गरम व्हिनेगर किंवा हायड्रोजन पेरोक्साइड वापरु शकता. हे मिश्रण किमान एक मिनिट तरी ठेवावं.

हे तयार कस करणार? तर १/२ कप व्हिनेगर किंवा हायड्रोजन पेरोक्साईड घ्यायचं आणि ते मिश्रण रिकाम्या स्प्रे बाटलीमध्ये घालायचं.

मग त्याने पृष्ठभागावर स्प्रे करा. आणि नंतर कोरड्या फडक्याने पुसून टाका.

 

८. ऑल पर्पज क्लीनर :

घरातील स्वच्छतेसाठी, जर तुम्हाला माइल्ड क्लीनर हवं असेल तर स्प्रेच्या बाटलीमध्ये १/२ कप व्हिनेगर, १/४ कप बेकिंग सोडा आणि त्यात अंदाजे कपभर गरम पाणी मिसळा.

हार्ड क्लीनर हवं असेल तर २ चमचे बोरेक्स, १/४ कप व्हिनेगर आणि २ कप गरम पाणी वापरा. सुगंध देण्यासाठी कोणत्याही मिश्रणामध्ये काही थेंब तेल घाला.

तर हे सगळे घरगुती क्लीनर तुम्ही नक्कीच घरी तयार करू शकता, वापरू शकता. डेटॉल, लाइफबॉय अशा महागड्या स्वच्छता ठेवणारे क्लीनर विकत घेणे टाळू शकता.

तर बघा वरील आठ क्लीनर बनवा आणि कोरोना आणि इतर आजरांपासून लांब रहा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?