'"सामग्री तैयार है, तुम आगे बढ सकते हो" : नरसिंह रावांच्या एका वाक्याने भारत बदलला तो कायमचाच!

“सामग्री तैयार है, तुम आगे बढ सकते हो” : नरसिंह रावांच्या एका वाक्याने भारत बदलला तो कायमचाच!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारताने स्वातंत्र्यानंतर मोठ्या झपाट्याने प्रगती केलेली आहे असे सांगण्यात येतं. पण लक्षात घ्या भारताला या वाटेवर अनेक कठोर आणि दूरदृष्टीचे निर्णय घ्यावे लागलेले आहेत.

भारताच्या वाटचालीचे इतिहासामध्ये असे अनेक मैलाचे दगड लागतील यामुळे भारत आज संपूर्ण विश्वामध्ये चांगली वाटचाल करताना दिसत आहे.

असाच एक निर्णय काही वर्षांपूर्वी १९९८ ला तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी घेतला होता आणि या निर्णयामुळे भारत आज परमाणु राष्ट्र म्हणून ओळखला जातो.

 

nuclear test inmarathi
indiatoday.in

 

पण आपल्या सर्वांना एवढच माहीती आहे की यामध्ये अटलजी, भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम आणि इतर संशोधकांचा सहभाग आहे.

मित्रांनो या सर्वां सोबतच एका दूरदृष्टी असणाऱ्या नेत्याचा देखील सिंहाचा वाटा आहे! कोण होता तो नेता जाणून घेऊयात!

आपले माजी पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी आपल्या सुस्पष्ट वक्तव्यासाठी आणि कठोर निर्णयासाठी प्रसिद्ध आहेत.

अमेरिकेचं दडपण असतानादेखील भारतात परमाणु परीक्षण करून आम्हीदेखील कोणापेक्षाही कमी नाही असं दाखवून देणारा कठोर निर्णय त्यांनी घेतला.

त्यांच्या या निर्णयानंतर भारतावर अनेक निर्बंध देखील घालण्यात आले पण अटलजींनी या सर्वांना न जुमानता वाटचाल चालू ठेवली.

११ मे १९९८ रोजी भारताने पोखरण राजस्थान मध्ये अणूस्फोट घडवून आणत आपल्या संरक्षण क्षेत्रातील कक्षा विस्तारल्या असल्याचं जगाला दाखवून दिलं.

या सर्व कार्यक्रमाचं श्रेय जेवढं अटलजी यांना पंतप्रधान म्हणून, एपीजे अब्दुल कलाम यांना संशोधक म्हणून आणि जॉर्ज फर्नांडिस यांना संरक्षणमंत्री म्हणून दिलं गेलं पाहिजे!

 

nuclear test heroes inmarathi
dailyo.in

 

तेवढंच याचं श्रेय भारताचे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांना देखील दिला गेलं पाहिजे.

याआधी याचा कधीही फार उल्लेख झालेला नाही परंतु काही गोष्टी या उघडपणे समोर येत नसतात त्या गोष्टी समजून घ्याव्या लागतात!

आणि भारतीय राजकारणाच्या इतिहासात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या समजून घेतल्या गेल्या पाहिजेत.

मित्रांनो अनेक असे प्रश्न असतात ज्यांची उत्तरं कधीही सरळ मार्गाने मिळत नाहीत आणि त्यातीलच हा एक प्रश्न आहे.

भलेही परमाणु स्फोटाचा प्रयोग अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात झाला होता तरीही त्याची पूर्वतयारी पी व्ही नरसिंह राव यांनी केली होती असं म्हणायला हरकत नाही.

भारताच्या आजपर्यंतच्या वाटचालीमध्ये प्रत्येक पंतप्रधानाचा समान वाटा आहे. कुठलाही पंतप्रधान आणि त्याच्या योगदानाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणं हे इतिहासाला धरून होणार नाही.

तत्कालीन परिस्थितीमध्ये जे विषय त्यांच्या समोर येत गेले त्यात देशाचा लाभ व्हावा असेच निर्णय प्रत्येक पंतप्रधानाने घेतलेले आहेत.

भारताचे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांनीदेखील भारताच्या वाटचालीमध्ये मोठे योगदान दिलेले आहे.

 

p v narsimha inmarathi
theweek.in

 

पोखरण प्रकरण देखील असाच काहीसं आहे, याचा खुलासा खुद्द अटल बिहारी वाजपेयी यांनी २००४ मध्ये केला होता.

त्याचं झालं असं की, ९ डिसेंबर २००४ ला दुर्दैवाने पी व्ही नरसिंहराव यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं.

१४ दिवस पी व्ही नरसिंहराव यांनी मृत्यूशी झुंज दिली. परंतु ते २० डिसेंबर २००४ रोजी भारताचे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

त्यांच्या अंतिम संस्कारानंतर दोन दिवसांनी एका ठिकाणी श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आलं होतं.

या ठिकाणी बोलताना अटलजींनी असा खुलासा केला की मे १९९६ मध्ये जेव्हा मी पी व्ही नरसिंहराव यांच्या कडून पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारला.

तेव्हा त्यांनी मला सांगितलं की, “परमाणु परीक्षणासाठी सर्व तयारी झालेली आहे आणि मी फक्त वीस्फोट केला आहे.”

पी व्ही नरसिंहराव तेव्हा अटलजींना असे म्हणाले होते की , “सामग्री तयार है, तुम आगे बढ सकते हो”

 

vajpeyee and narsimharao inamarathi
english.manoramaonline.com

 

खरं बघता नरसिंह राव यांनी १९९५ मध्येच परमाणु परीक्षणाची तयारी दर्शवली होती परंतु काही तांत्रिक कारणास्तव त्यांनी परिक्षण मात्र केलं नाही.

त्यांच्या या परीक्षण न करण्यामागे अनेक कथा सांगितल्या जातात परंतु सत्यता कोणालाही माहिती नाही.

राव यांच्या मृत्यूच्या महिनाभर आधी पत्रकार शेखर गुप्ता यांनी त्यांची मुलाखत घेतली होती. राव यांना पोखरन च्या मुद्द्यावरून प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर देण्यास नकार दिला.

परंतु विनय सीतापती यांच्या ‘हाफ लॉयन’ या पुस्तकात पोखरण बद्दल काही किस्से उपलब्ध आहेत. त्यातील तीन महत्त्वाचे किस्से तुम्हाला सांगत आहोत.

यातील पहिला किस्सा तुम्ही ‘परमाणू’ या सिनेमात नक्कीच पाहिला असेल आणि तो असा की पोखरण येथे परमाणु परीक्षण करायच्या आधीच अमेरिकी सॅटॅलाइट ने ही माहिती मिळवली आणि भारतावर परीक्षण करू नये म्हणून दबाव तयार केला.

या किस्स्यानुसार राव कधीच परमाणु परीक्षणासाठी तयार नव्हते.

पत्रकार राज चेंगप्पा यांच्या पुस्तकानुसार राव यांनी परमाणु परीक्षणासाठी कधीच ग्रीन सिग्नल दिला नव्हता तिथे रुटीन काम चालू असताना अमेरिकेचा त्याबद्दल गैरसमज झाला!

 

nuclear test 2 inmarathi
republicworld.com

 

आणि त्यांनी भारतावर दबाव तयार केला आणि त्यामुळे राव यांनी पुढे या विषयात काहीही हालचाल केली नाही.

या किस्स्यानुसार राव यांना कल्पना होते की जेव्हा भारत परमाणु परीक्षण करेल तेव्हा भारतावर मोठ्या प्रमाणात निर्बंध लादले जातील.

आणि त्यामुळेच त्यांच्याकडे परीक्षणासाठी केवळ एकच संधी होती कारण जर त्यांचा प्रयत्न फसला तर भारत कधीच परमाणू राष्ट्र बनु शकला नसता!

आणि त्यांना त्यांच्या कार्यकाळात हे न जमल्यामुळे त्यांनी ही संधी अटलजींना दिली.

असं म्हटलं जातं की १९९६ ला जेव्हा अटलजी पंतप्रधान झाले तेव्हा तत्कालीन १३ दिवसाच्या सरकारमध्ये अटलजींनी एकमेव परमाणु परीक्षणाचा निर्णय घेतला होता!

पण पुढे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की सरकार कोसळु शकते तेव्हा त्यांनी हा निर्णय रद्द केला.

पुढे जेव्हा स्थिर सरकार सत्तेत आलं आणि अटलजींना असं वाटलं की आपण आता परमाणु परीक्षण करण्यासाठी तयार आहोत तेव्हा त्यांनी हा निर्णय घेतला.

पण या घटनांवरून एवढं लक्षात येतं की अटल बिहारी वाजपेयी, पी व्ही नरसिंहराव हे दोघे देखील परमाणु परीक्षणासाठी आग्रही होते.

 

narsimha rao and bajpayee inmarathi
m.redii.com

 

पी व्ही नरसिंहराव यांनी त्यांच्या कार्यकाळात शास्त्रज्ञांना विविध उपकरणे उपलब्ध करून दिली आणि अटलजींनी १९९८ मध्ये त्याचं परीक्षण घडवून आणलं.

असं म्हटलं जातं की अटलजींचे सरकार अनुभवी नसतानादेखील त्यांनी घेतलेल्या कठोर निर्णयामुळेच आज देखील अटलजींचे नाव घेतलं जातं.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?