' काही जणांना त्यांची स्वप्नं पूर्णपणे आठवतात, तर काहींना नाही, असं का होतं? वाचा, यामागचं संशोधन

काही जणांना त्यांची स्वप्नं पूर्णपणे आठवतात, तर काहींना नाही, असं का होतं? वाचा, यामागचं संशोधन

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

झोपल्यावर स्वप्नं सगळ्यांनाच पडत असतात. मात्र त्यातील सगळीच स्वप्नं आपल्याला उठल्यावर आठवत नाहीत. काही स्वप्नं लख्ख आठवतात तर काही धूसर. काही तर आठवतही नाहीत. असं का असावं?

वैज्ञानिक जगतात स्वप्नांवर देखील बरेच संशोधन केले गेले आहे. अभ्यास केला गेला आहे. परंतु अजूनही स्वप्नं का पडतात आणि त्यासंबंधी इतर माहिती ही म्हणावी तितकी ठोस सापडलेली नाही.

माणसाला पडणारी स्वप्नं हे अजूनही एक रहस्यच राहिलंय असं म्हटलं तरी चालेल. महत्त्वाचं म्हणजे, स्वप्नं सगळ्यांनाच पडतात. परंतु ती सगळ्यांना नंतर आठवत नाहीत.

 

sleepy girl inmarathi
masterfile.com

 

तरीही,  मेंदूच्या अभ्यासात काही लोकांनाच त्यांची स्वप्ने इतकी लख्ख कशी आठवतात यासंदर्भात काही गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत.

डॉ. डीडर ली बॅरेट हे मानसशास्त्रज्ञ सांगतात, की “याबाबत कोणतेही सरळ आणि निश्चित असे स्पष्टीकरण अजूनही देता येणार नाही” परंतु त्यांनी स्वप्नांच्या आठवणी राहण्याबाबत काही घटक कारणीभूत असतात असे सांगितले.

 

पुरुष आणि स्त्री (Gender)  –

 

dreams-karma-part-1
ishafoundation.com

 

पुरुषांपेक्षा स्त्रियांना त्यांची झोपेतली स्वप्ने जागेपणी अधिक आठवतात. याचे नेमके कारण संशोधकांना कळलेले नाही. बॅरेट यांच्या म्हणण्याप्रमाणे, यामागे जीवशास्त्रीय किंवा हॉर्मोनल फरक कारणीभूत असावा.

 स्त्रिया या सर्वसाधारणपणे प्रत्यक्षापेक्षा स्वप्नांत अधिक खुलेपणाने वावरतात. रमतात. म्हणूनही कदाचित त्यांना त्यांची स्वप्ने अधिक आठवत असावीत.

परंतु हे नेहमीच असं असतं असं नाही. स्वप्नं न आठवणाऱ्या स्त्रियाही असतात आणि स्वप्नं नीट आठवणारे पुरुषही असतात. त्यामुळे या गोष्टीत लिंगभाव फारसा परिणाम करतो असं म्हणता येणार नाही.

 

वय –

 

child sleeping Inmarathi

 

मानसशास्त्रज्ञांचे निरीक्षण असे आहे, की लहान आणि तरुण वयात झोपेत पडलेली स्वप्ने जागेपणीही लक्षात राहण्याचे प्रमाण अधिक असते. विशेषतः विशीपंचविशीपर्यंत.

नंतर माणूस जसजसा प्रौढ होत जातो, तसतशी माणसाची ही आठवण कमी कमी होत जाते. परंतु इथेही असा ठोस नियम सांगता येत नाही.

अनेक प्रौढांना देखील आपली स्वप्ने जागेपणीही चांगली आठवतात. मात्र वयाचा थोडा परीणाम होत असावा.

 

व्यक्तिमत्व –

इथेही पुन्हा शंभर टक्के सांगता येणार नाही काही. तरी देखील स्वप्नांचा आणि ती आठवात राहण्याचा संबंध हा प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाशीही संबंधित असतो असे म्हटले जाते.

जी माणसे मनाशी फार विचार करतात, भावनाशील असतात, किंवा सतत विचार करतात अशा माणसांना आपली स्वप्ने चांगली आठवतात.

 

daydream inmarathi

 

जे लोक व्यवहारी, आणि आपल्या भावनांचा फार विचार न करता केवळ कर्तव्य, कामं यावर लक्ष केंद्रित करून जगत असतात, त्यांना झोपेत पडलेली स्वप्ने जागेपणी फार आठवत नाहीत.

कारण ते स्वप्नांच्या नव्हे तर वास्तवाच्या जगात रमत असतात.

 

झोपेचे प्रमाण –

माणसाला लागणारी झोप आणि तिचा काळ, स्थिती ही देखील स्वप्नांच्या आठवाशी संबंधित असते.

अनेकांना वेळेवर झोप लागत नाही. त्यांची झोप पुरेशी होत नाही. जी झोप लागते ती देखील गाढ, शांत झोप नसते.

 

less sleep inmarathi
theindianexpress.com

 

तर काही या उलट वेळेवर झोपतात. त्यांना अंथरुणात पडल्यावर लगेच झोप लागते. ती झोपही शांत, गाढ लागते. आवश्यक असेल तितकी म्हणजे साधारण सात ते आठ तास व्यवस्थित झोप ते घेतात.

झोपेत असताना आपण दर ९० मिनिटांनी स्वप्नं पाहत असतो. परंतु हा कालावधी पूर्ण रात्रीत अधिक वाढत जातो. म्हणजे अर्थातच पहाटेच्या सुमारास म्हणजे आपण जागे होण्याच्या काही काळ आधी ही स्वप्नं अधिक पडतात.

त्यानंतर आपण लगेच उठण्याच्या वेळेत असतो, त्यामुळे ती स्वप्नं आधी रात्री पडलेल्या स्वप्नांपेक्षा अधिक सहजपणे आठवतात.

जर तुम्हाला आठ तासाऐवजी चारच तास झोप मिळत असेल, तर साहजिकच स्वप्नांचा कालावधीही कमी होतो. त्यामुळे ती स्वप्नं सकाळी उठल्यावर लक्षात राहत नाहीत.

मात्र ह्याच व्यक्ती दुसऱ्या दिवशी सुट्टी आहे म्हणून रात्री शांत आणि पुरेशी झोप घेतात, तेव्हा त्यांना रात्री झोपेत पडलेली स्वप्नं दुसऱ्या दिवशी चांगली आठवतात.

 

मेंदूची कार्यक्षमता –

 

Lucid_Dream inmarathi
MELmagzines.com

 

आधुनिक संशोधनानुसार आता मेंदूचे कोणते भाग स्वप्नांशी संबंधित आहेत याची शास्त्रज्ञांना चांगली कल्पना आलेली आहे.

२०१४ साली झालेल्या संशोधनानुसार, ज्यांना आपली स्वप्ने दुसऱ्या दिवशी उठल्यावरही चांगली आठवतात त्यांच्या मेंदूचा माहिती आणि भावना संकलित करणारा भाग अधिक कार्यरत असतो असे लक्षात आलेले आहे.

टेंपोरो-पॅरीएटल-जंक्शन नावाने ओळखला जाणारा हा मेंदूच्या मागील बाजूस असलेला भाग लोकांना बाह्य उत्तेजनांकडे अधिक लक्ष देण्यास मदत करू शकतो. हा भाग इन्स्ट्रास्लीप वेकफुलनेस नावाच्या गोष्टीला प्रोत्साहित करतो.

ज्यांना सकाळी उठल्यावर आपली स्वप्नं स्पष्ट आठवतात, त्यांचा हा भाग झोपेत अधिक जागृत होतो आणि झोपेत पाहिलेले स्वप्नं तो आपल्या आठवणीच्या कप्प्यात सेव्ह करून ठेवतो.

त्यामुळे इतरांपेक्षा या लोकांना स्वप्नांची आठवण अधिक राहते.

संशोधक आपल्या संशोधनाच्या नोंदीत सारांशाने म्हणतात, की मेंदूच्या मागील टीपीएल ह्या भागाप्रमाणेच मेंदूच्या समोरचा भाग मेडिअल प्रिफ्रॉन्टल कॉर्टेक्स मानसिक घडामोडींना किंवा आठवणींना साठवून ठेवण्याचे काम करत असतो.

२०१७च्या अलिकडील संशोधनात मात्र संशोधकांना असे आढळले आहे, की ठळक स्वप्नांतील आठवणी देखील मेंदूच्या पुढच्या दिशेने असलेल्या उच्च क्रियाकलापांशी जोडलेली असते.

मेंदूच्या पुढच्या बाजूस असलेला हा भाग व्यक्तिच्या मनातील अमूर्त विचारांशी संबंधित आहे. म्हणूनच तो व्यक्तिला पडलेल्या स्वप्नांची स्मरणात नोंद करून ठेवतो.

मानवाच्या उत्क्रांतीत असे दिसून आले आहे, की आपले पूर्वज हे आपल्यापेक्षा अधिक अस्थिर आणि जीवाला भीती असलेल्या काळात जगत असत. त्यामुळे त्यांची झोप सावध असे.

त्यांचा मेंदू अशा रितीने कार्यरत असे, की झोपेत देखील त्याला येणाऱ्या धोक्याची जाणीव होईल.

अशी धोक्याची जाणीव झाली, की लगेच भर झोपेतूनही उठून त्या संकटाचा सामना करून किंवा तो धोका टळला, की पुन्हा झोपेच्या आधीन व्हायची सवय त्याने स्वतःला लावून घेतली.

या गरजेमुळेच कदाचित काही लोकांना आजही आपल्या स्वप्नांच्या बाबतीतही सावध राहण्याची सवय असावी. आणि त्यांना ती स्वप्ने जागेपणीही लक्षात राहत असावी.

 

आपली स्वप्ने लक्षात राहावी म्हणून काय करता येईल?

 

dreams inmarathi 2

 

झोपायला जाण्यापूर्वी आपल्याच मेंदूला सुचना द्या, की मला पडणारी स्वप्नं स्मरणात ठेवून मला उठल्यावरही ती आठवात आणून दे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण तुमचा मेंदू तुमचं ऐकत असतो आणि तुमच्या सुचना पाळत असतो.

त्यामुळे तुम्ही जर मेंदूला अशी सुचना दिलीत, तर तो दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय स्वप्नं पडलं होतं ते लख्ख स्मरणात आणून देऊ शकतो.

सकाळी उठल्यावर तुम्ही झटकन उठून आपल्या इतर कामांना सुरुवात न करता काही वेळ बिछान्यात तसेच पडून राहा आणि आपल्याला काल रात्री कोणती स्वप्नं पडली होती, ते आठवायचा प्रयत्न करून बघा.

जर काही आठवत असेल तर ते लिहून काढा. किंवा रेकॉर्ड करून ठेवा.

 

writing inmarathi
HaresfieldSchool.com

 

जर तेवढेही आठवत नसेल, तर झोपेतून उठल्याक्षणी तुमचा मूड कसा होता त्याचे निरीक्षण करा. तुम्ही आनंदी होतात ? दुःखी होतात? की वैतागलेले होतात?

काही वेळ ते आठवून त्याच स्थितीत राहण्याचा प्रयत्न करा. त्या भावनेच्या मागून तुम्हाला कदाचित रात्री पडलेले स्वप्नंही स्मरणात येईल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?