'तारखा लक्षात ठेवताना गोंधळताय? या टिप्स वापरल्यात तर प्रत्येक तारीख व्यवस्थित लक्षात राहील

तारखा लक्षात ठेवताना गोंधळताय? या टिप्स वापरल्यात तर प्रत्येक तारीख व्यवस्थित लक्षात राहील

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

शाळेत असताना सगळ्या विषयांपैकी फार वैताग आणणारा विषय कोणता वाटायचा? गणित? इंग्लिश? सायन्स? नाही इतिहास!!!!

आठवतं? शिवाजी महाराज आग्ऱ्याहून किती साली पळाले? अकबराचा जन्म किती साली झाला? हळदी घाटाचं युद्ध किती साली झालं? भारत छोडो आंदोलन किती साली झालं? अशा प्रकारच्या प्रश्नांनी लहानपणी डोकं फिरवलं होतं.

जोड्या जुळवा, गाळलेल्या जागा भरा या प्रश्नात हे हमखास यायचे आणि गोंधळ उडायचा…हो ना? बहुतेक जणांना वाटायचं हे सगळं होऊन गेलेलं आहे आणि यांचे प्रश्न आत्ता विचारुन काय कटकट लावली आहे!!!

 

girl reading featured
qr.ae/pNy7l

 

कारण ही सनावळी लक्षात रहायला अवघड.. आणि पर्यायाला पण जर वेगवेगळे सन दिसत असतील तर ‘हा’ की ‘तो’ ?? यांनी गोंधळून जायलाच होणार ना!!!!

अगदी हल्ली हल्ली पण लग्नाचा वाढदिवस विसरला जातो.. महत्त्वाचे दिवस तारखा लक्षात न राहील्यामुळे काय काय घोळ होतात..हा सारा अनर्थ एका विसराळूपणाने होतो!!!

ती सनावळी लक्षात ठेवायच्या काही युक्त्या आहेत, त्या वापरुन तुम्ही अगदी आरामात सगळ्या प्रकारच्या तारखा लक्षात ठेवू शकाल.

 

dates inmarathi3
wikihow.com

 

स्पर्धा परीक्षा देत असताना ढीगभर सनावळ्या पाठ कराव्या लागतात. तिथं कमी वेळात सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात. यामध्ये खूप सारे आकडे विशिष्ट क्रमाने लक्षात ठेवले,‌ की त्या अवघड वाटत नाहीत.

ही तयारी करत असताना विद्यार्थी विविध पद्धती वापरतात. या सनावळ्या लक्षात ठेवण्यासाठी एक विशिष्ट पद्धत वापरतात. म्हणजे प्रत्येक शब्दातील एक एक अक्षर घेऊन विशिष्ट शब्द तयार करायचा. किंवा सालाचे आकडे विशिष्ट क्रमाने मांडायचे वगैरे.

यामुळे तुम्हाला योग्य वेळी योग्य आकडे आठवणीत राहतात. याला नेमाॅनिक सिस्टीम असं म्हणतात. या सिस्टीममध्ये ज्या पध्दतीने हे आकडे सोपे बनवले जातात त्यातील पहीला प्रकार आहे-

 

१. सुलभीकरण-

 

dates inmarathi
wikihow.com

 

म्हणजे तुम्ही एका विशिष्ट शतकातील घटनांचा अभ्यास करत आहात, तर त्या शतकातील पहिले दोन अंक आणि दुसरे दोन अंक वेगवेगळे लक्षात ठेवायचे.

उदा. शिवाजी महाराज १६२७ ला जन्मले तर १६ आणि २७ हे वेगवेगळं करायचं. एकंदरीत शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील घटना या १६ व्या शतकात घडलेल्या तर त्यानुसार पुढची वर्षं लक्षात ठेवायची.

 

२. सुसंबद्ध मांडणी-

गणितातील आकडेवारी ही बेरीज- वजाबाकी- गुणाकार- भागाकार या मूलभूत क्रियांवर आधारित असतात. त्यांचा वापर करुन आपण सनावळ्या लक्षात ठेवू शकतो.

उदा. १७७६ या सनावळीत सात हा अंक जास्त लक्षात राहणारा आहे.

७-१=६ किंवा ६+१=७.

या समिकरणाच्या मदतीने आपण १७७६ हे साल लक्षात ठेवू शकतो.

किंवा जर तुम्हाला माहिती आहे, की आपण १७०० या सालाशी संबंधित माहिती ठेवत आहोत तर पुढं असलेल्या, ७६ म्हणजे ७ आणि ६ हे दोन अंक लक्षात ठेवले की आरामात लक्षात येते.

 

३. दृश्याची कल्पना करणे-

 

daydream inmarathi

 

आता आपण जो वर अंक घेतला आहे त्याला दृश्य स्वरुपात लक्षात ठेवायचा. स्तंभालेखात हा अंक डोळ्यासमोर घ्या.

म्हणजे १ या आकड्यांचा स्तंभ अतिशय लहान असेल. ७७ या अंकाचे स्तंभ एकाच उंचीचे दोन‌ असतील तर ६ चा अंक ७ पेक्षा थोडासा लहान असेल.

 

४. संदर्भासाठी एखादी कथा-

 

dates inmarathi1
wikihow.com

 

एखाद्या सनावळीशी संबंधित आकडा जर नेटवर टाकला तर त्या भावाशी संबंधित अनेक संदर्भ आपल्याला दिसतात. असा एखादा संदर्भ लक्षात ठेवणं हे अतिशय सोपं असतं.

एखादी विनोदी कथा रचून‌ ती लक्षात ठेवणं हे अतिशय सोपं असतं. कारण आकडेवारीपेक्षा जास्त लक्षात राहतात त्या गोष्टी!!! म्हणजे हसतखेळत ज्ञान हे असंच असतं.

लहानपणीच्या शिकवण्यातल्या गोष्टी जास्त लक्षात राहतात, कारण त्या आपल्याला मानेवर खडा ठेवून नाही तर गंमतीशीर पद्धतीने सांगितलेल्या असतं. बाईंनी, किंवा आईनं ती गोष्ट साभिनय सांगितलेली असते.

 

५. कागदावर लिहून काढा, चित्रांत दाखवा-

 

writing inmarathi
HaresfieldSchool.com

 

एखादी गोष्ट नुसती लक्षात ठेवण्यापेक्षा त्याची चित्रं काढा. त्यासाठी काही तुमचं ड्राॅईंग उत्तम हवं असं नाही. तुम्हाला ती गोष्ट, घटना चित्रलिपीतून लक्षात ठेवणं सोपं जावं इतकाच त्याचा हेतू ठेवून काढा.

आपण कितीही मोठे झालो तरी चित्रांची पुस्तकं आवडीने बघतो. एखादी घटना जाहिरातीत लिहीताना आकर्षक चित्र असलं, की जास्त ठसठशीतपणे दिसते. लक्षात राहते. तेच इथं करायचं.

त्या तारखेशी संबंध असणारी चित्रं काढा, ती सजवा. तारीखही वेगवेगळ्या पध्दतीने लिहा. हवा तो भाग आपलं मन मजेत स्वीकारतं आणि लक्षातही ठेवतं.

 

६. यमकात गाऊन बघा-

 

music inmarathi

 

कोणतीही घटना लिहीताना यमक जुळवून लिहून बघा. म्हणजे बघा हं, एखाद्या कार्यप्रसंगी स्त्रियांना उखाणे घ्यायला सांगतात. त्या कशा जुळवून जुळवून घेतात..अगदी तसंच.

तुम्हीही एकमेकांना जुळणारे शब्द मीटरमध्ये जमवून बसवा म्हणजे आपोआपच लक्षात राहील. मनाला येईल तशी चाल लावा आणि गाण्यात ती घटना गुंफा.. नक्की विसरली जाणार नाही.

 

७. एखाद्या गोष्टीचा संबंध जोडून ठेवा-

 

dates inmarathi2
wikihow.com

 

तुम्हाला माहिती असलेल्या एखाद्या गोष्टीशी संबंध जोडा. म्हणजे तुम्हाला कमी त्रास घ्यावा लागेल.

म्हणजे जर तुमचा वाढदिवस १९ जूनला (१९-०६)  असतो, आणि तुम्ही १९०६ची एखादी घटना लक्षात ठेवत असाल तर त्याला वाढदिवसाचा संदर्भ द्या.

 

८. कूकनी स्लँग-

सगळी माहिती एकत्र करून, त्यातली काही अक्षरं मिळून एक नवा शब्द तयार करणं ही इंग्लंड मधील वापरली जाणारी पद्धत आहे.

तो शब्द सहसा आपल्याशिवाय दुसऱ्या माणसाला फोड करायला जमत नाही. काही इंग्रजी शब्द बघा-

Tom Hanks- Thanks

थोडक्यात याचं डीकोडींग तुम्हाला लक्षात राहील.

९. तारखा लक्षात ठेवायला हे पण करा-

एखाद्या प्रसंगाची तारीख लक्षात ठेवताना,  त्या तारखेच्या उच्चाराशी मिळता जुळता शब्द बनवा सहजी लक्षात राहील.

थोडक्यात सांगायचं तर, ज्ञान मिळवणं ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. आपण त्याचा भाग असतो. फक्त ते मिळवताना चार युक्तीच्या गोष्टी लक्षात ठेवून काम केलं तर अवघड काहीही नसतं.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?