' मनोरंजन असो किंवा काम, चायनीज ऍपशिवाय तुमचं काहीही अडत नाही हे सांगणारी भारतीय ऍप्स! – InMarathi

मनोरंजन असो किंवा काम, चायनीज ऍपशिवाय तुमचं काहीही अडत नाही हे सांगणारी भारतीय ऍप्स!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

चीन सोबत वाद तसा भारताला नवीन नाही. पण तो आज एवढा वाढला आहे की दोघांचे सैन्य समोरासमोर उभं ठाकले गेले आहे.

पण आजच्या काळात समोरासमोरचं युद्ध कोणालाच झेपणार नाही.आर्थिक,सामाजिक सर्व स्तरावर फक्त आणि फक्त नुकसान!

पण शह आणि प्रतिशह दिला गेला नाही तर खुन्नस कसली? तिथे नेपाळ ला आपल्या मांडी खालून घेऊन चीन सरहद्दी वर पुन्हा नेपाळ – भारत वाद पेटवत आहे.

तर त्याच नेपाळी पंतप्रधानांची खुर्ची अशी काही हलवली गेली आहे की पुन्हा मॅप वरून वाद घालायच्या भानगडीत ते पडणार नाहीत.

व्यापारी युद्धात भारतात एक्स्पोर्ट होणाऱ्या मालावर चीनने किंमत वाढवायला सुरवात केली तर भारताने त्याच मालावर इम्पोर्ट ड्युटी वाढवून शह द्यायचा प्रयत्न केला.

हे सगळ चालूच होत आणि भारताने कठोर पाऊल उचलत डिजिटल व्यापारात चीनवर कुरघोडी करत जगप्रसिद्ध टिक टॉक सह ५८ ऍप्स वर बंदी घातली.

 

chinese apps ban inmarathi
zeenews.india.com

 

बंदी घातल्याच्या दुसऱ्याच दिवशी टिक टॉकचं ४५० करोडचं नुकसान झाल्याच्या बातम्या यायला लागल्या.

अन भारताने फेकलेला भाला बरोबर निशाण्यावर बसल्याचा अंदाज येऊ लागला. अन साहजिकच प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात.

एकीकडे अश्लील आणि धार्मिक भावनांचा सर्रास पणे खिल्ली उडवणारे कॉन्टेन बंद झाले म्हणून भारतातला एक मोठा वर्ग खुश होता.

तर अनेक बेरोजगार झाल्यामुळे टिक टॉक च्या बॅन वर अनेकांनी नाखुशी दाखवली. पण ऍप बॅन केलं म्हणजे काम झालं अशातला तर भाग नाही ना.

बॅन झालेल्या ऍप्स पैकी बरेचसे ऍप हे लोक आपल्या रोजच्या वापरात घेत होते. त्यामुळे त्याला चांगले पर्यायी ऍप असणे सुद्धा आवश्यक आहे. आणि होय त्याला पर्यायी अँप सुद्धा उपलब्ध आहेत.

तर बघूया बॅन झालेल्या ऍप्सना  उपलब्ध असलेले पर्यायी ऍप्स.

 

१. टिक टॉक, हॅलो, बिगो, वीगो, विमेट, क्वाय

पर्याय –

चिंगारी आणि मित्रो हे अँप याला पर्याय म्हणून वापरात येऊ शकते.

 

chingari and mitron inmarathi
kannada.news18.com

 

याचा युजर इंटरफेस अजून हवा तसा डेव्हलप झालेला नाही. पण टिक टॉक च्या बंदी नंतर डेव्हलपर यावर मेहनत घेत असल्याचे कळले आहे.

शिवाय इन्स्टाग्राम तर आहेच. टिक टॉक एवढाच किंबहुना टिक टॉक पेक्षा जास्त रिच हा इन्स्टाग्राम चा आहे.

याआधी सगळ्यात चर्चिले गेलेले डबस्मॅश सुद्धा याला उत्तम पर्याय आहे.

 

२. युसी ब्राऊजर, डियु ब्राऊजर, सीएम ब्राऊजर, अँपअस ब्राऊजर.

पर्याय –

सर्वाधिक वापरले जाणारे गुगल क्रोम हे याला उत्तम पर्याय आहे. शिवाय मोझिला फायरफॉक्स सुद्धा आहेच. विपीएन साठी तर मग ऑपेरा बेस्ट आहे.

 

chroma and firefox inmarathi
globessl.com

 

क्रोमचा युजर इंटरफेसला तर तोड नाही. क्रोम आणि फायरफॉक्स तर रोज नवीन नवीन फीचर्स ऍड करत आहेत.

 

३. युकॅम, ब्युटी प्लस, फोटो वंडर

पर्याय –

बी६१२ आणि फोटोलॅब हे या ऍप साठी उत्तम पर्याय आहेत. बी६१२ हे या बॅन केलेल्या ऍप सारखेच उत्तम फिल्टर लावलेले फोटो कॅपचर करत.

 

b612 photo lab inmarathi
in.pinterest.com

 

तर एडिट कारण्यासाठी फोटोलॅब हे उत्तम ऍप आहे.

 

४. शेअरइट, झेंडर

पर्याय –

सुपर बीम आणि फाईल्स गो. हे ऍप देखील तेवढ्याच स्पीड ने फाईल शेअर करण्यास सक्षम आहेत.

शिवाय, ड्रॉपबॉक्स, गुगल ड्राइव्ह सारखे उत्तम ऍप आहेतच जे स्टोरेज शिवाय लिंक थ्रू डेटा शेअर करण्यास सक्षम आहेत.

 

google drives inmarathi
securitynewspaper.com

 

 

५. ३६० सिक्युरिटी

पर्याय –

मुळात मोबाईलची ओएस ही व्हायरस प्रोटेक्शन साठी सक्षम आहे. त्यामुळे त्याला थर्ड पार्टी सिक्युरिटी ऍप ची गरज नाही.

 

avast mobile security inmarathi
techandgeek.com

 

तरी गरज वाटत असेल तर अवास्ट आणि बीट डिफेन्डर हे ऍप पर्याय म्हणून वापरू शकतो.

 

६. ऍप लॉक

पर्याय –

नॉर्टन ऍप लॉक हे ऍपच्या लॉक साठी उत्तम पर्याय आहे.

 

norton app lock inmarathhi
nortonsupportcentre.co.uk

 

आपल्या खाजगी गोष्टीच्या लॉक सिस्टीम साठी हे ऍप पासवर्ड, पॅटर्न प्लस फिंगरप्रिंटचा पण पर्याय देते.

७. कॅम स्कॅनर

पर्याय –

कॅम स्कॅनर ने मागे जेव्हा डेटा चोरायला सुरवात केली तेव्हाच मायक्रोसॉफ्ट यावर कामाला लागली आणि ऑफिस लेन्स अस्तित्वात आले.

शिवाय अँडोब स्कॅन हे लोकप्रिय स्कॅन ऍप आहेच. दोन्ही ऍप हवे तसे पीडीएफ फाईल स्कॅन करून देण्यास सक्षम आहेत.

 

adobe lense inmarathi
guidingtech.com

 

८. इएस फाईल एक्सप्लोरर

पर्याय –

मोबाईल मध्ये इन्बिल्ट आपल्याला फाईल एक्सप्लोरर मिळतो पण त्याचा युजर इंटरफेस एवढा खास नसतो.

तर इएस फाईल एक्सप्लोरर ला गुगल फाईल्स आणि फाईल कमांडर हे दोन छान पर्याय आहेत.

 

file commander inmarathi
play.google.com

 

दोन्ही ऍप हे फाईल मॅनेजमेंट आणि मेमरी मॅनेजमेंट उत्तमरीत्या करतात.

 

९. शेईन

कपडे खरेदी साठी महिला वर्गात हे ऍप भरपूर प्रसिद्ध होत.स्वस्त आणि वेगवेगळ्या डिझाईन ऑप्शन मुळे हे प्रसिद्ध होते.

पर्याय –

मिंत्रा, फ्लिपकार्ट, मॅक्स फॅशन सारखे एक सो एक ऍप याला पर्याय म्हणून उपलब्ध आहेत.

 

FLIPKART MYNTRA INMARATHI
indiatvnews.com

 

मोठमोठ्या ब्रँड चे सेल हे या ऍप वर सुद्धा मोठ्या प्रमाणात लागत असतात.

 

१०. एमआय व्हिडीओ कॉल

पर्याय –

आजच्या लॉक डाऊनच्या काळात व्हिडीओ कॉलिंग साठी अँप तसे कमी नाहीत.

व्हाट्सऍप, इन्स्टाग्राम, गुगल ड्युओ सारखे अनेक ऍप उपलब्ध आहेत.

 

google duo whatsapp inmarathi
guidingtech.com

 

११. वि मेट, वि चॅट

पर्याय –

व्हाट्सऍप सारखे प्रचंड लोकप्रिय ऍप असताना या कानव्हरसेशन ओरिएंटेड ऍप ची कोणाला गरज भासेल अस वाटत नाही.

शिवाय हाईक मेसेंजर सुद्धा आहेच.

 

hike inmarathi
bharatstories.com

 

१२. बाईडु ट्रान्सलेट

पर्याय –

अफकोर्स गुगल ट्रान्सलेट याहून बेस्ट ऍप कोणते मिळणार? तर बॅन झालेल्या चिनी ऍप्स ना भरपूर पर्याय उपलब्ध आहेत.

 

google translate inmarathi
youtube.com

 

त्यामुळे बॅन झालेल्या ऍप्स मुळे आपल्या रोजच्या मोबाईल वापरामध्ये काही फरक पडेल असे वाटत नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?