' या पठ्ठ्याने ऑलिम्पिक्समध्ये अनवाणी धावून सुवर्णपदक पटकवल्याची गोष्ट जगाला सदैव प्रेरणा देत राहील!

या पठ्ठ्याने ऑलिम्पिक्समध्ये अनवाणी धावून सुवर्णपदक पटकवल्याची गोष्ट जगाला सदैव प्रेरणा देत राहील!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

जगात असे उत्तम आणि एक से एक खेळाडू आहेत ज्यांच्याकडे आपण कधी फारसं लक्ष देत नाही. त्यांच्याबद्दल कुठे कधी काही वाचलं नाही.

पण खर तर या आपल्याकडून दुर्लक्षित झालेल्या क्रीडापटूनींच इतर कोणीही कधीच एवढी कामगिरी केली करणार नाही एवढी त्यांनी केली. अशाच एका दुर्लक्षित चॅम्पियनची ही एक छोटीशी कहाणी.!

इथिओपियाचा लेजंड अबेबे बिकिला हा आफ्रिकेचा पहिला विश्वविक्रम मोडणारा अ‍ॅथलीट, मॅरेथॉ रनर होता. आणि प्रथम इथिओपियन व सबसहारन आफ्रिकेचा होता ज्याने सुवर्णपदक जिंकल.

तो आफ्रिकेचा पहिलाच स्पोर्ट्स पर्सन होता ज्याने ऑलिम्पिकमध्ये दुहेरी-सुवर्णपदक जिंकलं आणि दोनदा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेकर अ‍ॅथलीट ठरला.

 

abebe bikila inmarathi
ethiosports.com

 

मॅरेथॉनमध्ये एकाच वेळी जगातील इतर कोणीही दोन ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकली नाहीत! आणि ते पण एकीकडे विश्वविक्रम मोडत.

अशीच आकडेवारी आणि सन्मान पुढे चालू राहतील. आणि या अबेबे बिकिलाच्या स्मरणार्थ बर्‍याच रचना आणि ट्रॉफी तयार केल्या आहेत.

अबेबे बिकिला यांचा जन्म ७ ऑगस्ट १९३२ मध्ये इथिओपियातील अमहरा प्रांताच्या सेमीयन शेवा भागातील जाटो गावामध्ये झाला.

एक स्पर्धात्मक धावपटू म्हणून बिकिला अंदाजे ६० किलोचा होता आणि त्याची ऊंची होती ५.१० सेमी. ऑरोमो नावाच्या मेंढपाळाचा हा मुलगा होता ज्याला बिकीला इथिओपियाच्या ऑलिम्पिक संघात शेवटच्या मिनिटाला घेतलं.

वडिलांना त्याने १९५० मध्ये सोडल्यानंतर तो जिरू गावातून आदिस अबाबा इथे आईकडे परत गेला. बिकीला या शहरामुळे प्रभावित झाला.

आणि बहुतेक सगळ्यांनी घातलेले व्यवस्थित कपडे, परिपूर्ण व शिस्तबद्ध अशा इम्पीरियल अंगरक्षकांना बघून तो सैन्यात सामील झाला. आणि १९५६ मध्ये तो खाजगी अंगरक्षक झाला.

आबेबे तरुण असतांना चांगला पोहणारा, कुशल घोडा चालक आणि हॉकी खेळाडू म्हणून ओळखला जायचा.

इथिओपियामध्ये अनवाणी धावून प्रशिक्षण घेतल्यानंतर, बिकीलांना युरोपियन मॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी दिलेली शूजची जोडी त्यांच्या मापाची नसल्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटलं.

 

abebe bikila 2 inmarathi
thevintagenews.com

 

म्हणूनच या २९ वर्षीय मुलाने इटलीच्या राजधानीच्या गजबजलेल्या रस्त्यावर पाय ठेवले.

मॅरेथॉनच्या शेवटच्या टप्प्यात बिकिला आणि मोरोक्कोचे लांब पल्ल्याचे धावपटू बेन अब्देसल्लाम यांनी आधीच बहुतांश पल्ला गाठलेला होता.

जेव्हा ते दोघे जिंकण्यासाठी संघर्ष करत होते तेव्हा या इथिओपियन धावपटूने अंतिम रेषेच्या ५०० मीटर पुढे २५ सेकंद आधीच विजय मिळविला.

बिकीला हा केवळ पहिला सुवर्णपदक जिंकणारा सबसहारन आफ्रिकन धावपटूच ठरला नाही तर त्याने २:१५:१६ ह्या विक्रमी वेळेत त्याने ४२ कि.मी. ची मॅरेथॉन पूर्ण केली.

नंतरच्या वर्षांत सिंगापुरच्या पी.सी.सपिय्या यांनी १९७२ च्या म्यूनिक ऑलिम्पिकमध्ये इंग्लंडच्या झोला बड यांनी १९८४ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये आणि केनिच्या टेगला लॉरूपे यांनी २००० च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये अनवाणी धावून मॅरेथॉन पूर्ण केली.

परंतु या कोणालाही पदक जिंकण्याच्या जवळही पोहोचता आल नाही.

रोमच्या या ऐतिहासिक सुवर्ण पदकानंतर चार वर्षांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये बिकीलाने त्याचाच विक्रम तीन मिनिटांनी मोडून काढला. पण यावेळी तो अनवाणी नव्हता.

 

abebe bikila olympic inmarathhi
youtube.com

 

ऑलिम्पिक मॅरेथॉन स्पर्धेच्या यशस्वीरित्या बचाव करणारा इथिओपियन रोड मास्टर हा पहिला अ‍ॅथलीट ठरला.

बिकीलाने १५ आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये भाग घेतला, त्यापैकी १२ मॅरेथॉन जिंकला आणि १९६३ मध्ये बोस्टन मॅरेथॉनमध्ये ५ वे स्थान मिळवले.

तो अथेन्स इथे १९६१ मध्ये शेवटच्या वेळी अनवाणी चालला.  २:२३:४५ या कालावधीत हीच स्पर्धा जिंकली.

बिकीलाचा अनवाणी धावून मेरेथोन पूर्ण करण्याच्या ५० व्या अॅनीव्हर्सरीचा प्रसंग अधिकच अविस्मरणीय ठरला. जेव्हा दुसरा इथिओपियन धावपटू सिराज गेना यांनी २०१० मध्ये रॉम इथे झालेल्या मॅरेथॉनमध्ये प्रथम स्थान पटकावल.

आपल्या देशाच्या नायकाच्या सन्मानार्थ आणि स्मरणार्थ, गेनाने शर्यतीच्या शेवटच्या ३०० मी मध्ये आपले बूट काढले आणि २:०८:३९ मध्ये अंतिम रेखा पार केली.

 

siraj gena inmarathi
news.bbc.co.uk

 

बिकीला त्याच्या आयुष्याची शेवटची शर्यत १९८६ मध्ये मेक्सिको सिटीमधील झालेल्या ऑलिम्पिकमध्ये धावला. परंतु दुखापतीमुळे तो बाद झाला होता.

सहकारी इथिओपियन ममो वोल्डेने सुवर्णपदक जिंकून आपल्या देशात सलग तिसरे ऑलिम्पिक जेतेपद आणले.

आज जेव्हा आपण इथिओपियन आणि केनियन धावपटू यांना लांब पल्ल्याच्या मॅरेथॉन जिंकताना पाहतो तेव्हा या स्पर्धा जिंकण्यासाठीचा पायंडा पाडणारा त्यांचा जनक हा अबेबे बिकीला हा होता हे विसरता कामा नये.

१९६९ मध्ये नियतीने असा उलटफेर केला की या दोनदा सुवर्णपदक जिंकणार्‍या धावपटुचा कार आपघात झाला.

त्यामध्ये तो जी कार चालवत होता ती त्याला इथिओपियाचा सम्राट हॅले सेलेसी याने त्याच्या कर्तृत्वाची ओळख म्हणून भेट दिली होती.

इंग्लंडमधील स्टोक मॅंडेविले हॉस्पिटलमध्ये सर्व वैद्यकीय उपचार करुन सुद्धा बिकीला हा पुन्हा पाय वापरू शकला नाही. धनुर्धारी म्हणून त्याला मनोरंजन व स्पर्धांमध्ये मर्यादित यश मिळाल.

त्याच्या बोटाचा वापर मर्यादित होता, त्याने आपल्या मनगटाने धनुष्य ताणलं आणि उजव्या हाताला डिझाइन केलेल्या हुकसह धनुष्य धरून ठेवले.

जुलै १९६९ च्या शेवटी व्हीलचेयर ऑलिम्पिकमधील नोव्हिस आर्चरी क्लासमध्ये बिकिलाने नववा क्रमांक मिळविला.

 

abebe bikila 3 inmarathi
bookofdaystales.com

 

१९७२ च्या म्यूनिच येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये त्याला पाहुणा म्हणून बोलावलं होत, जिथे सुवर्णपदक विजेता फ्रँक शॉर्टरचा त्याच्या हस्ते गौरव करण्यात आला. पण शेवटी त्याचे निधन झाले.

असे अनेक ऑलिंपिक वीर आहेत ज्यांची आपल्याला माहिती देखील नाहीये पण तरी त्यांनी छोट्याश्या गावातून येऊन स्वतःची क्रीडा क्षेत्रातील आवड जपणारे असे अनेक आहेत.

अशा खेळाडूंचा आदर आणि सन्मान करावा तेवढा कमीच आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?