' अभ्यासकांच्या मते, स्वप्नं लक्षात रहाणं स्व-विकासाठी महत्त्वाचं असतं! पण स्वप्नं लक्षात ठेवावी कशी? वाचा

अभ्यासकांच्या मते, स्वप्नं लक्षात रहाणं स्व-विकासाठी महत्त्वाचं असतं! पण स्वप्नं लक्षात ठेवावी कशी? वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘सपने मे मिलती है, ओ कुडी मेरी सपने मे मिलती है’… हे गाणं तर आपल्याला खूप आवडतं. पण, बऱ्याच वेळेस असं होतं की, आपल्याला एखादं स्वप्न पडतं आणि ते पूर्ण आठवतच नाही.

स्वप्नात दिसलेले काही प्रसंग तुकड्यांमध्ये आपल्याला आठवत असतात. त्या प्रसंगांना एकत्र केलं, तरी त्यातून काहीच कळत नाही.

 

dreams inmarathi1
cephuscorner.jadedragononline.com

 

कित्येकदा तर असं होतं की, आपण ज्या घरात आयुष्याची सुरुवातीची काही वर्ष घालवली किंवा सर्वात जास्त काळ आपण जगलो, तीच जागा आपल्याला स्वप्नात दिसत असते.

स्वप्न म्हणजे खरंच एक विचित्र गोष्ट आहे. एका मुलाखतीत शाहरुख खान गमतीने म्हणाला होता की, “मी झोपताना सुद्धा चांगले कपडे घालतो. स्वप्नात कोणी भेटायला आलं तर…”

स्वप्न लक्षात ठेवली जाऊ शकतात आणि त्यासाठी काय करावं लागतं यावर फार मोठा रिसर्च झालेला आहे. कारण, स्वप्न कळले म्हणजे आपल्याला आपलं सुप्त मन कळतं.  म्हणजेच subconscious mind मध्ये काय इच्छा दडल्या आहेत हे आपल्याला कळतं.

आपले स्वप्न लक्षात राहू लागले, की आपण वेगवेगळ्या परिस्थितीत आपण अगदी सहजपणे निर्णय घेऊ शकतो असं ही एक रिसर्च सांगतो.

तुम्हाला तुमचे स्वप्न कळले किंवा नाही जरी कळले, तरी ते तुमच्या सोबतच असते हे ही तितकंच खरं.

 

dreams-karma-part-1
ishafoundation.com

 

तुम्ही जर का पडल्यावर लगेच झोप लागणाऱ्या सुखी लोकांपैकी असाल तर तुम्हाला स्वप्न लक्षात राहणं थोडं अवघड जाईल.

अजून एक, तुम्ही जर का प्रत्येक वेळी अलार्म लावूनच झोपेतून उठत असाल, तरी सुद्धा तुम्हाला तुमचे स्वप्न लक्षात ठेवणं अवघड जाईल. मग, काय करावं लागेल ज्याने तुम्हाला तुमचे स्वप्न लक्षात राहतील ?

 

१. नियमित वेळी झोपा :

 

guy sleeping inmarathi
shutterstock.com

 

झोपण्याची वेळ ठरवलेली असली आणि ती पाळली, की झोप लागण्याआधी थोडा वेळ मिळतो. हा वेळ निवांत आणि शांत असतो. रोज एकाच वेळी झोपण्याचा प्रयत्न करा.

असं केल्याने तुम्हाला काही दिवसांनी आपोआप त्यावेळेस झोप येईल.

आपला लॅपटॉप कसा आपण shutdown केला तर तो चांगला राहतो. प्रत्येक वेळी त्याचा फक्त flap बंद केला तर तो सगळ्या फाईल्स व्यवस्थित बंद करत नाही, तसंच आपल्या मेंदूचं सुद्धा आहे.

 

२. थोडं जास्त वेळ झोपा :

 

indian guy sleeping inmarathi
indiatimes.com

 

झोपेची गरज ही प्रत्येक शरीराची वेगवेगळी असते. विज्ञानाच्या दृष्टीने तुम्हाला किमान ६ तास झोप आवश्यक आहे.

पण, तुम्ही जर ही वेळ ८ तासांपर्यंत वाढवू शकलात, तर झोप चांगली होईल आणि तुम्हाला स्वप्न चांगली पडतील आणि ते लक्षातही राहतील.

कारण, झोपेच्या पहिल्या ४ ते ६ तासात पडलेले स्वप्न हे दैनंदिन घटनांशी निगडित असतात. खरी स्वप्नं पडतात, ती झोप जास्त घेतल्यावर.

 

३. जाग येण्यात आणि उठण्यात थोडं अंतर ठेवा :

 

sleepy girl inmarathi
masterfile.com

 

जाग आली, की लगेच उठू नका. थोडा वेळ द्या आणि स्वप्न पूर्ण आठवत आहे का हे बघा.

हे तुम्ही weekend ला नक्कीच ट्राय करू शकता, जेव्हा तुम्हाला सकाळी पटकन उठून बस किंवा लोकल पकडायची नाहीये.

 

४. स्वतःला हे सांगा :

 

Lucid_Dream inmarathi
MELmagzines.com

 

“मला माझे स्वप्न लक्षात ठेवायचे आहेत. या सूचना जेव्हा आपण शरीराला देतो, तेव्हा आपलं शरीर, मेंदू त्या दिशेने काम करायला लागतो. तेव्हा या  सूचना झोपायच्या आधी शरीराला द्या.

तुमचा मेंदू हा तुम्ही दिलेल्या सूचना पाळत असतो. आणि हे सांगताना सकारात्मक भाषा वापरा जसं की, “होय, मी स्वप्न लक्षात ठेवू शकतो/शकते.”

 

५. लिहून काढा:

 

writing inmarathi
HaresfieldSchool.com

 

सकाळी उठल्यावर तुम्हाला पडलेलं स्वप्न लिहून काढा. त्यासाठी तुम्ही झोपता त्या ठिकाणी एक नोटपॅड आणि पेन असू द्यावा.

तुम्हाला लिहिण्याचा कंटाळा येत असेल तर स्वप्नात जे काही दिसलं, ते स्वतःच्या आवाजात बोलून रेकॉर्ड करा.

असं काही दिवस केलं, तर तुमची स्वप्नं तुम्हाला नक्की लक्षात राहू शकतात.

यामध्ये एकच काळजी घ्यावी की, प्रत्येक स्वप्न लिहायचा प्रयत्न करू नये. काही स्वप्न ही भीतीदायक सुद्धा असतात. ती भीती नकळत तुमच्या मनात जाऊ नये म्हणून ही काळजी घेणं गरजेचं आहे.

 

६. निसर्गाचं निरीक्षण करा:

 

open window inmarathi
learnreligions.com

 

आपल्या खिडकीतून तर का एखादा चांगला view असेल तर त्याकडे थोडं लक्ष देऊन बघा. तुमची निरीक्षण शक्ती चांगली असेल, तर स्वप्नं आठवण्यासाठी तुम्हाला कमी मेहनत घ्यावी लागेल.

खिडकीतून बाहेर बघताना निसर्गात जाणवणारे छोटे- छोटे बदल लक्ष देऊन नजरेत साठवा.  नकळत तुम्हाला स्वप्नात काय दिसलं होतं ते आठवेल.

 

७. ड्रीम अँकर

 

daydream inmarathi

 

तुम्ही ही पद्धत सुद्धा वापरू शकता.

यामध्ये कोणतीही एक वस्तू ठरवा जी तुम्हाला डोळे उघडल्यावर सर्वात पहिल्यांदा दिसेल. काही दिवस त्या वस्तूला तुमचं स्वप्न सांगा. तुम्हाला काही दिवसांनी त्या वस्तूकडे सकाळी बघितल्यावर तुमची स्वप्न आठवतील.

अजूनही उपाय आहेत जसं की, झोपताना थोडं जास्त पाणी प्यायलं तरी तुमची झोप सावध असेल आणि नंतरही तुम्ही स्वप्नात बघितलेल्या गोष्टी तुम्हाला दिसतील.

कधी कधी दिवसाची छोटी झोप ज्याला आपण power nap म्हणतो ती घेत जा. त्या झोपेतील स्वप्नं ही आठवायला सोपे असतात.

तुम्हाला प्रश्न पडला असे,ल की हे सगळं करायचं कशासाठी? तर स्वतःचे स्वप्न कळण्यासाठी आणि त्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी प्रयत्न करण्यासाठी.

अर्थात, उघड्या डोळ्यांनी बघितलेली स्वप्नं जास्त महत्वाची असतात आणि ती आधी पूर्ण करायची असतात या गोष्टीमध्ये मात्र तिळमात्र शंका नाही, पण स्वतःला ओळखण्यासाठी तुम्हाला हे उपाय मदत करतील.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?