' महाभारतात पांडवांच्या बाजूने लढणाऱ्या ‘अज्ञात कौरवा’ची गोष्ट! – InMarathi

महाभारतात पांडवांच्या बाजूने लढणाऱ्या ‘अज्ञात कौरवा’ची गोष्ट!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्या या संस्कृतीत रामायण हे आदर्शवाद आणि महाभारत हा वास्तववाद मानला जातो!

जसं रामायणात राम मनुष्य जातीतील एक आदर्श उभा करून देतो तसेच महाभारतात आपल्याला स्वभावातले द्वेष, कपट, इर्षा असे वेगवेगळे पैलू समोर येतात!

महाभारतात विजय जरी पांडवांचाच झाला असला तरी कौरव आणि पांडव यातले प्रत्येक पात्र हे खूपच महत्वाचे आहेत तशाच महाभारतातल्या काही कथा किंवा दंतकथा देखील तितक्याच महत्वाच्या आहेत!

महाभारतातील याच एकूण एक कथा आपण निरनिराळ्या निमित्ताने, अगदी लहानपणापासून ऐकत आलोय!

 

mahabharat 2 inmarathi

 

या कथांतून आपल्याला शिकायला सुद्धा बरंच काही मिळतं!

पण काही काही कथा अशा आहेत, ज्या आपल्या मनावर इतक्या स्पष्टपणे कोरल्या गेल्या आहेत की त्या विसरणं हे कधीच शक्य नाही. कारण त्या कथाच इतक्या रंजक आहेत की आपण आजही त्यात रममाण होऊ इच्छितो!

अशाच एका गोष्टीविषयी आपण जाणून घेणार आहोत!

व्यासांनी दिलेल्या वरदानामुळे अतिशय चमत्कारिकरित्या दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर गांधारीने १०० पुत्रांना जन्म दिला, ही गोष्ट बहुधा सगळ्यांना माहित असावी.

पण तुम्हाला माहित आहे का – कौरवांना एक बहिण (दुःशला) आणि अजून एक भाऊ होता… त्याचे नाव होते युयुत्सु…!

हा १०१ वा कौरव होय. पण ज्याप्रमाणे इतर १०० कौरवांना असत्याचे पुजारी मानलं जातं, तेथे या १०१ व्या कौरवाला मात्र महाभारत सत्याच्या बाजूने लढणारा योद्धा म्हणून ओळखतं.

चला जाणून घेऊया या अज्ञात कौरवाची कहाणी!

 

yuyutsu-marathipizza00

 

हा युयुत्सु म्हणजे कौरवांचा सख्खा भाऊ नव्हता. जेव्हा गांधारी गरोदर होती तेव्हा धृतराष्ट्राची काळजी घेण्यासाठी सुखदा नावाची एक दासी नेमण्यात आली होती.

व्यासांनी दिलेल्या वरदानानंतर दोन वर्षांचा कालावधी उलटल्यावरही गांधारीला पुत्र होत नाही हे पाहून धृतराष्ट्र चिंताग्रस्त झाला. आपला वारस म्हणून त्याला पुत्र हवा होता.

याच आशेने त्याने सुखदा दासी सोबत संबंध ठेवले. या संबंधातून जो पुत्र झाला, तोच दासीपुत्र युयुत्सु होय.

युयुत्सु हा हुशार होता, त्याला खऱ्या-खोट्याची जाण होती. दुर्योधनाला देखील तो चांगलाच ओळखून होता. दुर्योधनाने रचलेल्या कटकारस्थानांबद्दल त्याला ठाऊक होतं.

कौरवांच्या असत्याच्या मार्गाला कंटाळलेल्या सत्यवचनी युयुत्सुने पांडवांसाठी गुप्तहेराचे (खबरी) काम केले. तो वेळोवेळी पांडवाना कौरवांच्या गोटातील माहिती पुरवत असे.

त्यामुळे अनेक संकटातून पांडव सहीसलामत बाहेर सुटले.

 

yuyutsu-marathipizza01

 

जेव्हा खऱ्या अर्थाने महाभारताला सुरुवात झाली, त्यावेळेस महाभारतामध्ये कौरव आणि पांडवांच्या बाजूने अनेक वीर लढत होते.

संपूर्ण भारतवर्षातील योद्धे या युद्धामध्ये सहभागी झाले होते आणि कोणाला कोणाच्या बाजूने लढायचे आहे हे ठरवण्याचा स्वतंत्र अधिकार होता.

बऱ्याच जणांनी कौरवांची भलीमोठी सेना पाहून त्यांच्याच बाजूने लढण्याचा निर्णय घेतला होता. युयुत्सुने देखील बंधूआज्ञेचे पालन करीत कौरवांच्या बाजूने रणांगणावर उतरणे अपेक्षित होते – परंतु –

त्याने अतिशय जाणीवपूर्वक विचार करून पांडवांना साथ दिली. जे सत्य आहे त्याचेच पालन करीत तो पांडवांच्या बाजूने रणांगणावर उतरला.

त्याने या युद्धामध्ये कमालीचे युद्ध कौशल्य दाखवले.

१८ दिवसांनंतर जेव्हा महाभारत संपले तेव्हा हा युयुत्सु -धृतराष्ट्राचा शेवटचा पुत्र म्हणजेच एकमेव कौरव जिवंत होता. बाकी इतर १०० कौरवांना पांडवानी यमसदनी धाडले.

 

yuyutsu-marathipizza02

या मंदिरांमध्ये प्रसाद म्हणून मिळते चिकन बिर्याणी, फिश करी…!

पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे युयुत्सुच्या नशिबी तुसडे बोलच आले.

रामायणामध्ये ज्याप्रमाणे विभीषण सत्याच्या अर्थात प्रभू रामाच्या बाजूने लढला म्हणून त्याला राजद्रोही ठरवले त्याचप्रमाणे युयुत्सुला देखील लोकांनी राजद्रोही ठरवले.

आपल्या सम्राटावर मागून वार करणारा म्हणून त्याला हिणवले. त्याचा तिरस्कार करणाऱ्यांनी त्याला कधीही आपल्यातले मानले नाही.

कृष्णअवतार संपल्यावर कलियुगाची सुरुवात झाली आणि पांडवांनी राजसत्तेचा त्याग करून हिमालयामध्ये प्रस्थान करण्याचे ठरवले.

जाण्यापूर्वी युधिष्ठिराने अर्जुनाचा नातू आणि अभिमन्यूचा पुत्र परीक्षित याला हस्तिनापुराचा राजा केले. परंतु जोवर त्याला जाण येत नाही तोवर राज्याचा संपूर्ण कारभार हा युयुत्सुच्या हवाली केला.

 

yuyutsu-marathipizza03

 

आपल्या नीतीमूल्यांचे पालन करीत सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देणारा युयुत्सु त्याच्या अनोख्या कहाणीमुळे महाभारतामधील स्वत:च्या पात्राचे एक अढळ स्थान निर्माण करतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?