' हत्तीच्या सहवासात लहानाचा मोठा झालेल्या ह्या माणसाने नकळत चित्रपटसृष्टीत खूप मोठी भर घातली! – InMarathi

हत्तीच्या सहवासात लहानाचा मोठा झालेल्या ह्या माणसाने नकळत चित्रपटसृष्टीत खूप मोठी भर घातली!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

फिल्म इंडस्ट्री म्हंटल की आपल्यासमोर बॉलिवूड, टॉलीवूड आणि हॉलिवूड असे शब्द येतात! त्यातील टोलीवूड ही जगातली सर्वात जास्त सिनेमा बनवणारी इंडस्ट्री मानली जाते, हॉलिवूड ही खास करून वर्ल्ड क्लास सिनेमांसाठी आणि प्रगत तंत्रज्ञानासाठी ओळखली जाते!

तर बॉलिवूड हे अजूनही कुठंतरी अंधारात चाचपडताना दिसत आहे!

जुने हिंदी सिनेमा आणि सध्याचा हिंदी सिनेमा यात प्रचंड फरक आहे हे आपल्याला जाणवेल! जसा सिनेमांमध्ये फरक आहे तसाच त्यात काम करणाऱ्या कलाकारांमध्ये सुद्धा प्रचंड फरक आपल्याला आढळून येईल!

हॉलीवूड मध्ये काम करणाऱ्या भारतीय कलाकारांबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपल्याला काही निवडक नावं डोळ्यासमोर येतात. जसं की, प्रियांका चोप्रा, दिपीका पदुकोण, ओम पुरी, इरफान खान वगैरे.

 

bollywood stars hollywood inmarathi
indianexpress.com

 

या लोकांनी भारताचा झेंडा हॉलीवूड मध्ये उंच फडकवला आहे. पण, या ट्रेंड ची सुरुवात करणाऱ्या कलाकाराचं नाव फार कमी लोकांना माहीत असेल.

त्यांचं नाव आहे ‘साबू’. ज्यांना की म्हैसूर चे ‘Elephant Boy’ या नावाने सुद्धा ओळखलं जातं.

आपण बघितलेलं आणि प्रचंड प्रेम केलेलं ‘जंगल बुक’ या सिरीयलची प्रेरणा ज्या सिनेमातून मिळाली त्या १९४२ मध्ये तयार झालेल्या हॉलीवूड च्या ‘जंगल बुक’ या सिनेमात मोगली ची भूमिका साकारण्याचा मान हा आपल्या या भारतीय कलाकाराला मिळाला होता हे वाचून आपल्याला नक्कीच आनंद वाटेल.

थोडं फ्लॅशबॅक मध्ये जाऊया आणि या कलाकाराबद्दल जाणून घेऊया :

साबू शेख चा जन्म १९२४ मध्ये म्हैसूर मध्ये झाला होता. त्याच्या वडिलांचं नाव ‘महाराजा’ असं होतं.

साबू १३ वर्षांचा असताना Robert Flaherty हे ब्रिटिश दिगदर्शक ‘Elephant Boy’ या सिनेमाची कास्टिंग करण्यासाठी म्हैसूर ला आले होते.

रॉबर्ट यांनी ‘साबू’ ला हत्ती चालवताना बघितलं आणि त्यांना हे खूप अद्भुत वाटलं. त्यांनी साबू ला लीड रोल मध्ये घेण्याचं ठरवलं. त्याची शुटिंग सुद्धा त्यांनी भारतातच केली.

 

sabu sheikh inmarathi
cinema.ucla.edu

 

हा सिनेमा खूप हिट झाला. प्रेक्षक आणि समीक्षक दोघांनाही साबूचा नैसर्गिक अभिनय फारच आवडला!

‘Elephant Boy’ चे निर्माते ‘झोल्टन कोरडा’ यांनी साबू ला लंडन ला नेण्याचं ठरवलं. साबू ची लोकप्रियता वाढत होती. Korda यांनी साबू ला अजून काही सिनेमात काम करण्यासाठी साईन केलं.

त्यात प्रामुख्याने होती १९३८ मध्ये रिलीज झालेली ‘The Drum’ जो की या दिगदर्शकाचा पहिला कलर सिनेमा होता.

या सिनेमा नंतर साबू ला मायकेल पॉवेल या दिगदर्शकाने १९४० मध्ये रिलीज झालेल्या ‘The Thief of Bagdad’ या सिनेमात घेतलं. हा सिनेमा साबू ला खरी ‘ओळख’ देणारा ठरला.

या सिनेमाची शुटिंग ही इंग्लंड आणि अमेरिका मध्ये झाली होती. या सिनेमाला अकॅडमी अवॉर्ड फॉर स्पेशल इफेक्ट्स, सिनेमॅटोग्राफी आणि आर्ट डायरेक्शन हे अवॉर्ड मिळाले होते.

१९४२ मध्ये पूर्णपणे हॉलीवूड मध्ये शुटिंग झालेल्या ‘द जंगल बुक’ या सिनेमात साबू ला मोगली चा लीड रोल मिळाला. या संधीचं देखील साबू ने सोनं केलं होतं.

 

jungle book inmarathi
moriareviews.com

 

आता साबू चा ‘Kordas films’ सोबत चा करार संपला होता. तेव्हा त्याने Universal Pictures या कंपनी सोबत करार केला. आता साबू हा हॉलीवूड मध्ये ‘स्टार’ झाला होता.

हॉलीवूड मधील पुढच्या करिअर मध्ये साबू ने ‘अरेबियन नाईट्स’, ‘White Savage’, ‘Cobra Woman’, ‘Tangier’ या सिनेमात मुख्य भूमिका केल्या. १९४४ मध्ये साबू ने अमेरिकेचं नागरिकत्व स्वीकारलं.

साबू ने त्यानंतर अमेरिकन एअरफोर्स जॉईन केली. त्यामध्ये सुद्धा साबू च्या कामाचं कौतुक पुरस्काराने करण्यात आलं. या सगळ्यांमध्ये अभिनय थोडा मागे पडत चालला होता.

दुसऱ्या महायुद्धा नंतर साबू ला इंग्लंड मध्ये ज्या तोडीचे रोल मिळाले होते तसे रोल आता अमेरिकेत ऑफर होत नव्हते. साबू ला सपोर्टिंग रोल्स मिळत होते.

Black Narcissus आणि Tangier या सिनेमात साबू ला सपोर्टिंग रोल्स मध्ये काम मिळालं. १९४७ मध्ये रिलीज झालेल्या ‘The End of the River’ मध्ये लीड रोल केला होता.

 

sabu sheikh inmarathi 2
thebetterindia.com

 

पण, हा सिनेमा विशेष चालला नव्हता. त्यानंतर साबू परत हॉलिवूड मध्ये गेले.

१९४८ मध्ये रिलीज झालेल्या Kumaon मध्ये साबू ने लीड रोल केला होता.

त्यानंतर ‘The Song Of India’ या सिनेमाच्या शुटिंग च्या वेळी Marilyn Cooper यांची भेट झाली, दोघं प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न सुद्धा केलं.

१९५० च्या दशकात साबू हे भारतात आले आणि त्यांनी मेहबुब खान यांच्या १९५७ मधील ‘मदर इंडिया’ मधील ‘बिरजू’ चा रोल मिळवण्यासाठी प्रयत्न केला.

पण, तो रोल शेवटी सुनील दत्त यांना मिळाला. अमेरिकेचं नागरिकत्व असल्याने भारतात काम करण्याची परवानगी मिळाली नाही असंही कारण सांगण्यात आलं होतं.

 

mother india inmarathi
willylogan.com

 

२ डिसेंबर १९६३ रोजी साबू यांचं हृदयविकाराने निधन झालं. त्यावेळी ते लॉस इंजेलीस इथे होते. डॉक्टर च्या म्हणण्यानुसार साबू यांची तब्येत अगदी ठणठणीत होती.

पण, तरीही फक्त ३९ व्या वर्षी अचानक झालेल्या या निधनाने साबू शेख यांचा परिवार, हॉलीवूड इंडस्ट्री या सर्वांनाच धक्का बसला होता.

साबू शेख यांचे सिनेमे त्या काळातील लोकांना आज ही आवडतात आणि साबू ने एका तरी हिंदी सिनेमात बघायची इच्छा मात्र त्यांच्या चाहत्यांची अधुरीच राहिली.

साबू च्या करिअर बद्दल वाचताना आपण एक भारतीय माहूत आंतरराष्ट्रीय फिल्म स्टार झाला या गोष्टीचा अभिमान नक्कीच वाटू शकतो.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?