' सारखं "तोंड येतंय"? तोंडाच्या अल्सरची कारणं, कायमचा फुल्ल स्टॉप लावणारा उपचार!

सारखं “तोंड येतंय”? तोंडाच्या अल्सरची कारणं, कायमचा फुल्ल स्टॉप लावणारा उपचार!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम

===

अस्सल खवय्ये लोकांची फर्स्ट आणि लास्ट तक्रार म्हणजे ‘तोंड येणे’. एकवेळ अपचन झालं तर त्या सोबत तडजोड करून ते निस्तारता येईल. पण तोंड येणे म्हणजे अवघड विषय.

केवळ तोंड येणं एवढाच प्रॉब्लेम नाही.

तर त्यासोबत काही खाल्लं की जिभेची आणि हिरड्यांची जळजळ होणे, जिभेला आंबट आणि तिखट चव सहन न होणे, गिळताना त्रास होणे असे कैक आजार आणि त्रास हे एकमेकांशी जुळलेले आहेत.

हे दुखणं फार मोठे जरी नसले तरी होणारा त्रास हा भयंकर असतो.

शरीराच्या आतमध्ये चाललेल्या प्रोसेस मध्ये काही बाधा आली की शरीराच्या इंद्रियांवर त्याचा परिणाम दिसायला सुरवात होते हे वेगळं सांगायला नको.

तोंड येणे हे शारीरिक बदलाची एक झलक असते. तोंडात हलके दुखायला लागते आणि थोडीफार सूज यायला सुरुवात होते.

मुख्य म्हणजे तोंडाच्या आतील त्वचेला इजा झाल्यामुळे हे प्रकार घडतात. कारण तोंडाच्या आतील त्वचा ही अत्यंत नाजूक आणि संवेदनशील असते.

 

mouth ulcer inmarathi
cirrocodentalcenrepa.com

 

वैद्यकीय औषधोपचार करून यावर आळा घालू शकतो.पण सतत होणाऱ्या या अल्सर च्या त्रासाला रक्त तपासणी करून कारण शोधणे गरजेचे असू शकते.

तर, तोंड येणे म्हणजे नेमके काय? जस वर पाहिलं की तोंडाच्या आतील त्वचेला इजा झाली की हा त्रास सुरू होतो.

तोंडाच्या आतील त्वचेला वैज्ञानिक भाषेत म्युकस मेम्बरेन म्हणतात. याला झालेली इजा प्राणघातक तर नसते पण सहन करण्याइतपत सुद्धा नसते.

गाल किंवा ओठांच्या आतल्या बाजूस या अल्सरचे होण्याचे प्रमाण जास्त असते. तोंड येणे किंवा अल्सर याचे लक्षणे पुढील प्रमाणे,

तोंडाच्या आत हलक्या लाल रंगाचे चट्टे, बोलताना किंवा खाताना वेदना होणे, तोंडात होणारी जळजळ, तोंडात लाळ सतत जमा होणे, थंड खाद्यपदार्थ घेतल्यास दाह कमी होणे.

तोंड येणे तसे आठवड्या भरात किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत योग्य पथ्य पाळल्यावर बरे होऊन जाते. परंतु जास्तच त्रास होत असेल तर डॉक्टरांना दाखवणे अनिवार्य आहे.

तोंड येण्याचे नेमके कारण काय?

तोंड येणे हे एक प्रकारे नाही म्हटले तरी शरीरात निर्माण होणाऱ्या अतिरिक्त उष्णतेचे प्रतीक आहे. या उष्णता वाढण्याचे अनेक कारणे असू शकतात. जसे, एखाद्या आजारावर दीर्घकाळ औषध घेणे आणि त्याचा साईडइफेक्ट.

तंबाखू, चहा, कॉफी सारखे निकोटिन युक्त पदार्थांचे अतिसेवन. अतिप्रमाणात तेलकट आणि मसालेदार जेवणाचे-पदार्थाचे सेवन.

 

tea coffee cigerette inmarathi
steemit.com

 

पचना संबंधित त्रास असल्यावर सुद्धा तोंड येण्याची समस्या उद्भवू शकते.विशेष करून पोट साफ न होण्याच्या तक्रारी. आणि सर्वाधिक प्रभाव पडतो तो जीवनसत्त्वांचा अभावामुळे.

आता यावर उपाय म्हणून काय करू शकतो?

तोंड येणे किंवा तोंडाच्या अल्सर ला घरघुती उपचार सुद्धा उपलब्ध आहेत. पण डॉक्टरांचा सल्ला घेणे निश्चितचं उजवे ठरेल.

•डॉक्टरांच्या सल्ल्याने स्टिरॉइड नसलेल्या औषधांचा वापर.

•तोंडाच्या स्वच्छतेसाठी अँटीसेप्टिक लिक्विड आणि जळजळ किंवा दाह शमवण्यासाठी मलम.

•अल्सर का होत आहे याचे निदान झाल्यावर त्या विशिष्ट आजारावर योग्य ती ट्रीटमेंट करावी.

•संक्रमण मार्गे जर अल्सर होत असेल तर तत्सम प्रतिजैविक औषधांचा वापर.

•व्हिटॅमिनची कमतरता असल्यास त्यासंबंधीत योग्य त्या गोळ्या. उदाहरणार्थ व्हिटॅमिन बी साठी बी कॉम्प्लेक्स च्या गोळ्या.

 

b complex inmarathi
express.co.uk

 

•तोंडाच्या कर्करोगी साठी मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेणे अनिवार्य आहे.

शरीरासंबंधीत आजार हे आपल्या डेली लाइफस्टाइल वर अवलंबून आहे. जर त्याच्यात आपण बदल केला तर अल्सर सारख्या आजारांवर कायमचा फुल्ल स्टॉप लागू शकेल.

अल्सर होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो?

•तोंड येण्याची लक्षणे जर दिसायला लागली तर आहारात कमी दाह आणि तिखट पदार्थांचा वापर वाढवावा.

नारळपाणी, थंड दूध-दही सारख्या पदार्थांचा वापर वाढवावा.

•संपूर्ण पोषक द्रव्य आपल्या आहारातून शरीरात जातील अशा डाएट प्लॅनचा अवलंब करावा.

•जेवणाची वेळ ठरवून त्यानुसार जेवण घ्यावे.

•व्हिटॅमिन ए,सी आणि ई सारख्या अँटीऑक्सिडंट ने भरपूर अशा फळांचा वापर आहारात करावा. पपई, आंबे, गाजर, बदाम, आवळा इत्यादी.

 

vitamins inmarathi
newsnationtv.com

 

•पुरेशी झोप तर आवश्यक आहेच.

•भरपूर पाणी प्या. ज्यामुळे शरीरातील दाह कमी होण्यास मदत होईल आणि बॉडी टेम्परेचर मर्यादेत राहील.

•आणि मुख्य म्हणजे तोंडाची स्वछता ही नियमित करावी.

काय करू नये?

•मसालेदार आणि आम्लयुक्त भोजन टाळावे.

•सोड्याचा कमीत कमी वापर.

•धूम्रपान आणि मद्यपान टाळावे.

•जास्त गरम आणि जास्त थंड पेय/पदार्थ खाण्याचे टाळावे.

 

eating ice creaam inmarathi
medicalnewstoday.com

 

•दातांना,हिरड्याला आणि पर्यायाने तोंडाला इजा होणार नाही अशा टूथब्रश आणि पेस्टचा वापर टाळावा.

मोठ्या इंडस्ट्री मध्ये नुकसान झाल्यावर किंवा काही प्रोसेस तक्रारी निर्माण झाल्यावर क्वालिटी प्रोसेस मध्ये व्हाय-व्हाय मेथड वापरली जाते. आणि त्यानुसार त्यावर निदान शोधले जाते.

तसेच आपल्या आजारावर पण असेच व्हाय-व्हाय प्रोसेस वापरून आपण त्याच्या मुळापर्यंत जाऊ शकतो. आणि बरेचसे प्रश्न आपण सोडवू शकतो.

तर, योग्य जीवनपद्धती अवलंबून अल्सर सारख्या त्रासाला आपण लांब ठेवूच.

आणि जरी त्रास उद्भवलाच तर उपचार करताना आपण नेमके काय करत आहोत आणि का करत आहोत याची पुरेपूर कल्पना आपणास राहील.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?