' लॉकडाउनमध्ये “केक” करण्याचा प्रयत्न फसलाय? या टिप्स वापरल्यात तर केक बनवणं आहे खूप सोप्पं – InMarathi

लॉकडाउनमध्ये “केक” करण्याचा प्रयत्न फसलाय? या टिप्स वापरल्यात तर केक बनवणं आहे खूप सोप्पं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

===

केक…किती प्रकारचे असतात!!! बेकरीमध्ये गेलं, की दिसणारे कप केक, स्लाईस केक, कोल्ड केक, पेस्ट्रीज हे आपल्या जीभेला चाळवायचं काम करतात. त्यावरची सजावट पाहून त्याच्या मोहात पडायला होतंच.

घरी नेऊन खाऊ म्हटलं, तरी घरी गेल्यावर ठेवायला पण होत नाही. घरी नेल्यावर पाचव्या मिनिटाला केकचा फडशा पाडला जातो. म्हणजे मनमुराद आस्वाद घेणं होतंच नाही.

 

girl eating cake inmarathi
ahchealthenews.com

 

कधीकधी एखादी आपत्ती येते आणि कधीकधी आपल्याही नकळत आपल्याला किती तरी काही शिकवून जाते. कोरोनानं जगभर थैमान घातलं आहे. जगभरातील बऱ्याच देशांत लाॅक डाऊन जाहीर करण्यात आलं.

बहुतेक सगळे लोक घरात बंद झाले. रोजची आॅफीस गाठायची पळापळ थांबली. हाताशी खूप मोकळा वेळ मिळाला.

या मिळालेल्या मोकळ्या वेळामध्ये, वेळ सत्कारणी लावण्यासाठी बहुतेक सर्व जणांनी वेगवेगळ्या प्रकारची कामं चालू केली. त्यात बहुतांश घरकामात आईला, बायकोला मदत होती.

इतक्या दिवसांत स्त्रीयांना सुध्दा नोकरीची वेळ गाठायची असायची, त्यामुळे इच्छा असूनही मनाप्रमाणे हवे ते मुलांना आवडणारे पदार्थ करायला जमत नव्हते, ते आता करायची संधी मिळाली.

महिलांनी वेगवेगळ्या प्रकारच्या पाककृती करायला सुरुवात केली आणि त्यांचे फेसबुकवर, व्हाॅटस्अपवर स्टेटसही अपडेट केले. नवे पदार्थ करताना कधी जमले कधी फसले. पूर्वी घरी केवळ मोजकेच केकचे प्रकार केले जात.

 

cake baking inmarathi2
happyfoodstube.com

 

पण या लाॅक डाऊनच्या निमित्ताने वेगवेगळ्या केकची रेसिपीही महिलांनी करुन पाहिली. अगदी आपले सेलिब्रिटी सुध्दा यात मागे नाहीत. त्यांनी तर भांडी घासलेले व्हिडिओ सुद्धा पोस्ट केले होते.

शेवटी जान है तो जहान है. घरी राहणं, सुरक्षित राहणं हे महत्त्वाचं आहे ना!!! पण घरात नुसतं बसून बसून किती बसणार.. कंटाळा येईल इतकीही सुट्टी मिळू नये कुणाला. पण त्यावरही लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे मात केली.

वेगवेगळ्या रेसिपीज करताना केकसुध्दा केले. पण ते केक बेकरीसारखे साॅफ्ट झाले होते का? नाही? बरं… बिघडले होते? हो? ठिक आहे. 

 

cake baking inmarathi6
reddit.com

 

कोणताही पदार्थ करताना अचानक केला तर तो बिघडतोच.‌ काहीतरी कमी होतं..काहीतरी जास्त होतं. मग तो पदार्थ फसतोच.

हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली.. ..पण खरी सुगरण ती जी बिघडलेला पदार्थ पण खुबीने सुधारते. घरादाराची रसना तृप्त करते.

इतर पारंपरिक पदार्थ आपण हौसेने शिकतो, करतो, खायलाही घालतो. पण आजकालच्या पिढीला नवे पदार्थ जसं पिझ्झा, पास्ता, नुडल्स आवडतात आणि ते घरीही केले जातात.

आजही केक करताना गृहिणी खूपदा विचार करतात, नाही जमला तर? वेळ, श्रम पैसा वाया जाणार त्यापेक्षा विकत आणून खाल्लेला बरा, पण या टिप्स तुमचा केक नक्कीच छान करतील.

 

१. योग्य ते घटक पदार्थ मापातच घ्या –

 

cake baking inmarathi4
seriouseats.com

 

नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक पदार्थ तयार करण्याची एक हातोटी असते. चमचे, वाटी ही घरगुती मापाची साधनं आहेत. आपल्या घरात काही वजनकाटा नसतो. पण जी घरगुती साधनं आहेत ती साधारण मापाची असतात.

साधारणपणे एका वाटीत १२५ ग्रॅम, कपात १५० मिली पदार्थ अंदाजे बसतात. तर केक करताना तुम्ही जे घटक पदार्थ घेता ते मोजून मापून घ्या.

अंदाजे किंवा आडमापी केलेला कोणताही पदार्थ फसू शकतो, पण मापून केलेले पदार्थ सहसा बिघडत नाहीत.

हे झालं मापाबद्दल, पण त्याइतकंच महत्त्वाचं म्हणजे घटक पदार्थ. ते जे सांगितले आहेत ते आणि तेच घ्या. लोण्याऐवजी तूप…किंवा त्याच्या ऐवजी हे असं करु नका.

योग्य पदार्थ योग्य मापातच घ्या. कारण त्यात अगदी छोटासा जरी बदल केला तरी तुमचा केक बिघडू शकतो.

 

२. ओव्हनची निवड –

 

cake baking inmarathi5
sweetrevelations.net

 

केक बनवण्यात फार मोठा वाटा असतो तो ओव्हनचा. तुम्ही कोणत्या प्रकारचा केक बनवणार आहे हे जितकं महत्त्वाचं, तितकंच कोणता ओव्हन वापरुन केक बेक करणार हे ही महत्त्वाचं!!!

कारण प्रत्येक प्रकारच्या पदार्थाला बेक करण्यासाठी लागणारं तापमान हे वेगवेगळं असतं. म्हणूनच योग्य ओव्हनची निवड हाही एक महत्त्वाचा भाग आहे. कारण व्यवस्थित बेक झालेला केक खाण्यची जास्त मजा देतो.

सगळीकडून व्यवस्थित बेक झालेला, आतून फुलून स्पाँजी झालेला केक खाताना खुश झालेली मुलं कोणत्या गृहीणीला आवडणार नाहीत बरं?

ओव्हन ऐवजी प्रेशर कुकरमध्ये, पण तुम्ही केक बनवू शकता. पण त्यासाठी जी पद्धत सांगितली जाते ती आणि तीच वापरा.

 

३. योग्य पीठ घ्या –

 

cake baking inmarathi

 

केक बनवण्यासाठी जे पीठ वापरतात ते चांगलंच हवं. सर्वसाधारणपणे गव्हाचं पीठ, मैदा या प्रत्येकाची चव दर्जा वेगळा असतो. पण केक मधला हा महत्त्वाचा घटक पदार्थ.

तुम्हाला बेकरीतील केकसारखा स्पाँजी किंवा टी केकसारखा चविष्ट केक हवा असेल, तर तुम्ही त्या पध्दतीने सांगितलेलं पीठच वापरा. समजा तुम्हाला पेस्ट्री करायची असेल तर त्यासाठी लागणारं पीठ वेगळं असतं.

स्पाँज केक बनवताना कसलंही पीठ चालतं. म्हणजे अमूक ब्रँडच हवा असं नाही. साध्या गव्हाचंही पीठ चालतं.

 

४. ताजे पदार्थ वापरा –

 

cake baking inmarathi3
tarladalal.com

 

जर तुम्ही केक करताना त्यात फळं वापरणार असाल तर ती ताजी ताजीच असावीत. इतरही घटक जसं लोणी, दूध हे पदार्थही ताजे ताजे घ्या. शिळं दूध फ्रीजमध्ये ठेवून त्यातील सारं सत्व सायीतच गेलेलं असतं. त्यामुळं ताजं ताजं दूध कधीही चांगलं.

लोणी, साय हे पण वापरताना शक्यतो ताजं ताजं घ्या. त्याचा परिणाम केकच्या चवीवर नक्की होतो. केक स्पाँजी होणं हे तितकंच महत्त्वाचं आहे.

या कारणांमुळे घरात केक करणं हे फार चांगलं आहे. कारण घरगुती पदार्थ हे अतिशय निगुतीने केलेले असतात. ते तयार केले, की लगेचच वापरले असे असतात.

 

cake baking inmarathi1
happyfoodstube.com

 

शिवाय आपण जे काही घटक पदार्थ वापरतो, त्यात कसलेही प्रिझर्वेटीव्ह म्हणजे अन्न टिकावं यासाठी असलेले पदार्थ वापरलेले नसतात. कसलीही प्रक्रिया न करता केलेले घरगुती पदार्थ हे शरीराला अतिशय उपयुक्त असतात.

दुसरं असं, की जेवढ्या पैशात एखाद- दोन जण खातात त्याही पेक्षा कमी पैशात अख्खं घर मनसोक्तपणे केक खाऊ शकतं.

अन्न शिजवून प्रेमाने खाऊ घालणं हेच तर प्रत्येक आईला, बायकोला आवडत असतं. पण तेच खाणं चवीचं केलं तर अजून आनंद केवळ आईला नव्हे तर घरादाराला होतो!!!

===

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?