' सतेज त्वचा हवी असेल तर दैनंदिन जीवनातल्या "या" घातक सवयी आजपासूनच सोडून द्या

सतेज त्वचा हवी असेल तर दैनंदिन जीवनातल्या “या” घातक सवयी आजपासूनच सोडून द्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

===

आपल्या सगळ्यांनाच कायम छान आणि निरोगी त्वचा हवी असते. म्हणून आपण आपला चेहरा ग्लो कसा होईल, त्वचेच्या आजारावर घरगुती उपाय काय करता येतील हे बघत असतो,  पण या गोष्टी आपल्या त्वचेच्या प्रकाराला योग्य आहेत का हे कोणीच बघत नाही.

जर आपण आपल्या त्वचेची काळजी नियमितपणे घेत असाल तर ठीक आहे, पण तरीही त्वचा छान राहात नसेल किंवा त्याबाबतीत इतर दोष असतील तर त्याकरता आपण आपल्या वाईट सवयी बदलण्याची गरज आहे.

चांगली त्वचा हवी म्हणून काळजी घेताना आपल्याकडे असलेली उत्पादन किती महाग आहेत किंवा आपण किती वापरतो यावर काहीच अवलंबून नसतं.

आपल्याला आपली जीवनशैली बदलण्याची आवश्यकता नाही, आपल्याला फक्त त्वचेसाठी योग्य सवयी निवडण्याची आवश्यकता आहे. आपल्या त्वचेकरता योग्य ते प्रॉडक्ट्स् वापरुन काळजी घ्यायची गरज आहे.

तर या पुढील गोष्टी करू नका म्हणजे आपोआप तुमची त्वचा ही सुंदर होईल :

१. नकळतपणे आपल्या चेहर्‍यास स्पर्श करणे 

 

Skin care InMarathi

 

वरील सवय अनेकांना असते. काही ना काही कारणांनी आपण चेहर्‍याला स्पर्श करतोच. आपल्या हाताला लागलेले जीवाणू आपल्या बोटांवर येतात आणि नंतर आपल्या त्वचेपर्यंत किंवा कोणत्याही खुल्या जखमांपर्यंत पोहोचतात, म्हणून ही सवय थांबवण फार महत्वाच आहे.

विशेषत: पिंप्लस असलेल्या त्वचेसाठी तर हे गरजेचं आहे. चेहऱ्याला स्पर्श करण्याआधी हात स्वच्छ धुवून घ्या.

 

२. सनस्क्रीन न वापरणे

 

Asian woman in hot summer - heat stroke concept
sowetanlivecom

 

व्हिटॅमिन डी आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी उत्कृष्ट आहे, पण त्यासाठी ठराविक वेळेतलेच उन्ह गरजेचे आहे. इतर वेळेस कडक उन्हाचा शरीराला त्रास होऊ शकतो.

सूर्याच्या यूव्हीए आणि यूव्हीबी किरणांमुळे अकाली वृद्ध होणे, एजिंगचे स्पॉट्स येणे आणि त्वचेत कोरडेपणा येण असे आजार होऊ शकतात.

याला उपाय म्हणजे ब्रॉड-स्पेक्ट्रम फॉर्म्युला यासह कमीतकमी एसपीएफ 30 असेल असे सनस्क्रीन चेहर्‍यासाठी निवडा.

 

३. पिंप्लस किंवा तेलकट त्वचेला आपण मॉइश्चराइज न करणे 

 

pimples inmarathi
hevaradhealth.com

 

तेलकट आणि पिंप्लस असलेल्या त्वचेविषयी एक गैरसमज असा आहे, की आपल्या त्वचेत आधीच तेलकटपणा असल्यामुळे मॉइश्चरायझर लावण आवश्यक नाही. जे साफ चुकीच आहे!

पिंपल्स आणि तेलकट त्वचा आपल्याला मॉइश्चरायझेशनचं अधिक कारण देते. हे प्रोडक्टस आपली त्वचा हायड्रेट करण्यासाठी मदत करतात आणि त्वचेचा लालसरपणा कमी करतात.

तुमची मुरुम किंवा तेलकट त्वचा असल्यास, नॉन-कॉमेडोजेनिक मॉइश्चरायझर वापरा.

 

४. चुकीचे प्रॉडक्ट्स् वापरणे 

 

makeup clean inmarathi1
keranews.org

 

आज आपण बघू शकतो, की मार्केटमध्ये त्वचेची काळजी घेणार्‍या प्रॉडक्ट्स् ची संख्या प्रचंड आहे. यामुळे आपण सरळ गोंधळून जातो. तसेच त्यांच्या मोठ्या प्रमाणात आपण जाहिराती बघतो, ज्या आपल्याला असे प्रॉडक्ट्स् निवडण्यासाठी मोहात टाकतात.

नक्कीच, एखादे पांढर्‍या रंगाचे क्रीम आपल्या त्वचेचा आजार बरा करू शकत नाही. जेव्हा आपण त्वचेची देखभाल करणार्‍या उत्पादनाची खरेदी करता, तेव्हा प्रिंट वाचून घ्या किंवा आपल्या शॉपिंग कार्टमध्ये टाकण्यापूर्वी त्वचेची कोणती समस्या याने जाईल हे जाणून घ्या.

 

५.  मेकअप ब्रश साफ न करणे 

 

makeup clean inmarathi
allure.com

 

आपले मेकअप ब्रश नेहमी स्वच्छ आहेत का हे बघणे खूप गरजेचे आहे. धूळ आणि त्वचेतील तेल याबरोबर, आपल्या चेहर्‍यावर असलेले जीवाणू असं बरंच काही त्या ब्रशला लागलेल असतं.

मेकअप ब्रशमधून लोकांना त्वचेचे भयानक रोग झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

त्यामुळे तुम्ही जर रेग्युलर मेकअप करत असाल तर दर तीन आठवड्यांनी, आपल्या मेकअप ब्रशवर शैम्पू घाला आणि त्यांना रात्रभर वाळवत ठेवा. ही एक सोपी सवय आहे, जी आपली त्वचा छान ठेऊ शकते.

 

६.  अती exfoliate वापरणे 

 

makeup clean inmarathi2
yesstyle.com

 

त्वचेलाही अतिशयोक्तीमुळे सुद्धा त्रास होऊ शकतो. अत्यंत स्वच्छ त्वचेमुळे आपल्याला छान वाटतं, पण आपल्या त्वचेवरील कोरडेपणा वाढवून आपण गरज असलेल्या नैसर्गिक तेलांना पुर्णपणे काढून तर टाकत नाही ना? हे एकदा बघायला हवं.

आपल्याला एक्सफोलिएट करण्याची आवश्यकता असल्यास, ते करण्यासाठी कमीतकमी एक किंवा दोन दिवस मध्ये सोडा.

 

७. पुरेशी झोप न घेणे 

 

less sleep inmarathi
theindianexpress.com

 

एकतर आपल्या आवडत्या ऑनलाइन सिरिज पाहिल्यामुळे किंवा परीक्षांसाठी अभ्यास करत असल्यामुळे आपण उशीरापर्यंत जाग राहतो. ही सवय आपण कमी करायला हवी.

चांगल्या प्रकारे झोप न मिळाल्यास ताण येऊ शकतो आणि या परिणामी ब्रेकआउट्स, सोरायसिस आणि बाकीचे आजार होऊ शकतात.

जेव्हा आपली छान झोप होते तेव्हा आपले शरीर स्वतः बरे होते. हे चक्र तोडल्यास आपल्या त्वचेच्या रक्तप्रवाहामध्ये गडबड होऊ शकते. म्हणून कमीतकमी ८ तास झोप आवश्यक आहे.

 

८. पिंपल्स फोडणे 

 

pimples-inmarathi
skincareorg.com

 

पिंपल्स फोडणे ही अत्यंत चुकीची सवय आहे. असं केल्याने आपल्या त्वचेवर बॅक्टेरिया पसरण्यास मदत होते आणि त्वचेची जळजळ होते. त्याचप्रमाणे त्याचे डाग सुद्धा बरच काळ राहतात.

त्यांना घालवण्याऐवजी, असं करून आपण त्यांना आणखीन वाढवत असतो. इतकंच नाही, तर आपण त्यांचं आयुष्य एका आठवड्यापासून दोन आठवड्यांपर्यंत नेतो आणि जखमांना प्रोत्साहन देतो!

असं न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

९. जंक फूड खाणे 

 

fast food inmarathi
timesofindia.com

 

चिप्स, पिझ्झा असं जंक फूड खाणं हा आपल्या रोजच्या जीवनाचा एक भाग आहे. तरीपण, आपल्याला चांगली त्वचा हवी असल्यास जंकफूड कमीतकमी खाणं हेच योग्य आहे.

प्रक्रिया केलेले कार्ब आणि उच्च-ग्लाइसेमिक पदार्थांमुळे आपल्या रक्तप्रवाहात इन्सुलिन वाढतं. दुसरीकडे, इन्सुलिन शरीरातील तेल वाढण्यास मदत करतं. ज्यामुळे पिंपल्स येऊ शकतात. उच्च-फायबर आणि भरपूर प्रोटीन असलेला आहार जास्तीत जास्त घ्या.

 

१०. शरीराची काळजी न घेणे 

चेहर्‍याची काळजी घेत असताना आपण बाकीच्या शरीराकडे दुर्लक्ष करतो. यामुळे दोन समस्या निर्माण होऊ शकतात. स्कीन कोरडी होणे आणि सूर्यप्रकाशाचा त्रास होणे.

लोक बर्‍याचदा आपला चेहरा मॉइश्चराइझ करतात, परंतु त्यांच्या शरीराच्या इतर भागाबद्दल विसरून जातात. यामुळे त्वचा कोरडी होते.

बर्‍याचदा आपण चेहर्‍यावर सनस्क्रीन लावतो, पण ते मान, पाठ, पाय, हात यांनाही लावणे गरजेचे आहे.

 

sunscreen-facts-inmarathi06
skincancer.org

 

त्यामुळे, जेव्हा आपण मॉनिश्चराइझर आणि सनस्क्रीन लावता तेव्हा आपल्या संपूर्ण शरीरावर ते अप्लाय करा.

 

११. फोन त्वचेला चिकटवणे

 

mobile inmarathi
scroll.in

 

आपण ऐकले असेल, की आपल्या गालावर फोन दाबल्याने त्वचा खराब होऊ शकते. काही लोकांना फोन ज्यापासून बनवला जातो त्या मटेरियलची एलर्जि असते.

अनेक बॅक्टेरिया फोनच्या पृष्ठभागावर सुद्धा गोळा होतात आणि वाढू शकतात. आधी फोन पुसा आणि मग कानाला लावा ज्यामुळे आपल्या त्वचेवर परिणाम होणार नाही.

तज्ञ सांगतात की हेडसेट, कानाच्या कॉर्ड याने पण प्रॉब्लेम होऊ शकतात. या वस्तु वेळोवेळी स्वच्छ करणे गरजेचे आहे.

१२. धूम्रपान करणे 

 

no smoking inmarathi

 

धूम्रपान सोडण्याचं अजून एक कारण इथे मिळालंय. एका संशोधनानंतर हे लक्षात आलं, की धूम्रपानाने आपण अडीच वर्ष मोठे दिसू लागतो. ही सवय तुम्हाला एकंदरीतच घातक ठरू शकते. त्यामुळे उत्तम त्वचेसाठी स्मोकिंग बंद करा.

अशाप्रकारे वरील १२ उपाय लक्षात ठेऊन केल्यास तुमच्या त्वचेचे आरोग्य चांगले राहील. करताय ना मग फॉलो??

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?