' ब्रेकफास्टमध्ये हे पदार्थ खाल्लेत तर तुमच्या पचनसंस्थेला होईल जबरदस्त फायदा – InMarathi

ब्रेकफास्टमध्ये हे पदार्थ खाल्लेत तर तुमच्या पचनसंस्थेला होईल जबरदस्त फायदा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

===

सध्याचे युग हे धावपळीचे, ताणतणावाचे आणि स्पर्धेचे युग आहे. माणसाचे आयुष्य हे वेगवान झालेले आहे. इतके, की त्याला शांतपणे बसून जेवण, नाश्ता करायलाही अनेकदा वेळ नसतो.

मात्र तरीही विचारपूर्वक आपण योग्य आहाराचा समावेश आपल्या रोजच्या आयुष्यात करायला हवा. उलट या धावपळीच्या काळातच आपल्याला, आपल्या शरीराला चांगल्या आहाराची गरज आहे.

शरीर तंदुरुस्त असेल तरच आपण या स्पर्धेच्या युगात चांगले आयुष्य जगू शकू. आपली स्वप्ने पूर्ण करू शकू. आपले आरोग्य टिकवून फिट राहू शकू. याचा विचार करायला हवा.

आहाराची त्रिसूत्री –

असं म्हणतात, की सकाळचा नाश्ता राजासारखा करावा, दुपारचं जेवण सर्वसामान्य माणसासारखं करावं आणि रात्रीचं जेवण गरीब माणसाप्रमाणे करावं.

थोडक्यात, पोटभर खाणं हे नाश्त्यात व्हायला हवं. दुपारचं जेणं चौरस आहार तर रात्रीचं जेवणं हे अल्प आणि हलकं घ्यावं. परंतु सध्याच्या काळात आपण बरोबर उलटं करतोय.

विशेषतः महानगरीय जीवनात सकाळचा नाश्ता शांतपणे बसून व्यवस्थित करायला लोकांपाशी वेळच नसतो. त्याआधीच लोकल गाठायची असते.

तरीही वरील त्रिसूत्रीप्रमाणे आपला आहार ठेवण्याचा जास्तीत जास्तीत प्रयत्न करा. एकवेळ दुपारच्या जेवणाला उशीर झाला, व्यवस्थित नाही झालं तरी चालेल. पण सकाळची न्याहरी मात्र व्यवस्थित घ्या. त्यासाठी वेळेचं नियोजन करा.

 

actress eating inmarathi
ndtv.com

 

निरोगी राहण्यासाठी सर्वात महत्त्वाचा ठरतो तो आपला नाश्ता. ब्रेकफास्ट. रात्रीची व्यवस्थित झोप घेतल्यानंतर जेव्हा आपण उठतो, तेव्हा सकाळी उठून भूक लागायला हवी. आणि त्यासाठी चांगला नाश्ता करायला हवा.

चांगला म्हणजे पौष्टीक, सात्विक तरीही चविष्ट. सकाळी उठल्यावरचे रिकामे पोट हे आपला आहार चांगल्या तऱ्हेने पचवू शकते. त्यामुळे दिवसभरातल्या या पहिल्या भुकेचा उपयोग अरबट चरबट खाण्यासाठी करू नका.

उदा. बेकरी पदार्थ, मैद्याचे पदार्थ, तळलेले पदार्थ, बिस्कीटं हे शक्यतो नाश्त्यात टाळा. त्याऐवजी घरचा पारंपरिक नाश्ता घ्या. उदा. पोहे, उपमा, थालिपीठ, ईडली, घावन, धिरडी इत्यादी.

 

parathe inmarathi
youtube.com

 

अगदी आदल्या दिवशीच्या पोळ्यांचा फोडणीला घातलेला कुस्करा देखील मैद्याच्या पदार्थांपेक्षा जास्त पौष्टीक असतो. त्यामुळे अशाच पदार्थांना नाश्त्यात प्राधान्य द्या आणि त्याबरोबरच पुढील पदार्थांचा समावेश असू द्या.

पुढील काही पदार्थांचा समावेश आपल्या रोजच्या सकाळच्या नाश्त्यात करा. त्याचा फायदा तुमच्या पचनसंस्थेला होईल. या वस्तू सहजपणे मिळणाऱ्या आणि आपल्या रोजच्या परिचयातल्या आहेत. त्यामुळे त्यांचा वापर करणे सहज सोपे आहे.

पपई –

papaya-benefits-inmarathi
healthline.cpm

 

सर्वसाधारणपणे कोणतीही फळं ही नाश्त्यात घेतलेली अधिक चांगली, फायदेशीर ठरतात. जेवणानंतर फळं पचायला जड जातात. त्याऐवजी सकाळच्या सुरुवातीची न्याहरी फळांपासून करा.

पपई हे उत्तम फळ आहे. पचनसंस्थेसाठीही आणि आरोग्यासाठीही.

 

सफरचंद –

 

apple inmarathi
thefoodmagzine.com

इंग्रजीत म्हण आहे, अॅन अॅपल ए डे, किप्स ए डॉक्टर अवे. सफरचंदात भरपूर व्हिटॅमिन ए आहे. व्हिटॅमिन सी आहे आणि शिवाय यात भरपूर मिनरल्स आणि पोटॅशियम आहे. भरपूर फायबर आहे.

नाश्त्यात सफरचंद, पपई खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. पोट साफ होण्यास मदत होते आणि पर्यायाने पचनाच्या तक्रारी दूर होतात.

काकडी –

 

cucumber-inmarathi
food.ndtv.com

 

विशेषतः उन्हाळ्याच्या ऋतुत सकाळच्या नाश्त्यासोबत काकडीचा समावेश नक्की असू द्या. काकडीतील एरेप्सीन नावाचे द्रव्य पचनास योग्य मदत करते.

पोटातील उष्णता, पित्त, जठराची सूज, पेप्टीक अल्सर यावर काकडीसारखा साधा पदार्थ चमत्कारीक परिणाम दाखवतो.

 

केळी –

 

banana inmarathi
theindianexpress.com

पोटांच्या तक्रारींवर केळ्यासारखे बारमाही मिळणारे साधे फळ अतिशय गुणकारी आहे. केळी नेहमी नाश्त्यात सकाळी खावी.

एक केळं पोट भरल्याचं समाधानही देतं आणि त्यात भरपूर फायबर असल्याने पोट साफ होण्यासही मदत करतं.

 

मध-लिंबू –

 

lemonade-benifits1-inmarathi
reckontalk.com

 

कोमट गरम पाण्यात लिंबाचा रस आणि चमचाभर मध हे नाश्त्याच्या आधी घेतल्याने आपली पचनक्रिया तर सुधारतेच, शिवाय आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते.

सकाळी उठल्यावर लगेच, चहा, नाश्ता इत्यादी घेण्याआधीच, रिकाम्या पोटी लिंबू-मध कोमट पाण्यासोबत नियमित घेत राहिल्याने आपली चयापचय क्रिया नीट होते, तसेच वजन कमी करण्यासही मदत होते.

 

सत्तुचे पीठ –

 

sattu inmarathi
millichronicle.com

 

सत्तुचे पीठ नाश्त्यात अतिशय गुणकारी असते. त्याचे सरबत बनवूनही पिता येते. उत्तर भारतात सत्तुच्या पीठाचा वापर अधिक होतो. या पीठापासून लाडू देखील बनतात.

 

फ्रुट सॅलड –

 

fruits inmarathi 1
thehealthy.com

 

फळं ही शक्यतो सकाळी नाश्त्याच्या वेळी खावीतच.

त्यामुळे घरात असलेल्या सर्व फळांचे एकत्र सॅलड बनवून त्याचा नाश्त्यात वापर केल्याने सकाळी सकाळीच पोटाला सर्व विटॅमिन्स, मिनरल्सय आयर्न आणि फायबर मिळते. दुसऱ्या दिवशी पोट साफ होण्यास मदत होते.

 

ओट्सची खीर –

 

oats inmarathi
healthline.com

 

सध्या ओट्सची चलती आहे. ओट्स हे साधं आणि सात्विक आहारात मोडतात.

सकाळच्या नाश्त्यात ओट्सची दूधातली खीर आणि त्यासोबत काही फळं, केळी इत्यादी घेतल्याने हा पौष्टीक नाश्ता फायदेशीर ठरतो.

 

ग्रीन टी –

 

cancer-green tea-inmarathi
food.ndtv.com

 

सकाळी उठल्या उठल्या कोमट पाण्यासोबत मध-लिंबू घेत असताना त्याच पाण्यात थोडा ग्रीन टी टाकून गाळून घेतलात, तर ग्रीन टीचे अद्भूत फायदे मिळू शकतात. हे पेय फारच चमत्कार करतं. आपल्या पचनक्रियेला मदत करतं.

तर मंडळी, आता उद्यापासून आपल्या सकाळच्या नाश्त्याबद्दल गांभीर्याने विचार करा. वरील काही महत्त्वाच्या सूचनांचे पालन करून बघा. नाश्त्यात काही फळांचा समावेश जरूर करा. त्याचे फायदे अनुभवा.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?