' चहाप्रेमींनो – चहात केलेले २ छोटे बदल तुम्हाला देतील इम्युनिटी आणि आरोग्य! – InMarathi

चहाप्रेमींनो – चहात केलेले २ छोटे बदल तुम्हाला देतील इम्युनिटी आणि आरोग्य!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘अरे चल येतोस का? मस्त कटींग चहा मारू’ या वाक्यातली जी मजा आहे, जो आनंद आहे तो जगात कुठे शोधून सापडणार नाही. म्हणजे काय, तर आपल्याकडे चहाप्रेमी आणि चहावाले यांची काही कमी नाही.

साधारण कॉलेजच्या कट्ट्या पासून सुरू झालेला चहाचा प्रवास अगदी आपण म्हातारे झाल्यावर पार्कमध्ये बेंचवर बसून आपल्या वयस्कर मित्रांबरोबर हसेपर्यंत चालूच असतो.

आजकालच्या तरुण मुलांच तर ‘टी तिथे मी’ हे ब्रीदवाक्य आहे. अमृततुल्य काही असेल तर तो ‘चहा’.

असं म्हणतात की, चहाला वेळ नसते, पण वेळेला चहाच हवा. चहा हा आपल्याकडे ब्रिटिशांनी जरी लोकप्रिय केला असला तरी आज जवळ जवळ प्रत्येक भारतीय हा चहा पितोच.

 

tea time inmarathi

 

चहाने बहुतांश लोकांची सकाळ होते आणि चहा नसेल तर त्यांची दुपार काही पुढे सरकत नाही. चहा नसे तर डोकं चालत नाही आणि चहा नसेल तर पावसाचा आनंदही घेता येत नाही.

आपल्याकडच्या अगदी गरीब व्यक्ती ला सुद्धा चहा परवडतो आणि अगदी श्रीमंत आणि powerful माणूससुद्धा चहा घेतो. चहा आवडत नाही अशी कमी माणसे आपल्या आजूबाजूला असतील.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

भारतात अनेक ठिकाणी चहाचे मळे आहेत. जिथे विविध प्रकारचे चहा आपल्याला टेस्ट करायला मिळतात. साधा चहा, मसाला चहा, गुळाचा चहा, ग्रीन टी, हर्बल टी आणि ही अशी बरीच मोठी यादी आहे. या सगळ्याचे फायदेही खूप चांगले असतील.

ग्रीन टी मुळे तुमच्या शरीराला टोनिंग मिळेल. अनेक लाभ होतील, पण खर सुख असतं ते घरचा गरम गरम चहा किंवा टपरीवरचा उकळता चहा पिण्यात.

 

immunity tea inmarathi1

 

चहा हे पेय फक्त तुम्हाला छान वाटावं म्हणून नाही, तर एकंदरीतच आरोग्यासाठी फायद्याच आहे. सर्दी, खोकला आपल्याला थोडासा जरी झाला तरी आपण छान आलं आणि गवती चहा घालून चहा बनवतो आणि पितो.

कोरोनासारख्या निर्माण झालेल्या आजारात तर जास्तीत जास्त गरम खा आणि प्या असं सांगितलं असल्याने लोक चहाचा सपाटाच लावतात. रोजच्या चहात पुढील दोन पदार्थ टाकले, की चहा आणखीन फक्कड लागेल.

आपण चहापावडर, साखर, दूध, पाणी यांनी चहा बनवतो, पण या चहात अजून २ गोष्टी टाकल्यात तर हा तुम्हाला निरोगी राहण्यास मदत करेल. आरोग्यास उपयुक्त ठरेल आणि रोगप्रतिकारक शक्ती सहज वाढवेल.

हे दोन्ही पदार्थ आपल्या घरात अगदी सहज मिळण्यासारखे आहेत. यांचं आयुर्वेदाताही खूप महत्त्व सांगितलं आहे. हे दोन पदार्थ कुठले हे आपण बघूया.

१. लवंग (clove)

 

clove 3 inmarathi

लवंग मध्ये powerful antioxident असतं, जे आपल्यात असलेल्या फ्री रॅडिकलशी लढा देतं. आपली immunity म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती बर्‍याच प्रमाणात वाढवतं. लवंग याचा वापर चहामध्ये केल्यास आपले व्हायरस इन्फेक्टेड सेल्स मारले जातात.

 

clove oil inmarathi

 

लवंग यात युजेनोल असल्याने सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणे, कफ आणि डोकेदुखी या आजारांच्या बाबतीत antiviral आणि anticeptic असे काम करते.

तुमचे पचन सुकर करण्यासाठी लवंग अतिशय उत्तम असते. हेल्दि डायजेशन ही वेट लॉस ची गुरुकिल्ली आहे. आणि शिवाय शरीरातलं मेटबॉलीजम लवंग वाढवते.

 

clove 2 inmarathi

 

संपूर्ण शरीरातील वाईट घटकांशी लढल्यामुळे लवंग आपल्याला सुंदर त्वचा देखील देते.

साखरेची पातळी लवंग सांभाळते आणि त्यामुळे ज्यांना डायबीटिस आहे त्यांनी चहात लवंग तर घालायलाच हवी.

त्यामुळे, जरी तुम्हाला लवंग आवडत नसली, तरी पण चहावरच्या प्रेमापोटी हा उपाय करा.

तुम्हाला जर चहा अजून कडक बनवायचा असेल तर त्यात थोडं मध घाला. छान सकाळी उठल्यावर या चहाचा सीप मारा. स्वतःच्या तब्येतीसाठी आवश्यक असलेला हा चहा नक्कीच घेऊन पहा.

 

२. ज्येष्ठमध (Mulethi)

 

mulethi inmarathi

 

आपल्या आजीच्या बटव्यातील ही एक गोष्ट. ज्येष्ठमध जुनी औषधी वनस्पती असून त्याचे भरपूर फायदे आहेत. हे पित्तनाशक आणि विषनाशक असं घरगुती औषध आहे. Antiviral घटक ज्येष्ठमधात असतात.

ज्येष्ठमध यात बरेच antioxident, antifunguel घटक असल्याने कफ,सर्दी  यासारख्या त्रासावर तो जबरदस्त उपाय आहे.

शरीरात उष्णता जास्त असेल तर तोंड येतं, ते कमी करण्यासाठी याचा फायदा होतो.

यामुळे त्वचेची काळजी घेतली जाते. पिंप्लस कमी करणे, त्वचेवरील डाग घालवणे यासाठी ज्येष्ठमध गुणकारी आहे.  एखाद्याला अॅसिडिटीचा त्रास आहे तर तो कमी होतो.

घश्याची खवखव, ताप, अंगावर उठणारे पित्त यावर ज्येष्ठमध हा रामबाण उपाय आहे.

त्यामुळे अशा अनेक कारणांसाठी आणि थोडक्यात निरोगी आयुष्यासाठी लवंग जशी महत्वाची आहे, तसेच ज्येष्ठमध सुद्धा आहे.

लवंग आणि ज्येष्ठमध या दोन्ही घटकांचा वापर १ ते २ टेबल स्पून एवढाच रोज करा. चहाला मस्त वास तर येईलच पण त्याचबरोबर आपण ताजेतवाने होऊ.

clove tea inmarathi

 

शिवाय आरोग्यवर्धक चहा हा आपल्याला हवाच. तर हा असा चहा नक्की करून पहा आणि तुमच्या तब्येतीला जपा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?