डायबेटीस असतानाही हे ८ पदार्थ खाल्ले, तर धोका अधिक वाढेल, वाचा…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
सध्याच्या काळात मनुष्याची जीवनशैली खूप बदलली आहे.
कामाचा ताण, अपूरी झोप, वेळी-अवेळी आणि मिळेल ते (हेल्दी किंवा अनहेल्दी ह्याकडे लक्ष दिले जात नाही) खाणे, कामाच्या किंवा अणखी काही कारणांनी तब्येतीकडे दुर्लक्ष होणे ह्या सारख्या दिनचर्येमुळे मनुष्याचे आरोग्य बिघडत चालले आहे.
अती श्रम, अती ताण, खाण्या-पिण्याकडे हवे तसे लक्ष न देता येणे ह्यामुळे आपल्या शरीरात निरनिराळ्या रोगांनी घर केले आहे.
लॉकडाऊनमुळे सगळीच दिनचर्या बिघडली. व्यायाम, हालचाल या गोष्टी ठप्पच झाल्या होत्या. काहींना ‘वर्क फ़्रॉम होम’ होते, पण काहींना अजिबातच काम नव्हते. सगळ्यांनाच त्याचा खूप ताण आला होता.
काहीही खाणे, कधीही झोपणे, कधीही उठणे ह्याबरोबरच जिम पण लॉकडाऊन मुळे बंद आहेत त्यामुळे “वर्कआऊट” ला पण सुट्टी!
सगळ्यांनाच घरी म्हणावा तसा व्यायाम करणे जमत नाही, त्यामुळे पुन्हा तब्येतीच्या तक्रारी वाढतात.
कोलेस्ट्रॉल वाढणे, सुस्ती येणे, वजन वाढणे ह्यासारख्या तक्रारी तर असतातच पण एक सगळ्यात मोठी तक्रार म्हणजे रक्तातील साखर वाढणे! ह्या गंभीर आजाराकडे, समस्येकडे दुर्लक्ष करून चालणारच नाही!
रक्तातील साखर अतीरिक्त प्रमाणात वाढणे म्हणजेच मधुमेह, ज्यामुळे तब्येतीवर खूपच वाईट परिणाम होतो.
हे सगळं टाळायचं असेल तर काही गोष्टी कटाक्षाने पाळाव्या लागतील. Prevantion is better than cure ह्या उक्तीप्रमाणे काही पदार्थांचे सेवन टाळले तर रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहिल.
चला तर मग आज पाहूया कोणत्या पदार्थांचे सेवन टाळावे ते.
१. (साखर) शर्करा आणि सोडा युक्त पदार्थ
काही काही पदार्थ असे असतात की ज्यामध्ये साखर आणि सोडा दोन्ही असते.
जसे केक, ब्रेड, बाजारातील फळांचा रस इत्यादी! ह्या पदार्थांच्या सेवनामुळे केवळ रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते असे नाही तर शरीरावरील चरबीचे प्रमाण देखील झपाट्याने वाढते.
बाजारात मिळणाऱ्या फळांच्या रसामधे शर्करेचे प्रमाण जास्त तर असतेच शिवाय त्यात अजिबातच फायबर नसते त्यामुळे ह्याच्या सेवनाने फायदा तर सोडाच, पण आपण आपल्या तब्येतीवर दुष्परिणाम करून घेत आहोत!
मनासारखी जीवनशैली आणि वर्कआऊटला सुट्टी, त्यात ह्या पदार्थांचे अतीसेवन ह्यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढते जे शरीरासाठी हानीकारक आहे.
२. चिप्स्, कुरकुरे इत्यादी पदार्थ :
विकतचे चिप्स्, वेफर्स्, कुरकुरे किंवा तत्सम पदार्थ शरीरासाठी अतिशय घातक असतात.
ह्या पदार्थांमध्ये शरीरासाठी हानीकारक मैदा, अतिरिक्त मीठ, थोड्या प्रमाणात सोडा, प्रिझर्व्हेटिव्ज ह्याशिवाय अशी काही प्रथिने (trans fats) असतात जी शरीरावर वाईट परिणाम करतात.
ह्या फॅटस्मुळे कोलेस्टेरॉल वाढणे, हृदयविकाराचा झटका येणे ह्याशिवाय रक्तातील साखर वाढणे ह्यासारखे गंभीर आजार उद्भवतात. त्यामुळे हे पदार्थ खाणे टाळा.
३. व्हाईट ब्रेड, पास्ता इत्यादी :
मैद्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांचे सेवन हे आपल्या शरीरासाठी खूपच हानीकारक असते.
मैद्यापासून ब्रेड, पास्ता, झटपट तयार होणारे नूडल्स्, रोटी, नान, कचोरी, समोसे इत्यादी अनेक पदार्थ तयार केले जातात पण मैद्याचे अती सेवन आपल्या रक्तातील साखरेच्या वाढीस कारणीभूत ठरते.
पण, सध्याच्या काळात अशाच पदार्थांचे सेवन वाढत चालले आहे. मैद्याचे पदार्थ अतिशय अपायकारक असतात. त्याऐवजी आपण गव्हाचे पदार्थ वापरणे केव्हाही चांगलेच!
गव्हाचा ब्रेड किंवा पोळी ह्यांचे सेवन करणे खूपच फायदेशीर असते.
४. फ्रेंच फ्राइज, बर्गर, पिझ्झा, तळलेले चिकन इत्यादी :
आजच्या काळात फूड मॉल किंवा मोठ्या मोठ्या रेस्टॉरेंटस् मध्ये जाऊन खाण्याची फॅशन आली आहे.
काही जणांना त्यात खूप मोठेपणा वाटतो. पण, हे पिझ्झा, बर्गर, तळलेले चिकन ह्यासारखे पदार्थ रक्तातील साखर वाढण्यास कारणीभूत ठरतात.
कोलेस्ट्रॉल वाढणे, अतिरिक्त चरबी वाढणे ह्याबरोबरोबरच तणावात देखील अशा पदार्थांच्या सेवनाने वाढ होते. त्याऐवजी भाजलेले (बेक केलेले) पदार्थ आपल्या शरीरासाठी जास्त चांगले असतात.
५. फळांचा स्वाद असणारे दही :
साधे दही, आपण जे घरी विरजण लावून तयार करतो ते दही शरीरासाठी अत्यंत लाभदायक असते. पण आज काल बाजारात फळांचे फ्लेवर्स असणारे दही उपलब्ध आहे जे चवीला चांगले असते!
ज्यात फॅटस् कमी असतात पण त्यात अतिरिक्त साखर असते तसेच कर्बोदके देखील प्रमाणाबाहेर असतात जी आपल्या शरीराला अत्यंत हानीकारक असतात.
शिवाय ह्यात प्रिझर्वेटिव्हचे प्रमाण देखील जास्त असते जे शरीरासाठी हानीकारक असते. साखर, कर्बोदके आणि प्रिझर्वेटिव्हज् ह्यांच्या सेवनाने रक्तातील साखर, इंशुलिन ह्यांचे प्रमाण वाढते.
त्यापेक्षा साधे दही कधीही चांगलेच!
६. मद्य, अल्कोहोल :
मद्यपान, अल्कोहोलचे सेवन हे तर एकंदरीतच आपल्या तब्येतीसाठी हानीकारक असते.
ह्याचे सेवन म्हणजे खूपच हानीकारक असते. शिवाय, ह्याच्या अतिरिक्त सेवनाने रक्तातील साखर वाढते.
आज काल पार्टीज, उच्चभ्रू वर्तुळात मद्यप्राशन करणे ‘स्टेटस’ समजले जाते,
शिवाय काही जणांना उगीचच असे वाटते की ह्याच्या सेवनाने ताण तणाव कमी होतो त्यामुळे ह्या ना त्या कारणाने मद्यप्राशन करणे जरूरीचे समजले जाते जे शरीरासाठी हानीकारक असते!
रक्तातील साखरेचे तसेच इंशुरिनचे प्रमाण वाढते.
७. वाळवलेली फळे :
मनुका, बेदाणे आणि अंजीर ह्या फळांचे सेवन शरीरासाठी खूपच उपयुक्त असते!
पण आज काल मॉल्स् मधे वगैरे किंवा पाश्चात्य संस्कृतीमध्ये (तिथल्या हवामानानुसार) केळी, सफरचंद ह्यासारखी फळे वर्षभर साठवून ठेवली जातात त्याचे अंधानुकरण आपण करू लागलो आहोत.
आपल्याकडे देखील हे वाळवलेल्या पदार्थांचे ‘फॅड’ पसरत आहे, जे इथल्या हवामानाला अनुकूल नाही.
त्यातील प्रक्रियेने फळांतील पाणी काढून टाकले जाते तसेच त्यातील फायबर नष्ट होतात जे शरीरासाठी चांगले नसते तसेच ह्यांच्या सेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.
८. नाश्त्यामधे सेरील वापरणे :
सेरीलमध्ये अतिरिक्त साखर असते जी आपल्या शरीरासाठी हानीकारक असते अर्थातच रक्तातील साखरेचे प्रमाण ह्याच्या सेवनाने वाढते.
कमी प्रथिने आणि अती कर्बोदके असणारा हा पदार्थ नाश्त्यासाठी अजिबात योग्य नसतो. त्यापेक्षा योग्य प्रमाणात असणारी प्रथिने आणि कमी कर्बोदके असणारा नाश्त्यासाठी पर्याय निवडणे योग्य ठरेल.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.