'सुशांत सिंग

सुशांत सिंग

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===
लेखिका – सारिका बोधनी थेट
===

सुशांत सिंग राजपूतची बातमी ऐकली आणि कुठलं ही नातं नसताना सुद्धा मन सुन्न झालं, नकळत मनात काहीतरी टोचायला लागलं.

 

sushant sing inmarathi

 

ही व्यक्ती इतकी जवळची का वाटते? सगळ्यांना झोपेतून कुणीतरी जागं करावं तसं प्रत्येक का नंतर एक नवा प्रश्न आ वासून पुढे उभा राहिला असा अनुभव तुमच्यापैकी अनेकांना आला असेल.

बातम्या मधून उलट सुलट चर्चा, कोण बरोबर कोण चूक, कुणामुळे? का? हे नवे प्रश्न पडायला लागले. पण सगळ्यात मोठा धक्का बसला तो १७ ते ३० या वयोगटातील पिढीला.

सध्याचा तरुण स्पर्धात्मक जगात स्वतःला सिध्द करण्यासाठी दिवसरात्र झगडत आहे, हे उघड सत्य आहे.

आपलं एक छान करीअर असावं, सुखवस्तु समाजात मान सन्मान, हे करण्यासाठी लागलेली चढाओढ आणि सतत दुसऱ्यासाठी स्वतःला सिध्द करण्याचा प्रयत्न, हेच खरं मानून आपलं स्वप्न साकारण्यात मग्न असलेल्या पिढीला हा एक मोठा धक्का तर आहेच पण त्यांच्या मनात मोठा संभ्रम ही आहे.

आपण जगण्यासाठी जी wishlist बनवली आहे (हे आतचे नवीन खुळ), त्याबाबत सुशांतकडे सगळं काही असूनही त्याने असं का केले? प्रश्न प्रश्न आणि नं सापडणरी उत्तरं…

 

wish list inmarathi
www.travelpulse.com

 

मग परत एकदा शोध सुरु होतो की सगळं असूनही आणखी काय हवं याचा. सुशांतच्या आत्महत्येनंतर येणारा प्रत्येक दिवस नवे प्रश्न, नवे विचार घेऊन येतोय.

विशेषतः तरुणांच्या मनात नव्याने सुरु झालली ही खळबळ माझ्या मुलाच्या मनातल्या प्रश्नांच्या रुपाने पालक म्हणून विचार करण्यास भाग पाडते आणि त्याला समाधानकारक उत्तर देताना स्वतःलाच जीवनाकडे शांतपणे बघायला लावते.

मात्र यानंतर एक अस्वस्थ करणारी बाब लक्षात आली ती म्हणजे, याप्रकरणातला सुशांत तर माझ्यात पण आहे, कदाचित आपल्या आजूबाजूला पण आहेत.

आपलं जग थोडे छोटे करून आपल्या फक्त आजुबाजुला असणाऱ्या व्यक्तींचे निरीक्षण करूया,

समाजाच्या दृष्टिने प्रसिद्धी, गाडी, यश, पैसा आणि समाजातील मान सन्मान यांच्या आधारे आपण किती यशस्वी आहोत हे जे मापदंड आहेत यावरून ठरवले जाते की त्या व्यक्तीला कसले आले दुःख सगळे तर छान आहे.

सगळी वरकरणी जग जिंकण्याची लक्षणें, खरंच किती कोते मन आहे, हे एवढेच असू शकते का? तर बरेच जण म्हणतील व्यवहारिक आहे प्रॅक्टिकल असावं माणसाने.

अरे हो , पण यात ती व्यक्ती कुठे आहे? हे यश मिळवताना घेतलेले कष्ट, कधी कधी अवहेलना, अपमान ,अपयश एखद्या शिखरापर्यन्त पोहोचण्याची प्रोसेस आपल्याला माहिती करून घायची नसते.

विशलिस्ट च्या गोष्टी टिक मार्क केल्या म्हणजे झाला तो यशस्वी.

या विशलिस्ट ची एक गंमत म्हणजे व्यक्तीच्या कुवतीबरोबर आवडीपेक्षा सामाजिक मापदंड लक्षात घेऊन बराच वेळा ही लिस्ट बनवली जाते. मग चालू होते त्यासाठीची धडपड, मेहनत, प्रयत्न आणि ती प्रोसेस’ ज्याकडे दुर्लक्ष झालेलं असतं

पोचपावती ही नेहमी दुसऱ्यासाठी बनवलेली असते ज्यात त्या माणसाने केलेल्या कामाचे किंवा घेतलेल्या गोष्टींचा पुरावा असतो.

 

great job inmarathi

 

आपण माणूस गेल्यानंतर पुरावे शोधत राहतो कसं,काय, कधी, का सगळी के ची सिरीज.

पण त्या माणसाला त्याच्या आयुष्यात त्यानी जगण्यासाठी केलेली धडपड एखादी गोष्ट मिळवण्यासाठी केलेले कष्ट,प्रामाणिक प्रयत्न याची पोचपावती आपण नेहमी तो गेल्यावरच का देतो?

मित्रांनो, मन कोत झालं आणि व्यवहारिक जीवन शिष्टाचार मोठे झाले. एखाद्याचे मन भरून कौतुक केल्याचं आठवतंय का तुम्हाला? अगदी मनापासून…

विचार करावा लागतोय ना? कारण दुसऱ्याचं कौतुक करणे म्हणजेच आपल्यात काहीतरी कमी आहे असंच आज काल जाणवतं

अरे पण तसं नसतं रे, चुकतो आहेस, दुसऱ्याचे कौतुक केल्याने आपणही त्याच्याकडून कधीतरी पोचपावती घेण्याचे अधिकारी बनतो. हे पालकांनी मुलांना, मोठ्यांनी लहानांना शिकविलं पाहिजे.

प्रोसेस ला महत्त्व दिले पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींचे कौतुक करायला शिकवलं पाहिजे ही पोचपावती व्यक्तीच्या यशाची नसून त्याने त्यासाठी केलेल्या प्रयत्नांची, जिद्दीची, प्रामाणिकपणाची अथक परिश्रमांची त्या प्रोसेसची असावी.

या लॉकडाऊनमध्ये लोक म्हणतात, मी काहीतरी टाईमपास करतीय, तिकडे मोदी टास्क देतात, इकडे मी व्हाट्सअप च्या या झाडावरून (या ग्रुप मधून दुसऱ्या ग्रुप मध्ये) त्या झाडावर उड्या मारत असते.

वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस आठवून त्या व्यक्तीला आनंदी ठेवण्यासाठी बाकीच्यांना बरोबर घेते. ही एक प्रोसेस आहे,

 

म्हणजे बघा ना मजेशीर टास्क दिले की सगळे विचार करायला लागतात, नेहमीच्या तणावपूर्ण कामातून काहीतरी वेगळं त्यांना दिसते , त्यांच्यातील खट्याळ गमतीदार माणूस जागा होतो, त्या व्यक्तीच्या आठवणीत रमतो ,मग आपल्या आयुष्यातील त्याच्याबरोबर घालवलेल्या सुंदर आठवणी तो गंमतशीर नक्कल, डान्स ,कवितेद्वारे त्याला ती पोचपावती देतो.

पाच मिनिटात काय करु आणि काय नको असं होतं ही कौतुकाची वृत्ती जागी होते. दुसऱ्यासाठी काहीतरी करण्याची, त्याला आनंद देण्याची प्रोसेस चालू राहते.

मित्रांनो, प्रवास (प्रोसेस) सगळ्यांचा त्यांच्यापरीने अवघडच आहे हो, पण जजमेंटल बनू नका, भौतिक वस्तूंबरोबर त्याची तुलना यश अपयशात करू नका. कुणीच पूर्ण वाईट नसतो, कमतरता सगळ्यात असते.

शरीरातील जीवनसत्व कमी झाली म्हणून शरीराचा कोणी राग राग करतात का? तसंच आलेले यश म्हणजे आपलं जगणं आणि अपयश म्हणजे आपल्या जगण्याला अर्थ नाही हे समीकरण मांडू नका.

चूक-बरोबर ,यश-अपयश हे जज कोण करणार? अपयश म्हणजे चुकीची भलीमोठी यादी, त्या व्यक्तीला तो कसा जगण्यास लायक नाही आणि आता सगळं संपलं काहीच होऊ शकणार नाही या भावनांना दिलेलं बळ देण्याच्या प्रयत्नांचे भागीदार होवु नका.

अपयश आलं तर ते करताना चुकीची का होईना धडपड चालू होती,यशासाठी प्रोसेस चालू होती, प्रवास थांबला नव्हता.  याच पावलाने गेल्यावर यश मिळणार हे जर आधीपासून माहिती असूनही स्पर्धेत टिकण्याची ध़डपड कशासाठी?

अर्थात पालक म्हणून या सगळ्याचा विचार करताना सगळं फार क्लिष्ट आणि अनेक कांगोरे असणारे प्रश्न असल्याचं जाणवतं.

पण, दुसर्‍याला आनंद देत राहा छोट्या छोट्या गोष्टीतून त्याच्या प्रोसेसचं कौतुक करा या साध्या गोष्टी तर आपण मुलांना शिकवु शकतो.

अहो देवाला पण आवडतं त्याचं कौतुक केलेलं. टाळ्या वाजवून आपण आरती करतो ते त्याचं कौतुकच नाही का?
मग आपण तर माणसेच आहोत पावती द्यायला विसरू नका.

काही प्रश्न स्वतःला पण विचारा कधी आपण आई-वडिलांच्या जीवनाचा प्रवास जाणून घेतला का? त्यांच्या कष्टाची पोचपावती दिली आहे का?
सासू-सासरे यांनी त्यांचे जीवन कसं काढलं असेल त्यापेक्षा ते कसे बरोबर नाहीत हेच बघतो. सगळ्याची चांगली-वाईट बाजू आहे दोषांना गमतीने घ्या आणि तो कसा वेगळा छान आहे याचा आनंद घ्या.

हेच आपल्या मुलांना आणि या पिढीला शिकवलं पाहिजे दुसऱ्याचं कौतुक करणे ही एक कला आहे.

नको ती कुरबुर, नको ते हेवेदावे, मन मोठं करून जगा माफ करून टाका त्या सगळ्यांना, जे तुमच्या दुःखाचं कारण बनले असतील, कारण दुःखी होणं आणि सुख मिळणं हे कधी दुसऱ्या मुळे नसतं ते आपणच ठरवू शकतो.

दुःखाला अंत नाही आणि सुखाची प्रोसेस चालू आहे ही बाब वेळोवेळी आपल्या घरातल्या मुलांना समजावून सांगितली तर निश्चितच प्रत्येकजण केवळ यशस्वी नाही, तर ख-या अर्थाने सुखी होईल.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?