' १२ लाखांची नोकरी सोडून त्याने “गाय” पाळली आहे, पण का? – InMarathi

१२ लाखांची नोकरी सोडून त्याने “गाय” पाळली आहे, पण का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

देशासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी परदेशी पदवी आणि नोकरी झुगारून दिली, महात्मा गांधी किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सुद्धा त्यांची बॅरीस्टर ची पदवी झुगारून दिली, अर्थात त्यांचं बलिदान हे नेहमीच मोठं राहणार आहे!

पण आपण मिडल क्लास माणसं सामान्य आयुष्यात असा काय त्याग करतो ज्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे, देशासाठीच त्याग केला पाहिजे असं नाही, तर समाजकारण किंवा आपल्या मनासाठी आपण असा काय त्याग करतो याचा आपण विचार  केलाच पाहिजे!

कारण प्रत्येक गोष्टीचे मोल किंवा समाधान हे पैशातच असतं हा समाज चुकीचा आहे! 

सध्या प्रत्येकाला पटापट सेटल व्हायचंय, ६ आकडी पगार बँकेत पडायला हवा आहे, घराखाली आलिशान गाडी हवी आणि वर्षातून एकदातरी फॉरेन ट्रिप करायची आहे आणि यासाठी प्रत्येक तरुण झटत असतो पण तरी ९ तास कॉर्पोरेट जॉब करून सुद्धा ते शक्य होत नाही!

 

office inmarathi

 

या सगळ्यात जर कुणाला त्याच्या कम्फर्ट झोनच्या बाहेरचं काम दिल तर ती व्यक्ती चार पावलं मागे जाते, आणि त्यामुळेच कदाचित त्या कम्फर्ट झोन ची आपल्याला सवय होऊन जाते!

तरीही अशी काही माणसं आहेत जी वेगळ्याच मातीची बनलेली असतात, अतिशय वेगळा विचार करणारी आणि सामाजिक भान जपणारी माणसं असतात तीच या कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन काहीतरी वेगळं करून दाखवतात!

आजकाल जो तो पैश्याच्या मागे धावत असतो. अशात चांगल्या पगाराची नोकरी म्हणजे स्वर्गीय सुखचं! वर्षाला १०-१२ लाखांची नोकरी असेल तर विचारायलाच नको. सगळं कसं परफेक्ट!

एवढ्या पगाराची नोकरी कोणी सोडेल का? पण समजा आम्ही तुम्हाला सांगितलं की एक असा तरुण आहे ज्याने १२ लाखांची नोकरी सोडली तर, तुमचा विश्वास बसेल काय? चला जाणून घेऊया हे प्रकरण नेमकं काय आहे..!

 

cow man inmarathi

तर हो तुम्ही जे वाचताय ते अगदी खरं आहे राजेश गोपालक्रिष्णन नावाच्या दाक्षिणात्य तरुणाने कोटक महिंद्रा सारख्या मोठ्या कॉर्पोरेट कंपनीतला जॉब १२ वर्षांनी सोडून दिला, महिना लाखभर रुपयाचा जॉब त्याने हसत हसत सोडला!

आज कितीही नाही म्हंटल तरी लाखभर रुपयाला सुद्धा प्रचंड किंमत आहे!

पण तरीही उंची गाड्या, गलेलठ्ठ पगार, प्रॉपर्टी या सगळ्याचा मोह आवरून स्वतःसाठी जगायचा निर्णय राजेश ने घेतला म्हणूनच आज आपण त्याच्याबद्दल इथे वाचत आहोत!

एवढा पगार सोडून त्याने एक फूड व्हेंचर चालू करायचे ठरवले ज्यासाठी सुरुवातीला ८ लाख रुपयांपर्यंत भांडवल त्याला गुंतवायला लागले, त्याला प्रतिसाद सुद्धा उत्तम मिळायला लागला, झोमॅटो वगैरे साईट्स कडून सुद्धा त्याला प्रतिसाद मिळायला लागला!

 

rajesh inmarathi

 

पण जीएसटी मुळे त्याच्या या धंद्याला फटका बसला असं त्याने एका मुलाखतीत सांगितले!

पण निराश न होता त्याने आणखीन एक पाऊल पुढे टाकले आणि आपल्या घराच्या मागच्या आंगणातच त्याने चक्क दुधाच्या डेअरीचा व्यवसाय सुरु केला, सुरुवातीला त्यासाठी त्याने ९ गायी त्याच्या मित्राकडून विकत घेतल्या!

 

rajesh-marathipizza

 

राजेश ची मेहनत आणि जिद्द बघून त्याला त्याच्या घरच्यांनी सुद्धा साथ द्यायला सुरुवात केली,

जॉब सोडून खूप मोठी चूक केली अशी जाणीव त्याला कधीच झाली नाही कारण त्याच्या कुटुंबाने सुद्धा यात लक्ष घालायला सुरुवात केली!प्रत्येकानेच त्याची नोकरी सोडून व्यवसाय धंद्यात शिरलं पाहिजे असा मुळीच नाही!

पण स्वबळावर बिझनेस यशस्वी पार पाडून दाखवायची मजा काही वेगळीच असते, त्यामुळे नोकरी सोडून एखादा उद्योग करणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असावा!

चांगला पगार आणि ऐशोआरामी जीवन असून देखील काही लोकांचं त्यात मन रमत नसतं. मग अश्या वेळेस चाकोरीबाहेरचा विचार करणं सुरु होतं. असच चाकोरीच्या बाहेर पडून भरमसाट पगाराच्या नोकरीला लाथ मारून राजेश ने हा व्यवसाय का करायचं ठरवलं?

हे जाणून घ्यायचं असेल, त्याच्या गायी पाळण्याच्या किंवा दुधाच्या डेअरीच्या बाबतीत आणखीन जाणून घ्यायचं असेल तर खालचा व्हिडियो सुद्धा नक्कीच बघा!

तुम्हा आम्हाला पडणाऱ्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं यात राजेश ने स्वतः दिली आहेत! चला तुम्ही ही जाणून घ्या की राजेशच्या मनात नक्की काय सुरु आहे, त्याच्याच शब्दातून!

हा व्हिडियो बघा: 

 

 

ही व्यक्ती तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल !!!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?