'सुभाष बाबूंच्या "सैनिकांसाठी" नेहरूंनी चालवलेला खटला भारताच्या "संपूर्ण" स्वातंत्र्यासाठी कारणीभूत ठरला

सुभाष बाबूंच्या “सैनिकांसाठी” नेहरूंनी चालवलेला खटला भारताच्या “संपूर्ण” स्वातंत्र्यासाठी कारणीभूत ठरला

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

१९३० नंतर ब्रिटीश सत्तेविरुद्ध स्वातंत्र्याची चळवळ आक्रमकच होत गेली. ब्रिटीशांनी बरीचशी सत्ता भारतीयांच्या हातात सोपवली देखील होती. तरी देखील त्यांनी अजून भारताला संपूर्ण स्वातंत्र्य सुपूर्त केलेले नव्हते.

या संपूर्ण स्वातंत्र्यासाठी जोरदार प्रयत्न चालूच होते. १९४२ची चलेजाव चळवळ ही देखील त्याचेच एक फलित होते.

मात्र त्याचवेळी दुसऱ्या महायुद्धाचे पडघम जगभर वाजू लागल्याने ही भारतीयांची स्वातंत्र्य चळवळ मात्र काहीशी थंडावली होती.

अशावेळी सुभाषबाबूंसारख्या स्वातंत्र्यसैनिकांना मात्र वाटत होते, की हीच खरी वेळ आहे, ब्रिटीशांकडून स्वातंत्र्य हिसकावून घेण्याची. त्यांना बाहेरून आणि आतून दोन्हीकडून विरोध करून जेरीस आणण्याची.

त्यासाठीच त्यांनी इंडीयन नॅशनल आर्मी म्हणून ब्रिटीश इंडीयन आर्मीला समांतर सैनिकी चळवळ सुरू केली होती. या आर्मीत बरेच भारतीय सहभागी झाले होते.

 

bose with INA inmarathi
frontline.thehindu.com

 

या आर्मीला देशभरातून सहानुभूती आणि पाठींबा मिळत असताना ब्रिटीश सरकार मात्र या आर्मीला आणि तिच्या सदस्यांना देशद्रोही ठरवून त्यांची धरपकड करत होते. त्यांच्यावर खटले चालवत होते.

साहजिकच भारतीय जनमानसात ब्रिटीशांच्या विरोधातील हवा पुन्हा एकदा नव्याने तापली आणि तिने सुभाषबाबूंच्या सैन्याला पाठींबा दर्शवत ब्रिटीशांकडे संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी नव्याने रेटली.

शाहनवाझ खान, प्रेम सहगल आणि गुरबक्ष धिल्लन –

भारतीय जनतेने आणि कॉंग्रेससारख्या प्रमुख पक्षाने विरोध करूनही ब्रिटीश सरकारने सुभाषबाबू यांच्या इंडीयन नॅशनल आर्मीमधील सदस्यांची धरपकड सुरू केली आणि त्यांच्यावर खटले भरायला सुरूवात केली.

आणि त्यामुळे देशभर त्या विरोधात निदर्शन सुरू झाली होती.

संपूर्ण भारत एकवटून संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी देशभर सुरू झाली त्याच्यामागे हे इंडिअन नॅशनल आर्मीतल्या सदस्यांविरुद्ध भरण्यात आलेले खटलेच प्रामुख्याने कारणीभूत ठरले!

१९४५ मध्ये ब्रिटीश सैन्याने सुभाषचंद्र बोस यांच्या इंडीअन नॅशनल आर्मी मधील सदस्यांना ताब्यात घ्यायला सुरूवात केली.

ब्रिटीश सरकारने असं करू नये यासाठी त्यांना इशारे देण्यात आले होते परंतु भारतीय सर्वसामान्य लोक सुभाषबाबूंच्या सेनेला देशद्रोही मानत असतील असं वाटून ब्रिटीश सरकारने त्याकडे दुर्लक्ष करून हे खटले चालूच ठेवले.

ब्रिटीश सरकारने सर्वप्रथम या आर्मीतील सदस्य पकडले होते त्यात शाहनवाझ खान, प्रेम सहगल आणि गुरबक्ष धिल्लन हे तिघे होते.

 

ina officers inmarathi
sainrakesh.blogspot.com

 

त्यांच्यावर संयुक्तपणे देशाविरुद्ध युद्ध छेडण्याचा आरोप लावण्यात आला होता. (आयपीसी कलम १२१) शिवाय या तिघांवर खून आणि खून करण्यासाठी प्रोत्साहन देण्याबद्दलही स्वतंत्रपणे खटले भरण्यात आले होते.

लाल किल्ल्यावरील खटले –

हे खटले लाल किल्ला खटले म्हणूनही प्रसिद्ध झाले होते.

ब्रिटीशांनी जरी इंडीयन नॅशनल आर्मीच्या सदस्यांविरुद्ध खटले दाखल केले असले आणि त्यांना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न केला असला, तरी या खटल्याकडे सगळ्या भारताचे लक्ष लागून, सर्वसामान्य भारतीयांना ही आर्मी देशद्रोही नव्हे, तर देशप्रेमी वाटू लागली होती.

ही आर्मी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढतेय याची लोकांना जाणीव होऊ लागली होती. त्यामुळे या पकडलेल्या सदस्यांच्या बाजूने ब्रिटीश सरकारविरोधात देशातील विविध भागातून निदर्शने सुरू झाली होती.

 

red fort inmarathi
ibgnews.com

 

कॉंग्रेसने घेतली दखल –

भारतातील तेव्हाच्या देशातील प्रमुख पक्षाने, कॉंग्रेसने या घटनेची दखल घेतली. सुभाषबाबूंच्या आर्मीच्या बाजूने सारा देश एक होतोय हे पाहून कॉंग्रेसनेही या घटनेचा स्वातंत्र्यचळवळीसाठी फायदा उचलायचे ठरवले.

देशात पुन्हा एकदा लोकांच्या मनात स्वातंत्र्याची भावना आणि जोश निर्माण होतोय, याचा योग्य तो फायदा उचलून ही मागणी पुढे रेटता येईल याची त्यांना जाणीव झाली.

देश तोपर्यंत स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल करतच होता. तरी देखील अजून संपूर्ण स्वातंत्र्य मिळालेले नव्हते. अजूनही सत्ता ही ब्रिटीशांच्याच हातात होती.

त्यामुळे इंडियन नॅशनल आर्मीच्या या तीन सदस्यांच्या बाजूने खटला लढण्यासाठी त्यावेळचे जवाहरलाल नेहरू हे आपल्या पक्षातील भुलाभाई देसाई आणि तेज बहाद्दूर सप्रू या दोन सहकाऱ्यांसह पुढे आले.

या तिघांनी त्या तिघांची बाजू लढवताना इंडीयन नॅशनल आर्मीच्या कृती या कायदेशीर आणि भारतीय राष्ट्रीय सैनिक कायद्याला धरूनच आहेत असे मांडले.

 

red fort trial inmarathi
theprint.in

 

आणि त्या तिघांची इंडीयन पिनल कोड अंतर्गत आरोपातून सुटका करण्यासाठी त्यांची बाजू मांडली.

या खटल्यात त्या तिघा आरोपींच्या बाजूने साक्ष देण्यासाठी अनेक लोकांना कोर्टात बोलावले गेले. या साक्षीदारांनी आयएनएच्या वाढीच्या आणि त्या तीन आरोपींच्या बाजूने साक्ष दिली.

त्यांच्या देशाच्या स्वातंत्र्याविषयीच्या भूमिका स्पष्ट केल्या. त्यासंबंधी पुरावे दिले.

परंतु त्या तिघांच्या बचावासाठी जितके युक्तिवाद केले गेले, तितके ते तिघेही अधिक देशद्रोही आणि देशाविरूद्ध युद्ध छेडणारे म्हणून दोषी ठरत गेले.

मात्र त्या तिघांना मृत्युदंड न ठोठावता त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले. हे तिन्ही आरोपी सुटल्यानंतर देशभरात त्यांचे खूप स्वागत झाले. देशासाठी ते आरोपी नव्हे, तर हिरो ठरले.

कॉंग्रसनेही त्या तिघांना पाठींबा दिला.

तरीही खटले सुरूच राहिले –

त्या तिघांना सोडलं, तरी ब्रिटीश सरकारने आयएनएच्या इतर सदस्यांची धरपकड आणि त्यांच्यावर खटले दाखल करणे सुरूच ठेवले होते. अर्थात खुद्द ब्रिटीश इंडीयन आर्मीने असे न करण्याविषयी सुचवले होते.

 

ina team inmarathi
rstv.nic.in

 

असे केल्याने भारतीय जनमानसात विद्रोह निर्माण होऊ शकतो याचीही कल्पना दिली होती. तेव्हा ब्रिटीश आर्मीचे सरसेनापती क्लॉड ओचिनलेक हे होते.

ब्रिटीश इंडियन आर्मीत असलेल्या भारतीयांचा कल देखील देशाप्रती निष्ठेकडे अधिक झुकू लागला होता. ब्रिटीश दबावापुढे भारतीय सशस्त्र दलाचा प्रतिकार वाढत चालला होता.

भारीतय सैन्य आणि सर्वसामान्य नागरीक यांची एकजूट –

१९४६ च्या जानेवारी महिन्यात इंडियन एअर फोर्सच्या अधिकाऱ्यांनी संप करून विरोध सुरू केला. फेब्रुवारी महिन्यात रॉयल इंडीयन नेव्ही दल देखील त्यांना सामील झाले.

या दोन सैन्यदलांबरोबरच मुंबई सारख्या शहरातील नागरीक देखील संपात सहभागी झाले. आणि अशा रीतीने सारा देश ब्रिटीश सत्तेविरुद्ध संपूर्ण भारतीय स्वातंत्र्याच्या मागणीत सहभागी झाला.

हा स्पष्टपणे संपूर्ण भारतीय जनतेचा ब्रिटीश सरकारविरोधातील अंतिम उठाव होता. यातूनच ब्रिटीशांना भारतीयांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यासंबंधी पुढील पावले उचलावी लागली. 

 

naval mutiny inmarathi
timesofindia.indiatimes.com

 

भारतीय स्वातंत्र्यसैनिक सुभाषबाबू बोस यांनी आधीच वक्तव्य केले होते दोन वर्षांपूर्वी की,

‘ब्रिटीश सैन्यावर बाहेरून आक्रमण आणि देशांतर्गत ब्रिटीश सत्तेला विरोध जेव्हा दणक्यात सुरू होईल तेव्हाच भारताला पूर्ण स्वातंत्र्य देऊन ब्रिटीश सत्तेला इथून निघावं लागेल.’

सुभाषबाबू यांनी ऊभ्या केलेल्या इंडीयन नॅशनल आर्मीच्या त्या तीन सदस्यांना पकडून ब्रिटीश सरकारने जेव्हा त्यांच्याविरोधात लाल किल्ल्यावरून खटले चालवले!

तेव्हाच देश ब्रिटीश सत्तेविरुद्ध एकवटला आणि ब्रिटीश सत्तेचे या आर्मीला आणि त्यांच्या सदस्यांना देशद्रोही ठरवण्याचे मनसुबे उधळून लावण्यात आले.

आणि ते तिघे देशाच्या नजरेत देशद्रोही नव्हे, तर खरे हिरो, खरे देशभक्त ठरले. या खटल्याची मधुर फळे पुढील दोन वर्षातच आपल्या देशाला चाखायला मिळाली. स्वातंत्र्याच्या स्वरूपात!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “सुभाष बाबूंच्या “सैनिकांसाठी” नेहरूंनी चालवलेला खटला भारताच्या “संपूर्ण” स्वातंत्र्यासाठी कारणीभूत ठरला

  • July 4, 2020 at 5:32 pm
    Permalink

    याच नेहरूंनी आझाद हिंदचे सैन्य भारतात प्रवेश केले तर मी स्वतः बंदूक घेऊन त्यांच्याशी सामना करेन असे वक्तव्य केले होते.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?