…..आणि अशा प्रकारे एकता कपूरने “महाभारत” या महाकाव्याचं काहीतरी भलतंच करून टाकलं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

भारतात एंटरटेंमेंट म्हटलं, की सगळेजण दोनच गोष्टी जास्त बघतात. एक म्हणजे सिनेमा आणि दुसरं म्हणजे सिरियल्स. भारतीय लोकांचा कल या दोन गोष्टी बघण्याकडे अधिक असतो.

त्यातही विविध भाषेतील मालिका म्हणजेच लाडके ‘डेली सोप्स’ घराघरात पाहिले जातात. यांचे टीआरपी रेटिंग्स खूप जास्त असतात. याचा फायदा कायम निर्मात्यांना होतो.

‘लोगो को कुछ अलग दिखाना है’ असं म्हणत, वेगवेगळे विषय त्यांच्या समोर मांडून जास्तीत जास्त प्रेक्षक ते गोळा करतात. पण अस करतांना सुद्धा आपण अनेकदा लोकांना चुकीच्या गोष्टी, कथा दाखवतोय याचे भान त्यांना राहत नाही.

काही विषय असे असतात जे जुन्या कथा, प्रसंग यावर आधारित असतात; पण मूळ कथेपेक्षा स्वतःच्या पब्लिसिटी आणि टीआरपीसाठी काय दाखवता येईल याचा विचार ते जास्त करतात.

टेलिविजनवर विविधभाषीय मालिका दाखवल्या जातात. यात काही काळ प्रत्येक विषयाची लाट येते. म्हणजे काय तर काही काळ त्याच विषयावर आधारित मालिका सगळीकडे दाखवल्या जातात.

 

people watching tv inmarathi
livemint.com

 

ज्यात साधारणपणे प्रेम आणि संसार हे विषय ठरलेले असतातच. पण हे सोडून देवी देवता यांचे चरित्र दाखवले जाते. तर काही सिरियल्स या प्रामुख्याने ऐतिहासिक घटनांवर, राजांवर, त्यातही त्या राजांच्या प्रेम कथेवर आधारित असतात.

भारतीय संस्कृतीला साधारणपणे मायथोलोजीचा पाया मोठ्या प्रमाणावर आहे. त्यातही पुराणे, रामायण, महाभारत यातील कथा तर निर्माते आवर्जून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात.

मग कधी डॉक्युमेंटरी असतील किंवा रोजच्या मालिका असतील, हा मायथोलोजी विषय वेगळ्या पद्धतीने ते मांडतात.

१९८८ च्या काळात ‘महाभारत’ नावाची मालिका डीडी नॅशनल वर लागायची. ज्याचे एकूण ९४ भाग होते आणि त्याची कथा पूर्णपणे मूळ संस्कृत ग्रंथावर आधारलेली होती.

त्याचे प्रोड्यूसर ‘बि.आर.चोप्रा’ यांनी हुबेहूब महाभारत लोकांना दाखवण्याचा प्रयत्न तेव्हा केला.

 

mahabharat inmarathi1
thestatesman.com

 

याच महाभारतावर आधारित एक मालिका २००८ मध्ये एकता कपूरने तिच्या बालाजी टेलेफिल्म्स या प्रॉडक्शन हाऊसमधून प्रदर्शित केली. त्याचं नाव होत ‘कहानी हमारे महाभारत की’.

महाभारताची मूळ कथाच यात बदलेली होती. साधारण रोजच्या बघितल्या जाणार्‍या सिरियल्स प्रमाणे त्याची संकल्पना होती. ज्यात कथा कशीही वळते, आणि तिचा आधीच्या घटनेशी फारसा संबंध नसतो असे प्रकार या महाभारतात पाहायला मिळतात.

बी.आर.चोप्रा आणि एकता कपूर या दोघांनीही महभारतावरील सिरियलची निर्मिती केली. पण; १९८८ साली आलेले महाभारत हे मूळ कथेवर आधारित होते.

त्यातील एकूण एक घटना, कलाकारांची केलेली वेशभुषा हे अगदी १०० टक्के ओरिजिनल वाटत होती. त्यामुळे लोकांनी दिलेला प्रतिसादात हा उत्तम होता. अजून सुद्धा कधीही जुने महाभारत टेलीविजनवर लागले तरी घरातले सगळेजण आनंदाने बघायला बसतात.

तसेच त्याचा IMDB रेट सुद्धा बर्‍यापैकी जास्त आहे. या दोन्ही सिरियल्सचे विकीपीडिया पेज पाहिले तर लक्षात येईल की जुने महाभारत याची माहिती देतांना ‘इतिहासावर’ आधारित असा उल्लेख येतो.

 

mahabharat 2 inmarathi
OrissaPOST.com

 

तर एकता कपूरची सिरियल ही ‘इंडियन सोप ओपेरा’ या नावाने ओळखली जाते.

मुकेश खन्ना यांचा इंटरव्ह्यु मागे घेतला होता, तेव्हा त्यांनी काही मुद्दे एकता कपूर हिच्या महाभारतावरील मालिकेवर बोलतांना मांडले.

 

ekta kapoor mahabharat inmarathi
bollywoodbubble.com

 

‘त्यात वापरले गेलेली कलाकारांची वेशभूषा ही आपल्या महाभारताच्या आसपास देखील नाही. त्यावर मोठ्या प्रमाणात रोमन साम्राज्याचा पगडा आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे त्याचे नाव हे ‘हमारे महाभारत की’ अस म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. कारण ते कुठल्याही माणसाने लिहिलेले नसून वेद महर्षी व्यास ऋषींनी लिहिलंय.

कुठल्याही कथेसाठी कलाकार निवडतांना त्या कथेतील पात्राचा विचार केला जातो, जो एकता कपूरने केलेला नाही. तिने फक्त प्रसिद्ध कलाकारांना घेतले जेणेकरून टीआरपी वाढायला मदत होईल.

जुन्या महाभारतात घेतलेल्या कलाकारांमधील वैविध्य तुम्ही बघू शकता. त्यात प्रत्येक पात्र उत्तम प्रकारे साकारली. जसे नितीश भारद्वाज यांनी उभा केलेला कृष्ण. सगळ्यांना अजूनही आपलासा वाटतो.

 

nitish bhardwaj krishna inmarathi
india.com

 

आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा त्यांनी मांडला ते म्हणजे द्रौपदीच्या दंडावर टॅटू दाखवण्यात आला होता. त्याकाळात शरीरावर गोंदवणे ही संकल्पना तरी होती का? यातच मुळात शंका आहे.

एकता कपूरने तिच्या एका जुन्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं, तिने ही कथा तिच्या दृष्टीकोनातून लोकांपर्यंत पोहोचवली आहे.

सांगायचं म्हणजे, एका परदेशी पीटर ब्रुक्स नावाच्या दिग्दर्शकांनी १९८९ या वर्षात महाभारतावर आधारित कथेचे दिग्दर्शन केल होतं. जे एकता कपूरच्या कथेपेक्षा पण दमदार होतं.

या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर लक्षात येईल, की एकता कपूरने महाभारत फार वेगळ्या प्रकारे लोकांसमोर मांडले ज्याचा मूळ महाभारताशी तसूभर पण संबंध नव्हता.

अजून काही मुद्दे जे अभ्यासकांना आणि ज्यांना मूळ महाभारत माहिती आहे त्यांना खटकले ते म्हणजे, कथेतला ओवर ड्रमॅटिकपणा. साधारण प्रत्येक एपिसोड पहिलं तर त्यातील सीनमध्ये मोठ्या प्रमाणात लाऊड बॅकग्राऊंड म्यूजिकचा वापर केला गेलंय.

आणि त्यातसुद्धा जास्तीत जास्त डायलोग्स वापरुन पात्रांचे महत्व कमी केल्यासारखं वाटतं.

 

ekta kapoor mahabharat inmarathi1
storypick.com

 

बी.आर.चोप्रा यांच्या महाभारतात खूप मृदु संगीत आहे. आणि कमीत कमी पण तरीसुद्धा प्रभावशाली डायलोग्स असल्याने अंगावर काटा आल्याशिवाय राहात नाही.

कुठल्याही मायथोलोजी किंवा ऐतिहासिक विषयावर आधारित मालिकांमध्ये कथा आणि जुने संदर्भ असल्यास ते कथन करणे अत्यंत महत्वाचं असतं.

तुम्हाला आठवत असेल तर हरिष भीमानी यांच्या आवाजातील ‘मै समय हूं’ ऐकण्यात वेगळीच मजा होती. ज्यामुळे कुठलीही कथा ऐकतांना आपल्याला उस्तुकता निर्माण होते.

एकता कपूरने सुद्धा महर्षि व्यास बोलतायेत असे दाखवले पण ते लोकांना एवढ भावलं नाही.

एकता कपूरने काही महत्त्वाचे प्रसंग हे अत्यंत चुकीच्या प्रकारे दाखवले. तसच महाभारतातील काही महत्वाच्या कथाच तिने या मालिकेमध्ये दाखवल्या नाहीत. जसे की पराशर ऋषि आणि सत्यवती असतील, कर्णाचा जन्म असेल किंवा पांडवांचे वनवास असेल.

यात सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात काल्पनिक वाटत होत्या. कंसवध सारख्या अनेक घटनांना तिने महत्व दिलं आणि अस दाखवलं की मूळ महाभारत घडलं ते याच प्रसंगामुळे जे अत्यंत चुकीचं होत.

केवळ टीआरपी हवा म्हणून सुरू केलेली ही मालिका होती असं म्हटलं तर वावग ठरणार नाही.

 

ekta kapoor mahabharat inmarathi2
quora.com

 

लोकांना चुकीच्या गोष्टी दाखवण्यापेक्षा योग्य गोष्टींचा अभ्यास करून, त्या ठराविक विषयातील अनुभवी लोकांशी बोलून मांडल्या तर जास्त प्रभावशाली ठरतील आणि लोकांना आवडतील यात शंकाच नाही.

या सगळ्याचा विचार केला तर लक्षात येईल, की भारतात एंटरटेंमेंट सेक्टरला कमालीच्या बाहेर महत्त्व आहे. प्रेक्षक ते आवडीने बघतात पण म्हणून आपण काही मूळ कथा बदलून त्याचा अर्थ वेगळाच काढून, ते हवे तसे मांडणे याला काहीच अर्थ नाही.

तर यापुढे सुद्धा एकता कपूर सारख्या निर्मात्यांनी टीआरपी करता सिरियल करतांना थोडा विचार करावा. महाभारत यासारख्या विषयांचे जसे बारा वाजवले तसे न करता लोकांना आवडेल आणि पटेल असाच कंटेंट द्यावा हीच इच्छा आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?