'स्वयंपाकघरात हा पदार्थ ठेवलात तर महागडी औषधं, हॉस्पिटलायझेशन...बरंच काही टळू शकेल!

स्वयंपाकघरात हा पदार्थ ठेवलात तर महागडी औषधं, हॉस्पिटलायझेशन…बरंच काही टळू शकेल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आपले स्वयंपाकघर हा आपल्या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. सारे काही पोटा – पाण्यासाठीच तर सुरू असते. आपला जॉब, करिअर, व्यवसाय ह्या सगळ्याच्या पाठी मागचे मूळा कारण म्हणजे पोट भरणे!

भारतीय आहार किंवा खाद्य संस्कृती परिपूर्ण आहे. चौरस आहार हे आपल्या खाद्य संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. त्यात कडू, गोड, तिखट, आंबट, तुरट आणि खारट ह्या षड्रसांचा समावेश असतो.

आपल्याकडील हवामानानुसार आपले भोजन असते हा आपल्या खाद्यसंस्कृतीचा सगळ्यात मोठा गुण आहे.

 

indian food culture 2 inmarathi
nuffoodsspectrum.in

 

म्हणजेच हवामानानुसार घेतले जाणारे पिक आणि हवामानुसार पचन होणारे, तब्येतीसाठी उपयुक्त असाच आहार आपल्याकडे असतो. आपल्याकडे बहुतांश अन्नसेवन हे आपल्या आयुर्वेदानुसार असते. ज्याचा शरीराला खूपच लाभ होतो.

आपल्याकडे जेवणात, आहारात नेहेमीच वापरल्या जाणाऱ्या काही पदार्थांचा उपयोग आपल्या उत्तम स्वास्थ्यासाठी होतो. किंबुहना आपल्या आहारातील हे पदार्थ आपल्या तंदुरुस्तीसाठीच असतात.

गरम मसाला किंवा मसाल्याचे अन्य प्रकार हे आपल्याकडे सगळ्यांच्याच आहारामधे कमी जास्त प्रमाणात असतात.

ह्या मसाल्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या काही घटकांपैकी एका घटकाचा उपयोग आपल्या शरीरासाठी खूपच लाभदायक असतो.

अनेक प्रकारच्या व्याधी ह्या घटकामुळे रोखल्या जाऊ शकतात, अनेक प्रकारच्या वेदनांवर हा घटक परिणामकारक आहे.

त्या घटकाची माहिती आपण ह्या लेखातून आज घेणार आहोत आणि तो घटक म्हणजे ‘लवंग’.

साधारण काळसर तपकिरी, आकाराने छोटीशी ही लवंग वरून पाहिली असता एखाद्या नाजूक फूलाप्रमाणेच दिसते.

 

cloves inmarathi
delishably.com

 

चार नाजूक, छोट्याशा पाकळ्या आणि त्या फूलाला साजेसं छोटंसच देठ असा नाजूक दिसणारा हा मसाल्याचा पदार्थ चवीला मात्र झणझणीत असतो.

मसाल्याव्यतिरिक्त अन्य देखील पदार्थांमध्ये लवंग घतली जाते. साखरांबा ह्या गोड पदार्थामधे लवंग घातली जाते. तसेच काही भागात जिथे अती शीतलता असते त्या ठिकाणी सूपमधे, चहामध्ये लवंग वापरली जाते.

तसेच पावसाळ्यात सर्दी, खोकला अशा संसर्गजन्य रोगांपासून संरक्षणासाठी काढा बनवला जातो त्यातील इतर घटकांपैकी एक घटक लवंग असतो.

म्हणजेच पारंपारिक औषधांमध्ये लवंग वापरली जाते. ह्या लवंगाचे आरोग्याच्या दृष्टीने होणारे फायदे आज आपण पाहूया!

सर्वप्रथम लवंगीमधे असणारे घटक आपण पाहूया :

१ चमचा लवंग (साधारण २ ग्राम लंवग) कॅलरी – ६,  कर्बोदके – १ ग्रॅम, फायबर – १ ग्रॅम, मॅगनीज – ५५%, व्हिटॅमिन के – २%

 

clove 2 inmarathi
mnn.com

 

मेंदूचे कार्य योग्य तऱ्हेने होण्यासाठी, मेंदूची कार्यक्षमता वाढविण्यासाठी मॅंगेनीज खूपच उपयुक्त असते शिवाय हाडांना बळकटी मिळण्यासाठी कॅल्शियमच्या खालोखाल मॅंगेनीज जास्त फायदेशीर असते.

लवंगांमध्ये कॅलरीज कमी असल्या तरी मॅंगनीजनी भरपूर असल्याने ह्याचा कोलेस्टेरॉल कमी करणे, हाडे मजबूत करणे, स्नांयु बळकट करणे, हार्मोन्स् संतुलित ठेवणे ह्यासारखे फायदे होतात.

लवंग हा वेदनाशामक म्हणून काम करणारा मुख्य घटक आहे. प्रामुख्याने दातदुखी, हिरड्यांशी संबंधित विकार, वेदना ह्यासाठी औषध म्हणून लवंग वापरली जाते. दात दुखत असेल नुसती लवंग दाताखाली धरतात.

जर लवंग तेल असेल तर ते स्वच्छ, छोट्याशा कापसाच्या बोळ्यावर घेऊन तो बोळा दाताखाली ठेवावा ज्यामुळे दातदुखीवर खूपच प्रभावी परिणाम होऊन दात किंवा दाढदुखी कमी होते.

 

clove oil inmarathi
wikihow.com

 

शिवाय तोंडासंबंधी बाकीच्या समस्यांसाठी देखील लवंग वापरली जाते. जसे, मुखशुद्धीसाठी, तोंडाला येणारा दुर्गंध दूर करण्यासाठी लवंग चघळली जाते.

तोंडातील हानीकारक ‘बॅक्टेरिया’ किंवा विषाणू नष्ट करण्यास लवंग खूपच उपयुक्त असते. हिरड्यांच्या रोगाशी संबंधित जीवाणू, विषाणूंची वाढ लवंग सेवनाने खुंटते.

लवंग आपल्या आतड्यांसाठी खूपच उपयुक्त असते. आतड्यांना शांत करण्यासाठी आणि आराम मिळण्यासाठी लवंग खूपच उपयुक्त आहे, ज्यामुळे पचन क्रिया सुधारते आणि अन्न पचनास सहजरित्या मदत होते.

पोटासंबंधित काही विकार असतील जसे पोट बिघडणे, पोटात गुडगुडणे, पोट अस्वस्थ असणे ह्यासाठी लवंग खूपच लाभदायक असते.

तसेच पोटात गोळा येणे, गॅस किंवा अपचन ह्यासारखे विकार लवंग सेवनाने नाहिसे होतात.

ह्याशिवाय यकृतांचे कार्य सुधारते, जळजळ कमी करणे, ह्याशिवाय महत्त्वाचे म्हणजे यकृतावरील व्रण (stomach ulcers) किंवा तत्सम जखमा लवंगाच्या सेवनाने बरे होऊ शकतात.

लवंग हे ऍंटीऑक्सिडेंटस् नी युक्त असतात. लवंगाचे सेवन अशा ऑक्सिडेंटस् चा ताण कमी करतात जे अनेक आजारांची कारणे असतात.

 

stomoch problem inmarathi
lifealth.com

 

ज्यांचा आपल्या शरीरावर अती ताण पडतो आणि ज्यामुळे अनेक आजार होण्याची भरपूर शक्यता असते.

लवंग ह्या घटकामध्ये युजेनॉल नावाचे कार्बोनिक यौगिक (compound) असते जे उत्तम नैसर्गिक ऍंटीऑक्सिडेंट आहे. म्हणजेच लवंगाचे आपल्या आहारात योग्य प्रमाणतील सेवन आपल्या आरोग्यास अत्यंत उपयुक्त असते.

कफ अर्थात सर्दी, खोकला ह्यांना कारणीभूत असणाऱ्या ह्या कफावर नियंत्रण ठेवण्याचे काम लवंग करते.

आधी सांगितल्याप्रमाणे सर्दी खोकला ह्यासारख्या संसर्गजन्य विकारांवर जो पारंपारिक उपाय केला जातो तो म्हणजे काढा!

ह्या काढ्यामध्ये जे घटक असतात त्यापैकी एक मुख्य घटक म्हणजे लवंग! लवंग नुसती खाल्ली किंवा चघळली तरी चालते ज्यामुळे कफ कमी करण्यास मदत होते.

चहामध्ये लवंग घालून तो चहा प्यायल्यास कफाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते जो सर्दी-खोकल्यासाठी कारणीभूत असतो.

विशेषतः हवामान बदलल्यावर किंवा पावसाळ्यात ह्या कफाचे प्रमाण वाढते आणि सर्दी किंवा खोकल्याने हैराण व्हायला होते तेव्हा लवंगाचे सेवन करणे अतिशय उपयुक्त ठरते.

 

clove tea inmarathi
dupischai.com

 

ह्याशिवाय श्वसनाशी संबंधित इतर विकार जसे सायनस, दमा ह्यांवर देखील लवंग खूप फायदेशीर ठरते.

लवंग योग्य मात्रेत नियमित सेवन केली तर ह्या सर्दी, खोकला, कफ, दमा आणि सायनस सारख्या रोगांवर नियंत्रण करता येते.

लवंगाचा आणखीन एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे लवंग सेवन केल्यामुळे रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण राहते. रोज १ लवंग खाल्ली तर रक्तातील साखर नियंत्रित राहते.

रोजच्या आहारात जर योग्य प्रमाणात लवंग वापरली गेली तर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत नाही.

कर्करोगाशी संबंधित पेशींना नष्ट करण्याचे काम लवंगाचे योग्य प्रमाणतील सेवन करते हे एका प्रयोगा अंती निष्पन्न झाले आहे.

आधी उल्लेख केल्याप्रमाणे लवंग मध्ये युजेनॉल असते जे कर्करोग विरोधात उपयोगी ठरते. गर्भाशयाचा तसेच अन्ननलिकेचा कर्करोग ज्या पेशींमुळे होतो त्या पेशी लवंग सेवनामुळे मृत होतात.

पण, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कोणत्याही गोष्टीचे अती सेवन हे हानीकारक असते त्याप्रमाणे लवंग प्रमाणाबाहेर सेवन केली तर ती विषयुक्त ठरते. “अती तेथे माती” हे कायम लक्षात ठेवावे.

 

clove 3 inmarathi
fit.thequint.com

 

लवंगाचे योग्य प्रमाणातील सेवन हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत करते त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर रोज एक लवंग सेवन केली तर ते आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असते.

मग ती कोणत्या पदार्थात, चहात, चटणी किंवा कोशिंबिरीत घालून खावी किंवा ज्यांना शक्य आहे त्यांनी नुसतीच चघळावी, पण दिवसातून एक लवंग रोज खावी.

===

सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. InMarathi.com च्या वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून ,डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?