या कलाकरांनी बॉलिवूडमधील “गलिच्छ” प्रकारांवर दणदणीत विजय मिळवलाय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

“Nepotism म्हणजे काय रे भाऊ ?” असा प्रश्न किती तरी जणांनी मागच्या काही दिवसात विचारला असेल. शब्दशः अर्थ सांगायचा तर वशिलेबाजी. आपल्याला नात्यातल्या, जवळच्या लोकांनाच काम मिळावं, बढती मिळावी म्हणून केलेली तरतूद.

वर वर न दिसणारी ही गोष्ट जवळपास प्रत्येक इंडस्ट्री मध्ये असते. काही ठिकाणी त्यावर उघडपणे बोललं जातं तर काही ठिकाणी न बोलता ही गोष्ट अस्तित्वात असते.

काही सरकारी नोकरीत बढती मिळण्यासाठी किंवा एका ठराविक ठिकाणी बदली न होण्यासाठी लाच देऊन ही ठरलेली गोष्ट बदलण्यात आली असं आपण लहापणापासून वाचत आहोत.

जर का तुम्ही खाजगी क्षेत्रात काम करत आहात तर तिथे या गोष्टीला reference असं गोंडस नाव देण्यात आलं आहे.

Nepotism हा शब्द सध्या अचानक चर्चेत आला आहे तो म्हणजे बॉलीवूड मुळे. हो, इथे सुद्धा हे चालतं. ठराविक लोक हे त्यांच्या मित्रांना, त्यांना ‘चांगलं’ म्हणणाऱ्या लोकांना पुढे येण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात.

फरक इतकाच आहे की बॉलीवूड अशी कोणती एक संस्था नसल्याने त्याला काही नियम लावून देण्यात आलेले नाहीयेत. प्रत्येक जण आपल्या मनाने नवीन रुल्स तयार करतो आणि त्याच्या दृष्टीने ‘टॅलेंटेड’ लोकांना सोबत घेतो आणि यश चाखायची संधी देतो.

‘चोप्रा कॅम्प’, ‘जोहर कॅम्प’, ‘राम गोपाल वर्मा कॅम्प’, ‘सलमान खान कॅम्प’ असे अदृश्य कॅम्प काही वर्षात इथे तयार झाले आहेत. हे कॅम्पच बॉलीवूड ची ‘दिशा ठरवतात’ आणि एखाद्या कलाकाराचं ‘भवितव्य’ सुद्धा, असं म्हंटल्यास चूक ठरणार नाही.

सुशांत सिंग राजपूत या गुणी कलाकाराच्या आत्महत्येनंतर हा विषय सध्या सर्वांच्या केंद्रस्थानी आहे. मागील चार पाच वर्षात पदार्पण केलेले कोणतेही कलाकार बघा.

 

sushant singh inmarathi
geo.tv

 

ते एक तर कोणत्या तरी बॉलीवूड मधील यशस्वी व्यक्तीचे मुलं आहेत किंवा जवळचे नातेवाईक आहेत.

कोणी कलाकार रंगभूमी वर काम करून किंवा टीव्ही सिरीयल मध्ये काम करून सिनेमात पदार्पण केलेला असेल तर त्याला लगेच ‘बाहेरचा’ किंवा ‘outsider’ असा लेबल लावून टाकण्यात येतं आणि त्याला कमीत कमी काम कसं मिळेल यासाठी एक अदृश्य फळी तयार केली जाते.

बॉलीवूड मधील अजून एक घातक पद्धत म्हणजे ‘कॉन्ट्रॅक्ट’. एखाद्या कलाकाराला तीन चित्रपटांसाठी एकदाच साईन केलं जातं. त्या चित्रकरणाच्या दरम्यान आलेल्या संधी त्याला सोडव्या लागतात आणि मग तो कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर न त्याला कोणता निर्माता काम देतो न कोणतं बॅनर.

त्या कलाकाराने जर तो कॉन्ट्रॅक्ट अर्ध्यात संपवला मग तर त्याचं करिअरच संपवण्यात येतं.

याचं एक उदाहरण म्हणजे महिमा चौधरी. तिने सुभाष घई सोबत तीन सिनेमाचा कॉन्ट्रॅक्ट केला होता. तो सुरू असेपर्यंत कमाईतील ३५ टक्के हिस्सा सुभाष घई यांच्या ‘मुक्ता आर्टस्’ या कंपनी ला द्यायचा आणि त्या दरम्यान कोणताही परदेश दौरा परवानगी शिवाय करायचा नाही.

किती जाचक अटी आहेत या कोणत्याही कलाकारासाठी!!

या प्रकरणात पूर्ण बॉलीवूड ढवळून निघत आहे आणि तिथे असलेली एक फळी अधोरेखित झाली आहे. ज्या कलाकारांनी या अदृश्य शत्रूवर मात केली त्याबद्दल सुद्धा जाणून घेऊया.

Nepotism च्या चक्रात न अडकलेले किंवा त्यातून बाहेर पडू शकलेले हे काही कलाकार आहेत:

१. शाहरुख खान:

 

shahrukh khan inmarathi
timesofindia.indiatimes.com

 

एकेकाळी दिल्लीहून बॉलीवूड मध्ये करिअर करण्यासाठी आलेला हा पोरगा आज बॉलीवूड चा एक यशस्वी कलाकार म्हणून ओळखला जातो.

त्याचं बॉलीवूड मधील सध्याचं स्थान असं आहे की, कोणीही त्याला दुर्लक्षित करू शकत नाही.

 

२. अक्षयकुमार:

 

akshay kumar canadian
india.com

 

एका हॉटेल मध्ये ‘शेफ’ म्हणून काम करणारा राजीव भाटिया हा काही वर्षांनी एक मॉडेल झाला आणि मग एक यशस्वी कलाकार.

बॉलीवूड च्या या ‘खिलाडी’ कुमार ला आज सिनेमा मिळवण्यासाठी कोणत्याही ओळखीची किंवा नात्याची गरज नाहीये. तो आज केवळ त्याच्या मेहनती च्या जोरावर यशाच्या या शिखरावर आहे.

 

३. नवाझुद्दीन सिद्दीकी:

 

nawazudding siddique inmarathi
scroll.in

 

आजच्या आघाडी च्या कलाकारांपैकी एक. ज्याच्यासाठी आज रोल लिहिले जातात. हा कलाकार एके काळी छोटे रोल मिळवण्यासाठी धडपड करायचा. त्याने त्याचे प्रयत्न सोडले नाहीत.

‘सरफारोश’ मधील ‘आस्मान मे…’ पासून सुरू झालेली त्याची गाडी सध्या सुसाट धावत आहे. ‘गॅंग्स ऑफ वासेपुर’ हा नवाजुद्दीन सिद्दीकी चा पहिला मुख्य कलाकार म्हणून रोल होता.

 

४. राजकुमार राव:

 

rajkumar rao inmarathi
timesofindia.com

 

दिल्ली हुन ग्रॅज्युएट झालेला हा कलाकार FTII मध्ये acting शिकायला पुण्यात आला आणि नंतर बॉलीवूड मध्ये स्थिरावला. त्याचा पहिला मोठा रोल सुशांत सिंग राजपूत सोबतच ‘Kai Po Che’ मध्ये 2013 मध्ये मिळाला होता.

त्यानंतर ‘शाहीद’ या सिनेमासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आणि 2017 मध्ये त्याची प्रमुख भूमिका असलेला Newton हा भारताकडून ऑस्कर ला जाणारा सिनेमा ठरला.

 

५. आयुष्मान खुराना:

 

aayushman khurana 1 inmarathi
livemint.com

 

सध्याचा आघाडीचा कलाकार. चंदिगढ मधून मुंबईत करिअर करण्यासाठी आलेल्या ह्या कलाकाराने आधी MTV roadies मध्ये विजय मिळवला.

नंतर एक अँकर झाला आणि मग २०१२ मध्ये त्याला ‘विकी डोनर’ मध्ये पहिला ब्रेक मिळाला. आज तो realistic रोल करण्यासाठी सर्वात योग्य हिरो म्हणून समजला जातो.

२०१८  त्याची प्रमुख भूमिका असलेला अंधाधुन साठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

६. कंगना राणावत:

 

queen inmarathi

 

Nepotism वर सध्या उघडपणे बोलणारी कंगना राणावत ही एक यशस्वी अभिनेत्री आहे. हिमाचल प्रदेश मधून दिल्लीला मॉडेल बनण्यासाठी आलेल्या या अभिनेत्रीला पहिला मोठा रोल मिळाला तो म्हणजे ‘गँगस्टर’ मध्ये भट कॅम्प कडून.

त्यानंतर तिच्या टॅलेंट च्या जोरावर तिने लाईफ इन अ मेट्रो, फॅशन यासारखे रोल मिळवले ज्यासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.

तनु वेड्स मनू, क्वीन आणि मनकर्णिका हे तिचे प्रचंड लोकप्रिय आणि बॉक्स ऑफिसवर यशस्वी सिनेमे आहेत.

 

७. विद्या बालन:

 

vidya-balan-InMarathi-06

 

‘हम पांच’ या लोकप्रिय टीव्ही सिरीयल मधून बॉलीवूड मध्ये पदार्पण करणारी ही अभिनेत्री ‘वन वुमन आर्मी’ आहे. तिच्या अभिनयाच्या जोरावर तिने आजही बॉलीवूड मध्ये तिचं एक स्थान अबाधित ठेवलं आहे.

सुरुवातीच्या काळात नवीन रोल मिळवण्यासाठी तिला कधीही कोणत्या नात्याचा आधार घ्यावा लागला नाही.

 

८. प्रियांका चोप्रा:

 

priyanka chopra inmarathi

 

बरेली मध्ये जन्मलेली प्रियांका चोप्रा ही आज तिच्या स्मार्ट moves मुळे एक यशस्वी अभिनेत्री आणि निर्माती आहे. प्रियांका चोप्रा ही १९९४ ची मिस वर्ल्ड आहे.

आत्मविश्वास आणि ध्येय निश्चित असलं, की यश मिळतंच याचं एक उदाहरण प्रियांका चोप्रा ला म्हणता येईल.

 

९. अनुष्का शर्मा:

 

anushka sharma inmarathi
idiva.com

 

मॉडेलिंग मध्ये करिअर करत असताना अनुष्का शर्मा ला सुरुवातीला काही जाहिराती मिळाल्या. तिचा पहिला ब्रेक तिला मिळाला, तो यशराज बॅनर च्या रब ने बना दी जोडी मध्ये शाहरुख खान सोबत.

आज ती एक निर्माती सुद्धा आहे आणि पहिल्या सिनेमापासून ‘सुलतान’ मधील दमदार अभिनया पर्यंत तिने कायम चांगले रोल्स स्वीकारले.

 

१०. दीपिका पदुकोण:

 

om shanti om inmarathi
netflix.com

 

प्रकाश पदुकोण या बॅडमिंटन खेळाडू ची मुलगी दीपिका पदुकोण हिला बॉलीवूड मध्ये कोणी गॉडफादर नव्हता. आज ती सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री आहे.

आधी मॉडेलिंग आणि नंतर ओम शांती ओम पासून सुरू झालेलं acting career हे आजच्या नवोदित अभिनेत्री आणि मॉडेल साठी एक चांगलं उदाहरण आहे असं म्हणता येईल.

या लेखातून आम्ही तुम्हाला बॉलीवूडच्या दोन्ही बाजू सांगितल्या. एक आहे ती बॉलीवूड मधील ‘लॉबी’ ची आणि दुसरी बाजू म्हणजे आपल्या मेहनतीच्या जोरावर, न पटणाऱ्या गोष्टी दुर्लक्षित करून बॉलीवूड मध्ये आपलं नाणं खणखणीत आहे हे सिद्ध करणाऱ्या यशस्वी कलाकारांची बाजू.

सध्या दिसत असलेलं मळभ लवकरच दूर होवो आणि आपण पुन्हा एकदा चांगल्या सिनेमाचे साक्षीदार होऊ अशी आशा करूया.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?