' प्रसिद्ध अॅड आयकॉन आणि सामाजिक विषयांवर मार्मिक टिप्पणी करणाऱ्या 'अमूल गर्ल' चा रंजक प्रवास!

प्रसिद्ध अॅड आयकॉन आणि सामाजिक विषयांवर मार्मिक टिप्पणी करणाऱ्या ‘अमूल गर्ल’ चा रंजक प्रवास!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

Advertising Industry ही सतत बदलणारी आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे.

लोकांच्या भावनांचा, सध्याच्या विचारांचा अभ्यास करणारी आणि कोणतीही वस्तू किंवा सेवा लोकांपर्यंत कोणत्या प्रकारे पोहोचवली तर त्याला मान्यता मिळेल हे या क्षेत्रातील तज्ञ मंडळींना खूप योग्य रीतीने माहीत असतं.

सतत नवीन जाहिराती तयार करणे हा एक प्रकार आहे आणि एकच टॅगलाईन तयार करणे जी लोकांच्या कायम लक्षात राहील हा एक दुसरा प्रकार आहे.

काही कंपनी पहिला मार्ग निवडतात आणि काही कंपनी दुसरा. या काही टॅगलाईन्स आपल्या सुद्धा लक्षात असतील: “हमारा बजाज”, “येही है राईट चॉईस बेबी…आ हा”, “टेस्ट द थंडर”.

या जाहिराती लोकांच्या तोंडात बसल्या आणि मग त्या वस्तूंचा खप वाढतच गेला. या श्रेणीमध्ये एक महत्वाचं नाव म्हणजे “Utterly Butterly Delicious…Amul.”

 

utterly butterly inmarathi
audiomatic.in

 

अमूल कंपनी ची ही टॅगलाईन इतकी लोकप्रिय झाली की त्यांनी ती कधीच बदलली नाही.

तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण ही टॅगलाईन आणि जाहिरातीत दिसणारी ती छोटी मुलगी कंपनी ने १९६६ मध्ये म्हणजे आजपासून ५४ वर्षांपूर्वी फायनल केले होते.

मध्यंतरी दूरदर्शन ने प्रकाशित केलेल्या रामायण आणि महाभारत ला अमूल ने प्रायोजित केलं होतं!

आणि त्या काळात अमूल ने ‘Amul classics’ या सदरात जवळपास सगळ्या जुन्या जाहिराती पुनः प्रसारित केल्या आणि लोकांना पुन्हा त्या क्लासिक काळात नेऊन ठेवलं जेव्हा एकच टीव्ही चॅनल होतं, माध्यमांचा इतका भडिमार नव्हता.

बघता बघता ‘अमूल गर्ल’ ने प्रत्येक घरात आपली जागा निर्माण केली. लोक अमूल च्या वस्तूंसोबत अमूल च्या जाहिराती सुद्धा आवडीने बघू लागले.

‘अमूल गर्ल’ चा एक विशिष्ट लूक आहे. निळ्या रंगाचे केस, लाल बुट्टे असलेला ड्रेस, त्याच रंगाची हेअर रिबीन. तोच पॅटर्न. फक्त कधी कधी रंग बदलले गेले.

 

the amul girl inmarathi
elaunchers.com

 

भारतीय जाहिरात क्षेत्रातील या सर्वात दीर्घ चाललेल्या कॅम्पेन ला जन्म दिला तो DaCunha यांच्या जाहिरात एजन्सी ने.

अमूल ही कंपनी १९५७ मध्ये रजिस्टर झाली होती. जाहिरात कॅम्पेन मात्र १९६६ मध्ये सुरुवात झाली होती. मुंबई च्या DaCunha यांना या कॅम्पेन ची जवाबदारी देण्यात आली होती.

अमूल कंपनी चे हेड डॉक्टर वर्गिस कुरियन ज्यांना ‘Father of India’s White Revolution’ असं सुद्धा संबोधलं जातं, त्यांनी स्वतः हे कॅम्पेन या एजन्सी ला देण्याचा निर्णय घेतला होता.

टीव्ही, जाहिरात आणि प्रिंट मीडिया हा त्या काळी जाहिराती देण्यासाठी खूप महाग होता. त्यामुळे DaCunha यांनी अमूल या ब्रँड चे होर्डिंग तयार करण्याचा निर्णय घेतला.

होर्डिंग साठी नेहमीच एका आकर्षक आणि ज्याला आपण eye catching म्हणतो तसा एक चेहरा असावा लागतो.

Eustace Fernandes या आर्ट डायरेक्टर ने ‘अमूल गर्ल’ या design ला जन्म दिला. “Utterly Butterly” ही फ्रेझ DaCunha यांच्या पत्नी निशा यांना सुचली होती.

 

creator of amul girl inmarathi
ntdin.tv

 

Butterly हा शब्द व्याकरणाच्या दृष्टीने आधी बरोबर वाटत नव्हता.

पण, हीच फ्रेझ पुढे जाऊन भारतीय advertising industry ची सर्वात लक्षात राहणारी टॅगलाईन ठरली आणि अमूल ही कंपनी डेअरी क्षेत्रात जगातली सर्वात मोठी कंपनी ठरली.

१९६६ मध्ये DaCunha आणि Fernandes यांनी या सुंदर ‘अमूल गर्ल’ चं पहिलं होर्डिंग चं डिझाईन तयार केलं.

ह्या होर्डिंग ची थीम अशी होती की, ही लहान मुलगी प्रार्थना करत आहे आणि ती एक डोळा उघडून अमूल बटर कडे बघत आहे. होर्डिंग वर या ओळी लिहीलेल्या होत्या:

“Give us this day our daily bread with Amul Butter”. ह्या ओळी लोकांना खूप आवडल्या. ज्याला आपण ‘क्लिक झाल्या’ असं ही म्हणतो.

 

amul first hoarding inmarathi
aisfm.edu.in

 

काही काळाने DaCunha यांच्या लक्षात आलं की या ‘अमूल गर्ल’ ला फक्त food industry पुरतं मर्यादित ठेवू नये!

आणि त्यांनी अमूल च्या पुढच्या कॅम्पेन मध्ये ‘अमूल गर्ल’ ला एक जॉकी म्हणून दाखवलं जी की घोड्यांच्या शर्यतीत ब्रेड ची स्लाईस घेऊन तिथे हजर असते. ही जाहिरात सुद्धा लोकांना खूप आवडली.

पुढे जाऊन ‘अमूल गर्ल’ ला पावसाळी जाहिरातींसाठी सुद्धा ठेवण्यात आलं.

एका इंग्रजी कवितेच्या ओळी वापरण्यात आल्या: “Pitter-patter, pick-a, pack-a Amul Butter” ही जाहिरात सुद्धा घरातील प्रत्येक लहान मोठ्या मुलांना आवडल्या.

सध्याच्या पद्धतीनुसार तेव्हा सुद्धा प्रांत किंवा स्थानिक भाषेच्या जाहिरातीची पद्धत होती. कलकत्ता येथील एक लोकांना केंद्रस्थानी ठेवून एक जाहिरात तयार करण्यात आली होती.

त्याचे शब्द असे होते: “Bread without Amul – Cholbe na, Cholbe na”.

 

calcutta amul ad inmarathi
twitter.com

 

एका मोर्चात लोक हे ओरडत असतात. Cholbe na म्हणजे ‘चालणार नाही’. ह्या जाहिरातीत असलेलं हास्य बघता बघता कोलकत्ता पुरतं मर्यादित न राहता पूर्ण भारतभर पसरलं.

कोणत्याही जाहिरात एजन्सी वर जेव्हा त्या कंपनी चा पूर्ण विश्वास असतो तेव्हा किती अलौकिक गोष्टी घडतात!

याचं एक योग्य उदाहरण म्हणजे अमूल कंपनी आणि DaCunha Communications या दोन्ही कंपनी मध्ये असलेली कमालीची ‘ट्युनिंग.’

एकदा ही ट्युनिंग असली की गोष्टी कमी शब्दात सोमोरच्या व्यक्ती पर्यंत पोहोचत असतात.

ज्याला आपण creative freedom म्हणतो ते असलं की एखादी एजन्सी सुद्धा अगदी जीव ओतून काम करते याचा प्रत्यय या दोन्ही कंपनी ने त्यांच्या कामातून दाखवून दिलं होतं.

या गोष्टींचा उल्लेख करण्यामागे एक कारण आहे.

१९६० च्या त्या दशकात DaCunha Communications ने सध्याच्या करंट टॉपिक वर भाष्य करणाऱ्या जाहिराती तयार करण्याचं ठरवलं.

म्हणजे असं की राजकीय अस्थिरता असली की त्या विषयावर ‘अमूल गर्ल’ जाहिरातीत काही तरी मार्मिक भाष्य करेल असा तो पॅटर्न होता.

या जाहिरातींचं एक वैशिष्ट्य असतं की, या जाहिराती त्वरित होर्डिंगवर झलकणं अपेक्षित असतं. हिंदीत जसं म्हणतात की, “लोहा गरम है, मार दो हतोडा”. तसंच या जाहिरातींचं असतं.

 

amul political ad inmarathi
musebycl.io

 

त्या काळी आजच्या सारखे इन्स्टंट संपर्क होण्याचे माध्यमं उपलब्ध नव्हते. शिवाय, कोणतीही जाहिरात प्रदर्शित करण्याआधी ती ज्या कंपनी ची जाहिरात आहे त्या कंपनीच्या मालकाच्या नजरे खालून जाणं अपेक्षित असतं.

पण, त्या काळी या सगळ्या गोष्टींमध्ये खूप वेळ जात असे.

या गोष्टीवर पर्याय म्हणून Dr Verghes Kurian यांनी DaCunha यांना जाहिरात कॅम्पेन चालवण्यासाठी ‘माझ्या परवानगी साठी थांबू नका’ असे निर्देश दिले.

यामुळे गोष्टी पटपट घडू लागल्या. या कामाच्या पद्धतीतून Dr Verghes यांच्या बिजनेस स्किल्स आणि लोकांवर विश्वास ठेवण्याच्या त्यांच्या वृत्तीचं दर्शन सतत होत गेलं.

आणि त्यामुळेच कदाचित अमूल कंपनी ला त्यांच्या प्रत्येक जाहिरात कॅम्पेन मधून best results सतत मिळत गेले!

 

amul girl creators inmarathi
thebetterindia.com

आणि ‘अमूल गर्ल’ ही आज ५४ वर्षानंतरही लोकांच्या मनात घर करून आहे.

कोणतीही जाहिरात आपल्याला त्यावेळी आवडत असते जेव्हा आपल्या त्यामध्ये एक ‘human touch’ दिसत असतो.

ग्राहकाची ही अपेक्षा आणि त्याकाळच्या इतर जाहिराती यामध्ये जर कोणी एक ब्रिज तयार करून हे अंतर पार केलं असेल तर या ‘अमूल गर्ल’ ने.

लोकांना असाच आनंद देत तिने शंभर वर्ष सुद्धा पूर्ण करावेत यासाठी आमच्या टीम कडून शुभेच्छा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?