' पुस्तकांचा खजिना लुटा, भारतातील या सर्वात स्वस्त ‘बुक मार्केट्स’मध्ये! – InMarathi

पुस्तकांचा खजिना लुटा, भारतातील या सर्वात स्वस्त ‘बुक मार्केट्स’मध्ये!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

वाचनप्रेमींची एक सवय असते ती म्हणजे कुठेही नव्या ठिकाणी गेलं की त्या भागातली पुस्तकांची दुकान शोधून काढायची आणि डोक्याला खाद्य पूरवेल असं एखादं पुस्तक मिळवायचं. आपला स्वतःचा पुस्तकांचा स्वतंत्र खजिना असावा असं तुमच्यापैकी कितीजणांना वाटतं?

अर्थात अनेकदा, पुस्तकांच्या वाढत्या किंमतींमुळे पुस्तक खरेदी करण्याचा आनंद आपल्याला उपभोगता येत नाही.पण हाच आनंद तुम्हाला मिळवून देणारी ठिकाणं मिळाली तर? त्यातल्या त्यात स्वस्तात पुस्तकं मिळत असतील मग तर आनंदी आनंद गडे!

तुम्ही देखील वाचनप्रेमी असाल आणि तुम्हाला देखील अशी स्वस्तात कुठे उत्तम पुस्तके मिळतायत का, ते पाहण्याची सवय असेल तर हा लेख खास तुमच्यासाठी!

आज आम्ही तुम्हाला भारतातील १० स्वस्त बुक मार्केट बद्दल सांगणार आहोत. जेथे जगभरातील प्रसिद्ध पुस्तक तुम्हाला अगदी कमी किंमतीत मिळू शकतात.

 

अलाहाबाद- कटरा मार्केट

 

katra-market-marathipizza

स्रोत

 

अलाहाबाद विद्यापीठाच्या आसपासच्या परीसरामध्ये फिरत असताना तुमच्या नजरेस पडतात पुस्तकांची दुकाने!

या बुक मार्केटला कटरा बुक मार्केट म्हणून देखील ओळखले जाते. भारतात सर्वात स्वस्त पुस्तके कुठे मिळत असतील तर ती या कटरा मार्केट मध्येच!

 

अप्पा बळवंत चौक, पुणे 

 

a.b.-chawok-marathipizza

स्रोत

 

पुण्यातल्या लोकांना याची माहिती नसेल तर नवलच! अप्पासाहेब बळवंत चौक म्हणून प्रसिद्ध असलेल्या या चौकात नीटशी रचून ठेवलेली पुस्तके तुमचे सहज लक्ष वेधून घेतात.

मनोरंजनासहित विविध विषयांवरील पुस्तके या बुक मार्केटमध्ये सहज मिळतात.

 

पटना- गांधी मैदा

 

gandhi-maidan-marathipizza

स्रोत

 

पटनाच्या गांधी मैदानामध्ये भरणारा पुस्तकांचा बाजार अभ्यासू वाचकांसाठी एक पर्वणी ठरतो.

अभ्यास विषयक, वैचारिक, धार्मिक पुस्तक या बाजारात सहज उपलब्ध होतात. ती देखील अगदी कमी किंमतीत.

 

चंडीगड- सेक्टर १५

 

sector-15-marathipizza

 

चंदीगड तसं खास प्रसिद्ध आहे येथील स्ट्रीट मार्केटसाठीचं!

येथे तुम्हाला विविध प्रकारची स्ट्रीट मार्केट पाहायला मिळतात. त्यातीलच एक आहे सेक्टर १५ वरचं बुक मार्केट!

साहित्याची आवड असणाऱ्या व्यक्तीने या मार्केटला एकदा तरी भेट दिलीच पाहिजे!

 

हैद्राबाद- कोठी मार्केट

 

kothi-market-marathipizza

हे ही वाचा – ही १० पुस्तकं वाचली नाहीत – तर मराठी वाचता येण्याचा काहीच उपयोग नाही!

हैद्राबादला गेल्यावर चुकूनही या कोठी मार्केटला भेट देणं चुकवू नका, कारण येथे तुम्हाला अवघ्या २०-३० रुपयाला देखील पुस्तके मिळतील.

आता इतक्या स्वस्त जर पुस्तके मिळायला लागली तर ती संधी वाया कशी जाऊ द्यायची बरं?

 

मुंबई- फोर्ट

 

fort-marathipizza

स्रोत

 

मुंबईच्या फोर्ट भागात फिरताना फ्लोरा फौंटनवर रस्त्याच्या एका कडेला भलीमोठी पुस्तकांची रांग लावलेली दिसली की समजायचं आपण पोहोचलो आहोत पुस्तकांच्या दुनियेत!

पुस्तकांची दुनिया म्हणण्याचं कारण हे की, कोणत्याही पुस्तकाचं नाव सांगा ते पुस्तक येथील माणूस तुमच्यापुढे आणून सादर करणार! नसेल तर १-२ दिवसांत तुम्हाला शोधून देणार!

दिल्ली- दरियागंज

 

dariyaganj-marathipizza

स्रोत

 

जुन्या दिल्लीमधील दरियागंज भागात दर रविवारी पुस्तकांचा साप्ताहिक बाजार भरतो. गोलचा सिनेमागृहाच्या आसपास हा बाजर लागतो.

दिल्लीला येणारे वाचनप्रेमी पर्यटक या बुक मार्केटला भेट दिल्याशिवाय परत जातच नाहीत.

जगप्रसिद्ध कादंबऱ्या कुठेही नसल्या तरी येथे मात्र हमखास मिळतात असा या बुक मार्केटचा नावलौकिक!

 

कोलकत्ता- कॉलेज स्ट्रीट

 

college-street-marathipizza

स्रोत

 

पश्चिम बंगाल म्हणजे साहित्यमय प्रदेश! या प्रदेशाची राजधानी कोलकाता म्हणजे पुस्तकांची मांदियाळीचं जणू! इथे तुम्हाला असंख्य पुस्तकांची दुकाने पाहायला मिळतील.

पण दीड किलोमीटरचा कॉलेज स्ट्रीटचा रस्ता मात्र खास आणि स्वस्त पुस्तकं घेऊन तुमची वाट बघत बसलेला असतो.

काय मग? देताय न भेट या पुस्तकांच्या खजिन्यांना!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?