' पावसाची मजा घेताना हमखास होणाऱ्या सर्दी तापापासून दूर राहण्यासाठी हे उपाय करून बघाच!  – InMarathi

पावसाची मजा घेताना हमखास होणाऱ्या सर्दी तापापासून दूर राहण्यासाठी हे उपाय करून बघाच! 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘नेमेची येतो पावसाळा’ ह्या उक्ती प्रमाणेच मे महिन्याच्या शेवटी शेवटी आकाशात काळ्या ढगांनी यंदाही गर्दी केली. आला आला म्हणताना यंदा सुरुवातीलाच ‘निसर्ग’ नी मोट्ठा दणका दिला.

वातावरण खूपच बदलले. आभाळात दाटलेल्या मेघांनी बरसायला सुरुवात केली. वातावरण कुंद झाले, दमट वातावरण आणि पावसाने आलेला थंडावा हे उन्हाळ्यात झालेल्या लाही लाही नंतर हवे हवेसे वाटते.

अचानक कधीही अंधार दाटून येतो आणि सरी बरसायला लागतात.

 

monsoon inmarathi
moneycontrol.com

 

पण, वातवरणात झालेला हा अचानक बदल हवाहवासा वाटणारा असला तरी… सर्दी, खोकला, ताप असे नको असणारे आणि संक्रमित होणारे रोग ह्याच दिवसात होतात!

आणि आता तर ह्या कोरोनाच्या लक्षणांमुळे साधी सर्दी, साधा खोकला जरी झाला तरी कोरोनाची भीती वाटते.

ह्या साध्या सर्दी खोकल्या पासून बचावासाठी काही सोप्या टिप्स् आहेत ज्या वापरून आपण हेल्दी राहू शकतो, फिट राहू शकतो. चला तर मग पाहूया ह्या सोप्या टिप्स्!

 

१. छत्री किंवा रेनकोट बाळगणे :

 

people in rain inmarathi
livemint.com

 

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधी उल्लेख केल्याप्रमाणे कधीही पावसाला सुरुवात होऊ शकते, पावसाची लक्षणे नसताना देखील अचानक सरी बरसायला लागतात!

त्यामुळे बाहेर जाताना (सध्या फक्त बाजार आणि अत्यावश्यक सेवांसाठी) आपल्या सोबत कायम छत्री किंवा रेनकोट ठेवावा. लहरी पाऊस केव्हाही येऊ शकतो.

 

२. गरम पाणी पिणे :

 

warm water inmarathi
apollopharmacy.in

 

गरम पाणी पिणे हे आपल्या शरीरेसाठी अत्यंत उपयुक्त असते, त्यामुळे दिवसातून २ ते ३ वेळा आपल्याला सोसेल इतके गरम पाणी प्यावे. ज्यामुळे थ्रोट इन्फेक्शन होण्याची शक्यता फारच कमी होते.

थ्रोट इन्फेक्शन हे बर्याचदा तापाचे कारण बनते ह्या दिवसात, त्यामुळे अशक्तपणा, भूक मंदावणे ह्यासारखे विकार होतात ज्याचे शरीरावर गंभीर परिणाम होतात.

म्हणून हे जर टाळायचे असेल तर दिवसातून २ ते ३ वेळा गरम पाणी पिणे हा उपाय करणे गरजेचे आहे. हे शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यास मदत करते.

 

३. पोषक आहार :

 

khichdi inmarathi
vegrecipesofindia.com

 

थंडीमध्ये आपण कितीही आणि काहीही खाल्लं तरी ते सहजपणे पचतं पण पावसाळ्यात पचनक्रिया मंदावते त्यामुळे पोटाला जड अन्न सेवन करू नये.

हलका आहार घ्यावा जसे, सूप (ह्याचे सेवन तर जरूर करावे, कारण पचनास हलके आणि शरीराला लाभदायक असते), दाळ तांदळाची खिचडी, घावन इत्यादी.

ह्या पदार्थांचे गरमा गरम असतानाच सेवन करू शकतो शिवाय ह्यामुळे पोषण मिळते. व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचे सेवन करावे, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

ह्या शिवाय ह्या दिवसात आले, लवंग, तुळस घातलेला गरमा गरम चहा प्यावा ज्यामुळे सर्दी, खोकला टाळता येतो, काढा घेतला तर उत्तमच!

पण, ज्यांना काढा घ्यायचा नाही, ज्यांना काढा आवडत नाही त्यांनी असा चहा दिवसातून २ वेळा घ्यावा.

 

४. पाणी साचू देऊ नये :

 

rainy season inmarathi
indiatoday.in

 

आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घराभोवती किंवा जवळपास कोठेही पाणी साचू देऊ नये.

कारण, साठलेल्या पाण्यात मलेरिया, डेंग्यू ह्यासारखे रोग पसरविणार्या डासांची पैदास होते.

हे डॆम्ग्यु, मलेरिया संक्रमित रोग आहेत, ज्याची लागण लगेच होते आणि झपाट्याने ते पसरतात, त्यामुळे आपल्या आसपासच्या परिसरात कोठेही पाणी साठणार नाही ह्याची काळजी घ्या.

 

५. शारीरिक स्वच्छता :

 

bathing-inmarathi
intoday.in

 

आता ह्या कोरोनाच्या भीतीमुळे जे करावयास लागले तेच एरव्ही सुद्धा, पावसाळ्यात देखील करावयाचे आहे ते म्हणजे, वारंवार साबणाने किंवा हॅंड वॉशने हात धुणे, हॅंड सॅनिटायझर वापरणे.

बाहेरून आल्यावर हात-पाय स्वच्छ धुवावेत. हे आत्ताच ह्या कोरोना इन्फेक्शनच्या काळामध्ये नाही तर कायम अंमलात आणणे गरजेचे आहे.

कारण, सर्दी खोकला ह्या रोगांचे देखील इंफेक्शन लवकर होते.

ह्याशिवाय हात पाय धुतल्यानंतर, आंघोळ केल्यानंतर आपले हात पाय किंवा शरीर पूर्णपणे कोरडे करावे.

आपले शरीर किंवा हात पाय ओले राहिल्यास ह्या दिवसांमध्ये सर्दी खोकला लवकर होतो, हे टाळण्यासाठी शरीर ओले ठेवू नये, पूर्णपणे कोरडे करावे.

 

६. बाहेर जाताना योग्य ती काळजी घेणे :

 

gum boot inmarathi
indiatoday.in

 

आता तर बाहेर पडणे शक्यच नाहीये पण, इतर वेळाही पावसात बाहेर पडणे टाळावे.

पावसाळ्यात बाहेर जे पाणी साठलेले असते त्यामध्ये उंदिर, घूस वगैरेंची घाण असू शकते ज्यामुळे लेप्टोस्पायरसिस सारख्या रोगांचे इंफेक्शन होण्याची दाट शक्यता असते.

पण, समजा जर जणे अनिवार्य असेल तर गमबूट किंवा पाय पूर्णपणे झाकले जातील असे बूट घालावेत, रस्त्यावरचे पाणी अंगावर उडणार नाही ह्याची खबरदारी घ्यावी. रेनकोट जरूर घालावा.

 

७. दमटपणा वाढू न देणे :

 

dry clothes inmarathi
dailymercury.com.au

 

घरात कोठेही ओलावा राहणार नाही ह्याची खबरदारी घ्यावी. पावसाळ्यात दमटपणा, ओलसरपणा ह्यामुळे अनावश्यक बुरशी (फंगस) वाढू शकते.

विशेषकरून ओलसर, दमट कपडे वापरू नयेत. (पावसाळ्यात कपडे लवकर वाळत नाहित). त्यावर बुरशी वाढू शकते ज्यामुळे इन्फेक्शन होते आणि आरोग्याला अपायकारकर असते.

अन्न देखील गरम करून ठेवावे आणि शक्यतो ताजेच अन्न सेवन करावे. बर्याच शिळ्या अन्नाला फ्रिजमध्ये देखील बुरशी लागू शकते. असे बुरशी लागलेले अन्न सेवन करण्यात धोका असतो.

त्यामुळे आपल्या घरात आपण साफसफाई तर करावीच शिवाय अन्न आणि कपड्यांची विशेष काळजी घ्यावी.

 

८. घराची स्वच्छता :

 

ceaning inmarathi
mysuburbanlife.com

 

साफसफाई करताना, कपडे धुताना फिनाईलचा, डेटॉलचा वापर करावा.

फिनाईल, डॆटॉल ह्याच्या वापरामुळे अनावश्यक कीटाणू, विषाणू नष्ट होण्यास मदत होते जे इंफेक्शन पसरविण्यास जबाबदार असतात.

पावसाळ्यात हे वापरणे अनिवार्य असते कारण सर्दी खोकला पसरवणारे जीवाणू विषाणू ह्याच दिवसांत जास्त कार्यक्षम असतात.

 

९. घरगुती प्राथमिक उपाय :

 

taking steam inmarathi
verywellhealth.com

 

काही काही वेळा सर्दीची लक्षणे असतात जसे नाक चोंदणे, घसा खवखवणे इत्यादी, अशा वेळी निलगिरी तेल वापरणे केव्हाही उपयोगाचे असते.

बहुतेक वेळेला रात्री झोपतानाच नाक चोंदते ह्या दिवसात, अशा वेळी निलगिरी तेल लावणे खूपच फायदेशीर ठरते.

ह्याने सर्दी होण्यापासून तर बचाव होतोच शिवाय चोंदलेले नाक मोकळे होऊन शांत झोप देखील लागते. निलगिरी तेलामुळे श्वसनासंबधित असणार्या इतर रोगांपासून देखील बचाव होऊ शकतो.

===

सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. InMarathi.com च्या वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून ,डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?