'कोरोना : बाहेरून आल्यावर आपण तर अंघोळ करतो, पण या ९ वस्तु स्वच्छ करणं आहे जास्त गरजेचं

कोरोना : बाहेरून आल्यावर आपण तर अंघोळ करतो, पण या ९ वस्तु स्वच्छ करणं आहे जास्त गरजेचं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लॉकडाऊन शिथिल केलं तसं कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळेच आता सगळ्यांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. लोकांच्या मनातही एक प्रकारची भीती देखील आहे.

बाहेर जाताना मास्क, ग्लोव्हज, फेसशील्ड, सॅनिटायझर या सगळ्यांचा वापर आता आवश्यक गोष्ट म्हणून केला जात आहे. त्याच बरोबर सोशल डिस्टंसिंग पाळण्याचा प्रयत्न देखील लोकांकडून होताना दिसत आहे.

दुकानांमधून ऑफिसमधून, वाहनांमधून देखील विशेष काळजी घेतली जात आहे. बाहेरून घरात गेल्यानंतर लोक आंघोळ करत आहेत. कपडे लगेच धुतले जात आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठीच हे उपाय केले जात आहेत.

इतकं करूनही काही वस्तू सॅनिटायइझ करणं गरजेचं झालं आहे. विशेषतः ज्या आपल्या फारशा लक्षात न येता तशाच राहू शकतात आणि त्याद्वारे देखील कोरोना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अशा कोणत्या वस्तू आहेत आणि त्यांची काळजी घेणे जरुरीचे आहे ते पाहू.

कारचे स्टिअरिंग

 

car steering inmarathi
auto.howstuffworks.com

 

सध्या लॉकडाऊन नसल्यामुळे आपण ऑफिस साठी किंवा इतर काही कामासाठी कारने बाहेर जातोय. किंवा घरातील काही सामान आणण्यासाठी देखील कारचा वापर होतोय.

प्रत्येक वेळेस आपण सामान गाडीत टाकतो आणि लगेच स्टिअरिंग हातात घेतो. परंतु त्यातूनच covid-19 च्या विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता आहे. कारण बाहेर किंवा ऑफिसात आपण अनेक ठिकाणी स्पर्श केलेला असतो.

बाजारात सामान घेतानाही आपण अनेक वस्तूंना स्पर्श करतो. त्यामुळे विषाणूंचा प्रसार होऊ शकतो. तेच विषाणू जर स्टिअरिंग वर आले तर आपण त्या विषाणूंच्या कॉन्टॅक्ट मध्ये लगेच येऊ शकतो.

कारण श्वास घेताना स्टिअरिंग नाकाजवळ असते त्यामुळेच कोरोना होण्याचा धोका वाढू शकतो. यासाठीच स्टिअरिंग हातात घ्यायच्या आधी ते सॅनिटाईज करणे गरजेचे आहे.

हेडफोन्स

 

headphones inmarathi
theindianexpress.com

 

जॉगिंग करताना, धावताना किंवा घरातील इतर कामे करतानाही आपण हेडफोन्स लावून गाणी ऐकत असतो. इतरांना त्रास न देता स्वतःचे मनोरंजन करून घेण्याचं हे एक चांगलं साधन आहे.

परंतु हा हेडफोन स्वच्छ करण्याच्या बाबतीत मात्र आपण हयगय करतो.

कोरोनाचा विषाणू कुठल्याही पृष्ठभागावर तासन-तास बसून राहू शकतो. तो आपल्या हेडफोनवरही असू शकतो. म्हणूनच हेडफोन्स देखील वेळोवेळी सॅनिटाइझ करणे गरजेचे आहे.

टीव्हीचा रिमोट

 

ott watch inmarathi
IndiaTV

 

घरातली आणखीन एक वस्तू जी सगळ्यात जास्त अनेक लोक वापरतात. परंतु जी स्वच्छ करण्याच्या बाबतीत मात्र कोणाच्याच लक्षात येत नाही ती म्हणजे आपल्या टीव्हीचा रिमोट.

रिमोटला अनेक लोकांचे हात लागतात. तसाच तो कुठेही ठेवला जातो. त्यामुळे त्याच्यावरही विषाणू बसण्याचा धोका अधिक असतो आणि त्याद्वारे तो माणसाच्या शरीरातही जाऊ शकतो. म्हणूनच टीव्हीचा रिमोट देखील स्वच्छ करणे गरजेचे आहे.

 

लाईट स्विचेस

 

light switches inmarathi
homestratosphere.com

घरातील किंवा ऑफिसातील ज्या ठिकाणांना अनेक लोकांचा स्पर्श होतो ते म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स दिव्यांचे स्विचेस. दिवे चालू करण्यासाठी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे लावण्यासाठी अनेक व्यक्तींचा स्पर्श लाईट स्विचेसला होऊ शकतो.

त्यातून कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका देखील अधिक असतो. म्हणूनच तीन-चार तासाने लाईटचे स्विचेस देखील सॅनिटाईज करणे गरजेचे आहे.

उशा किंवा पिलो

 

Pillow good or Bad Inmarathi

 

घरामध्ये आपण वारंवार बेडशीट आणि उशाच्या खोळी किंवा पिलोंचे कव्हर हे वेळोवेळी धुऊन स्वच्छ करतो. परंतु पिलो मात्र वारंवार धुतले जात नाहीत.

त्या मध्येच अनेक प्रकारचे विषाणू बसून राहू शकतात. ज्यांचा त्रास होऊ शकतो, म्हणूनच उशा किंवा पिलो हे देखील धुतले पाहिजेत.

आज-काल वॉशेबल पिलो मिळतात त्यांना वाशिंग मशीन मध्ये धुऊन घेतल्यास त्या वाळण्याचाही प्रश्न येत नाही.

क्रेडिट किंवा डेबिट कार्ड

 

Credit-cards-inmarathi02
upgradedpoints.com

 

सध्या कॅशलेस व्यवहार करा असं सांगितलं जातं. कारण चलनी नोटांद्वारे कोरोनाव्हायरसचा प्रसार होतोय असं लक्षात आलं आहे. म्हणूनच क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर वाढला आहे.

परंतु त्याला देखील आपला हात तसेच दुकानदाराचा हातही लागत असतो. त्यामुळेच डेबिट आणि क्रेडिट कार्ड हे देखील कोरोनाव्हायरस पसरवणारे साधन होऊ शकतात, म्हणूनच तेदेखील वेळोवेळी सॅनिटाइज करावेत.

बाजारात न्यायच्या पिशव्या

 

vegetable bag inmarathi
goodhousekeeping.com

 

आपण बाजारातून सामान आणतो भाज्या म्हणतो आणि त्या काढून त्यांना व्यवस्थित स्वच्छ करतो.

काहीजण किराणा सामान आणल्यानंतर दोन दिवस एका ठिकाणी ठेवून देतात आणि त्याला हातही लावत नाहीत. जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी काळजी घेतली जाते.

परंतु ज्यातून सामान आणतो, त्या पिशव्या किंवा बॅग मात्र आपण तसेच ठेवून देतो आणि परत लगेच वापरतो. परंतु यामध्ये सामान आणताना कदाचित कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो.

म्हणूनच सामान आणल्यानंतर काढून ठेवल्यानंतर त्या पिशव्या लगेचच धुवायला टाकाव्यात. नाहीतर किमान ४८ तास ती बॅग/ पिशवी वापरायला घेऊ नये, जेणेकरून कोरोना चा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी करता येईल.

 

मायक्रोवेव्हचे हँडल आणि बटन

 

Microwave Oven
UERC.com

 

घरातील सगळ्यात जास्त वापरलं जाणारं उपकरण म्हणजे सध्या मायक्रोवेव आहे. प्रत्येक वेळेस गरम स्वयंपाक बनवून जेवण करणे शक्य नसतं.

सध्या एकाच वेळेस स्वयंपाक करून ठेवला जातोय, पण जेवायच्या वेळेस भाजी गरम करण्यासाठी बरेच जण मायक्रोवेवचा वापर करतात. सध्याच्या स्वयंपाक घरातील ही एक आवश्यक गोष्ट आहे.

परंतु सध्या कोरोनामुळे मायक्रोवेव्हचे हँडल्स आणि बटन्स प्रत्येक वेळेस वापरानंतर स्वच्छ करणे गरजेचे आहे. कारण त्यालाही घरातल्या अनेक जणांचे हात लागत असतात.

त्याद्वारे घरातल्या सगळ्याच सदस्यांना कोरोना होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. म्हणूनच मायक्रोवेवचे हँडल आणि बटन्स देखील नियमित साफ केले पाहिजेत.

फ्रिजचे हँडल

181030-better-refrigerator-woman-reaching-in-se-419p_d951ed2b8623ead7ffe8730561487106.fit-760w

 

घरातील अजून एका उपकरणाला सगळ्यात जास्त हात लागतो तो म्हणते म्हणजे फ्रीज. आणि त्याचा वापर घरातील प्रत्येक व्यक्ती कशा ना कशासाठी करत असते.

बऱ्याच घरांमधून फ्रीजच्या हँडलवर एखादं नॅपकिन ठेवलेलं असतं. जेणेकरून, फ्रीजचा हँडल चिकट किंवा घाण होऊ नये यासाठी ही काळजी घेतलेली असते. परंतु ते नॅपकिन तसंच ठेवणं धोकादायक बनू शकतं. त्यालादेखील अनेकांचे हात लागतात.

घरातील प्रत्येक जण फ्रिजमध्ये काहीतरी शोधत असतो त्यामुळे वारंवार फ्रिजची उघडझाप होते. आणि त्याद्वारे कोरोना विषाणूचा प्रसार होऊ शकतो.

म्हणूनच जर नॅपकिन ठेवत असाल ते नॅपकिन दररोज धुवायला टाकले पाहिजे. तसेच ते हँडल देखील दिवसातून दोन-तीन वेळा ओल्या वाइप्स ने पुसून घेतले पाहिजे.

सध्या कोरोनाच्या काळात अशा अनेक खबरदारी घेणे आवश्यक बनले आहे. त्याद्वारेच कोरूनाचा प्रसार कमी करता येऊ शकतो.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?