' घरात "आरोग्यास लाभदायक" म्हणून आवर्जून असणाऱ्या या गोष्टी घातक ठरू शकतात

घरात “आरोग्यास लाभदायक” म्हणून आवर्जून असणाऱ्या या गोष्टी घातक ठरू शकतात

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपण दररोज वेगवेगळे पदार्थ खातो. त्यातही आपण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य असणारे पदार्थ खातो. त्यामुळे आपल्याला प्रोटिन्स, विटामिन्स आणि आवश्यक पोषण तत्व मिळतील याची काळजी घेतो.

परंतु असेही काही पदार्थ आहेत, जे आपण रोज खातोय पण त्यांच्यापासून आपल्या शरीरासाठी धोका निर्माण होतो याची आपल्याला कल्पना देखील नसते. काही काही पदार्थ हे आपल्या शरीरासाठी विषारी ठरू शकतात.

काही पदार्थांमध्ये नैसर्गिकरीत्या विष तयार होते. माणसाने तो पदार्थ सेवन केला आणि ते विष माणसाच्या शरीरात गेलं तर मात्र माणसाला अत्यंत वेगवेगळ्या शारीरिक संकटांचा सामना करावा लागतो.

ज्यामध्ये पोटदुखी, डोकेदुखी, अतिसार, अॅलर्जी आणि कधीकधी मृत्यू देखील होऊ शकतो.

अशी उदाहरणे प्रत्यक्षात घडलेली आहेत. लोक सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्यावर तिथे असणाऱ्या ज्यूस स्टॉल मधील ज्यूस घेतात. तो ज्यूस किती काळजी घेऊन बनवण्यात आला आहे याची आपल्याला कल्पना नसते.

आपले महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर यांच्याबाबतही जिवावर बेतणारी घटना घडली. त्यांनीदेखील सकाळी उठल्यावर दुधी भोपळ्याचा ज्यूस घेतला जो कडवट होता. सुदैवाने वेळेवर इलाज झाल्याने आदेश बांदेकर सुखरूप परत आले.

आज अशाच काही पदार्थांची माहिती आपण करून घेणार आहोत ज्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो. आणि असे पदार्थ खाताना कोणती काळजी घेतली पाहिजे हे देखील पाहू.

बटाटा

 

potato-plantation-inmarathi

 

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे बटाटा. बटाट्याचे वेगवेगळे पदार्थ सगळ्यांनाच आवडतात. कुठल्याही स्नॅक्स पासून भाजी पर्यंत बटाटा वापरला जातो.

पण या बटाट्याच्या पानांमध्ये, अंकुरांमध्ये ग्लाइकोअल्कॅलॉइड नावाचा एक विषारी पदार्थ असतो. आणि जेव्हा बटाट्यावर सूर्यप्रकाश पडतो त्यावेळेस हा ग्लाइकोअल्कॅलॉइड वर येतो आणि बटाट्याला हिरवा रंग प्राप्त होतो.

असा बटाटा खराब असतो किंवा त्यावर सुरकुत्या पडलेल्या असतात. असा ग्लाइकोअल्कॅलॉइड जास्त असलेला बटाटा जर खाल्ला तर जुलाब, डोकेदुखी, अन्नावरची वासना उडणे असे त्रास होऊ शकतात.

जर ग्लाइकोअल्कॅलॉइड जास्त असेल तर माणसाचा मृत्यू देखील होऊ शकतो.

 

राजमा

rajma inmarathi

 

आपण नेहमीच राजमा खातो. परंतु राजम्यामध्ये लेक्टीन नावाचा एक पदार्थ असतो जो विषारी असतो. त्यामुळे माणसाला मळमळ,पोटदुखी, उलटी, जुलाब असे त्रास होऊ शकतात.

त्यासाठीच राजमा दहा ते बारा तास पाण्यात भिजवून नंतर चांगला उकळून शिजवला पाहिजे. पूर्ण शिजल्यावरच तो खाल्ला गेला पाहिजे.

 

जायफळ

 

jayfal inmarathi

 

एखाद्या गोड पदार्थात थोड्या प्रमाणात टाकलेला जायफळ नेहमीच पदार्थाची लज्जत वाढवतो. मात्र जायफळाचे प्रमाण जास्त झाल्यास ते हानिकारक ठरू शकतं.

कारण त्यामध्ये मयरिस्टिसिन नावाचं एक तेल असतं ज्यात विषारी गुण असतात. त्यामुळे माणसाला चक्कर येणे, भास होणे, तंद्री लागणे इत्यादी त्रास होऊ शकतात.

सफरचंद

 

apple inmarathi

हे ही वाचा – सकाळच्या नाश्त्यामध्ये हे पदार्थ टाळलेत तर आरोग्याची चिंता करावी लागणार नाही

रोज एक सफरचंद खाण्याचा सल्ला तर डॉक्टर ही देत असतात. त्यामुळेच चांगल्या आरोग्यासाठी लोक सफरचंद खातात. परंतु सफरचंदाच्या बियांमध्ये सायनाइड असतं.

चुकून एखादं बी गिळलं गेलं तर काही प्रश्न नाही, कारण सफरचंदाचे बियांची रचना अशी असते की, बियांच्या आतलं सायनाइड तुमच्या शरीरात जाणार नाही.

म्हणूनच सफरचंद खाण्याआधी पूर्ण काळजी घेऊन त्या बिया काढल्या पाहिजेत. कारण एखादं बी चावून खाल्लं तर त्याचा त्रास होऊ शकतो. 

सायनाइडच्या कमी अंशाने देखील धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि त्याचं पर्यावसन म्हणजे मृत्यू येणे इतपत होऊ शकतं.

 

मशरुम्स

 

mushroom inmarathi

 

अधिक प्रोटिन्स मिळवण्यासाठी हल्ली मशरुम्स आपण खूप खातो. आजकाल बाजारात वेगवेगळ्या प्रकारची मशरूम देखील मिळतात. परंतु आपल्याला माहीत असलेलेच मशरूम खाणे योग्य असते.

कारण कधीकधी जंगली मशरूम हे विषारी असल्याने त्यांचा त्रास होऊ शकतो.

यामध्ये पोटदुखी, जेवणावरची वासना उडणे, मळमळ, उलट्या, डीहायड्रेशन, लिव्हर फेल्युअर होऊन माणूस कोमात जाऊ शकतो आणि त्याचा मृत्यू होऊ शकतो.

 

कच्चे काजू

 

cashew inmarathi

 

काजू हे अनेक शाही रेसिपीज साठी वापरतात हे आपण पाहतोच. तसेच भूक चाळवली असता दोन- तीन काजू आपण असेच तोंडात टाकण्याचा पदार्थ म्हणून खातो.

आपल्याकडे येणारे काजू हे संपूर्ण प्रक्रिया होऊन आलेले असतात, पण काजूच्या कवचामध्ये युरोशिवोल नावाचे एक विषारी द्रव्य असते, आणि जर ते पोटात गेले तर त्याची ऍलर्जी होऊ शकते आणि त्याचा खूपच त्रास होऊ शकतो.

यासाठीच भाजलेले किंवा वाफवलेले काजू खाणे केव्हाही चांगले तसेही जास्त काजू खाल्ल्यास ऍसिडिटी होते म्हणूनच ते कमी प्रमाणात खाल्ले पाहिजेत.

 

आंबे

 

mango inmarathi

 

उन्हाळ्यात सगळ्यात विकले जाणारे फळ म्हणजे आंबे. आंबे न आवडणारा विरळाच असेल. परंतु आंब्याच्या पानांमध्ये, आंब्याच्या सालीमध्ये उरोशिवोल नावाचं द्रव्य असतं आणि ज्यांना त्याची आलर्जी आहे त्या लोकांना याचा त्रास होऊ शकतो.

आंबा खाताना आंब्याची साल चावली गेली तर श्वासोश्वासाला त्रास होणे, पुरळ येणे इत्यादी त्रास होऊ शकतात.

 

बदाम

 

almond inmarathi

 

हृदयासाठी आणि एकूणच शरीरासाठी उपयुक्त असलेला बदाम सगळ्यांनाच आवडतो. परंतु कधी-कधी बदाम खाताना तो आपल्याला कडू लागतो असा बदाम मात्र खाऊ नये.

कारण त्यामध्ये अमिगडलीन नावाचं एक रासायनिक द्रव्य असतं जे सायनाइड प्रमाण काम करतं. ज्यामुळे हातापायात गोळे येणे, शरीरातील पाणी कमी होणे इत्यादी त्रास होऊ शकतात.

 

चेरी

 

cherry inmarathi

 

आज-काल चेरी तशी सगळीकडे उपलब्ध आहे. परंतु चेरीचे बी मात्र विषारी आहे. अर्थात चेरी खाताना ते बी टाकून दिलं जातं पण समजा चुकून गिळलं गेलंच तरी त्याचा त्रास होत नाही. मात्र ते बी चावून खाऊ नये, त्याचा त्रास होऊ शकतो.

याशिवाय आज-काल मिळणारे बेरीज म्हणजेच स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी, एल्डरबेरी हे कुठलेही फळ पूर्ण पिकल्या शिवाय खाऊ नये. कारण हे जर कच्चे खाल्ले गेले तर त्याच्या फायद्याऐवजी नुकसान होण्याची शक्यता अधिक असते.

तसेच बऱ्याच ठिकाणी केळफुलाची भाजी करतात. तर त्या केळफुलामध्ये देखील एक काळा दोरा असतो जो काढणे गरजेचे असते. कारण तेदेखील विषारी असते.

 

banana flower inmarathi

 

अगदी तसेच प्रॉन्सच्या बाबतीतही म्हणता येईल प्रॉन्स आणल्यानंतर ते स्वच्छ धुऊन त्यामधील काळा धागा काढणे गरजेचे असते, नाहीतर त्यामुळे अतिसार, पोटदुखी याचा त्रास होऊ शकतो.

दुधी भोपळा देखील कडू असेल आणि तो कच्चा खाल्ला गेला किंवा त्याचा ज्यूस घेतला तरी जीवावर बेतू शकते. म्हणूनच शक्यतो फळभाज्या या शिजवून खाल्ल्या पाहिजेत.

तसेच कोणत्याही फळाचा मिल्कशेक न करता किंवा दुधाबरोबर मिसळून न खाता फक्त फळ खावं. कारण दूध आणि फळ एकत्र येणे म्हणजे विषारी पदार्थ तयार होण्यासारखे आहे, हे आपल्या आयुर्वेदात सांगितले आहे.

एकूणच आपण जे काही खाणार आहोत ते स्वच्छ धुऊन, नको असलेला भाग काढून टाकून त्यावर योग्य ती प्रक्रिया करून खाल्लं तर कोणताही धोका उत्पन्न होणार नाही.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

हे ही वाचा – रोजच्या वापरातील ‘या’ २ पदार्थांचं मिश्रण आहे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?