'पांढरट जीभ असू शकते धोक्याची सूचना, वाचा, वेळीच सावध व्हा!

पांढरट जीभ असू शकते धोक्याची सूचना, वाचा, वेळीच सावध व्हा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

साधारणपणे मानवी शरीर हे रोगाची लक्षणे स्वतःहून दाखवते.

उदाहरण घ्यायचं म्हणजे, डोळे पिवळे दिसू लागणे म्हणजे कावीळ, लघवी करताना त्रास होणे म्हणजे मुतखडा, श्वास घ्यायला त्रास होणे याचाच अर्थ अस्थमा, अचानकपणे छातीत दुखणे म्हणजे हृदय किंवा रक्ताभिसरण संबंधित आजार, इ.

आपले इंद्रिय हे देखील काही प्रमाणात आजार दाखवण्यात मदत करतात. तर, तसंच काहीसं आपल्या जीभेचं पण आहे. ताप भरल्यानंतर किंवा उतरल्यानंतर हाताची नाडी आणि जीभ ही डॉक्टरांकडून हमखास बघितली जाते. का बरं?

सामान्यपणे, निरोगी आणि स्वस्थ व्यक्तीची जीभ ही गुलाबी रंगाची असते. .! आपल्या जीभेचा रंग आणि पोत एकूणच आपल्या सुदृढ आरोग्याचं सूचक आहे.

पण, त्याच जीभेवर जर पांढरा थर दिसत असेल तर? जीभ हलवताना दुखत असेल तर? किंवा जीभेवर विचित्र डाग असतील तर?

 

white tongue inmarathi1

हे ही वाचा – महागड्या ‘डेंटल ट्रिटमेंट’पेक्षा या घरगुती उपायांच्या मदतीने दातांना कीड लागू न देणं केव्हाही योग्यच!

हे नक्कीच काळजी करण्याचं कारण आहे. पण मुळात हे सगळे प्रकार फक्त आणि फक्त जीभ पांढरी पडल्यामुळे दिसून येतात. त्यामुळे जीभ पांढरी होणे म्हणजे नेमकं काय ते पाहूया.

जीभ पांढरी पडण्याचं मूळ कारण म्हणजे, आपल्या जिभेवर लहान लहान छिद्रे असतात वैद्यकीय भाषेत त्याला पॅपिले म्हणतात, त्याला सूज येते.

विषाणू, मृत पेशी आणि इतर सूक्ष्म घटक हे जिभेवरील त्या छिद्रात अडकतात आणि परिणामी ते खराब होऊन छिद्राला सूज येते आणि शेवटी जिभेवर एक पांढरा कोट तयार व्हायला सुरुवात होते.

याची काही कारणं आहेत :

• तोंडाची अपेक्षित काळजी न घेणे किंवा व्यवस्थित दात न घासणे.

• मधुमेह किंवा इतर कारणामुळे तोंड कोरडे होणे.

• मद्यपान

• हृदय रोग

• धूम्रपान किंवा तंबाखू सेवन

 

smoking and corona inmarathi

 

• नाकाऐवजी तोंडाने श्वासोच्छ्वास. ज्यामुळे मुखामध्ये पुरेसा ओलावा न राहणे.

• ताप

• सॉफ्ट पदार्थ जास्त खाणे. उदाहरणार्थ, उकडलेले बटाटे.

आता नेमकं कारण तर कळलं, पण यावर उपाय काय?

तर, हृदय रोग आणि मधुमेह सारखे आजार असतील तर नक्कीच तुम्हाला स्पेशालिस्ट डॉक्टर कडे जावं लागेल. पण, काही उपाय असे आहेत ज्यांनी आपण आपली जीभ स्वच्छ ठेऊ शकतो.

विशेष कोरड्या तोंडासाठी सामान्यपणे आलेखित केलेले नियम पाळून त्यानुसार तोंडाची स्वछता करणे, स्वतःचा आहार समतोल करून तोंड आणि हिरड्यांना अपाय होण्या पासून वाचवणे, मद्य आणि तंबाखू यांचे सेवन थांबवणे, इत्यादी.

तोंडाच्या स्वच्छतेसाठी एक व्यवस्थित दिनक्रम असणे गरजेचे आहे.

दिवसातून दोन वेळा दात हे घासले गेले पाहिजे आणि आपली जीभ देखील घासली पाहिजे. दिवसातून एकदा फ्लोस करा, तोंडाच्या मागच्या भागापर्यंत अगदी दाढेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा.

==

हे ही वाचा :  पाणीपुरी म्हणजे केवळ “जीभेचे चोचले” नव्हे, ही तर आहे भरपूर “आरोग्यदायी”!

==

brushing-teeth-inmarathi

 

जेव्हा आपण फ्लॉसिंग करता तेव्हा आपल्या हिरड्या खराब होऊ नयेत याची काळजी घ्या. तोंड स्वछ करण्यासाठी चांगले माउथवॉश वापरा.

जीभेच्या स्वच्छतेसाठी जीभ स्क्रॅपर वापरण्याचा प्रयत्न देखील करावा.

स्वच्छता आणि तपासणीसाठी वर्षातून कमीतकमी दोनदा आपल्या डेंटिस्टकडे भेट द्या. आपलं संपूर्ण तोंड चांगल्या स्थितीत कसं ठेवावं याबद्दल टिप्स देण्यास आपले डेंटिस्ट सक्षम असतील.

पण जीभेवरच्या पांढऱ्या डागांचे काय? जर तुमची पांढरी जीभ सूजलेल्या पॅपिलेची नसली तर? पांढरी जीभ असण्याची इतर अनेक कारणे आहेत.

त्यापैकी काही म्हणजे थ्रश, ल्युकोप्लाकिया, जिओग्राफीक टंग, कॅन्सर आणि सिफिलीस हे असू शकतात.

जर जीभ पांढरी असण्याऐवजी जर त्यावर डाग असतील तर ही गंभीर वैद्यकीय स्थिती दर्शवू शकेल. हे माऊथ थ्रश असू शकतात. जे की यीस्टचा संसर्ग आहे.

 

white tongue inmarathi2

 

माऊथ थ्रशमुळे जिभेवर पांढरे छिद्र निर्माण होतात जे की वेदनादायक असू शकतात.

आपले डेंटिस्ट थ्रशचे निदान करु शकतात आणि त्यावर उपचार करण्यासाठी अँटीफंगल औषधे लिहून देऊ शकतात.

थ्रशसाठी डेंटिस्ट अँटीफंगल नेस्टाटिन नावाची औषधी लिहून देऊ शकतात. हे एक लिक्विड औषध आहे, जे तोंडात फिरवून नंतर गिळावे लागते. सहसा हे एका आठवड्यासाठी सुचवले जाते.

यामुळे पांढरी जीभ आणि त्यामुळे होणारी दुखापत ही निस्तारली जाऊ शकते. ओरल थ्रश विविध कारणांमुळे होऊ शकते.

सामान्यत: हे संसर्गावर उपचार करण्यासाठी प्रतिजैविकांचा जास्त वापर केल्यामुळे होते. हे इतर गंभीर कारणांमुळे सुद्धा होऊ शकते.

निदान न केलेल्या मधुमेह सारख्या आजारांमुळे पांढरी जीभ येऊ शकते, कारण आपल्या लाळेत  मोठ्या प्रमाणात साखर असते, ज्यामुळे बुरशीच्या वाढीस प्रोत्साहन मिळते.

कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीमुळे जीभ पांढरी होऊ शकते.

एचआयव्ही / एड्स किंवा कॅन्सर सारख्या गंभीर परिस्थितीतून आपली रोगप्रतिकार शक्ती कमकुवत झाल्यास थ्रश वाढण्याची शक्यता खूप जास्त असते.

या दोन्ही आजारांमुळे आपणास त्रास होण्याची जोखीम वाढू शकते, कारण आपल्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे इतर आजारांशी लढण्याचा प्रयत्न केल्यामुळे बुरशीचा प्रतिकार करणे कठिण असते.

तोंडाचा कॅन्सर, जिभेचा कॅन्सर आणि सिफिलीस ही जीभेवर पांढरे ठिपके निर्माण करण्यास कारणीभूत असू शकतात.

ल्युकोप्लाकियामुळे आपल्या जिभेवर पांढरे ठिपके उमटतात जे सहसा लावजर निघत नाहीत. ते सामान्यत: जाड असतात आणि ते केवळ आपल्या जिभेवरच नव्हे तर आपल्या ब्यूकल म्यूकोसा (आपल्या गालांचे अस्तर) आणि तोंडाच्या तळाशी देखील तयार होऊ शकतात.

 

white tongue inmarathi3

 

आपली जीभ पांढरी होऊ शकते अशी आणखी एक अवस्था म्हणजे जिओग्राफीक टंग.

‘जिओग्राफीक टंग’ला सौम्य स्थलांतरित ग्लोसिटिस देखील म्हटले जाते. आणि ही एक नॉनकॅन्सरस ,निरुपद्रवी कंडिशन आहे.

हे पॅपिलेच्या पॅचची कमतरता आहे. सहसा पेपिलिया गुलाबी-पांढर्‍या रंगाचे असतात आणि आपल्या जीभेला अंदाजानुसार रेखाटतात. पॅपिलेचे काही भाग झिजल्यामुळे आपल्या जिभेवर पॅच निर्माण होतात.

तसं पाहिल्यास जीभ पांढरी होणे ही जास्त काळजी करण्यासारखे नाही आहे. तोंडाची जरा जास्त काळजी घेणे यावर उपाय होऊ शकतो. किंवा आपल्या आहारात योग्य बदल.

 

mouthwash-inmarathi

 

तथापि वर नमूद केल्याप्रमाणे एखादे लक्षण दिसत असेल तर तात्काळ तज्ज्ञांची भेट घेणे अनिवार्य आहे.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

हे ही वाचा – दातांच्या पिवळसरपणामुळे तोंड लपवताय? हे उपाय करून घरच्या घरीच दात चमकवा

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?