'काळाच्या ओघात विस्मरणात गेलेल्या रॉयल एनफील्ड च्या 'ह्या' बाईक्स एकेकाळी खूप लोकप्रिय होत्या!

काळाच्या ओघात विस्मरणात गेलेल्या रॉयल एनफील्ड च्या ‘ह्या’ बाईक्स एकेकाळी खूप लोकप्रिय होत्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आकर्षक आणि मजबूत दुचाकी बनवणाऱ्या कंपनीत रॉयल एनफिल्ड ही अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाते. गेल्या कित्येक वर्षांपासून यांच्या बाईक्स तरुणाई च्या गळ्यातल्या ताईत बनल्या आहेत!

मोटरसायकलींची आवड असणाऱ्या प्रत्येक तरुणाचं रॉयल एनफिल्ड च्या बाईक्स चालवण्याच ,विकत घेण्याचं स्वप्न असतंच!

असं म्हटलं जातं ‘Boys ride toys, men ride Royal Enfield’! यावरून रॉयल एनफिल्ड च्या बाईक्स ची क्रेझ देशात किती मोठी आहे याची कल्पना येईल.

 

royal enfield inmarathi
businesstoday.in

 

रॉयल एनफिल्ड च्या क्लासिक ३५०,थंडर बर्ड आणि सुप्रसिद्ध बुलेट या बाईक्स कित्येक वर्षांपासून लोकप्रिय आहेत.

‘हिमालयन बाईक ‘आणि ‘थंडर बर्ड ३५०’एक्स या मॉडेल च्या उत्पादना नंतर कंपनी ची कामगिरी अधिक दमदार झाली आहे!

६५ वर्षां पूर्वी ‘रॉयल एनफिल्ड इंडिया’ कंपनी ची स्थापना चेन्नई ला झाली.

अल्पावधीतच खडबडीत रस्त्यांवर आणि अगदी समुद्र किनाऱ्यावर च्या रेतीत सुद्धा चालू शकतील अश्या बाईक्स बनवण्यासाठी कंपनी प्रसिद्ध झाली.

क्लासिक-३५० हे कंपनीचं पहिलं मॉडेल होतं. या मॉडेल च्या तुफान यशानंतर कंपनी ने अजून बरीच मॉडेल्स काढली.

 

classic 350 inmarathi
hindi.drivespark.com

 

गेल्या ६५ वर्षांत अशी पण काही मॉडेल्स होती की, जी काळाच्या ओघात विस्मरणात गेली.

अर्थात त्या रॉयल एनफिल्ड बाईक्स ची सुद्धा एक खासियत होती पण काही ना काही कारणाने त्या बुलेट प्रमाणे सर्वकाळ लोकप्रिय राहू शकल्या नाहीत.

चला तर मग अश्या विस्मृतीत गेलेल्या रॉयल एनफिल्ड च्या बाईक प्रवासाला!

 

रॉयल एनफिल्ड – मोफा

 

enflielf mofa inmarathi
royal-enfield-history.blogspot.com

 

आता पर्यंतची सर्वात छोटी रॉयल एनफिल्ड बाईक हीच होती! कंपनी ज्या प्रकारच्या मोटारसायकली बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे त्याच्या अगदी उलट हे उत्पादन होतं!

एनफिल्ड च्या बाईक म्हणजे मजबूत अन दणकट मामला! परंतु ही लुना पेक्षा ही नाजूक दिसणारी बाईक सुद्धा कंपनी ने बाजारात आणली होती!

ही मोफा बाईक २२ सीसी च इंजिन असलेली एक कमी किमतीची मोटारसायकल होती. ३० किलो वजन असलेली मोटारसायकल एका लिटर मागे ९० किमी चं मायलेज द्यायची!

गंमतीची गोष्ट म्हणजे ,ही बाईक चालवण्यासाठी वाहन परवाना किंवा RTO च्या कुठल्याही परवानगी ची गरज नव्हती.

 

रॉयल एनफिल्ड – फ्यूरी १७५

 

fury inmarathi
cartoq.com

 

या बाईक कडे पाहिल्यावर ही एखादी LML कंपनी ची बाईक असल्याचा भास होतो. फ्यूरी प्रचंड लोकप्रिय सुद्धा होती विशेषतः तरुणांमध्ये!

१६३ सीसी, २ स्ट्रोक इंजिन १७ hp पर्यंत शक्ती निर्माण करायचं. फुरे १२५ किमी प्रति तास पर्यंत धावण्याची क्षमता राखून होतं. यामुळेच तरुण रक्तामध्ये याची प्रचंड क्रेज होती.

अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या बाईक च्या फ्रंट चाकाला डिस्क ब्रेक देण्यात आले होते. त्या काळातल्या बाईक साठी ही नवीनच गोष्ट होती!

 

आर ई एक्सप्लोरर

 

explorer inmarathi
motoauto.in

 

तसं पाहायला गेलं तर ही संपूर्ण रॉयल एनफिल्ड कंपनीची बाईक नव्हती. झुंडआप कंपनीच्या सहयोगातून याची निर्मिती करण्यात आली होती.

एक्सप्लोरर ,झुंडआप के एस -५० बाईक होती. ५० सीसी चं इंजिन,सिंगल सिलेंडर, २ स्ट्रोक इंजिन यांच्या साह्याने बाईक ६ एच पी पर्यंत शक्ती निर्माण करू शकत होती.

या मोटारसायकल ची सर्वोच्च वेगमर्यादा होती ९० किमी! सध्या ११० सीसी बाईक पेक्षा सुद्धा ही बाईक उजवी होती!

रॉयल एनफिल्ड छोट्या इंजिनाच्या साह्याने फार मोठं काही करू शकले नाही तरी त्यांनी मध्यम इंजिन सेगमेंट मध्ये सुद्धा हात आजमावला होता हे महत्त्वाचं!

 

फँटाबुलस – स्कुटर

 

fantabulous inmarathi
forum.classicmotorworks.com

 

स्कुटर चा फोटो पाहून चमकलात ना! हो ,रॉयल एनफिल्ड ने स्कुटर सुद्धा आणली होती.

एलएमएल किंवा बजाज शिवाय एनफिल्ड या भारतीय कंपनी ने सुद्धा स्कुटर सफारी भारतीयांना घडवली होती.

दुर्दैवाने फँटाबुलस बाकी कंपन्यांच्या स्कुटर इतकी लोकप्रियता मिळवू शकली नाही. या स्कुटर चं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे याला असलेलं इलेक्टरीक स्टार्ट बटन!

भारतीय बनावटीच्या स्कुटर ला अशी सुविधा देणारी ही पहिली कंपनी. १७३ सीसी,२ स्ट्रोक इंजिन ७.५ हॉर्स पॉवर पर्यंत शक्ती निर्माण करायची.

तरीही भारतीय बाजारात ही स्कुटर फारशी चालली नाही. नंतर बजाज चेतक ने भारतीय बाजाराचा पूर्ण ताबा घेतला आणि एनफिल्ड ने सुद्धा स्कुटरच्या पुनर्निर्मिती चा नाद सोडला.

 

रॉयल एनफिल्ड लाइटनिंग

enfield lightning inmarathhi
youtube.com

थंडरबर्ड या मॉडेल विषयी आपण सर्वच परिचित आहोत परंतु त्या सारखी दिसणारी ही ‘लायटिंग’ बाईक १९९७ ला बाजारात आणली गेली.५३५ सीसी इंजिन असलेली ही एक दूरच्या सफारी ची बाईक होती.

या इंजिनातून २५ hp पर्यंत ची पॉवर निर्माण केली जायची. थंडरबर्ड बाजारात आणण्यापूर्वी काही वर्षे अगोदरच आलेली लायटिंग मात्र थंडर इतकी नशीबवान ठरू शकली नाही.

त्या काळी लोकांचा कल हा कमी पेट्रोल पिणाऱ्या अश्या छोट्या मोटरसायकलींकडे होता.

 

सिल्वर प्लस – मोपेड सुद्धा

 

silver plus inmarathi
team-bhp.com

 

बाकीच्या मोटारसायकल कंपनी प्रमाणेच रॉयल एनफिल्ड ने सुद्धा मोटारींच्या प्रत्येक प्रकारात हात आजमावून पाहिले आहेत. सिल्वर प्लस हा त्याच प्रयोगाचं फलित होतं.

एक्सप्लोरर प्रमाणेच ५० सीसी चं इंजिन वापरून मोपेड चं निर्माण केलं.

परंतु हा प्रयोग सुद्धा सपशेल अपयशी ठरला आणि छोट्या गाड्यांच्या निर्मितीत बादशहा बनण्याचं स्वप्न परत भंगल.

 

रॉयल एनफिल्ड टोरस – डिझेल बाईक

 

enfield taurus inmarathi
cartoq.com

 

डिझेल वाली बाईक? हो डिझेल वर चालणारी बाईक – टोरस ! भारताची पहिली डिझेल मोटारसायकल होण्याचा मान टोरस कडे जातो. टोरस म्हणजे बुलेट ची डिझेल आवृत्ती.

परंतु अगडबंब शरीर आणि सुरू होताना होणारा त्रासदायक आवाजाने सगळ्या मेहनतीवर पाणी फिरवलं. ही बाईक सुद्धा फार काही विशेष करू शकली नाही.

तरी बुलेट चालवताना येणारा विशिष्ट आवाज अन बुलेट ची शान या बाईक मध्ये सुद्धा होती.

 

रॉयल एनफिल्ड – मिनी बुलेट

 

mini bullet inmarathi
indianautosblog.com

 

बुलेट हे नाव तर भारताच्या घरा- घरात परिचित असलेलं नाव. विशेषतः पंजाब- हरियाना परिसरात प्रत्येक गल्लीत एक तरी बुलेट-३५० उभी असलेली दिसते.

परंतु त्याच्या अवजड वजनाने बुलेट-३५० चालवणं प्रत्येकालाच शक्य होईल याची काही शाश्वती नाही.

अश्या लोकांसाठीच कंपनीने मिनी बुलेट ची निर्मिती केली. मिनी बुलेट म्हणजे बुलेट चं लहान अपत्य!

२०० सीसी इंजिन आणि बुलेट च्या तुलनेत वजनाला ही बाईक बरीच हलकी होती.

 

रॉयल एनफिल्ड क्रुसाडेर :

 

enfield crusader inmarathi
bikes4sale.com

 

क्रुसाडेर रॉयल एनफिल्ड शेर्पा नावाने १९६३ ते १९८० दरम्यान प्रसिध्द होती. १९७९ च्या सुमारास शेर्पा ची पुनर्रचना करून क्रुसाडेर ची निर्मिती करण्यात आली.

१७३ सीसी इंजिन,टू स्ट्रोक, सिंगल सिलेंडर आणि एअर कूल ही याच्या इंजिनाची वैशिष्ट्य होत. या शिवाय इंजिनात मल्टी-प्लेट क्लच वापरण्यात आला होता.

या बाईक चा सर्वाधिक वेग प्रति तास ९०-९५ किमी होता.

ह्या होत्या काही जुन्यात काळाच्या ओघात विसरल्या गेलेल्या बाईक्स! तुमची आवडती रॉयल एनफिल्ड बाईक कोणती ते कंमेंट करून सांगा नक्की!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?