' भारताचं राष्ट्रगीत अभिमानाने गाताहेत - भारताचे स्पोर्ट-स्टार्स !

भारताचं राष्ट्रगीत अभिमानाने गाताहेत – भारताचे स्पोर्ट-स्टार्स !

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

दिवसेंदिवस भारतात मैदानी खेळ खेळण्याकडील मुलांचा कल कमी होत आहे.

त्यामुळे, मुलांना मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहित करण्यासाठी International Institute of Sports Management चे संस्थापक, पूर्वाश्रमीचे भारतीय क्रिकेट खेळाडू निलेश कुलकर्णी ह्यांनी “The Sport Heroes” हा अल्बम बनवण्याची कल्पना मांडली आणि अमलातसुद्धा आणली.

हा अल्बम २४ जानेवारी २०१६ रोजी सचिन तेंडुलकर आणि धनराज पिल्लेच्या उपस्थितीत प्रदर्शित करण्यात आला होता.

 

national anthem 03 marathipizza

स्त्रोत: द हिंदू

“२०११ च्या वर्ल्ड कप फायनलच्या आधी वानखेडे स्टेडियममध्ये राष्ट्रगीत म्हणणं हा सर्वात रोमांचक अनुभव होता” असे उद्गार सचिन तेंदुलकरने ह्या प्रदर्शनाच्यावेळी व्यक्त केले.

ह्याच अल्बममध्ये भारतीय क्रीडाक्षेत्रातील दिग्गज एकत्र आले आहेत – भारतीय राष्ट्रगीत म्हणण्यासाठी!

 

national anthem 01 marathipizza

 

अभिजित पानसेंनी दिग्दर्शित केलेल्या “The Sport Heroes” ह्या अल्बममधे – सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, धनराज पिल्ले, महेश भूपती, सानिया मिर्झा, बाईचंग भुतिया, गगन नारंग आणि सुशील कुमार – ह्या भारतीय क्रीडा क्षेत्रातल्या ८ दिग्गजांनी एकत्र येऊन राष्ट्रगीत म्हटलं आहे.

मुलांना खेळ खेळण्यास प्रोत्साहित करण्याचा संदेश देत देशाच्या स्पोर्ट्स-हिरोंना एकत्र दाखवणारा हा व्हिडीओ आपला दिवस अजून छान करेल :

व्हिडीओ इथे क्लिक करून बघू शकता :

 

 

जय हिंद !

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?