'घरगुती गॅस सिलेंडर अधिक काळ टिकवण्यासाठी १००% उपयोगी ठरतील या टिप्स, करताय ना फॉलो?

घरगुती गॅस सिलेंडर अधिक काळ टिकवण्यासाठी १००% उपयोगी ठरतील या टिप्स, करताय ना फॉलो?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

५ जूनला जागतिक पर्यावरण दिवस पार पडला. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण कितीतरी गोष्टी करतो. काही कराव्याश्या वाटतात पण जमत नाहीत.

प्लॅस्टिकच्या वापरावर तर आता बंदीच आहे. त्यामुळं कापडी पिशव्या, कागदी पिशव्या सर्रास वापरल्या जातात. आपण वापरतोही. पण याशिवाय अजूनही खूप ठिकाणी आपण याबाबत जे काही करु शकतो.

पाणी बचत करणे, इंधन बेतानेच वापरणे, वीज वाया न घालवणे हे ते विविध पर्याय. पर्यावरणाची हानी करणारे घटक टाळणं हा पण एक त्यातील भाग.

आजकाल इंधनाची बचत हा एक मोठा भाग बनला आहे कारण मर्यादित स्त्रोत असलेले‌ इंधन हे नैसर्गिक स्त्रोत आहेत. राॅकेल, पेट्रोल डिझेल हे जरी नैसर्गिक स्त्रोत असले तरी त्यांचे साठे मर्यादितच आहेत. म्हणून ते काटकसरीने वापरले तर आपल्याला त्याचा फायदाच होईल.

 

petrol pump inmarathi
sirfnews.com

 

Charity begins at home… म्हणजे सत्कृत्याची सुरुवात घरापासून करा. सगळ्यात मोठे काम स्वयंपाकघरात होते.. तिथूनच आपण पर्यावरण रक्षणासाठी सुरुवात करु शकतो.

स्वयंपाकघरात पूर्वी लाकडं, कोळसे वापरुन स्वयंपाक केला जायचा. पुढं स्टोव्ह आले. फर्रर्र आवाज करणारा स्टोव्ह वापरणार घर आता एखादंच असेल. त्या आवाजावर मात करुन मंद तेवणारे वातीचे स्टोव्ह आले.

राॅकेलची टंचाई, संपणारे इंधनसाठे, हे पाहता काही जणांनी सूर्यचूल म्हणजे सोलर कुकर आणले. सूर्यकिरणांच्या सानिध्यात हा सोलर कुकर ठेवून अन्न शिजवलं जाई.

यानंतरच्या काळात आले गॅस सिलिंडर. गॅसच्या वापरानं वेळाची बचत होते, आवाजाचा त्रास नाही. पण इंधनाची बचत कशी करावी ही समस्या आजही कायम आहे.

इंधनाचे वाढते दर आंतरराष्ट्रीय स्तरावर हे दर सतत बदलत असतात त्यामुळे आपल्याकडंही हे दर महागच असतात. एका महिन्यात आणि कधीकधी महिन्याच्या आतच संपणारा गॅस हा कधी कधी आपलं आर्थिक गणित चुकवू शकतो.

कारण सरकार फक्त बारा सिलिंडर वर सबसिडी देतं. तेरावा सिलिंडर आपल्याला जास्त पैसे देऊनच घ्यावा लागतो. मग यावर उपाय काय? तर सांभाळून बेतानेच काटकसरीने गॅस वापरणे. याशिवाय अजूनही काही उपाय आहेत जे आज आपण पाहूया.

 

१. प्रेशर कुकरमध्ये अन्न शिजवा-

 

pressure cooker inmarathi
scroll.in

 

अन्न शिजवताना प्रेशर कुकरमध्ये शिजवून घ्या. त्याचा फायदा इंधन बचतीसाठी होतो.

प्रेशर कुकर झाकण लावल्यावर जी वाफ तयार होते त्याच्या प्रेशरवर म्हणजे दाबावर अन्न शिजवतो, त्यामुळं अन्न शिजायला वेळ लागतो तो अतिशय कमी असतो. त्यामुळं इंधनाची बचत व्हायला मदत होते.

 

२. वापराची भांडी स्वच्छ ठेवा-

 

utensils inmarathi
youtube.com

 

ज्या भांड्यात आपण अन्न शिजवतो ती भांडी स्वच्छ असावीत. जर तेलकट किंवा राप जमलेलं भांडं असेल तर ते तापायला वेळ लागतो.

पण जर स्वच्छ भांडी असतील तर भांडी चटकन् गरम होतात आणि अन्न‌ शिजण्यासाठी लागणारा वेळ वाचतो.

 

३. पदार्थ करताना जे घटक असतात ते मोजून घ्या-

 

adding-salt-inmarathi
keluarga.my

 

कोणताही पदार्थ करत असताना त्यातील समावेश असणारे घटक पदार्थ मोजून घ्यावेत. जसं पाणी, साखर.‌ कारण हे जर कमी पडले तर पुन्हा एकदा ते  मिसळण्यासाठी गॅस खर्च होतो. जास्त झाले तर आटवायला वेळ जातो.

म्हणून घटक पदार्थ योग्य रितीने मोजून घ्यावेत. अंदाजे केलेला पदार्थ नुसताच बिघडतो असं नाही तर इंधनपण जास्त खर्च करतो.

 

४. उघड्या तोंडाची भांडी टाळा-

 

addding salt
buzzfeed.com

 

स्वयंपाक करताना अन्न पदार्थ शिजवण्यासाठी जी भांडी वापराल ती उघडी ठेवू नका. त्यावर झाकण ठेवून शिजवा म्हणजे वाफेवरच तो पदार्थ व्यवस्थित शिजून जाईल अन्यथा शिजवण्यासाठी जास्त वेळ लागतो पर्यायाने गॅसही जास्त खर्च होतो.

 

५. बर्नर नियमितपणे स्वच्छ करुन घ्या-

 

gas clean inmarathi
parenting.firstcry.com

 

गॅसची शेगडी आपण स्वयंपाक झाल्यावर धुवून पुसून काढतो. पण त्याच बरोबर तिचे बर्नर, बटने स्वच्छ आहेत का हे पहाणंही आवश्यक आहे.

खूपदा अन्न सांडून, कधी कधी दूध उतू जाऊन बर्नरची छिद्रे बुजून जातात. मग पुरेसा गॅस पेटत नाही किंवा बर्नरची ज्योत काजळी धरल्यासारखी मंद होते. त्यामुळे पदार्थ शिजायला वेळ लागतो पर्यायाने गॅसही जास्त प्रमाणात वापरला जातो.

म्हणूनच शेगडीचं सर्व्हिसिंग दर दोन तीन महिन्यांनी करुन घ्यावे म्हणजे बर्नर स्वच्छ होतात आणि इंधन योग्य रितीने वापरले जाते.

 

६. योग्य मापाची भांडी वापरा-

 

cooking inmarathi

 

स्वयंपाक करताना आपण जी पातेली कढया वापरतो त्या अन्न पदार्थाच्या मापाने असावीत. ज्यामुळे शेगडीची धग पूर्ण भांड्याचा तळ नीटपणे व्यापून उष्णता योग्य रितीने वापरली जाऊन इंधन वाया जात नाही.

कधी कधी लहान भांडे आणि मोठा गॅस झाला तर भांडं करपून खराब होतात. तेच अति मोठे भांडे असले तर गॅस कितीही मोठा ठेवला तरी त्याची आच सर्वत्र पोचू शकत नाही व इंधन जास्त प्रमाणात जळते. हे टाळण्यासाठी योग्य मापाची भांडी स्वयंपाकात वापरा.

 

७. गॅसची तपासणी नियमितपणे करा-

 

gas clean inmarathi 1
glotechrepairs.co.uk

 

रेग्यूलेटर जेव्हा जेव्हा बसवला जातो तेव्हा तो नीट बसवला आहे का याची खात्री करुन घ्या. कारण मोठी गॅसगळती हे अपघाताला आमंत्रण असतंच पण थोडा थोडा गॅस गळत राहीला तर त्यामुळे गॅस जास्त खर्च होतो. म्हणून सुरक्षा पाईप वापरा आणि गॅसची काळजी घ्या. ‘

रोज रात्री झोपताना रेग्यूलेटर बंद करुन झोपा. म्हणजे गॅस गळतीचा धोका टळू शकतो. गॅसचा वास येतो आहे असं वाटलं तरी काळजीपूर्वक बघा.

गॅसच्या शेगडीची बटने बंद आहेत का? कधी कधी वाऱ्याच्या झोताने गॅस विझतो आणि बटन चालू राहीले तर तो तसाच गळत राहतो. म्हणून हे लक्षपूर्वक बघा.

८. योग्य प्रमाणात स्वयंपाक करा-

 

housewife inmarathi
stuartfreedman.com

 

थोडं थोडं अन्न शिजवणे हे जास्त इंधन खर्च करणारं ठरतं. त्यापेक्षा पोळ्या, भाजी हे थोडं जास्त बनवा. वेळ आणि इंधन नक्की वाचतं चहा करताना वेगवेगळा करु नका. एकदम सगळ्यांचा चहा करा.

प्रत्येकाचा एक एक कप चहा उकळायला जेवढा गॅस लागतो त्यापेक्षा कमी गॅसमध्ये‌ सर्वांचा चहा एकत्रितपणे होतो. म्हणजेच बचत होते.

फ्रीझमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ सामान्य तापमानाला येईपर्यंत थांबा. ते फ्रीझमधून काढून लगेच गॅसवर गरम करायला ठेवले तर ते थंड पदार्थ गरम करायला जास्त प्रमाणात गॅस लागतो.

म्हणून स्वयंपाकाच्या आधी अशी फ्रीझमधील भांडी बाहेर काढून ठेवा आणि एक तासाने‌ गरम करायला घ्या. कमी वेळात पदार्थ गरम होतील.

थोडक्यात काय बचत हीच मिळकत असते. याचं धोरणाने गॅसची बचत केली तर नक्कीच त्याचे चांगले परिणाम दिसतीलच.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?