' मतनोंदणी आणि मतमोजणी प्रकिया कशी असते? जाणून घ्या!

मतनोंदणी आणि मतमोजणी प्रकिया कशी असते? जाणून घ्या!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती यापैकी कोणत्याही निवडणुकांची मतनोंदणी प्रक्रिया पार पडली की मतदार राजाला आणि उमेदवारांना एकाच गोष्टीची उत्सुकता असते ती म्हणजे निकालाची! निकाल कोणाच्या बाजूने लागणार हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक नागरिक उत्सुक असतो. निकालाच्या दिवशी मतमोजणीला सुरुवात होते आणि दुपारपर्यंत संपूर्ण निकाल आपल्या हाती येतो. आज आपण मतनोंदणी आणि मतमोजणी या दोन्ही प्रक्रिया नेमक्या कश्या पूर्ण होतात ते जाणून घेऊया!

evm voting machine

सर्वप्रथम आपण जाणून घेऊया वोटिंग मशीन अर्थात Electronic Voting machine(EVM) बद्दल!

१९९८ साली दिल्ली, राजस्थान आणि मध्यप्रदेश मधील १६ विधानसभा मतदार संघातील निवडणुकांसाठी पहिल्यांदा प्रायोगिक तत्वावर या वोटिंग मशीनचा वापर करण्यात आला. भारत इलेक्ट्रॉनिक्स, बँगलोर आणि इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, हैद्राबाद या दोन कंपन्याच या मशीन तयार करतात. या मशीन्सची चहुबाजूंनी पडताळणी केल्यावरच निवडणूक आयोग या मशीन्स वापरण्याची परवानगी देते.

या मशीन्स एका विशिष्ट प्रणालीवर काम करतात. मशीनचे दोन युनिट असतात.

१) Control Unit आणि २) Balloting Unit.

evm machine 2 units marathipizza

स्रोत

हे दोन्ही युनिट एका ५ मीटर लांब वायरने जोडलेले असतात. यातील Control Unit हे पोलिंग अधिकारी सांभाळतो आणि Balloting Unit म्हणजे ते ज्यावर आपण आपले मत नोंदवतो. पोलिंग अधिकारी जेव्हा Control Unit वरचं Ballot Button दाबतो, तेव्हा वोटिंग मशीन अॅक्टीव्ह होते आणि मतदाराने नोंदवलेलं मत रेकॉर्ड होतं.

तुम्हाला वाटत असेल की, एका वेळेस दोन तीन ठिकाणी बटण दाबली तर काय फरक पडतो? तर ही गोष्ट लक्षात घ्या की तुमच्या या उपद्व्यापाचा काही उपयोग नाही – कारण जे बटण तुम्ही पहिलं दाबता तेव्हा तुमचं मत थेट नोंद केलं जातं आणि मशीन लॉक होते. त्यामुळे पुढे तुम्ही किती बटण दाबलीत तरी ते रेकॉर्ड केले जाणार नाही.

एका वोटिंग मशीनमध्ये जास्तीत जास्त ३८४० मतदार आपली मते नोंदवू शकतात. पण सामान्यत: एका मशीनमध्ये केवळ १५०० मतेच नोंदवून घेतली जातात. Control Unit जवळपास १० वर्षे मतनोंदणी स्टोअर करून ठेवू शकते.

या वोटिंग मशीन विजेवर चालतात असा गैरसमज करून घेऊ नये. या वोटिंग मशीन सहा वोल्टच्या alkaline battery वर चालतात. त्यामुळे ज्या भागात वीज नाही त्या भागात देखील वोटिंग मशीनचा वापर केला जातो. एका वोटिंग मशीन मध्ये जास्तीत जास्त ६४ उमेदवारांचा समवेश केला जाऊ शकतो. पण एका Balloting Unit मध्ये केवळ १६ उमेदवारांचा समावेश करण्याची तरतूद असते. अश्यावेळेस १६ पेक्षा जास्त उमेदवार असतील तर पहिल्या Balloting Unit ला अजून एका दुसरे Balloting Unit जोडले जाते. अश्याप्रकारे जर ६४ उमेदवार उभे असतील तर एकूण ४ Balloting Unit एकमेकांना जोडले जातात.

evm 64 candidates marathipizza

स्रोत

पण समजा ६४ पेक्षा जास्त उमेदवार एखाद्या मतदारसंघात असतील तर अश्यावेळेस या वोटिंग मशीनचा वापर केला जात नाही, तर पारंपरिक बॉक्स पेपर मतदान पद्धतीचा वापर केला जातो. (पण सहसा अशी गोष्ट घडत नाही.)

तर अशी ही मत नोंदणीची प्रक्रिया संपली म्हणजेच बूथवरच्या शेवटच्या मतदाराने आपले मत नोंदवले की पोलिंग अधिकारी जो Control Unit सांभाळत असतो तो ‘’Close’ बटण दाबतो. त्यानंतर कोणतेही मत मशीन नोंदवून घेत नाही. त्यानंतर Balloting Unit हे Control Unit पासून वेगळे करून एका सुरक्षित ठिकाणी ठेवले जाते. मतमोजणीच्या एक दिवस आधी सर्व वोटिंग मशीन्स मतमोजणी केंद्रावर आणली जातात. आणि अति सुरक्षित असणाऱ्या एका खोलीमध्ये ठेवली जातात.

सकाळी ८ वाजता मतमोजणीच्या पहिल्या फेरीला सुरुवात होते. मतमोजणी केंद्रावर अनेक ब्लॉक्स तयार केलेले असतात. एका ब्लॉकमध्ये मतमोजणी करण्यासाठी काही टीम्स असतात आणि मतमोजणी प्रक्रिया नीट होते आहे हे स्वत:च्या डोळ्याने पाहणारा प्रत्येक पक्षाचा एक प्रतिनिधी उपस्थित असतो. या टीम्स Control Unit वरील result बटण दाबतात. हे बटण दाबल्यावर प्रत्येक उमेदवाराला किती मते पडली आहेत हे कळते. अश्याप्रकारे  प्रत्येक फेरीला प्रत्येक ब्लॉकमध्ये एक वोटिंग मशीन पाठवली जाते आणि अश्या पद्धतीने जेवढ्या मशीन्स असतीत त्या नुसार फेऱ्या होतात आणि हळूहळू निकाल उलगडला जातो.

तर अश्या या मतनोंदणीच्या आणि मतमोजणीच्या प्रक्रिया, काहीश्या वेळ खाऊ असल्या तरी आजच्या घडीला मतदान निपक्षपणे होण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात.

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?