' क्रिकेट, फुटबॉल इतक्याच थरारक अशा १० खेळांची नावं आपण ऐकलीही नसतील! – InMarathi

क्रिकेट, फुटबॉल इतक्याच थरारक अशा १० खेळांची नावं आपण ऐकलीही नसतील!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपल्या भारतात ठराविक खेळच लोकप्रिय आहेत. आणि बाकीच्या खेळांना क्रिकेटइतके ग्लॅमर लाभलेले नाही. त्यातल्या त्यात दुसरा खेळ आपल्या इथल्या लोकांना आवडतो तो म्हणजे फुटबॉल.

 

cricket football inmarathi

 

पण जगात या दोन खेळांव्यतिरिक्तही अनेक खेळ खेळले जातात. आणि ते खेळ देखील अतिशय थरारक असतात. एंटरटेनिंग असतात. त्यापैकी काही खेळांची नावं तुम्ही ऐकली असतील पण काही खेळ असे आहेत ज्याची तुम्हाला कदाचित अजून कल्पना नसेल.

चला बघूया असे कोणकोणते खेळ आहेत, जे भारतात फारसे लोकप्रिय नाहीत.

हे ही वाचा या पठ्ठ्याने ऑलिम्पिक्समध्ये अनवाणी धावून सुवर्णपदक पटकवल्याची गोष्ट जगाला सदैव प्रेरणा देत राहील!

१. सेपॅक टकरॉव –

 

sapak takrow inmarathi

 

हा मूळ मलेशियन खेळ असून सध्या त्याचा प्रसार जगभर झालेला दिसतो. व्हॉलीबॉल आणि फुटबॉलचे मिश्रण असलेला हा खेळ दक्षिण पूर्व आशियाई देशांत खेळला जातो.

याला फुट-व्हॉलीबॉल म्हणू शकतो. यात व्हॉलीबॉलप्रमाणेच मध्ये नेट बांधलेले असते. मात्र दोन्हीकडचे खेळाडू बॉलला हात न लावता तो पायाने, गुडघ्याने, डोक्याने किंवा आपल्या छातीने तो दुसरीकडे टोलवतात.

अलिकडेच हैद्राबाद येथे नुकत्याच झालेल्या सेपॅक टक्राव विश्वचषक स्पर्धेसह गेल्या काही वर्षांत भारत देखील ISTAF मध्ये भाग घेऊ लागला आहे.

हैदराबाद येथील सेपॅक टकरॉवच्या विश्वचषक स्पर्धेत भारताने ब्रॉन्झ पदक आपल्याकडे राखले हे ऐकून तुम्हाला आश्चर्य आणि गर्व दोन्ही वाटतील.

शिवाय किंग्स कप सेपॅक टकरॉव वर्ल्ड चॅम्पिअनशीप या महत्त्वाच्या टुर्नामेंटमध्ये देखील भारत गेल्या सहा वर्षांपासून भाग घेत आहे आणि त्यात रेग्युलर भाग घेणाऱ्या पंधरा सहभागी देशांत भारताचे रँन्कींग ८ वे आहे.

 

sapak takrow 2 inmarathi

 

अजून या खेळाचा ऑलिम्पिकमध्ये समावेश झालेला नाही. त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. जर या खेळाचा समावेश ऑलिम्पिकमध्ये झाला, तर भारत त्यात चांगली कामगिरी करेल यात शंका नाही.

२. रग्बी –

 

rugby inmarathi

 

एकाग्रता, शिस्त, पॅशन याची सगळ्या खेळात आवश्यकता असते. असाच एक खेळ आहे तो म्हणजे रग्बी. यात तीन गोष्टींना महत्त्व आहे – कॅच, पास आणि रन, म्हणजेच झेला, पास करा आणि धावा.

हा खेळ अर्जेंटीना, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, फ्रान्स, आयर्लंड, इटली, न्यूझीलंड, स्कॉटलंड, साऊथ आफ्रिका या देशांत खूप लोकप्रिय आहे.

या खेळात जवळपास १०८ देश भाग घेतात, त्या सर्वांत भारताचे स्थान ८० वे आहे. हळूहळू भारतात देखील या खेळाला महत्त्व येत आहे.

आशियामध्ये भारत या खेळात क्रमांक १ वर आहे. मात्र भारत अजूनही वर्ल्ड कप रग्बीत खेळलेला नाही. मात्र आशियाई चॅम्पिअनशीपमध्ये तो भाग घेत असतो.

 

३. स्क्वाश –

 

squash inmarathi

 

बर्‍याच काळापासून स्क्वॉश हा एक मनोरंजक खेळ मानला जात आहे. परंतु अलिकडेच स्पर्धात्मक खेळ म्हणूनही याला लोकप्रियता मिळाली आहे.

दिपिका पल्लीकल, जोश्ना चिनप्पा, सौरव घोशाल आणि ऋत्विक भट्टाचार्य ही बऱ्याच काळापासून या खेळातली भारतातील प्रसिद्ध नावं. दशकभरापूर्वी ऋत्विक भट्टाचार्य याने पहिल्या पन्नासमध्ये स्थान मिळवले होते.

दिपिका पल्लिकल आणि जोश्ना चिनप्पा या दोघींनी मिळून २०१४ च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले होते. दिपिकाने टॉप टेन मध्ये रॅंकींगही मिळवले होते.

४. गोल्फ –

 

the golf inmarathi

 

हा खेळ सर्वसाधारणपणे श्रीमंत आणि उच्चभ्रू लोकांचा खेळ म्हणून ओळखला जातो. परंतु भारतीय व्यक्तींनी देखील या खेळात चांगले नाव कमावले आहे.

जीव मिल्खा सिंग या भारतीय खेळाडूने या खेळात जगभरातल्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन आतापर्यंत १३ पुरस्कार मिळवले आहेत.

ज्योती रंधवा, अर्जून अटवाल, अनिर्बन लाहिरी, रायन थॉमस एसएसपी चौरसिया ही नावे देखील भारतीय गोल्फर्सची असून गेल्या काही वर्षांत गोल्फ या खेळात देखील भारताचे नाव झळकू लागले आहे.

५. फॉर्म्युला – इ –

 

formula e inmarathi

 

हा मोटार रेसचा प्रकार आहे. भारत अनेक वर्षांपासून या खेळात भाग घेत आलेला आहे.

फोर्स इंडिया ही भारताची मोटार रेस स्पर्धा आयोजित करणारी संघटना असून टीव्हीएस कंपनी देखील मोटार रेसला उत्तेजन देणाऱ्या स्पर्धा आयोजित करत असते.

एफ१ आणि एफ२ सर्कीटमध्ये नारायण कार्तिकेयन, करूण चांडक, अरमान इब्राहीम यांनी यशस्वीपणे भारताचे प्रतिनीधीत्व केले आहे.

सध्या महिंद्रा कंपनी ही भारतीय स्पर्धकांना फॉर्म्युला – ई साठी उत्तेजन देत आहे.

फॉर्म्युला – ई ही एक मोटार रेस आहे. यात केवळ इलेक्ट्रीकल मोटारींचा वापर होतो. ही रेस २०१४ पासून सुरू झालेली आहे.

आपल्याला सहसा अनोळखी असलेले खेळ –

वरील पाच खेळ हे भारतात कमी खेळले जात असले, तरी आपल्याला निदान त्यांची माहिती तरी असते. ऐकून तरी हे खेळ आपल्याला ठाऊक असतात.

परंतु काही खेळ जगात असे खेळले जातात, की ज्याची अजून सर्वसामान्य भारतीयांना माहीतीही नाही. असे काही खेळ आहेत ते पुढीलप्रमाणे –

 

१. अंडरवॉटर हॉकी –

 

underwater hockey inmarathi

 

नावावरूनच आपल्याला या खेळाची कल्पना येते. या खेळाचा शोध ब्रिटीश नेव्हीने आपल्या डायव्हर्सना फिट ठेवण्यासाठी म्हणून १९५० मध्ये लावला.

मात्र नंतर हा खेळ सर्वसाधारण खेळाडूंमध्ये देखील प्रिय झाला आणि सध्या तो जगात जवळपास विसेक देशांमध्य खेळला जातो.

यात वापरली जाणारी स्टीक ही फार लहान असते. या खेळात पंधरा मिनिटांचे दोन भाग असतात आणि या दोन भागात तीन मिनिटांचा ब्रेक असतो.

२. झॉर्बिंग –

 

zorbing inmarathi

 

ह्या खेळात एक रबरी गोल असतो मोठा. याच्या आत उभे राहून स्पर्धक पाण्यावर धावण्याची स्पर्धा खेळत असतात.

३. टो रेसलिंग –

 

toe wrestling inmarathi

 

१९७६ पासून हा खेळ युकेमध्ये खेळला जातो. यात प्रतिस्पर्धी आपापल्या पायांची बोटं एकमेकांच्या पायात अडकवून एकमेकांना मात देण्याचा प्रयत्न करत असतात.

४. एक्स्ट्रीम आयर्निंग –

 

extreme ironing inmarathi

 

१९९७ मध्ये या खेळाला इंग्लंडमध्ये प्रारंभ झाला.

या खेळात रॉक क्लायबिंग करताना, स्कूबा डायव्हिंग करताना, धावताना, किंवा अगदी स्काय डायव्हिंग करताना आयर्निंग करणे हा प्रकार असतो.

२००२ मध्ये याची जागतिक स्पर्धा देखील झाली होती.

 

५. थ्री-सायडेड फुटबॉल –

 

3 sided football inmarathi

 

हा नेहमीचाच फुटबॉल प्रकार असतो. मात्र यात दोन टिमऐवजी तीन टिम सामील असतात. यात तीन गोलपोस्ट असतात आणि या खेळाला १९६६ मध्ये सुरूवात झाली.

प्रत्येक टिममध्ये फक्त पाच खेळाडू असतात. तर जगभरात असे आणि याहून अनेक विविध प्रकारचे खेळ खेळले जातात.

मात्र भारतासारख्या अती लोकसंख्येच्या देशांत खेळाडू आहेत, पण त्यांना उत्तेजन देणारे खिलाडू वातावरण नाही. त्यामुळे आपल्या इथे क्रिकेट, कबड्डी, फुटबॉल याशिवाय इतर खेळांना पोषक असे वातावरण नाही.

===

हे ही वाचा ड्रग्जच्या तडाख्यातून स्वतःला बचावत घडलाय तुफानी फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला हा खेळाडू

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?