' कोरोना संकटात जागतिक अर्थव्यवस्थेची धुरा ह्या दोन ‘कर्तृत्वान’ महिलांच्या हातात! – InMarathi

कोरोना संकटात जागतिक अर्थव्यवस्थेची धुरा ह्या दोन ‘कर्तृत्वान’ महिलांच्या हातात!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आज सगळीकडे एकाच विषयाची वाच्यता होताना आपल्याला दिसते ती म्हणजे कोरोना! जानेवारी मध्ये वूहान मध्ये सुरू झालेल्या ह्या माहमारीचं इतकं भयंकर रूप साऱ्या जगाला बघायला मिळेल याची कुणी कल्पना सुद्धा केली नसावी!

जगातल्या सर्वात बलाढ्य देशांमध्ये सुद्धा ह्या कोरोनाचा विळखा वाढतोच आहे, भारतात सुद्धा लॉकडाऊन ५ किंवा अनलॉक १ चालू आहे!

 

corona inmarathi 2
deccanherald.com

 

आज कोरोनामुळे अर्ध्या पेक्षा जास्त लहान मोठे उद्योग ठप्प झाले आहेत. लोकांचे पगार ते सरकारच्या तिजोरीत जमा होणारा टॅक्स या सर्वांवर चाप बसला आहे.

ढासळत चाललेल्या या परिस्थितीत केंद्र सरकारने आधी मेडिकल पॅकेज ची घोषणा केली आणि त्यानंतर तब्बल २० लाख करोड इतक्या मोठ्या रक्कमेची मदत या आणीबाणीच्या परिस्थिती मध्ये जाहीर केली.

एकंदरीत केंद्राच्या तिजोरीत जी सेव्हिंग होती त्यातला काहीसा हिस्सा हा पॅकेज म्हणून घोषित झाला. अर्थव्यवस्थेच्या जवळपास १०% ही रक्कम आहे असे म्हणतात.

 

nirmala sitaraman inmarathi
financialexpress.com

 

जस केंद्राने हे आपत्कालीन पॅकेज राष्ट्रीय स्तरावर घोषित केले आहे तशीच मदत आंतरराष्ट्रीय स्तरावरून सुद्धा होत असते.

जागतिक बँकेने आतापर्यंत कोरोना विरोधाच्या लढ्यात भारताला दोन वेळा मदत केली सहाजिकच ती म्हणजे आर्थिक स्वरूपाची.

३ एप्रिल ला १ बिलियन डॉलर (म्हणजेच आत्ताच्या भारतीय चलना प्रमाणे ६५०० करोड) आणि पुन्हा १५ मे ला १ बिलियन डॉलर अशी भरघोस मदत केली.

दुसरी मदत ही पहिल्या दिलेल्या रक्कमेचा योग्य वापर केला गेला म्हणून काम अधिक प्रभावीपणे करता यावे म्हणून जास्तीची तरतूद ही वर्ल्ड बँकेकडून केली गेली.

आर्थिक आणीबाणी काळात जागतिक अर्थव्यवस्थेला सपोर्ट मिळावा म्हणून काही आंतरराष्ट्रीय स्तरावर संस्था कार्य करत असतात.

वर्ल्ड बँक,आयएमएफ अर्थात इंटरनॅशनल मॉनेटरी फंड म्हणजेच जागतिक नाणेनिधी यासारख्या संस्था कार्यरत आहेत.

वर्ल्ड बँकेचं काम आपण पाहिलच.

 

world bank inmarathi
dnaindia.com

 

सभासद देशांना आणीबाणीच्या वेळेस पैसा उपलब्ध करून देणे तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही आंतरराष्ट्रीय विनिमय दरांमध्ये स्थिरता आणणे,

आणि कर्जे, पुनर्रचना किंवा मदतीच्या मोबदल्यात इतर राष्ट्रांना आपली आर्थिक धोरणे अधिक उदार बनवावयास लावून विकास घडवून आणण्याचे घोषित ध्येय असणारी संस्था आहे.

सध्याच्या या आपत्कालीन समयी या दोन आंतरराष्ट्रीय संस्था या देशांना देशोधडीला लागण्यापासून वाचवू शकतात आणि आंतरराष्ट्रीय अर्थकारणाला पुन्हा मुख्य प्रवाहात सुद्धा हेच आणू शकतात.

आणि या दोन्ही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटनांच्या प्रमुख पदी या महिला आहेत.

वर्ल्ड बँकेचे प्रमुख या प्रोफेसर कारमेन रेनहार्ट या आहेत तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख या गीता गोपीनाथ या आहेत.

 

geeta gopinathan and carmen inmarathi
blog.globalsaja.es

 

सध्याच्या बिघडत्या अर्थकारणाच्या नाड्या आता या दोन प्रमुख अर्थतज्ज्ञाच्या हातात आहेत असं म्हटल्यास वावगे वाटणार नाही.

पाहूया कोण आहेत या आणि यांचं या महत्वाच्या पदावर असणं आजच्या घडीला का महत्वाचे आहे.

 

गीता गोपीनाथ :

गीता गोपीनाथ यांनी जानेवारी २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी च्या चीफ इकॉनॉमिस्ट पदाचा पदभार स्वीकारला.

ऑक्टोबर २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्याचं मॅनेजिंग डायरेक्टर क्रिस्टिना जियोर्जेवा यांनी नियुक्ती केली होती.

या पदावर येणाऱ्या गीता गोपीनाथ या पहिल्याच महिला आहेत. जगातल्या सर्वोत्तम अर्थतज्ञांमध्ये यांची गणना होते.

४८ वर्षीय गीता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ११ व्या चीफ इकॉनॉमिस्ट आहेत. त्या हावर्ड युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून कार्यरत होत्या.

 

gita gpoinath inmarathi
blooomberg.com

 

वर्षाच्या सुरुवातीला, जानेवारी २०२० मध्ये गीता गोपीनाथ यांनी कमेंट केलेली,

ग्लोबल ग्रोथ रेट हा ०.१% ने कमी होऊन २.९% पर्यंत आला आहे. कारण भारताचा जीडीपी ग्रोथ हा स्लो डाऊन झाला आहे. ज्याचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय अर्थकारणावर पडत आहे.

भारताच्या अर्थव्यवस्थेचं स्लो डाऊन आंतरराष्ट्रीय अर्थकारणावर किती प्रभाव पाडतो या बाबत त्यांना विचारलं असता त्यांनी उत्तर दिलेलं, जवळपास ८०%.

त्यांच्या या उत्तराने जगात एकच खळबळ माजवलेली.

पण आता या आणीबाणीच्या परिस्थिती मध्ये गीता गोपीनाथ यांच्या खांद्यावर महत्त्वाची जबाबदारी आहे. आणि येणाऱ्या आर्थिक मंदीमध्ये त्या कशा प्रकारे लीड करतात यावर सगळ्यांच्या नजरा लागून आहेत.

 

gita gopinath imf inmarathi
lepetitjournal.com

 

प्रोफेसर कारमेन रेनहार्ट :

वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मल्पास यांनी आधिकारीक रित्या वर्ल्ड बँकेच्या चीफ इकॉनॉमिस्ट या पदावर प्रोफेसर रेनहार्ट यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

१५ जून पासून त्या आपला कार्यभार स्वीकारतील.

मूळच्या क्युबाच्या नागरिक असलेल्या रेनहार्ट या लहानपणीचं अमेरिकेत स्थायिक झाले.

कोलंबिया युनिव्हर्सिटीची त्यांच्याकडे अर्थशास्त्राची डॉक्टरेटची पदवी आहे. हावर्ड केनेडी स्कुल मध्ये त्या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र शिकवतात.

तिथून त्या दोन वर्षांची रजा घेऊन वर्ल्ड बँकेमध्ये आपली सेवा बजावतील.

 

carmen reinhart inmarathi
capitalism.columbia.edu

 

२००९ मध्ये प्रोफेसर रेनहार्ट यांनी अर्थतज्ञ केनेथ रोगोफ यांच्या सोबत मिळून This Time is Different: Eight Centuries of Financial Folly हे पुस्तक प्रकाशित केले होते.

हा तो काळ होता जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक मंदी आली होती. त्यांच्या या पुस्तकात मार्केटला कशाप्रकारे रेग्युलेट करू शकतो यावर उपाय सांगितले होते.

आणि आर्थिक डबघाईच्या संकटातून सावरण्यासाठी एक सिस्टीमॅटिक पद्धतीचा उपाय सांगितला होता.

सध्याच्या कोरोना व्हायरसचा आपत्तीवर रेनहार्ट म्हणतात,

“स्पष्ट सांगायचं म्हणजे आता ‘काहीही करावं लागलं,तर करू’ या प्रकारची परिस्थिती आहे. आपल्याला अशी आर्थिक आणि मौद्रीक स्ट्रॅटेजीची गरज आहे जी सामान्यांपेक्षा वेगळी असेल.”

 

world bank chief inmarathi
indiatoday.in

 

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मॅनेजिंग डायरेक्टर क्रिस्टिना जियोर्जेवा म्हणतात,

रेनहार्ट या आपत्कालीन स्थिती मध्ये उत्तम चॉईस आहेत. आणि त्यांना गीता गोपीनाथ यांच्या प्रमाणेच कर्ज, आर्थिक भांडवलाचा फ्लो, आर्थिक संकट याबाबत योग्य ज्ञान आहे.

ज्या प्रकारे घराचं अर्थकारण महिला एकदम वाईट परिस्थिती मध्ये योग्य प्रकारे हँडल करतात,

तशीच जागतिक स्तरावर आलेल्या या आपत्कालीन स्थिती मध्ये या महिला अर्थतज्ज्ञ योग्य प्रकारे नय्या पार लावतील अशी अपेक्षा ठेवण्यात काहीच हरकत नसावी.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?