' चायनीज टिकटॉकला टक्कर देणाऱ्या देशी "मित्रो" अॅपचं पाकिस्तानी कनेक्शन...!

चायनीज टिकटॉकला टक्कर देणाऱ्या देशी “मित्रो” अॅपचं पाकिस्तानी कनेक्शन…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

सध्या टिक टॉक या ऍपची चलती आहे. अनेकदा वादात असलेलं हे ऍप खूपच प्रसिद्ध आहे, याचं कारण म्हणजे अगदी कमी सेकंदांचे व्हिडिओ देखील यावर अपलोड करता येतात.

थोड्याच कालावधीत त्याला बरेच व्ह्यूज, शेअर्स, लाईक या व्हिडीओज ना मिळतात. त्यामुळेच तरुणाईमध्ये हे ऍप खूप वापरले जाते.

 

tik tok inmarathi
thejakartapost.com

 

त्याशिवाय अनेक मोबाईल मध्ये देखील हे ऍप आधी डाऊनलोडेड असतं. पण सध्या कोरोनाचा कहर झाला आणि संपूर्ण जगभर हाहाकार उडाला.

कोरोनाचा प्रादुर्भाव चीनमधून झाल्यामुळे आणि चीनने खूप उशिरा जगाला हे सांगितल्यामुळे,जगातल्या सगळ्या देशांचा चीन वरती रोष उत्पन्न झाला.

अमेरिकेचे अध्यक्ष तर कोरोनाला चिनी व्हायरस म्हणतात. आणि त्यांनी वेळोवेळी चीन वरचा राग व्यक्त देखील केला आहे. चीन बरोबर असलेले व्यापारी संबंध संपवण्याची भाषा देखील त्यांनी केली आहे.

भारतातही चिनी वस्तूंना आपल्या जीवनातून हद्दपार करण्यात यावं अशी एक मोहीमच सुरू झाली आहे.

अगदी लडाखचे सोनम वांगचूक हे देखील आता चायनीज वस्तूंच्या विरोधात युट्युब वर माहिती देत आहेत. आणि म्हणूनच चीनच्या कोणत्याही ऍपला डाऊनलोड करण्यास विरोध वाढू लागला आहे.

 

sonam wangchuk inmarathi 2
tv9bharatvarsh.com

 

लोक टिक टॉक हे चायनीज ॲप आपल्या मोबाईल मधून डिलीट करत आहेत किंवा टिक टॉक वर आलेला व्हिडिओ पुढे पाठवला जात नाही.

भारतात विकले गेलेले अनेक मोबाईल हे चीनमधून आलेले असल्यामुळे किंवा चिनी कंपन्यांचे असल्यामुळे बऱ्याच मोबाईल मध्ये टिक टॉक ॲप आहे.

त्यामुळे त्याचे पैसे चीनला मिळताहेत. आता निदान ऍप तरी डिलीट करूयात अशी भावना लोकांमध्ये पसरत आहे.

हे सगळं सुरू असतानाच टिक टॉक च्या तोडीस-तोड भारतीय ऍप आलं असून त्याचं नाव “मित्रों” असल्याची असल्याची बातमी मीडियामध्ये आली.

एकतर मित्रों हा शब्द आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आवडता आहे. ते आपल्या भाषणात अनेकदा जनतेला ‘ मित्रों ‘ असं संबोधतात.

त्यात मित्रों हे ऍप संपूर्ण भारतीय टेक्नॉलॉजी वापरून तयार करण्यात आले आहे अशी माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत होती.

 

mitron app inmarathi
khabar.ndtv.com

 

म्हणूनच त्यावेळेस कोणतीही शहानिशा न करता लोकांनी धडाधड ते ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करायला सुरुवात केली.

एका आठवड्यातच पन्नास हजार लोकांनी मित्रों हे ऍप डाउनलोड केले.

आता मात्र त्याबद्दल एक नवीनच आणि धक्कादायक माहिती पुढे येत आहे. त्यानुसार मित्रों हे ऍप भारतीय बनावटीचे नसून त्याचा निर्माता पाकिस्तानी आहे.

एक पाकिस्तानी डेव्हलपर कंपनी Qboxos या ऍपचं व्हर्जन फक्त २५०० रुपयाला विकलेलं आहे.

पाकिस्तानात टिकटॉकच्या व्हर्जनची कॉपी टिक टॅक या ऍपमध्ये केलेली आहे.

Qboxos या कंपनीच्या संस्थापकाचे म्हणणं असं आहे की त्याने मित्रों ऍपच्या निर्मात्याला टिकटॅकचा सोर्स कोड हा फक्त ३४ डॉलर्सला विकला आहे.

म्हणजेच मित्रोंचा निर्मात्याने तो कोड फक्त २५०० रुपयाला खरेदी केला आहे. सध्या भारतात जे मित्रों ऍप दिसतं ते टिक टॅकचं रीब्रांडेड व्हर्जन आहे.

 

mitron app inmarathi2
thequint.com

 

टिक टॅक कंपनीचा संस्थापक आणि सीईओ इरफान शेख याच्या म्हणण्यानुसार भारतात असलेलं मित्रों ऍप हे मुळात त्याच्या कंपनीने तयार केले आहे.

त्याचं असं म्हणणं आहे की त्याची कंपनी सोर्स कोड विकते आणि कोणीही ते सोर्स कोड विकत घेऊ शकतो. खरेदी करणारे लोक नंतर ते सोर्स कोड कस्टमाईज करू शकतात.

आत्तापर्यंत २७७  लोकांनी हे सोर्स कोड विकत घेतले आहेत. आजही ते कोड code cayon प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.

इरफान शेखच्या म्हणण्यानुसार मित्रों ऍप मध्ये काहीही बदल मित्रों याच्या निर्मात्यांनी केले तरी चालेल, कारण हे त्यांनी पैसे देऊन घेतलेलं आहे.

फक्त प्रश्न आहे की, मित्रों ॲपचा निर्माता हे ॲप भारतीय बनावटीचे आहे म्हणून सांगत आहे. आणि हे अजिबातच खरे नाही. डेवलपरने त्यात कोणत्याही नवीन सुधारणा केलेल्या नाहीत.

मित्रों ऍपला प्रसिद्धी मिळाली आणि ते मोठ्या प्रमाणात डाऊनलोड होऊ लागले. त्यामुळे ती एक बातमी झाली आणि त्याच वेळेस टिक टॅक च्या निर्मात्याने ते आपण केल्याचा दावा केला.

यातली सत्यासत्यता पाहण्यासाठी जेव्हा दोन्ही ॲपच्या API कोडची चाचणी’ इंफॉर्मेशन सीक्युरिटी रिसर्चर ‘ यांनी केली.

 

mitron app 2 inmarathi
palpalindia.com

 

तेंव्हा त्यांच्या असे लक्षात आले की दोन्ही ऍपचे API code सारखेच असून फक्त वापरण्यासाठी वेगवेगळ्या सर्व्हरचा वापर केला आहे.

मित्रों ऍप Qboxos चा कोड वापरूनच बनवण्यात आला आहे. Qboxos ही कंपनी कुठल्याही ऍपचा क्लोन तयार करते आणि सोर्स कोड कमी किमतीत बाजारात विकते, हे आता सगळ्यांना माहीत झालं आहे.

आधी असं म्हटलं गेलं होतं की भारतातील रूरकी मधील आयआयटीच्या एका विद्यार्थ्याने मित्रों हे ऍप तयार केल आहे म्हणूनच भारतात तो लगोलग डाऊन करण्यात आला.

पण आता हे ऍप पाकिस्तान मधील कंपनीने तयार केले आहे हे माहीत झाल्यावर बरेच लोक परत तो अनइन्स्टॉल करतील. कारण तशाही त्या ॲप मध्ये बऱ्याच संशयास्पद गोष्टी आहेत.

आपण जी माहिती ऍपमध्ये देतोय त्याचा कशाप्रकारे दुरुपयोग होईल हे सांगता येत नाही. त्या ऍप मध्ये बरेचसे बग्ज देखील आहेत.

तरीही भारतीय कंपनी आहे म्हणून अनेकांनी या ऍपला चांगलं रेटिंग दिलेलं आहे!

केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी मित्रों हा शब्द वापरतात म्हणून हे ऍप प्रसिद्ध होईल, यासाठीच त्याला मित्रों हे नाव देण्यात आलं. परंतु आता त्याची सत्यता लोकांसमोर येत आहे.

 

modi inmarathi
catchnews.com

 

त्यासाठीच अशाप्रकारचे ॲप डाऊनलोड करण्याआधी त्याची सत्यासत्यता, त्याची उपयुक्तता आणि व्यक्तीची प्रायव्हसी सांभाळली जाते का?

इतकी तरी काळजी असं कोणतंही ॲप डाऊनलोड करण्याआधी घेतलीच पाहिजे. नाहीतर केवळ उत्साही देश प्रेमापोटी आपण आपल्या देशाचेच नुकसान करू.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?