' १६०० वर्ष जुना न गंजलेला हा लोखंडी खांब प्राचीन भारताच्या स्थापत्यशास्त्राची साक्ष देतो! – InMarathi

१६०० वर्ष जुना न गंजलेला हा लोखंडी खांब प्राचीन भारताच्या स्थापत्यशास्त्राची साक्ष देतो!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

प्राचीन काळापासून भारतातील अनेक शोध हे जगात प्रथम लावले होते असं संशोधन सांगतं.

मग ती प्लास्टीक सर्जरी असो की सोमनाथाच्या मंदिरापासून असलेलं अंतर असो.. काळाच्या ओघात काय काय बदल झाले.. पुष्पक विमान, रामाचा सेतू, मयसभा या पौराणिक कथा ऐकून तरी एकंदरीत आपल्याकडील तंत्रज्ञान बरंच सुधारीत होतं असंच वाटतं.

आणि काय काय शोध गुडूप झाले. कितीतरी शोध परदेशात लावले गेले आहेत.

 

inventions in india inmarathi
livemint.com

 

पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, प्राचीन काळी भारतीय स्थापत्यशास्त्र आणि अभियांत्रिकी शास्त्र म्हणजे आर्कीटेक्चर आणि इंजिनिअरिंग हे कमालीचे प्रगत होते.

मयसभेत पाण्याचा भास निर्माण केलेली जमीन आणि जमिनीचा भास असलेलं‌ पाणी, त्यावरुन पडलेला दुर्योधन, द्रौपदीने केलेली कुचेष्टा ही कथा तर सर्वश्रुत आहे.

म्हणजे हे सगळे भाग हेच दर्शवतात की त्यावेळी हे शास्त्र खूप प्रगत होतं. असे अजूनही कितीतरी शोध आहेत जे आपल्यालाही माहीत नाहीत.

स्थापत्यशास्त्राचे विविध नमुने असलेली दक्षिणेतील उंचच उंच गोपूरांची मंदिरं, नक्षीकामाचा अजोड नमुना असलेली विविध देवस्थानं, वेगवेगळ्या गुंफा, त्यातील शिल्पकला हे पाहून थक्क व्हायला होतं.

कसं केलं असेल हे एवढं नाजूक काम त्या वेळच्या लोकांनी. बरं आत्ता यंत्रं आली आहेत. त्यावेळी कसं मोजमाप करत एवढं अफाट काम कसं केलं असेल हा प्रश्न पडतोच.

 

indian temple inmarathi
culturalindia.net

 

आजही सांचीचा स्तूप, शिवकालीन विहीर, गडांवरील पाण्याचे टाके कसे बनवले असतील..त्याकाळी असलेल्या पाणीपुरवठा योजना कशा आखल्या असतील हा एक गहन प्रश्न आहे.

आज आपण असाच आणखी एक स्थापत्यशास्त्र आणि अभियांत्रिकी मधील एक चमत्कार असलेला खांब आणि त्याची माहिती बघूया.

दिल्लीमधील कुतुब काँप्लेक्स भागातील मशिदीसमोर एक अत्यंत प्राचीन खांब आहे. हा खांब पुरातत्त्व विभागाच्या मते १६०० वर्षं जुना आहे.

ऊन वारा पाऊस सगळे ऋतूमान सहन करत हा खांब इतक्या वर्षांपासून आजही तसाच्या तसा उभा राहिला आहे. ना त्यावर गंज चढला आहे ना त्यावर हवामानाचा काही परिणाम झाला आहे.

पूर्वी हा खांब भारतातील शुष्क हवामानाच्या प्रदेशात होता.

सम्राट चंद्रगुप्त मौर्य दुसरा याच्या कार्यकाळात २४ फूट उंच आणि १३ हजार पौंड वजन असलेला हा खांब बनवण्यात आला.

 

iron piller inmarathi
funalive.com

 

आश्चर्याची गोष्ट अशी की हा खांब आतल्या जिथं आहे तिथून केवळ ५०० मैल अंतरावर बनवण्यात आला होता. पण तो तिथून वाहून कसा आणला हे एक रहस्यच आहे.

धातूचे ओतकाम करुन एक पातळसा थर त्यावर दिला आहे असं जाणकारांचं मत आहे. हे ओतकाम करताना लोखंड, ऑक्सीजन आणि हायड्रोजन यांचं १/२० असं प्रमाण घेऊन जाडसर लेप दिला आहे.

काहींच्या मते, हा थर निव्वळ अपघात आहे पण त्यामुळेच हा खांब इतकी वर्षे हरतऱ्हेचे ऋतूमान सहन करत टिकून आहे.

तर आणखी एक वर्ग असा आहे ज्यांचं म्हणणं आहे की हे एखाद्या अतिशय कुशल लोहाराने बनवलं आहे ज्याचं ओतकामातील ज्ञान हे त्या काळातील लोकांना समजणं अवघड होतं!

 

lauhar inmarathi
pinterest.com

 

याकरीता शास्त्रज्ञांनी परिक्षण करुन या मुद्द्यावर ठाम मत दिलं आहे की, हा खांब जाणीवपूर्वक बनवला आहे.

या खांबाचं एकंदरीत विश्लेषण करताना असं सांगितलं जातं,

या खांबावर जो संरक्षक धातूंचा लेप दिला आहे तो म्हणजे आधुनिक धातूशास्त्राचा थोडासा वेगळा प्रकार आहे त्यामुळंच तो इतका दीर्घकाळ टिकून राहीला आहे.

सर्वसाधारणपणे प्राचीन काळी चुनखडीचा वापर लेप देण्यासाठी केला जायचा. पण इथं मात्रं लोणारी कोळसा वापरला आहे. आता प्रश्न असा पडतो की ही पद्धत पुन्हा का नाही वापरली गेली?

जी वापरली गेलेली पध्दत आहे ती प्राचीन पद्धत आहे. त्यानंतर केल्या आहेत त्या नकलाच म्हणा.

या खांबावर काही संस्कृत भाषेतील शब्द आहेत. त्याचा संदर्भ चंद्रगुप्त मौर्य दुसरा याच्याशी आहे.

 

iron piller words inmarathi
delhitourism.com

 

गुप्त राजघराणे –

गुप्ताच्या कालावधीत ज्ञानाचा प्रचंड प्रमाणात विकास झाला होता. विज्ञान तंत्रज्ञान साहित्य आणि खगोलशास्त्र या विषयांचा तर सुवर्णकाळ मानला जातो.

याच दरम्यान लोकांना हे ज्ञान उमगलं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. ग्रहण आणि इतर अवकाशातील रहस्यं समजू लागली होती.

दुसरा चंद्रगुप्त मौर्य हा विक्रमादित्य म्हणून ओळखला जाई. तो कलागुणांचा चाहता होता. त्याने बौध्द धर्म आणि जैन धर्मीय दोघांनाही आपल्या राज्यात आसरा दिला होता.

त्याच्या कर्तृत्वामुळेच त्याला विक्रमादित्य म्हणून संबोधले जाई. या खांबावर त्याचे मूळ स्थान दिले गेले आहे.

 

vikramaditya inmarathi
satyavijayi.com

 

त्याचा वापर साधारण एक ज्योतिषशास्त्राचे साधन म्हणून केला असावा असा एक कयास आहे. सूर्योदय आणि सूर्यास्त यांचे विषुववृत्तापासूनचे अंतर मोजण्यासाठी हा खांब वापरत असावेत.

अशोक स्तंभ –

हा ही एक अतिशय प्राचीन स्तंभ आहे. कलिंगच्या युद्धानंतर व्यथित झालेल्या अशोकाची गोष्ट सर्वांना माहीत आहे. त्यानंतर त्याने शांततेचा पुरस्कार करणारा बौद्ध धर्म स्वीकारला.

आणि ती महती सांगणारे बरेच स्तंभ संपूर्ण भारतात बांधले होते. मात्र त्यातील केवळ १९ स्तंभच आता राहीले आहेत.

५० फूट उंच आणि ५० टन वजन असलेले हे स्तंभ ख्रिस्तपूर्व २५० मध्ये बांधले होते. त्यावर कमळ आणि विविध चित्रे काढली आहेत.

जगभर बौद्ध धर्म पोहोचवण्यासाठी त्याने विविध भाषेत त्या खांबांवर लिहीले आहे. कलिंगच्या महायुध्दात जी अपरिमित जीवीतहानी झाली त्याबद्दलची ही क्षमापनाच आहे.

आणि आजही हे दोन्ही स्तंभ काळजीपूर्वक जतन केले आहेत. फक्त ते स्तंभ बनवताना जे काही तंत्रज्ञान वापरलं गेलं ते कुठं गेलं हाच एक प्रश्न उरतो.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?