' जगभरातील एक कोटी मराठी भाषिकांचा जागतिक कोविड - १९ 'महाजागर'!

जगभरातील एक कोटी मराठी भाषिकांचा जागतिक कोविड – १९ ‘महाजागर’!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

कोविड -१९ या महामारीच्या पार्श्वभूमीवर जगभरातील ४२ देशातून, अमेरिकेतील २१ राज्यातून आणि महाराष्ट्रासह भारतातील १२ राज्यातून एकाचवेळी अनेक मराठी भाषिक एकत्र येत असून २५ मे, २०२० रोजी ते समूह माध्यमावर कोविड – १९ संबंधाने महाजागर करणार आहेत.

विश्व मराठी परिषदेच्या वतीने या अभिनव उपक्रमाचे नेतृत्व बृहन महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिकेच्या अध्यक्ष विद्या जोशी ह्या करणार असून,

 

Vidya Joshi

 

बृहन महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०२१ शार्लेट अमेरिकाचे मुख्य संयोजक आणि गर्जा मराठीचे संस्थापक सदस्य संदीप पाध्ये, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव मिनाक्षी पाटील,

तसेच जगभरातील अनेक देशातील आणि भारतातील अनेक राज्यातील महाराष्ट्र मंडळांचे आजी माजी पदाधिकारी या उपक्रमामध्ये सहभागी होत आहेत.

कोविड – १९ विषयी मानसिक आणि भावनिक आरोग्याबरोबर शैक्षणिक जागृती असे या उपक्रमाचे स्वरूप आहे.

२५ मे रोजी हा जागृती संदेश ४२ देश, अमेरिकेतील विविध राज्ये. भारतातील विविध राज्ये आणि महाराष्ट्रातील विविध शहरांमधून एकाच दिवशी लाखो लोक शेअर करतील!

आणि त्यापुढील ७२ तासात तो जगभर मोठ्या प्रमाणावर पाठवला जाईल. किमान एक कोटी मराठी भाषिकांनी या महाजागरामध्ये सहभागी व्हावे या पद्धतीने जगभरातील विश्व मराठी परिषदेचे समन्वयक प्रयत्न करीत आहेत.

 

Mahajagar Title

 

जग सध्या एका अनाकलनीय, भीषण आणि भयकंपित अशा परिस्थितीतून जात आहे.

जगभरातील मराठी भाषिक याप्रसंगी एकत्र असून ते परस्परांना आधार देत जागृती निर्माण करणार आहेत, अनुभवांची देवाणघेवाण करणार आहेत.

सध्याही ते गप्पा मारीत आहेत, लिखाण करीत आहेत, कविता लिहित आहेत, सृजनशील निर्मिती करीत आहेत, आपल्या भावनांना वाट करून देत आहेत, मन मोकळ करीत आहेत आणि धीराने या महाभयंकर संकटाचा सामना करीत आहेत.

मुख्य म्हणजे हे सर्वजण सर्वसामान्य मराठी लोक आहेत. यात कोणी सेलिब्रिटी अथवा राजकारणी नाही. सामान्य माणसांनी एकत्र येऊन एकमेकांना दिलेला मानसिक आणि भावनिक आधार असे या महाजागराचे स्वरूप आहे.

कोविड – १९ महामारीविरोधी लढताना शारिरीक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य सुदृढ़ राखणे आवश्यक आहे. अशा वेळी जगभरातील मराठी भाषिकाचे ऐक्य, बंधुभाव आणि संवाद यांचा हा अभूतपूर्व अविष्कार असेल.

विशेष म्हणजे या उपक्रमाद्वारे कोविड – १९ काळातील जगभरातील मराठी बांधवांच्या संवादाचे एक महत्त्वपूर्ण असे दस्तावेजीकरणही होईल.

 

Covid19Jagar Earth

 

शारिरीक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्य, जागृती, दस्तावेजीकरण, सृजनशील कल्पनांचा अविष्कार आणि विश्वसंवाद असे या उपक्रमाचे अपेक्षित फलित आहे,

असे प्रतिपादन विश्व मराठी परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केले आहे.

एखाद्या भाषिक समूहाने एकत्र येऊन अशा प्रकारे संवेदनशीलतेचा आणि एकत्वाचा एकाचवेळी महाजागर करायचा आणि सामुहिक मानसिक, भावनिकतेला बळ द्यायचे ही जगातील वेगळीच घटना असेल.

जगजगभरातील विविध देशातील महाराष्ट्र मंडळे, सांस्कृतिक मंडळे, मराठी संस्था, मराठीभाषा आणि संस्कृतीसंवर्धन संस्था, मराठीकट्टे, इ. या उपक्रमात सहभागी होत आहेत.

अमेरिकेतील आर्सि फाऊंडेशन यासाठी विशेष सहाय्य करीत आहे.

या महाजागरामध्ये सहभागी होण्यासाठी www.vishwamarathiparishad.org या संकेतस्थळाला भेट द्यावी आणि ७०६६२५१२६२ या परिषदेच्या व्हॉट्सअप क्रमांकाला संपर्क करावा.

या महाजागराचा व्हिडिओ विश्व मराठी वाणी या युट्युब चॅनेल वर प्रसिद्ध झाला आहे.

 

 

देशविदेशातील अधिकाधिक मराठी भाषिकांनी या महाजागरामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन विश्व मराठी परिषदेच्यावतीने प्रा. क्षितिज पाटुकले आणि अनिल कुलकर्णी यांनी केले आहे.

प्रा. क्षितिज पाटुकले

संस्थापक अध्यक्ष, विश्व मराठी परिषद, पुणे

———————————————————-

नेतृत्त्व :

a) विद्या जोशी – अध्यक्ष – बृहन महाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेरिका

b) संदीप पाध्ये – संयोजम, BMM अधिवेशन २०२१, शार्लेट, USA आणि संस्थापक गर्जे मराठी

 

Sandeep Pandhye

 

c) डॉ. रविंद्र कुलकर्णी – आर्सी फाउंडेशन, न्यु यॉर्क

Participants and Co-ordinators

१) मिनाक्षी पाटील – चित्रकार, कवयित्री, सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती विभाग

२) मंजुषा कुलकर्णी – कवयित्री, पहिल्या महिला मराठी भाषा संचालक, माजी – महाराष्ट्र राज्य

३) सुशील रापतवार – माजी अध्यक्ष, महाराष्ट्र मंडल, लंडन

४) अजित रानडे – संस्थापक अध्यक्ष – मराठी कट्टा, जर्मनी

५) संदीप दिक्षित – विश्वस्त, बृहन महाराष्ट्र मंडळ, नॉर्थ अमेरिका

६) प्रशांत बेलवलकर – ऑकलॅंड मराठी असोसिएशन न्युझीलंड आणि गर्जे मराठी – संस्थापक सदस्य

७) प्रिया आपटे – संस्थापक – बृहन महाराष्ट्र मंडळ – स्वित्झर्लंड

८) रश्मी गोरे – अध्यक्ष – बृहन महाराष्ट्र मंडळ, व्हिक्टोरिया, मेलबर्न, ऑस्ट्रेलिया

९) निरंजन गाडगीळ – विश्वस्त, बृहन महाराष्ट्र मंडळ, टोकियो, जापान

१०) दीपक वेताळ – माजी अध्यक्ष – बृहन महाराष्ट्र मंडळ शार्लेट, यु.एस.ए

११) भारत सासणे – प्रसिद्ध मराठी लेखक आणि साहित्यिक, पुणे

१२) मोनिका गजेंद्रगडकर – प्रसिद्ध मराठी लेखक, कवयित्री, संपादक- मौज प्रकाशन

१३) गिरिश दिवाकर – अध्यक्ष – बृहन महाराष्ट्र मंडळ, युगांडा

१४) राहूल बागडे – अध्यक्ष – बृहन महाराष्ट्र मंडळ, शांघाय, चीन

१५) मृणाल गर्दे – सचिव – बृहन महाराष्ट्र मंडळ, फ्रान्स

१६) भावना शेंड्ये – सचिव – बृहन महाराष्ट्र मंडळ केनिया – माजी

१७) नोहा मससील – संस्थापक – मायबोली मराठी मासिक, इस्राइल

१८) अनिल कुलकर्णी – संस्थापक संचालक –विश्व मराठी परिषद

१९) राजन लाखे – प्रमुख – साहित्य कट्टा – अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

२०) मनोज कुलकर्णी – अध्यक्ष – बृहन महाराष्ट्र मंडळ, हॉंगकॉंग

२१) विजय पाटील – संस्थापक – शिवाजी महाराज अमेरिका परिवार, युएसए

२२) श्रीनाथ सरनोबत – अध्यक्ष – मराठी भाषिक मंडळ, टोरॅन्टो, कॅनडा

२३) अमेय साठे – बृहन महाराष्ट्र मंडळ, डेन्मार्क

२४) सुधीर जोशी – बृहन महाराष्ट्र मंडळ न्युझिलंड आणि संस्थापक सदस्य – गर्जे मराठी

२५) अर्जुन पुतलाजी – अध्यक्ष – मराठी सांस्कृतीक केंद्र, मॉरिशस

२६) सुमित कांबळे – विश्वस्त – बृहन महाराष्ट्र मंडळ, जकार्ता, इंडोनेशिया

२७) विनायक पाटुकले – प्रसिद्धी आणि मिडिया प्रमुख – विश्व मराठी परिषद

२८) अनिकेत पाटील – प्रमुख व्यवस्थापक – विश्व मराठी परिषद

२९) संतोष अंबिके – अध्यक्ष – बृहन महाराष्ट्र मंडळ सिंगापोर

३०) मंजुषा नाईक – अध्यक्ष – बृहन महाराष्ट्र मंडळ, दक्षिण फ्लोरिडा, युएसए

३१) अर्पिता कुलकर्णी – सह, अध्यक्ष – बृहन महाराष्ट्र मंडळ – बॅंकॉक

३२) अक्षय महाशब्दे – सदस्य, बृहन महाराष्ट्र मंडळ नेदरलॅंड

३३) चिन्मय सहस्रबुद्धे – सदस्य – बृहन महाराष्ट्र मंडळ, आयर्लंड

३४) सुरेश वाघमारे – माजी अध्यक्ष – बृहन महाराष्ट्र मंडळ, कुवेत

३५) निखिल कुलकर्णी – सॅन जोसे, सिलिकॉन व्हॅली, कॅलिफोर्निया, युएसए

३६) म. भा. चव्हाण – प्रसिद्ध मराठी कवी, गझलकार आणि साहित्यिक

३७) हिमांशु कुलकर्णी – प्रसिद्ध कवि आणि रूबायाकार ( रुबाया )

३८) गजानन खोलगडे – अध्यक्ष – महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळ बाहरिन

३९) सुलक्षणा कुलकर्णी – संचालिका, शिकागो मराठी शाळा, युएसए

४०) शिरिन कुलकर्णी – काउंसेल ऑफ क्रिएटिव्ह एज्युकेशन, फिनलॅंड

४१) प्रशांत जोशी – अध्यक्ष, मराठी सोसायटी ऑफ ब्रिटिश, कोलंबिया, कॅनडा

४२) प्रचिती तलाठी – समन्वयक – एमिराट्स दुबई लिटररी फेस्टिवल (Literary Festival)

४३) वल्लभ केळकर – संचालक – गोवा मराठी अकॅडमी

४४) विद्या देवधर – अध्यक्ष – मराठी साहित्य परिषद, तेलंगणा

४५) कुमुदिनी विचारे – समन्वयक – विश्व मराठी परिषद, कंबोडिया

४६) अरुण पाटील – अध्यक्ष, बृहन महाराष्ट्र मंडळ, घाना

४७) संतोष कदम – बृहन महाराष्ट्र मंडळ, ओमान

४८) धनंजय मोकाशी – विश्वस्त – बृहन महाराष्ट्र मंडळ, अबुधाबी

४९) सचिन किन्हिकर – माजी अध्यक्ष – बृहन महाराष्ट्र मंडळ, कतार

५०) अश्विन चौधरी – समन्वयक – विश्व मराठी परिषद – कॅनडा

५१) सतिश पाटील – बृहन महाराष्ट्र मंडळ, लुसाका, झांबिया

५२) विवेक वेलनकर – संस्थापक, सजग नागरिक मंच, पुणे

५३) अंजली कुलकर्णी – प्रसिद्ध मराठी कवयित्री आणि साहित्यिक

५४) अ‍ॅड. कल्याणी पाठक – वकील आणि कॉपीराइट तज्ञ

५५) अनिल गोरे – मराठी काका – सदस्य – मराठी भाषा सल्लागार समिती, महाराष्ट्र

५६) दिलीप खोपकर – माजी अध्यक्ष – मराठी वांडमय परिषद, बडोदे

५७) पूर्णिमा हुंडिवाले – माजी संचालक – मध्यप्रदेश मराठी साहित्य अकादमी

५८) गजानन पाटील – अध्यक्ष – कवी केशवसुत स्मारक ट्रस्ट आणि प्रतिनिधी कोकण मराठी परिषद

५९) किशोर काकडे – माजी अध्यक्ष – मंगळूरु मराठी मंडळ

६०) जितेंद्र रेडेकर – मराठी बुकलवर्स क्लब, बेळगांव

६१) निलिमा बोरवणकर – प्रसिद्ध मराठी लेखिका, पुणे

६२) कल्याणी कुलकर्णी – लेखिका आणि ब्लॉगर, पुणे

६३) मोहन रेडगावकर – प्रसिद्ध मराठी लेखक, इंदोर, म.प्र.

६४) ओंकार दाभाडकर – संस्थापक – इनमराठी.कॉम

६५) नंदकुमार दिवटे – संचालक, करवीर नगर वाचन मंदिर, कोल्हापूर

६६) रणजित कामत – अध्यक्ष – बृहन महाराष्ट्र मंडळ, होस्टन युएसए

६७) मकरंद उत्पात – न्यु जर्सी, युएसए

विश्व मराठी परिषद

प्रमुख मार्गदर्शक – डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी

संस्थापक अध्यक्ष – प्रा. क्षितिज पाटुकले

संस्थापक संचालक – अनिल कुलकर्णी

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?