' हा घरगुती आयुर्वेदिक काढा तुम्हाला ठेवेल कोणत्याही रोगापासून दूर!!

हा घरगुती आयुर्वेदिक काढा तुम्हाला ठेवेल कोणत्याही रोगापासून दूर!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारतीय प्राचीन ग्रंथ म्हणजे ज्ञानाचा दुर्मिळ खजिनाच आहे. निरनिराळ्या ग्रंथांमध्ये निरनिराळ्या शास्त्रांची माहिती दिली आहे.

जसे, विमानशास्त्रामधे विमानासंदर्भात सगळी माहिती आहे, पाणिनीय ग्रंथामध्ये व्याकरणाची माहिती आहे, चाणक्यनीति ह्या ग्रंथात अर्थशास्त्राची माहिती दिली आहे.

याशिवाय गणित, खगोलशास्त्र, योगशास्त्र, विज्ञान, समाजशास्त्र, वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र अशा अनेक छोट्या गोष्टींपासून मोठ्या गोष्टींपर्यंत, नाना (जवळ जवळ सगळे) विषय असणारे भारतीय प्राचीन ग्रंथ आहेत.

असाच आपला एक प्राचीन ग्रंथ आहे ज्यामध्ये आपल्या शरीरशस्त्राची आणि रोग, रोगांवरचे उपचार ह्यांची इत्यंभूत माहिती दिली आहे आणि तो ग्रंथ म्हणजे “आयुर्वेद”.

 

aayurved inmarathi

==

हे ही वाचा : सावधान : रोज ‘काढा’ घेताय? आधी हे वाचा, नाहीतर…

==

‘आयुः+वेद= आयुर्वेद’ – म्हणजेच आपल्या आरोग्याविषयी माहिती आणि तब्येतीची काळजी घेणे होय. ह्यात आजारपणावर उपाय म्हणून योग्य ती औषधे, ती औषधे कशी तयार करायची ह्याची सविस्तर माहिती आहे.

ह्या ग्रंथाची परंपरा आहे असे म्हटले जाते. चरक संहिता, सुश्रुत संहिता, काश्यपसंहिता अशा तऱ्हेने चरक, सुश्रुत आणि कश्यप ह्या तिघांनी ह्या ग्रंथाचे लिखाण केले आणि त्यांच्या शिष्यांनी ही परंपरा पुढे चालवली.

आयुर्वेदातील उपचार पद्धतींमध्ये वनौषधी, वनसपतीजन्य औषधी, आहारविषयक नियम, व्यायामाचे विविध प्रकार आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकार शक्ती वाढवण्यावर जास्त भर दिला गेला आहे.

ह्याच रोगप्रतिकारक शक्तीची आत्ताच्या कोरोना रोगाला मात देण्यासाठी जास्त गरज आहे. रोगावर लस जरी मिळाली असली तरी लस घेऊनही कोरोना होत असल्याचे अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळत आहेत.

 

corona israel scientist inmarathi 2

अशा भयंकर रोगांवरती आयुर्वेदात अनेक उपाय सांगितले आहेत. आयुर्वेदात रोगप्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या काढ्यांबद्दल माहिती दिली आहे.

कोरोना व्हायरस विरुद्ध लढा देण्यासाठी आयुर्वेदातील हे उपाय नक्कीच उपयोगी पडतो. आपली प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदातले उपाय नक्कीच उपयोगी पडणारे आहेत.

अशाच काढ्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत ज्याच्या नियमित सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि ह्या कोरोनाच्या महामारीपासून आपला बचाव होऊ शकतो.

ह्या काढ्यात कालमेघ, चिरायते पूड, गूळवेल, तुळशीचे बीज, ज्येष्ठमध ह्या घटकांचा उपयोग केला जातो. ह्या प्रत्येक घटकाचे विशेष गुणधर्म आहेत. ते गुणधर्म बघूया.

 

कालमेघ

 

kalmegh inmarathi

कालमेघ ही वनस्पती चवीला कडू असते. हे एक उत्तम ऍंटिऑक्सिंडंट आहे जे शरीराची जळजळ, दाह कमी करतं.

ही अशी उपयोगी वनस्पती आहे जी जुनी सर्दी, सर्दी, ताप, इन्फेक्शन आणि श्वसनाच्या विकारांवरचे चांगले औषध आहे.

शरीरातीतील त्रिदोषांपैकी वात आणि पित्त ह्या दोषांवर कालमेघाच्या सेवनाने नियंत्रण राहते.

पचनक्रिया सुधारते ह्याशिवाय कोणत्याही टॉक्सिन्सचा प्रभाव ह्याच्या सेवनाने नष्ट होतो आणि जर नियमित सेवन केले तर आपले शरीर डिटॉक्सिफाय होते असे म्हटले जाते.

 

गुळवेल

 

gulvel inmarathi

==

हे ही वाचा : कोरोनाला घाबरण्यापेक्षा रोगप्रतिकारक शक्ति वाढवण्यासाठी “आयुष मंत्रालयाने” सांगितलेल्या या टिप्स फॉलो करा

==

ह्या काढ्यात वापरली जाणारी आणखीन एक वनस्पती म्हणजे गुळवेल! ह्या गुळवेलीचे खूपच फायदे आहेत. ताप शमन करणारी ही गुळवेल ऍंटिऑक्सिंडंट, कॅन्सरविरोधी, दाहशमक, इम्युनिटी वाढवणारी आहे.

आत्ता पर्यंतच्या संशोधनात असे आढळून आले आहे, की गुळवेल हे कोविद-१९ च्या सर्व लक्षणांवर मात करणारी आहे. ह्याशिवाय ह्याच्या नियमित सेवनाने चिंता, ताण-तणाव कमी होण्यास मदत होते.

 

चिरायते पावडर

 

chiarata inmarathi

चिरायते एक अशी आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहेज्याचा उपयोग आयुर्वेदात नेहमी केला जातो.

दाह शमक म्हणून ह्याचा वापर तर होतोच या व्यतिरिक्त, आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यात दमा विरोधी काम करणारे गुणधर्म असतात आणि कफ कमी करणारे गुणधर्म आहेत, जे श्वसनासंबंधीचे विकार, इन्फेक्शन दूर करण्यास मदत करतात.

याच्या सेवना मुळे होणारी कोणतीही अस्वस्थता कमी होण्यास मदत होते.

 

तुळशीचे बीज

 

tulsi seed inmarathi

आयुर्वेदात तुळशीला खूपच महत्त्व आहे. तुळशीच्या नियमित सेवनाने कफ दोष संतुलित राहतो. तसेच पचन क्रियेमध्ये महत्त्वपूर्ण घटक असणाऱ्या लाळेची निर्मिती होते.

ह्यामध्ये ऍंटी व्हायरल गुणधर्म आहे आणि पचन क्रिया सुधारण्यास मदत होते.

तुळशीचे बीज मिळाले उत्तमच पण जर मिळण्यास कठिण जात असेल तर तुळशीची पाने देखील वापरली तरी चालतील.

 

 ज्येष्ठमध 

 

mulethi inmarathi

ज्येष्ठमध हे घशाशी संबंधित विकारांवर खूपच उपयुक्त आहे. घशाची जळजळ होणे, घसा खवखवणे ह्यासारख्या घशासंबधित दोषांवर ज्येष्ठमध अतिशय गुणकारी आहे.

ह्याशिवाय कोरड्या खोकल्यावर देखील हे खूपच औषधी असते. ह्याच्या नियमित सेवनाने इन्युनिटी वाढण्यास देखील मदत होते.

हा काढा कसा बनवावा?

 

aayurvedic drink inmarathi

 

एक पेला पाणी घ्यावे. काळमेघ, गुळवेल, चिरायते पूड, तुळशीचे बीज आणि ज्येष्ठमध हे सर्व घटक प्रत्येकी अर्धा चमचा घ्यावेत. १ पेला पाण्यात हे सर्व घटक मिसळून ह्या मिश्रणाला चांगले उकळून घ्यावे.

एक पेला पाण्याचे १/२ पेला होईपर्यंत हे उकळून घ्यावे. थंड झाल्यावर गाळून घ्यावे. हा काढा पिण्यास तयार झाला. जर जास्तच कडू वाटत असेल तर ह्यात मध किंवा गूळ घालावा.

येथे लक्षात घ्यायला हवे की मध असेल तर उत्तमच नसल्यास गूळच वापरावा, साखरेचा वापर अजिबात करू नये.

ह्याशिवाय अजूनही काही काढे आहेत ज्यांचा उपयोग इम्युनिटी वाढविण्यासाठी होतो त्याच बरोबर ह्या काढ्यांच्या सेवनाने श्वसनासंबंधीचे सर्दी, खोकला असे विकार दूर होण्यास मदत होते.

 

aayurvedic drink inmarathi1

==

हे ही वाचा : कोरोना ते कॅन्सर अशा अनेक दुर्धर आजारांवर प्रभावी ठरणा-या आयुर्वेदाची ही माहिती वाचायलाच हवी!

==

१ पेला दूध, ४ पेले पाणी एकत्र करून त्यात लसणीच्या तीन पाकळ्या घालाव्यात आणि हे मिश्रण १ पेला होईतोवर उकळून घ्यावे आणि चहा किंवा कॉफी ऐवजी ह्याचे सेवन करावे

आपल्या स्वयंपाक घरात हळद, लसूण, आले, कांदा हे इम्युनिटी वाढवणारे घटक नेहमीच असतात ह्यांचा नियमित वापर आपल्या रोजच्या स्वयंपाकात करावा.

ह्याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढते ती हंगामी फळे आणि भाज्या ह्यांच्या नियमित सेवनाने!

लिंबाच्या रसामधे व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे पाण्यात लिंबाचा रस आणि मध घालून त्याचे नियमित सेवन देखील प्रतिकारक शक्ती वाढवते.

या गोष्टींचा आपल्या आहारात समावेश करूया आणि फिट राहुया!!

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?