' अनवाणी मिलिंद सोमण + ५१७ किमी = Ultraman! – InMarathi

अनवाणी मिलिंद सोमण + ५१७ किमी = Ultraman!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

अलिशाच्या गाण्याच्या अल्बम मधला मिलिंद सोमण आठवतोय? पिळदार शरीरयष्टीचा तो भारतीय युवक पेटीतून बाहेर येतो आणि अलिशाला पसंत पडतो. कॅप्टन व्योम बनुन आपल्या सहकाऱ्यांसोबत केलेलं गॅलॅक्सिचं रक्षण कितीही खोटंनाटं वाटलं तरी आवडायचं मुलांना. त्याने निवडक चित्रपट सुद्धा केले. लहानश्या भूमिकांमध्येही हा आपल्या अभिनयाच्या साहाय्याने भाव खाऊन जायचा.

त्याने नव्या पिढीला लावलेल्या वेडाबद्दल अधिक वाचा : मिलिंद सोमण: भारतीय तरुणाईचं हे चिरतरुण स्वप्न एवढं “खास” का आहे?

captain vyom marathipizza

Source

हा झाला त्याच्या करिअरचा भाग एक कलाकार म्हणून पण तो खेळाडू सुद्धा आहे हे त्याच्या चाहत्यांशिवाय बाकीच्या जगाला कळायला लागलं ते पिंकॅथलॉन इव्हेन्ट नंतर.

pinkathlon marathipizza

Source

पिंकॅथलॉन हा इव्हेन्ट फक्त स्त्रियांसाठी होता. स्त्रियांमध्ये व्यायाम आणि स्तनाचा कर्करोग ह्या विषयांबद्दल जागरूकता निर्माण व्हावी ह्यासाठी पिंकॅथलॉन मिलिंदच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला होता. त्यानंतर चाहत्यांना कळू लागलं की मिलिंद चांगलाच जलतरणपटू आहे. लहान गटात त्याने महाराष्ट्र राज्यासोबतच त्याने मोठ्या गटात देशाचं नेतृत्व करून ४ वर्षे चॅम्पियनशिप जिंकली. २०१५ मध्ये Ironman हा किताब मिलिंद जिंकला.

milind iron man marathipizza

Source

त्याने आपला ५०वा वाढदिवस साजरा करण्यासाठी स्विझर्लंड ला Ironman च्या शर्यतीत भाग घेतला होता.

जगातल्या सर्वात अवघड शर्यतींपैकी एक मानल्या जाणाऱ्या ह्या शर्यतीत सायकल चालवणे, पोहणे आणि पळणे ह्या तीन गोष्टी करायच्या होत्या. मिलिंद ने ३.८ किमी पोहणे, १८०.२किमी सायकल चालवणे आणि ४२.२ किमी पाळणे एवढं सगळं १५ तास १९ मिनिटांत पूर्ण केलं.

हा अवलिया काही साधासुधा नाहीये एकतर पायात काही न घालता पळत सुटतो. त्याला विचारणाऱ्यांनाही हेच सांगतो की कसंही पळा पण स्वतःसाठी पळा. किती पळायचं, कुठपर्यंत पळायचं काही ठरलेलं नसतं ह्याचं. ह्यांच्यासोबत सेल्फी काढायचा असेल तर तुम्हाला जोर(Push-ups) काढता यायला हवेत.

milind soman marathipizza ultraman

Source

तर असा हा अवलिया पोहोचला फ्लोरीडाला. अजून एक नवीन आव्हान शिंगावर घ्यायला. आव्हानाचं नाव होत “Ultraman”. ह्या शर्यतीतही तो अनवाणीच होता. भाग घेतल्याबद्दल सर्व पातळीवरून ह्या अवलिया मॅन चं कौतुक होत असताना त्याने त्याच्या फेसबुकच्या प्रोफाईलवरून सगळ्यांना सांगितलं.

milind soman marathipizza

Source

त्याने हे ही बिरुद जिंकलं!

तीन दिवसांच्या ह्या शर्यतीत त्याने एकुण ५१७.५ किमी अंतर पार केलं. त्यात ४२३ किमी सायकल चालवणे, १० किमी पोहणे आणि ८४ किमी धावणे पूर्ण करायचं होतं. मिलिंद ने पहिल्या दिवशी १० किमी पोहुन १४८ किमी सायकल चालवली. दुसऱ्या दिवशी २७६ किमी सायकल आणि तिसऱ्या दिवशी ८४ किमी धावणे पूर्ण केले. आपल्याला ऐकूनच अंगावर काटा येतोय पण मिलिंद ने ही टास्क पूर्ण केली आहे आणि त्याला UltraMan चा किताब मिळाला आहे. शर्यत पूर्ण झाल्या नंतर सगळ्यात आधी मिलिंदने आईला मिठी मारली.

असा हा आयर्न मॅन बनला अल्ट्रा मॅन!

अभिनंदन करायला जाणार असाल तर पुश अप्स येतात ह्याची खात्री करून घ्या!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?