दिवाळी साजरी करण्यामागे ‘राम आगमन’ हे एकच कारण नाही! जाणून घ्या इतर ९ कारणं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

भारतात साजऱ्या करण्यात येणाऱ्या सर्व सणांत दिवाळीचे धार्मिक तसेच सामाजिक दृष्ट्या एक वेगळेच महत्व आहे. जसे प्रत्येक सणामागे कुठली ना कुठली धार्मिक कथा असते तशीच दिवाळीची देखील आहे. पण दिवाळीमागे अश्या अनेक कथा आहेत ज्यामुळे दिवाळीला अनन्यसाधारण असे महत्व प्राप्त झालं आहे.

पण लहानपणापासून दिवाळीची केवळ एकच कथा आपल्याला माहिती आहे. ती म्हणजे रामाची. रावणाचा वध केल्यानंतर १४ वर्षांचा वनवास पूर्ण करून राम सीता आणि लक्ष्मणा बरोबर अयोध्येला परततो, त्या दिवशी संपूर्ण अयोध्यावासी अतिशय आनंदी होतात.

तो दिवस त्यांच्यासाठी एखाद्या उत्सवाप्रमाणे असतो. रामाचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण अयोध्यावासी अयोध्येला पानाफुलांच्या तोरणांनी सजवतात, रांगोळी काढतात. पण त्यादिवशी अमावस्या असल्याने सर्वत्र अंधार पसरलेला असतो.

म्हणून अयोध्यावासी अनेक दिवे लाऊन संपूर्ण अयोध्येला उजळून टाकतात. अशा प्रकारे अयोध्येत रामाचं स्वागत करण्यात येत. त्यादिवसापासून दिवाळीची सुरवात झाली असे म्हणतात. आपल्यालाही हीच कथा माहित असेल हो ना…

पण तुम्हाला माहितीये का, की या व्यतिरिक्त दिवाळी साजरी करण्याचे आणखी काही कारणे आहेत. आज आम्ही तुम्हाला तीच कारणे सांगणार आहोत.

लक्ष्मी देवीचा जन्मदिवस

 

goddess Lakshmi-marathipizza
detechter.com

शास्त्रांनुसार असे मानले गेले आहे की, या दिवशी लक्ष्मी देवीचा जन्म झाला. म्हणून या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते.

भगवान विष्णूंचा वामन अवतार

 

vaman-avtar-marathipizza
webdunia.com

या दिवशी भगवान विष्णूने वामन अवतार धारण करून देवी लक्ष्मीला बळी राजाच्या बंदिवासातून सोडवले होते. म्हणून या दिवशी दिवाळी साजरी केली जाते असे मानतात.

नरकासुराचा वध

 

narkasur-krishna-marathipizza
quora.com

पौराणिक कथांनुसार नरकासुराने १६,१०० महिलांना बंदी बनवून ठेवले होते. तसेच त्याने रयतेवरही अनेक अत्याचार केले, देवी देवतांचाही छळ केला. तेव्हा कृष्णाने त्या अत्याचारी दुष्ट नरकासुराचा वध करून त्या महिलांना त्याच्या कैदेतून सोडवले.

कृष्णाने कार्तिक चतुर्दशीला नरकासुराचा वध केला होता म्हणून त्या दिवशी नरक चतुर्दशी साजरी करतात तसेच नरकासुर वधानंतर तेथील लोकांनी कार्तिक अमवस्येला दिवे लाऊन आनंद साजरा केला होता. दिवाळी साजरी करण्यामागे हे देखील एक कारण सांगितले जाते.

पांडव अज्ञातवासातून परतले

 

pandav-marathipizza
twitter.com

कार्तिक अमावस्येच्याच दिवशी पांडव १२ वर्षाच्या अज्ञातवासातून परतले होते. तेव्हा हस्तिनापुर येथील प्रजेने दिवे लाऊन त्याचं स्वागत केलं होतं.

समुद्रमंथनातून लक्ष्मी आणि कुबेराचे प्रकट होणे

 

samudra-manthan-marathipizza
adhyashakti.com

पौराणिक मान्यतेनुसार दिवाळीच्याच दिवशी समुद्रमंथनातून देवी लक्ष्मी प्रकटली होती. दुध सागर ज्याला केसर सागर म्हणून ओळखले जाते त्यातून आजच्याच दिवशी देवी लक्ष्मी आणि कुबेर प्रकटले. यावेळी देवी लक्ष्मीने संपूर्ण जगातील प्राण्यांना सुख-समृद्धीचे वरदान दिले.

विक्रम संवतचे प्रवर्तक चक्रवर्ती राजा विक्रमादित्य यांचा राज्याभिषेक

 

raja-vikramaditya-marathipizza
revoltpress.com

इतिहासकारांच्या मते या दिवशी विक्रम संवतचे प्रवर्तक हिंदू धर्मातील महान राजा चक्रवर्ती विक्रमादित्य यांचा राज्याभिषेक झाला होता. म्हणून दिवाळी हा एक ऐतिहासिक सण देखील आहे.

जैन गुरु महावीर यांचे निर्वाण

 

bhagwan_mahaveer-marathipizza
intoday.in

दिवाळी ही केवळ हिंदूंसाठीच नाही तर जैन धर्मियांसाठी देखील महत्वाची आहे. याच दिवशी जैन गुरु महावीर यांना निर्वाण प्राप्ती झाली होती असे मानले जाते. म्हणून जैन समाज देखील दिवाळी साजरी करतात.

शिखांचे सहावे गुरु हरगोविंद साहब यांची सुटका

 

guru-Hargovind-marathipizza
intoday.in

शिखांसाठी देखील दिवाळीचे खूप महत्व आहे. १५७७ साली याच दिवशी अमृतसर येथील सुवर्ण मंदिरच्या पायाभरणीची सुरवात झाली होती. याशिवाय १६१८ मध्ये दिवाळीच्याच दिवशी शिखांचे सहावे गुरु हरगोविंद सिंह यांची बादशाह जहांगीर याच्या कैदेतून सुटका झाली होती.

देवी महाकालीची पूजा

 

mahakali-marathipizza
detechter.com

राक्षसांचा वध केल्यानंतर देखील देवी महाकाली यांचा क्रोध कमी होत नव्हता, जर त्यांना शांत केल्या गेले नाही तर संपूर्ण जीवसृष्टीचा नाश झाला असता. तेव्हा महाकालीला शांत करण्यासाठी महादेव स्वतः त्यांच्या पायाशी आले.

महाकालीचे चरण महादेवाला स्पर्श करतातच महाकालीचे रौद्ररुप  शांत झाले. याच्याच स्मरणार्थ या दिवशी देवीच्या शांत रुपाची म्हणजेच देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. तसेच महाकालीच्या रौद्ररूपाचीही पूजा केली जाते.

कदाचित यामुळेच दिवाळी ही संपूर्ण भारतात साजरी केली जाते आणि या सणाचं एवढ महत्व आहे…!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

3 thoughts on “दिवाळी साजरी करण्यामागे ‘राम आगमन’ हे एकच कारण नाही! जाणून घ्या इतर ९ कारणं!

 • October 26, 2019 at 6:01 pm
  Permalink

  खरं कारण सांगतच नाही

  Reply
 • October 27, 2019 at 11:28 am
  Permalink

  ईडा पिडा ट्रू दे
  बली राजयांच राज्य येऊ दे.

  Reply
 • October 27, 2019 at 9:47 pm
  Permalink

  सगळा भिकारचोटपणाय हा. आपल्या पूर्वज मादरचोदांनी गू खाऊन ठेवलाय ना म्हणून संस्कृती, परंपरा, रूढी अशा चुतियापांना बळी पडतोयत आपण.

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?