पियुष मिश्रा ते नसिरुद्दीन शाह : चाळीशीत यश कसं मिळवावं हे शिकवणारे ९ लोक!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===


एका ठराविक वयात यश मिळालं की माणसाच्या डोक्यात हवा जाते. अनेक माणसं अशी आहेत जी यशासाठी एका विशिष्ट वयोमर्यादेपर्यंतच प्रयत्न करतात. त्यांनी ठरवलेल्या वयानंतर ते प्रयत्न करणं सोडून देतात. फिल्ड बदलतात किंवा नशिबाला दोष देत बसतात.

पण यांना अपवाद काही लोक आहेत. ज्यांनी वयाच्या चाळीशीनंतर भरघोस यश मिळवलंय. ज्यांचं जगभर नाव झालंय.

त्यांची कलाकृती, किर्ती तीन्ही लोकांत पसरली आहे. बघूया असे काही लोक ज्यांनी चाळीशीनंतर नंतर यश मिळवले आहे.

१. बोमन इराणी 

 

Sucess After 40 gae InMarati 00
Hindusthantimes.com

मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटात मुन्ना म्हणजेच संजुबाबा च्या अभिनयाला तोडीसतोड अभिनय करत बोमान इराणी फेम मध्ये आले. त्याआधी त्यांनी पेज थ्री चित्रपटातही काम केले होते.

मुन्नाभाई नंतर त्यांनी थ्री इडीयट या चित्रपटात प्रो. सहस्त्रबुद्धेची भुमिका गाजवली. बोमान इराणी यांना यश वयाच्या चाळीशीनंतर मिळाले.

२. स्टॅन ली


Sucess After 40 gae InMarati 01
Factscompany.com

स्पायडर मॅन, एक्स मॅन या काल्पनिक हिरोंचे जे चाहते आहेत त्याकाल्पनिक हिरोंना जन्म देणारे स्टॅन ली यांनाही वयाच्या 40 नंतरच यश मिळाले. त्यांनी रेखाटलेल्या एक्स-मॅन आणि स्पायडरमॅन चे चित्रपट सर्व पिढ्या हौसेने बघतात.

३. अॅलन रिकमॅन

 

Sucess After 40 gae InMarati 04
Scoopwhoop.com

हॅरी पॉटर या चित्रपटाच्या सिरीज मधील प्रोफेसर रिकमॅन तुम्हाला आठवत असेल. त्या प्रो. रिकमॅन यांनी वयाच्या ४६ व्या वर्षी आपल्या करिअरला सुरवात केली थोड्याच काळात ते प्रसिद्धीच्या झोतात आले.

आपले यश साजरे करण्यासाठी ते आज आपल्यात नाहीत. पण त्यांनी केलेल्या भुमिकेने ते सदैव आपल्यासोबत असणार आहेत.

४. परेश रावल

 

Sucess After 40 gae InMarati 05
Indiatoday.com

परेश रावल यांनी अनेक भुमिका केल्या पण बाबुराव गणपतराव आपटे या भुमिकेसाठी ते ओळखले जाऊ लागले. त्यांनी केलेला बाबूराव हा अजरामर झाला. त्यांच्या करिअरमध्ये खऱ्या अर्थाने हेराफेरी झाली आणि परेश रावल यशस्वी झाले.

५. मॉर्गन फ्रिमॅन

 

Sucess After 40 gae InMarati 07
Latimes.com

असं म्हणतात कलेला भाषा नसते. ती भावनेच्या भाषेतून व्यक्त होते. ज्यांना हॉलिवूड सिनेमातलं काही माहित नसेल त्यांनी जरी फ्री मॅन यांचा चित्रपट पाहिला की त्यांना सकस अभिनय काय असतो ते लक्षात येईल. फ्रीमॅनवयाच्या 52 व्या वर्षी प्रसिध्दीस आले.

६. नसिरुद्दीन शहा

 

Sucess After 40 gae InMarati 06
Zeenews.com

“आणि मग एक दिवस” नावाने काही महिन्यांपूर्वी नसिरुद्दीन शहा यांनी आपले चरित्र प्रकाशित केले. त्यांच्या अभिनयाची किर्ती बॉलिवुडच नाही तर हॉलिवुडमध्येही पोहोचली आहे.

सरफरोश, इक्बाल आणि तीन दिवारे या चित्रपटांसाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. वयाच्या ४० व्या वर्षी शहा यांना हम पांच या चित्रपटाद्वारे यश लाभले.

७. हेन्री फोर्ड

 

Sucess After 40 gae InMarati 09
Scoopwhoop.com

फोर्ड कंपनीचे नाव गाड्यांची माहिती असलेल्या आणि नसलेल्या सर्वांनीच ऐकले असेल. त्या कंपनीचे जनक हेन्री फोर्ड हे वयाच्या 45 व्या वर्षी यशस्वी झाले. एक बिझनेसमॅन म्हणून त्यांनी स्वतःचा जगभरात अमिट ठसा उमटवला आहे.

८. पियुष मिश्रा

 


suceess story InMarathi 12
NewIndianexpress.com

इक बगल में चाँद होगा इक बगल में रोटींयाँ हहे गाणं तुम्ही गँग्स ऑफ वासेपूरमध्ये ऐकलं असेलच. त्याच गँग्स ऑफ वासेपूरमध्ये बेस्ट सपोर्टींग अॅक्टरचं काम पियुष मिश्रा यांनी केलं आहे.

याआधी त्यांनी मक्बूल सिनेमात अभिनय केला आहे. त्यांनाही प्रसिद्धीच्या झोतात यायला बराच वेळ लागला. ४१ व्या वर्षी ते प्रसिद्ध झाले.

९. किरण खेर

 

suceess story InMarathi 13
Mazapaper.com

किरण खेर या नावाजलेल्या अभिनेत्री असल्या तरी त्यांना नाव कमवण्यासाठी ४१ वर्ष वाट पहावी लागली.

रंग दे बसंती मध्ये त्यांनी आमीरच्या आईची भुमिका केली आहे. तसंच त्या भाजपा मधून लोकसभेवर गेल्या आहेत. त्यांनी केलेल्या सर्व भुमिका आज प्रेक्षकांना आवडतात.


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?