९ अर्थशास्त्रज्ञ ज्यांच्या कल्पना जग बदलताहेत !

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===


सध्याचा काळ हा वैश्विकरणाचा आहे. जगातील सर्व देश हे आर्थिक दृष्ट्या एकमेकांशी जोडले गेले आहेत. त्यामुळे एखाद्या देशाची आर्थिक स्थिती काही कारणाने खालावली तर त्याचा प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष परिणाम हा संपूर्ण जगावर होतो. या बदलत्या जगाबरोबरच अर्थशास्त्रातील संकल्पना पण वेगाने बदलत आहेत.

economists_marathipizza

स्त्रोत

अनेक हुशार अर्थशास्त्रज्ञ सातत्याने नवनव्या कल्पना मांडत आहेत.

आपण ९ असे अर्थशास्त्रज्ञ आणि त्यांच्या संकल्पना थोडक्यात बघुयात की जे जगावर प्रभाव टाकत आहेत.

 

१) हा जून चैंग, केम्ब्रिज विद्यापीठ

कल्पना : चैंग हा विकसित देशांवर टीका करतो. त्याच्या मते विकसित देश हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेचा वापर हा स्वतःच्या फायद्यासाठी करतात आणि त्यायोगे गरीब देशांची पिळवणूक करतात. चैंग हा मुक्त बाजारपेठेवर सुद्धा टीकेची झोड उठवतो. त्याच्यामते विकसित देश हे मुक्त बाजार पेठांचा वापर त्यांच्या देशातील मोठ्या कंपन्यांना फायदा व्हावा म्हणून करतात. चैंग चे बरेच टीकाकार पण आहेत.

 

२) कथरीना पिस्तर, कोलंबिया विद्यापीठ

कल्पना : कथरीना पिस्तर या भांडवली बाजाराच्या नियमनासाठी असणाऱ्या कायद्यांवर संशोधन करतात. त्यांच्या मते भांडवली बाजार जेव्हा संकटात सापडतो, तेव्हा नियमनाचे कायदे निरुपयोगी ठरतात. तेव्हा संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करणेच इष्ट ठरते.

 

३) चार्ल्स कलोमरीस, कोलंबिया विद्यापीठ

कल्पना : चार्ल्सच्या मते वित्तीय संकटे ही अचानक येत नसतात, तसेच ती अपरिहार्य देखील नसतात. सरकार आणि बँका यांच्या अभद्र, जटील अशा संबंधांमुळे ती निर्माण होतात. तो अमेरिका आणि क्यानाडाचं उदाहरण देतो. अमेरिकेत १८४० पासून १२ वित्तीय संकटं आली, याउलट क्यानाडा मध्ये एकपण नाही.


 

४) जॉन डानिल्सन, लंडन स्कूल ऑफ इकोनोमिक्स

कल्पना : जॉन वित्तीय धोक्याबाबतच्या गणितीय आराखड्यांवर (रिस्क मॉडेल्स) टीका करतो. त्याच्यामते हे गणितीय आराखडे वित्तीय संकटाच्या काळात योग्य ते मार्गदर्शन करू शकत नाहीत. त्यामुळे बैंका, वित्तीय संस्था यांना मोठा फटका बसतो.

 

५) मरिअन बर्ट्रांड, शिकागो विद्यापिठ

कल्पना : मरिअनच्या मते मोठ्या कंपन्यांचे जे सी इ ओ असतात त्यांचं यश हे बहुतांशी नशीबावर अवलंबून असतं. मरिअनच्या याच संशोधनामुळे सी इ ओ ना देण्यात येणाऱ्या मोठ्या पगारांवरून अमेरिकेत मोठं रान उठलं होत.

 

६) आल्विन रौथ : हार्वर्ड विद्यापिठ

कल्पना : रॉथ आणि शार्प्ली यांनी दाखवून दिलं, की पैशाचा वापर “विनिमयाचे साधन” म्हणून नं करता देखील बाजार चालू शकतो. त्यासाठी व्यक्ती आपल्या गरजा आपापसात भागवू शकतात. त्यांनी यासाठी ‘गेम थेअरी’ चा वापर केला. रुग्णांना असणाऱ्या किडनीची गरज ते आपापसात कशी भागवू शकतात हे त्यांनी दाखवून दिलं.

 

७) रिचर्ड पोर्टेस : लंडन स्कूल ऑफ इकोनोमिक्स


कल्पना: पोर्टेसचं काम हे शासकीय कर्जरोखे (गव्हर्न्मेंट बॉंड) मालकांच्या एकत्रित होऊन सरकारशी किमतीबाबत घासाघीस करण्याबाबत तसेच सरकारवर दबाव आणण्याबाबत आहे . पोर्टसच्या संकल्पनांचा ग्रीस मधील संकटांच्या वेळी फार उपयोग झाला.

 

८) चार्ल्स गुडहार्ट : लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स

कल्पना: गुडहार्ट्स लॉ : जेव्हा सरकार वित्तीय बाजारातील संख्याशास्त्रीय माहितीनुसार तिच्या धोरणांमध्ये बदल करते, तेव्हा गुंतवणूकदार पण त्याप्रमाणे निर्णय करतात – असा हा law आहे. ह्याने जगभर बऱ्याच चर्चा घडवून आणल्या.

 

९) अल्बारतो आलेसिना : हार्वर्ड विद्यापीठ

कल्पना : काटकसरीचे उपाय करून सरकारी खर्च कमी करणे आणि त्यायोगे सरकारवरील कर्जात कपात करणे की सरकारी खर्च वाढवून विकासकामे करणे, अर्थव्यवस्थेला चालना देणे — वित्तीय संकटाच्या काळात नेमकं काय योग्य आहे – ह्यावर तज्ञांत नेहेमी वाद होत आले आहेत. त्यावर अल्बारतोने हे उत्तर दिलंय की काटकसरीचे उपाय हे विकासाला मारक नं ठरता बऱ्याच वेळेस देशाला वित्तीय संकटातून बाहेर काढण्यात उपयोगी ठरतात.

 

या सर्व आघाडीच्या विचारवंतांमध्ये भारतातीय नाव कुठेच नाही ही खंत वाटते.

परकीय विचार उसने घेण्याच्या वृत्तीमुळे वेगळा आणि मुलभूत विचार करण्याची क्षमताच आपण हरवून बसलो आहोत का?

: गौरव जोशी

फिचर्ड इमेज: हा जून चैंग, स्त्रोत

लेखाचा स्त्रोत: weforum


लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 229 posts and counting.See all posts by omkar

2 thoughts on “९ अर्थशास्त्रज्ञ ज्यांच्या कल्पना जग बदलताहेत !

 • October 19, 2018 at 11:46 pm
  Permalink

  अर्थशास्त्रज्ञ ज्यांच्या कल्पनाने जग बदलत आहे या यादीमध्ये भारतीय अर्थतज्ञ अनिल बोकील यांनी मांडणी केलेल्या ‘अर्थक्रांती प्रस्तावाची नोंद का घेण्यात ली नाही याचे आश्चर्य व खेद वाटत आहे.
  “परकीय विचार उसने घेण्याच्या वृत्तीमुळे वेगळा आणि मुलभूत विचार करण्याची क्षमताच आपण हरवून बसलो आहोत का?”
  भारतीय मनुष्याने भारतीय अर्थव्यवस्थेकरीता तयार केलेली हि मांडणी आहे व दुर्दैवाने आपण भारतीयच त्याच्या कडे दुर्लक्ष करतो.
  कृपया अनिल बोकील यांची मुलाखत व अर्थक्रांती संबंधी माहिती इनमराठी वर देण्यात यावी.

  Reply
 • October 21, 2018 at 9:42 pm
  Permalink

  परकीय विचार उसने घेण्याच्या वृत्तीमुळे वेगळा आणि मुलभूत विचार करण्याची क्षमताच आपण हरवून बसलो आहोत का?
  यासाठी कृपया अर्थक्रांती प्रतिष्ठानने मांडलेला ‘अर्थक्रांती प्रस्ताव ‘ इन मराठी वर मांडावा. एका भारतीयानें भारतीयांच्याकरीता भारतीय अर्थव्यवस्थेतील प्रश्नांवर उत्तर मांडले आहे. त्यावर एक लेख प्रसिद्ध करावा.

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?