नामशेष झालेलं जगातील ८ वं आश्चर्य शोधल्याचा शास्त्रज्ञांचा दावा!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

 

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण अगदी दोन शतकांपूर्वी जगामध्ये सात नाही तर आठ आश्चर्ये होती. आता सध्या जगात केवळ सातचं आश्चर्ये आहेत. वगळलेले हे आठवे आश्चर्य न्यूझीलंडच्या उत्तरी बेट रोटोमाहना तलावावर होते. रोटोमाहना वरील सफेद आणि गुलाबी चकाकणाऱ्या थराने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले होते आणि पुढे हे जागतिक आश्चर्य म्हणून घोषित करण्यात आले. पर्यटकांची तर येथे येण्यासाठी रीघ लागायची, परंतु दुर्दैवाने जून १८८६ मध्ये ज्वालामुखी पर्वत माउंट तारावेरा फुटल्याने हे आश्चर्य नामशेष झाले होते. या जागतिक आश्चर्याला पिंक व्हाईट टेरेस म्हटले जायचे.

pink-and-white-terraces-marathipizza01
amusingplanet.com

नुकताच दोन संशोधकांनी असा दावा केला आहे की, त्यांनी त्या गाडल्या गेलेल्या गुलाबी आणि सफेद थराचे योग्य स्थान शोधून काढले आहे. या दोन्ही संशोधकांनी ही गोष्ट जर्मन ऑस्ट्रियन भूशास्त्रज्ञ Ferdinanad Von Hochstetter यांच्या संशोधनाच्या आधारावर केली आहे, ज्यांनी १८५९ साली या जागेचा सर्वे केला होता. Hochstetter ला न्यूझीलंडच्या भूविज्ञानचे जनक म्हटले जाते.

पिंक व्हाईट टेरेसचा सुंदर नजारा रोटोमाहना तलावाच्या किनाऱ्यावर दिसत असे, जिथे गरम पाण्याच्या दोन झऱ्यातून सिलिका एकत्र होत असे. मात्र १० जून १८८६ मध्ये माउंट तारावेरा फुटल्याने जवळपास ४० किलोमीटरचा परिसर राखेत मिळाला आणि या दुर्घटनेत जवळपास १२० लोकांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून पिंक व्हाईट टेरेस गायब झाले ते कायमचेच!

pink-and-white-terraces-marathipizza02
bbc.com

न्यूझीलंडच्या जर्नल ऑफ द रॉयल सोसायटी मध्ये संशोधक रेक्स बन आणि डॉ. साशा नोल्डन यांनी दिलेल्या अहवालानुसार, पिंक व्हाईट टेरेस तलावाच्या तळाशी नसून तलावाच्या किनाऱ्याच्या १० ते १५ मीटर खाली आहे.

या संशोधकांना २०१० मध्ये एक नोटबुक मिळाली, ज्यात पूर्वी केलेल्या सर्वेची विस्तारीत माहिती होती. त्यांनी जेव्हा या पूर्ण सर्वेचा अभ्यास केला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की जेथे पिंक व्हाईट टेरेस दबलेले आहे असे मानले जाते, त्या ठिकाणी ते आहेच नाही. ते त्या ठिकाणापासून जवळपास ३५ मीटर खोलात गाडले गेले आहे.

२०११ मध्ये वैकाटो विद्यापीठ आणि द वूड्स ओशनग्राफिक संस्थेच्या शास्त्रज्ञांनी जाहीर केले की, त्यांना या गुलाबी सफेद थराचे (पिंक व्हाईट टेरेस) अवशेष मिळाले आहेत. परंतु मागील वर्षी GNS सायन्स, न्यूझीलंड यांनी केलेल्या पाच वर्षाच्या संशोधनानंतर असे समजले आहे की, ज्वालामुखीच्या विस्फोटाने हा पूर्ण थर नष्ट झाला होता. रेक्सबन आता GNS शी याच विषयाबद्दल चर्चा करत आहेत आणि त्यांचा दावा आहे की आतापर्यंत शास्त्रज्ञ चुकीच्या नकाशाशास्त्रीय माहितीवर काम करत होते.

pink-and-white-terraces-marathipizza03
amusingplanet.com

जर त्यांचा हा दावा आणि ते करत असलेले संशोधन यशस्वी ठरले तर जगाला त्याचे नष्ट झालेले आठवे आश्चर्य पुन्हा मिळू शकते.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?