' टिळकांचे वैचारिक शत्रू आणि गांधींचे गुरु जेव्हा आपल्या एका "कृत्याने" संसद हादरवून टाकतात!

टिळकांचे वैचारिक शत्रू आणि गांधींचे गुरु जेव्हा आपल्या एका “कृत्याने” संसद हादरवून टाकतात!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

सध्याच्या काळात विरोधकांनी संसदेतून वॉक आऊट करणे हे काय नवीन राहिलेलं नाही.

ट्रिपल तलाक रद्द करण्याच्या वेळेस, ३७० रद्द करताना, सीएए कायद्याच्या वेळेस सत्ताधारी पक्षाच्या विरोधात विरोधी पक्षातल्या बऱ्याच खासदारांनी वॉक आऊट केलेलं.

आताच्या घडीला विरोधकांची ताकद तितकीशी नसल्यामुळे सबंध सगळे बिल मंजूर होऊन त्याचं कायद्यात रूपांतर झाले.

 

parliament inmarathi
NDTV.com

 

पण, संसदेतून वॉक आऊट करणारा पहिला नेता कोण?आणि त्यांच्या वॉक आऊट करण्याचा काय परिणाम झाला असेल?

तर आज बघूया त्याच मराठी नेत्याबद्दल ज्यांनी संसदेत चाललेल्या चर्चेवर बहिष्कार टाकून वॉक आऊट केलं होतं.

गोपाळ कृष्ण गोखले! ज्यांनी सर्व प्रथम सरकारी बिलाच्या विरोधात तेव्हाच्या बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या संसदेतून वॉक आऊट केलं केलं होतं.

एक असा नेता ज्यांच्या प्रामाणिक आकडेवारीने रचलेल्या आर्थिक बजेटच्या भाषणाच्या माहितीसाठी लोक वृत्तपत्रांची चातकासारखी वाट बघायचे.

असा नेता ज्यांना महात्मा गांधी आणि बॅरिस्टर जिना दोघे आपला गुरू मानत. गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म ९ मे १८६६ ला रत्नागिरी जिल्ह्यात झाला होता.

 

goal krishna gokhle inmarathi
yourstory.com

 

कुटुंब परिस्थिती सामान्य होती. पण त्यांच्या वडिलांना शिक्षणाचे महत्व माहीत होते. परिस्थितीशी तडजोड करून त्यांनी आपल्या मुलाला चांगलं आणि योग्य शिक्षण दिल.

मुंबईच्याचं एल्फिन्स्टन कॉलेज मधून पदवी घेऊन ते गणिताचे प्राध्यापक बनले.

काँग्रेसच्या स्थापनेच्या चार वर्षातच त्यांनी काँग्रेस जॉईन केली. काँग्रेस मध्ये सामील व्हायची त्यांना प्रेरणा मिळाली ती न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्याकडून.

कॉलेज मध्ये त्यांचे घनिष्ठ मित्र होते लोकमान्य टिळक जे पूढे जाऊन त्यांचे राजनैतिक विरोधी सुद्धा बनले.

१९०६ मध्ये गोखलेंमुळेच टिळकांना काँग्रेस सोडून जहाल पक्षाची स्थापना करावी लागला होती. आणि अशाप्रकारे देशातल्या पहिल्या आणि मोठ्या पक्षाला फाळणीला सामोरे जावे लागले होते.

१० वर्षानंतर काँग्रेस पुन्हा एकसंध होऊन रुळावर आली.

गोखलेंचं निधन झालं तेव्हा आपलं राजकीय शत्रुत्व दूर ठेऊन टिळक श्रद्धांजली द्यायला जातीने हजर होते.

 

gokhle and tilak inmarathi
opindia.com

 

गोपाळ कृष्ण गोखले यांना सुरवातीलाच न्यायमूर्ती रानडे आणि दादाभाई नौरोजी यांचं सानिध्य मिळालं.

त्यामुळे त्यांना ब्रिटिशांचे कायदे,नियम आणि त्यांची काम करण्याची पद्धत कळाली. तत्कालीन बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये विधान परिषदेची निर्मिती झाली होती.(संसदीय लोकशाही तेव्हा अस्तित्वात नव्हती.)

तेव्हा तिथे बजेट आणि इतर बिलांवर चर्चा व्हायची. या विधान परिषदेत तेव्हा तरुण तडफदार असा युवा फिरोजशहा मेहता जो ब्रिटन मधूनच वकिलीच शिक्षण घेऊन आलेला तो गर्जत असायचा.

उभ्या चर्चेमध्ये तो ब्रिटिशांची चिरफाड करायचा. सरकारच्या विरोधात डोळ्यात डोळे घालून बोलणारा तो एकमेव नेता होता.

१९ व्या शतकात सरकारच्या विरोधात बोलणे म्हणजे मोठ्या बहादुरीच काम मानलं जायचं.

२०व्या शतकाच्या सुरुवातीला फिरोजशहा मेहता यांची तब्येत खालवायला लागली होती.तेव्हा त्यांनी गोखलेंची एन्ट्री विधान परिषदेत करून दिली.

आणि त्याच काळात ही वॉक आऊट वाली घटना घडली.

ही घटना घडली तेव्हा,जेव्हा सभेमध्ये शेतकऱ्यांचे जमीन मालकीचे हक्क खारीज करण्याचं बिल मांडलं गेलं होतं.

पुन्हा एकदा फिरोजशहा मेहता यांनी सरकारवर तुटून पडत बिलाच्या अक्षरशः चिंधड्या उडवून दिल्या.

 

pherozshah mehta inmarathi
fastread.in

 

सभेत आपल्या भाषणात मेहता म्हणाले,

“ब्रिटिश सत्तेच्या माजमध्ये तो बाप बनू इच्छितो जो पत्नीला सांगतो मुलांना गरिबीत वाढव आणि स्वतः अय्याशी करण्यात मग्न आहे.”

यानंतर सुद्धा सरकार बिल बहुमत ने पास करण्यावर अडून राहिली तेव्हा गोपाळ कृष्ण गोखले यांच्या आग्रहाने मेहता आणि इतर विरोधी दलाने बिलाच्या विरोधात वॉक आऊट केलं.

आणि या वॉक आऊट मुळे देशात एकच हडकंप उडाला. आपल्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीमुळे प्रसिद्ध असलेल्या ब्रिटिशांच्या पायाखालची जमीन सरकली.

मेहतांच्या मृत्यूनंतर गोखलेंनी मेहतांची ही परंपरा कायम ठेवली. १९०२ मध्ये ब्रिटिश वित्तीय सचिव एडवर्ड लॉ याने ७ करोड बचत दाखवून अर्थ संकल्प सादर केला.

सगळ्या बाजूने कौतुकाचा गुलाल त्यांच्यावर उडवला जात होता.

याला छेद देत गोखलेंनी आपली बाजू मांडताना कमेंट केली, देशाची एकंदरीत आर्थिक स्थिती आणि अर्थसंकल्प याचा अजिबात समन्वय नाही आहे.

तार्किक आकडे दाखवून गोखलेंनी दाखवून दिलं की दुष्काळ असताना असताना सुद्धा शेतसारा आहे त्या दरात वसूल केला जाणार आहे.

सैन्यावर वायफळ खर्च आणि शिक्षणाच्या तरतुदींवर कपात केलेल त्यांनी उजेडात आणलं.

 

g k gokhale inmarathi
indianexpress.com

 

गोखलेंच्या या वक्तव्यामुळे सरकारची काळी बाजू उजेडात आली. स्वदेशी प्रेस मीडियाने त्यांना पहिल्या पानावर जगा दिली.

गोखलेंनी अर्थसंकल्पाची हवा काढत सभेतल्या चर्चेला राष्ट्रवाद आणि अर्थव्यवस्थेच्या चर्चेत कन्व्हर्ट केलं. गोखलेंच्या अर्थसंकल्पावर होणाऱ्या भाषणाना जनता चवीने वाचू लागली.

आणि काँग्रेस वर आपली पकड मजबूत करून गोखले जनमानसात प्रसिद्ध झाले. अन १९०६ साली काँग्रेसचं विभाजन झालं.

टिळकांचा जहाल गट आणि गोखलेंचा मावळ गट.

टिळक ब्रिटिशांच्या विरोधात उग्र विरोधाला समर्थन करत होते ते गोखले आतापर्यंत ज्या संसदीय मार्गाने विरोध करत होते त्याच्या समर्थानात होते.

टिळकांच्या मते गोखलेंच्या मार्गाने गेलो तर काहीही सिद्ध होणार नाही तर गोखलेंच म्हणणं होतं की स्वतंत्र मिळवण्यासाठी जनतेचं शिक्षित आणि जागृत होणं गरजेचं आहे!

तेव्हाच एक नागरिक म्हणून ते आपला हक्क मागू शकतात.

काँग्रेसच्या विभाजनामुळे राजकीय शक्ती विभागली गेली. तरी गोखले आपल्या पद्धतीने काम करतच होते.

१९१२ साली मोहनदास गांधी यांच्या निमंत्रणामुळे ते आफ्रिका दौऱ्यावर गेले तर त्याच काळात मुंबईतले प्रसिद्ध बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांना गोखलेंनी आपलं संरक्षण दिल.

 

gandhi and jinnah inmarathi
sambhalnews.in

 

गांधी जेव्हा भारतात परतले तेव्हा त्यांनी गोखलेंना आपला राजनैतिक गुरू मानलं होतं. गोखलेंनी गांधींना सांगितलं,

जर देशाला समजून घ्यायच असेल तर देशाच्या जनतेच्या जवळ जा. संपूर्ण देश बघून घ्या. त्याला समजून घ्या. मगच आपली राजनीती तयार करा.

गोखलेंनी दिलेला हा संदेश गांधींनी शेवटच्या श्वासापर्यंत जपला.

सलग प्रवास आणि सक्रियतेमुळे १९ फेब्रुवारी १९१५ रोजी वयाच्या अवघ्या ४८व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

संपूर्ण देश तेव्हा सुन्न झाला खास करून मुंबईतला बौद्धिक जन. गोखलेंच्या चितेकडे पाहून टिळक जे म्हणाले ते आजच्या राजकीय चढाओढ मध्ये खुप महत्त्वाचे आहे.

“हे भारताचे रत्न चितेवर झोपलेले आहेत. देशवासियांनी गोखलेंसारख आचरण आपल्या आयुष्यात जपलं पाहिजे.”

तेंव्हा महात्मा गांधी म्हणतात,

“गोखले नितळ पाण्यासारखे स्पष्ट होते.ते गायीप्रमाणे दयाळू तर सिंहासारखे साहसी होते.आणि त्या राजकीय परिस्थिती मध्ये आदर्श पुरुष होते.”

आजच्या काळात गोखलेंची आठवण काढणे म्हणजे स्वस्थ संसदीय कार्यपद्धतीची आठवण काढण्यासारखं आहे. राजनैतिक मतभेदामध्ये व्यक्तीगत रोष लांब ठेवणे गरजेचे असते.

आणि आजच्या तारखेला आपली नियत आणि मेहनतचं आपल्या उज्वलतेला आणि प्रसिद्धीला कारणीभूत असणार आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?