' घराच्या चाव्या, एलइडी लाइट्स स्वतःच्या शरीरात बसवणारी ही “बायोनिक वुमन” आहे तरी कोण?  – InMarathi

घराच्या चाव्या, एलइडी लाइट्स स्वतःच्या शरीरात बसवणारी ही “बायोनिक वुमन” आहे तरी कोण? 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

तंत्रज्ञानामुळे माणसाने थेट चंद्रापर्यंतचा प्रवास केला, आणि नुसता प्रवास नाही केला तर तिथल्या गोष्टींचा अभ्यास सुद्धा चालू केला आहे. २१ वे शतक हे मानवाने तंत्रज्ञानाच्या मदतीने केलेल्या आविष्कारांसाठी ओळखले जाते!

आधुनिक तंत्रज्ञानाची महती –

२१ व्या शतकात आधुनिक तंत्रज्ञानाने इतकी भरारी घेतली आहे, की आपल्याला कधी कधी विज्ञानाच्या या चमत्काराने दिपून जायला होतं.

अवघ्या पंचवीसेक वर्षांपूर्वी जिथे अजून मोबाईलचाही शोध लागला नव्हता आणि लोक लॅंडलाईन फोनवरच लोकांशी संवाद साधण्याइतपत प्रगती करू शकले होते.

तिथे गेल्या पंचवीस वर्षांत संगणक आणि मोबाईल यांच्या तंत्रज्ञानाने अद्भूत अशी प्रगती केली आहे आणि मानवी जीवन पूर्णपणे बदलून टाकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

 

computer inmarathu
pinterest.com

 

पंचवीसेक वर्षांपूर्वी जर कुणी आपल्याला सांगितले असते,

की तुम्ही भारतातल्या एखाद्या खेड्यात बसल्या बसल्या आपल्या अमेरिकेतील मुलांशी समोरासमोर गप्पा मारू शकाल, त्याचे तिथले घर बघू शकाल, त्याला आपले व्हिडिओ, ऑडीओ, चित्रे, आवाज एका क्षणात पाठवू शकाल, तर कुणाचा विश्वासही बसला नसता कदाचित.

पण आज तंत्रज्ञानाने मारलेल्या भरारीमुळे हे सगळे आपल्या दैनंदिन जीवनाचा एक हिस्सा बनले आहेत.

अगदी सर्वसामान्य माणसे देखील अत्यल्प खर्चात ही सगळी सुविधा उपभोगू शकत आहेत. हा केवळ विज्ञानाचाच चमत्कार होय!

विंटर म्राज –

काम सोपं करण्यासाठी लोक आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतात. कम्प्युटरची मदत घेतात. परंतु ही महिला स्वतःच एक चालता फिरता कम्प्युटर बनली आहे.

तिने आपल्या शरीरात दोन चिप (chip) बसवून घेतल्यात. त्यामुळे तिची बरीच कामं करणं तिला सोपं जातंय. तिला ‘बायोनिक वुमन’ असे सध्या म्हटले जात आहे.

या महिलेचं नाव आहे विंटर म्राज. ती ३१ वर्षाची असून ब्रिटनमध्ये लिव्हरपूल येथे इंजिनिअर म्हणून काम करते.

 

winter mraz inmarathi
amarujala.com

 

तिने एका टिव्ही शोमध्ये दिलेल्या मुलाखतीत सांगितले की या शरीरात बसवलेल्या चिपच्या साह्याने ती आपल्या घराचे दरवाजे उघडू शकते आणि दुसऱ्या चिपचा उपयोग ती बिझनेस कार्डसारखा करते.

हे बिझनेस कार्ड म्हणजे कम्प्युटराईज्ड वर्जन आहे.

एवढंच नव्हे, तर तिच्या हातांच्या बोटांमध्ये मॅग्नेट बसवून घेतलेत आणि हाताच्या दोन्ही बाजूला फ्लॅश लाईट्स देखील बसवून घेतलेत.

असं केल्याने तिच्या रोजच्या कामातली बरीच कामे सोपी झालेयत.

 

bionic woman inmarathi
headtopics.com

 

अपघातामुळे ती बनली विकलांग आणि करावी लागली अनेक ऑपरेशन्स आणि बसवावे लागले अनेक कृत्रिम अवयव –

विन्टर म्राजने आपल्या इंटर्व्यूत हेही सांगितले, की एका मोठ्या अपघातात तिच्या शरीराला अनेक ठिकाणी खूप दुखापती झाल्या होत्या.

तिच्या मानेला, गुडघ्यात आणि पायाच्या घोट्यात बऱ्याच गंभीर जखमा झाल्या होत्या. त्यावेळी तिच्या शरीराची बरीच ऑपरेशन्स झाली होती. आणि तिच्या शरीरात बऱ्याच कृत्रिम गोष्टी बसवाव्या लागल्या होत्या.

तिच्या एका गुडघ्यात ३डी प्रिन्टेड कॅप बसवलेली आहे.

या सगळ्या सर्जरी तिच्या शरीरावर झाल्या तेव्हाच तिने विचार केला की आपलं आयुष्यही थोडं सोपं होईल अशी काही आधुनिक तंत्रज्ञानाची ऑपरेशन्स का करून घेऊ नयेत?

म्हणून मग विंटर म्राजने आपल्या शरीरात या दोन चिप बसवून घेतल्या. अशा प्रकारे चिप बसवून घेण्याची कल्पना तिला तिच्या शेजाऱ्याने दिली होती.

तिच्या बोटांमध्ये मॅग्नेट बसवले गेलेत. त्यामुळे तिला इलेक्ट्रोमॅग्नेटिक क्षेत्राची लगेच जाणीव होते आणि ती धोकादायक वायरीना स्पर्श करणे टाळू शकते.

 

winter mraz 2 inmarathi
patrika.com

 

ती म्हणते की तिच्या शरीरात जे इम्प्लान्टेशन केलेय ते फक्त प्रतिक्रियात्मक नसून ते सक्रिय आहेत.

माझ्याबाबतीत काहीतरी दुर्घटना घडून नंतर पुन्हा माझी ऑपरेशन्स करायला लागण्यापेक्षा मला सुरक्षित ठेवून माझी रोजची कामं करता येतील अशी उपकरणे मी जर आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बसवून घेतली तर ते केव्हाही चांगलेच ना?

आता मी किल्ल्या विसरू शकत नाही. कारण त्या माझ्या शरीरातच आहेत.

ती म्हणते, की तिने आपल्या शरीरात गर्भनिरोधक देखील इम्प्लान्ट करून घेतलेय. जे कुणालाही दिसत नाही. भविष्यात अजून अशी काही उपकरणं तिला आपल्या शरीरात बसवून घेण्याचा तिचा ईरादा आहे.

जेणेकरून तिला आपली रोजची दैनंदिन कामे उरकणं सोपं होईल.

ट्रान्सह्युमनिस्ट –

म्राझसारखे लोक स्वतःला ‘ट्रान्सह्यूमनिस्ट’ म्हणवून घेतात. त्यांचा विश्वास तंत्रज्ञानावर आहे. त्यांचं म्हणणं आहे की ते भविष्यातील नवीन तंत्रज्ञानाचे प्रणेते आहेत.

असे तंत्रज्ञान भविष्यात माणसाच्या क्षमता वाढवण्यात, त्याची बुद्धिमत्ता वाढवण्यात, त्याला हुषार बनवण्यात मदत करणार आहे.

 

winter mraz featured inmarathi
dailymail.co.uk

 

अजून तर हि सुरुवात आहे आणि हे शारीरिक अपग्रेड्स केवळ गंमतीशीर गिमिक्सपेक्षा थोडे अधिक उपयोगी आहेत इतकंच.

परंतु शरीराला अशी तंत्रज्ञानाची जोड दिल्याने एक दिवस असाही येईल की ते शरीरातील रोग आणि काही कमतरता दूर करू शकेल.

विज्ञानाची घोडदौड आणि संशोधन –

सध्या तंत्रज्ञान इतकी प्रगती करत आहे की आपण एकेक बातम्या वाचून अचंबित होऊन जातो.

लोक म्हणतात की एक दिवस असा येईल की लोक स्वतःचीच नवीन वर्जन्स डाऊनलोड करतील.

सिलिकॉन व्हॅली मधील लोक स्वतःच्या मुलांना ‘सायबॉर्ग्स’ मध्ये बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. ही मुले खोट्याला लगेच ओळखू शकतील आणि सदैव आनंदी राहतील.

सिलिकॉन व्हॅली सध्या अमरत्व शोधण्याचाही प्रयत्न करत आहे. त्यासाठी सेल इंजेक्शन्स, चुंबकीय खुर्च्या आणि मेंदूच्या रोपणासह अनेक प्रयोग केले जात आहेत.

 

sillicon valley inmarathi
news.com.au

 

बघू या हे विज्ञान अशा तऱ्हेने अजून कुठे कुठे पोचतेय आणि काय काय चमत्कार दाखवते ते? आजवरची त्याची प्रगती पाहता आता माणसाला काहीही अशक्य नाही असेच वाटू लागलेले आहे.

तुम्हालाही अशा तऱ्हेने आपले शरीर अपग्रेड करायला आवडेल का? आम्हाला जरूर कमेंट मध्ये कळवा!

कारण सध्या ज्या गतीने विज्ञान तंत्रज्ञान प्रगती करतय ते पाहून वर उल्लेख केलेल्या गोष्टी सत्यात उतरायला फार काळ लागणार नाही असंच वाटत! त्यासाठी आपण सुद्धा तयार हवं ना!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?