' प्रसिद्धीच्या झोतात वावरणाऱ्या ह्या बॉलीवूड स्टार्सनी कसलंही मानधन न घेता केलेत हे सिनेमे! – InMarathi

प्रसिद्धीच्या झोतात वावरणाऱ्या ह्या बॉलीवूड स्टार्सनी कसलंही मानधन न घेता केलेत हे सिनेमे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आपल्या कामाचं मानधन म्हणजेच आपण केलेल्या मेहनतीचं फळ!

प्रत्येक प्रोफेशनल व्यक्ती ही मोबदला योग्य मिळणार की नाही हे आधी ठरल्याशिवाय कोणतंच काम करायला कधीच तयार होत नाही. असं म्हणतात की आपल्या कामावर प्रेम करावं; फक्त त्यातून मिळणाऱ्या मोबदल्यावर नाही.

पण, हे आत्मसात करणं हे फार कमी जणांना जमत असतं.

बॉलीवूड बद्दल बोलायचं तर, आपण असेही किती तरी किस्से ऐकले आहेत की, आधी कलाकारांकडून काम करून घेतलं जातं आणि नंतर त्यांचे पैसे एक तर बुडवले जातात किंवा रखडले जातात.

 

bollywood stars inmarathi
starsunfolded.com

 

त्यामुळे कलाकार लोक सुद्धा आता खूप हुशार झाले आहेत. काही विषय मात्र असे असतात जिथे कलाकारांना स्वतः तो रोल करायची इच्छा असते.

तो रोल करणे ही त्यांच्यासाठी व्यवसायिक गरज तर असतेच; पण त्याहूनही मोठी ती त्यांची व्यक्तिगत इच्छा असते.

बायोपिक चा काळ आल्यापासून तर कलाकार मंडळी हे बायोपिक कोणाच्या जीवनावर आहे त्या कलाकार किंवा खेळाडू चं फक्त नाव ऐकून त्यांचा सिनेमा करण्यास अगदी डोळे झाकून तयार होतात.

एखाद्या वेळी असं होतं की, जेव्हा त्या सिनेमाचा दिगदर्शक एखाद्या कलाकाराला कथा ऐकवत असतो. तेव्हाच, त्या कलाकाराला त्याच्या अनुभवामुळे लक्षात येतं की, हा सिनेमा नक्की खूप यशस्वी होईल.

 

biopics inmarathi
theweek.in

 

समीक्षकांना सुद्धा हा सिनेमा आवडेल आणि बॉक्स ऑफिसवर सुद्धा बंपर कमाई होईल.

आपल्या अनुभवाने आलेल्या अंदाजावर ही कलाकार मंडळी विश्वास ठेवतात आणि अगदी क्षुल्लक मानधन घेऊन असे सिनेमात काम करायला तयार होतात आणि त्या कलाकृतीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात.

अश्याच दहा कलाकारांची माहिती आम्ही देत आहोत ज्यांनी की त्यांच्या करिअर मधील या महत्वाच्या सिनेमांसाठी अगदीच नाममात्र मानधन घेतलं होतं.

 

१. शाहिद कपूर :

 

shahid kapoor inmarathi
india.com

 

आपल्या करिअर मध्ये एका अवघड फेज मधून जात असताना शाहिद कपूरला विशाल भारद्वाज या अत्यंत प्रतिभावान दिगदर्शकाने ‘हैदर’ या सिनेमाची कथा ऐकवली.

ही कथा शाहिद कपूर ला इतकी आवडली की, त्याने या सिनेमासाठी काहीही मानधन न घेण्याचं ठरवलं.

त्याच्या मानधनामुळे सिनेमाच्या बजेट वर कोणताही फरक पडू नये हा सुद्धा त्याने विचार केला आणि या सिनेमात काम करून त्याच्या करिअरचा सर्वात दमदार परफॉरमन्स दिला.

या कामासाठी त्याचं प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी सुद्धा खूप कौतुक झालं.

‘हैदर’ या सिनेमाला ५ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. ज्यामध्ये बेस्ट स्क्रीनप्ले, बेस्ट कॉश्च्युम, बेस्ट संगीत, बेस्ट कॉरिओग्राफी आणि बेस्ट पार्श्वगायक ह्या पुरस्कारांचा समावेश होता.

 

२. अमिताभ बच्चन :

 

amitabh bacchan inmarathi
storynotch.com

 

बॉलीवूड च्या महनायकाचं जितकं कौतुक करावं ते कमीच आहे हे आपण सगळे जाणतोच. या वयात सुद्धा ते किती व्यस्त असतात हे सर्वश्रुत आहे.

त्यांच्या तारखा मिळणं आणि त्यांची फीस परवडणं हे कोणत्याही नव्या दिगदर्शकासाठी अवघडच असणार.

पण, या व्यस्तते मधून सुद्धा त्यांनी दीपक सावंत हे त्यांचे मेकअप मॅन यांच्यासाठी वेळ काढला होता!

 त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला भोजपुरी सिनेमा ‘गंगा, गंगोत्री आणि गंगा देवी’ यामध्ये बिग बी यांनी कोणतेही मानधन न घेता काम केलं.

यासोबतच, ‘ब्लॅक’ या हिंदी सिनेमासाठी सुद्धा अमिताभ बच्चन यांनी कोणतंही मानधन घेतलं नाही.

असंही बोलण्यात येत की, भारत सरकारच्या पोलिओ अभियान, स्वच्छ भारत वगैरे जाहिरात करताना सुद्धा अमित जी कोणतंही मूल्य घेत नाहीत.

 

३. शाहरुख खान :

 

srk inmarathi
indiatoday.in

 

बॉलीवूड चा सर्वात महागडा कलाकार. जो की प्रसिद्ध आहे आपल्या व्यवसायिक हुशारी साठी. कोणत्या माध्यमातून त्याने कशी जास्त कमाई केली या गोष्टीची मीडिया मधून कायम चर्चा होत असते.

पण, आश्चर्य म्हणजे शाहरुख खान ने सुद्धा ‘भुतनाथ रिटर्न्स’ या सिनेमा साठी कोणतंही मानधन घेतलं नव्हतं.

यासोबतच, ह्रतिक रोशनच्या ‘क्रेझी ४’ मध्ये एका गाण्यात काम करण्यासाठी सुद्धा कोणतंही मानधन घेतलं नव्हतं.

कमल हसन यांच्यासोबत असलेल्या मैत्रीपूर्ण संबंध टिकवण्यासाठी सुद्धा शाहरुख खान ने ‘हे राम’ या सिनेमा मध्ये एक छोटासा रोल करण्याची तयारी दाखवली आणि तेसुद्धा कोणतंही मानधन न घेता.

 

४. राणी मुखर्जी :

 

rani mukherjee inmarathi
medium.com

 

राणी मुखर्जी ला बॉलीवूड मध्ये एन्ट्री मिळाली ती म्हणजे करण जोहर च्या ‘कुछ कुछ होता है’ या सिनेमामधून. त्या नंतर हे दोघेही अगदीच जवळचे मित्र झाले.

या मैत्रीखातर राणी मुखर्जी हिने ‘कभी खुशी कभी गम’ या सिनेमामध्ये काम करण्यासाठी आपल्या लाडक्या मित्राकडून कोणतेही मानधन घेतले नव्हते.

 

५. दीपिका पदुकोण :

 

deepika padukone inmarathi
zeenews.india.com

 

आजची आघाडीची अभिनेत्री. जी की सध्या बॉलीवूड मधील सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री आहे. बॉलीवूड मध्ये येण्याआधी ती मॉडेलिंग करत होती आणि काही अलबम च्या गाण्यात लोकांना दिसली होती.

तिला पहिला ब्रेक मिळाला आणि लोकांच्या पसंतीस पडली ती म्हणजे शाहरुख खान निर्माता असलेल्या ‘ओम शांती ओम’ या सिनेमा मधून.

स्वतःला पहिल्याच सिनेमात शाहरुख खान सोबत काम करण्याची संधी मिळत आहे ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे हे मानून दीपिका पदुकोण ने या सिनेमासाठी कोणतेही मानधन घेतले नव्हते.

 

६. सोनम कपूर :

 

sonam kapoor inmarathi
desimartini.com

 

‘भाग मिल्खा भाग’ या मिल्खा सिंग या धावपटू यांच्या जीवनावर आधारित सिनेमा!

यामध्ये फरहान अखतर यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळणे म्हणजे आपलं सौभाग्य समजून सोनम कपूर ने या सिनेमा साठी फक्त ११ रुपये इतकं मानधन घेतलं होतं.

आश्चर्याची बाब म्हणजे स्वतः मिल्खा सिंग ज्यांना flying sikh या नावाने सुद्धा ओळखलं जातं त्यांनी या सिनेमा च्या निर्मात्यांकडून केवळ १ रुपये इतकं मानधन घेतलं होतं.

मिल्खा सिंग यांनी ते एक रुपयाचं नाणं दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांना मिल्खा सिंग यांच्या १९५८ मध्ये प्रकाशित झालेल्या आत्मचरित्रात चिकटवायला लावलं होतं.

 

७. नवाझुद्दीन सिद्दीकी :

 

nawaz in manto inmarathi
dnaindia.com

 

नंदिता दास यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘मंटो’ या सिनेमासाठी नवाझुद्दीन सिद्दीकी या गुणी कलाकाराने केवळ १ रूपये इतकं मानधन घेतलं.

नवाझुद्दीन सिद्दीकी यांच्या शिवाय या सिनेमातील इतर कलाकार जसं की ऋषी कपूर, गुरुदास मान, जावेद अखतर, राजश्री देशपांडे, स्वानंद किरकिरे आणि रणवीर शौरी या कलाकारांनी सुद्धा काहीच मानधन घेतलं नाही.

या चित्रपटाचं टोरंटो फिल्म फेस्टिवल, आशिया पॅसिफिक स्क्रीन अवॉर्ड या ठिकाणी समीक्षकांकडून खूप कौतुक झालं आणि नवाझुद्दीन सिद्दीकी यांना बेस्ट हिरो म्हणून पुरस्कार देण्यात आला होता.

 

८. सलमान खान :

 

salman in zero inmarathi
dnaindia.com

 

बॉलीवूड चे ‘भाई जान’ जे की प्रसिद्ध आहेत सर्वांसोबत त्यांचे असलेले मैत्रीपूर्ण संबंध जपण्यासाठी. खरं तर सलमान खान हा सर्वात महागडा कलाकार आहे.

याचं कारण म्हणजे सलमान खान या फक्त नावामुळे सिनेमाला हमखास मिळणारी बंपर ओपनिंग.

एक खासियत आहे की सलमान खान कधीही त्यांच्या मित्राने केलेल्या सिनेमात पाहुणा कलाकार म्हणून काम करताना कधीच फीस घेत नाहीत.

याचे उदाहरण म्हणजे फराह खान दिगदर्शित ‘तीस मार खान’, सतीश कौशिक यांचा ‘अजब प्रेम की गजब कहानी’, शाहरुख खान निर्माता असलेला ‘ओम शांती ओम’ आणि अजय देवगण निर्माता असलेला ‘सन ऑफ सरदार’.

 

९. मीना कुमारी :

 

meena kumari inmarathi
outlookindia.com

 

मीना कुमारी या ७० च्या दशकातील सर्वात यशस्वी अभिनेत्री होत्या. ‘पाकिझा’ हा त्यांनी काम केलेला शेवटचा सिनेमा होता. हा सिनेमा कमाल अमरोही यांनी दिगदर्शित केला होता.

या सिनेमासाठी मीना कुमारी यांनी केवळ १ रुपये इतकं मानधन घेतलं होतं. त्यावेळी मीना कुमारी ह्या खरं तर दवाखान्यात भरती होत्या. पण तरीही त्यांनी मानधन कधीही वाढवून मागितलं नाही.

हा सिनेमा म्हणजे भारतीय सिनेमातील सर्वोत्कृष्ट सिनेमांपैकी एक समजला जातो.

१०. आमिर खान :

 

aamir khan pk inmarathi
telllychakkar.in

 

 

बॉलीवूड मध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान याने सुद्धा त्याच्या करिअर च्या एका सुपरहिट सिनेमा ‘PK’ साठी काहीच मानधन घेतलं नाही.

दिगदर्शक राजू हिराणी यांच्याकडून कथा ऐकतानाच आमिर खान ला हे लक्षात आलं होतं की हा सिनेमा नक्की खूप चांगला असेल आणि बॉक्स ऑफिसवर सुद्धा खूप चालेल.

फक्त या नायकांमध्ये आणि आमिर खान मध्ये हा फरक आहे की आमिर खान ने या सिनेमाच्या निव्वळ नफ्यातून ३३% नफा त्याला मिळावा अशी अट निर्मात्यां समोर ठेवली होती.

इतका त्याला त्याच्या कामावर आणि सिनेमाच्या यशावर भरोसा होता. आणि झालंही तसंच, PK ने त्या वर्षीचे बॉक्स ऑफिस वरचे कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडून काढले होते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?