' हे ८ दहशतवादी हल्ले म्हणजे प्रत्येक भारतीयाच्या मनातली कधीही न भरून निघणारी जखमच! – InMarathi

हे ८ दहशतवादी हल्ले म्हणजे प्रत्येक भारतीयाच्या मनातली कधीही न भरून निघणारी जखमच!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आपण इतिहासात बघितलं तर आपल्याला मानवाविषयी काही अगम्य, अतर्क्य गोष्टी समजतात. आदिमानवापासून आत्ताच्या आधुनिक युगातील प्रगत मानव प्राण्याविषयी सगळी माहिती इतिहासात डोकावल्यावर मिळते.

आदिमानव जंगलात रहायचा, फळे कंदमुळे गोळा करुन गुजराण करायचा, हळू हळू माणूस प्रगती करू लागला. प्राण्यांची शिकार करू लागला.

कच्चे मांस हा ही गुजराण करण्याचा १ घटक बनला. नंतर आगीचा शोध लागला.

मानवाने अजुन प्रगती केली. चाकाचा शोध लागला. शेती करणे, जनावरे पाळणे, दळणवळण ह्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी होऊ लागल्या. मानव समूह करून राहू लागला.

 

ashamyugin manav inmarathi
fossilhistorypaige.com

 

मग समूहाचे नियम, अटी लागू करणे अनिवार्य ठरले ज्यामुळे सामाजिक जीवन स्थिर झाले. समाज हा मानवाच्या समूहातून अस्तित्त्वात आला आणि समाजप्रिय म्हणून ओळखला जाऊ लागला.

पण ह्या समाजात अशीही माणसं आहेत जे समाजप्रिय नसतात, समाजकंटक म्हणून ओळखले जातात.

ज्यांना समाजात शांती नको असते, आपलं वर्चस्व, वरचढपणा त्यांना सिद्ध करायचा असतो, समाजात भीती पसरवायची असते, दहशत पसरवायची असते.

मग सुरू होतात समाजविरूद्ध कारवाया, दहशतवादी कारवाया, दहशतवादी हल्ले!

ज्यामधे अपरिमित वित्तहानी होतेच पण त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे कधीही भरून न येणारी मनुष्यहानी होते, अपंगत्व येते, समाजात अतिशय उलथापालथ होते, राष्ट्रीय सुरक्षेला धोका उत्पन्न होतो.

terrorism inmarathi
rand.org

 

ज्यामुळे सुन्न व्हायला होतं. आज आपण भारतातल्या अशाच कधीही न विसरता येणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांविषयी माहिती करून घेणार आहोत ज्यामुळे भीतीने अजूनही अंगावर सर्रकन् काटा येतो.

 

१) ११९३ सालची बॉंबस्फोटांची साखळी :

 

1993 bomb blast inmarathi
livemint.com

 

मुंबईमधे १२ मार्च १९९३ रोजी १ किंवा २ नाही तर तब्बल १३ बॉंबस्फोट घडवून आणले गेले.

हे स्फोट एअर इंडिया इमारत, स्टॉक एक्सचेंज इमारत, हॉटेल सी रॉक, हॉटेल जुहू सेंटर, हॉटेल एअरपोर्ट सेंटर, प्लाझा थिएटर इत्यादी मुंबईतील वाणिज्यिक केंद्रे आणि इतर महत्त्वाच्या इमारती येथे हे स्फोट झाले.

त्याशिवाय माहीममधील हिंदू फिशरमेन कॉलनी येथे हँड ग्रेनेड देखील फेकण्यात आले. ज्यामुळे मुंबईच्या स्टॉक एक्स्चेंजवर भयंकर परिणाम झाला.

ज्यामध्ये जवळपास २५७ लोकं मृत्युमुखी पडली आणि ७०० च्या जवळपास लोकं जखमी झाली. २७ कोटींपेक्षा जास्त किंमतीची संपत्ती नष्ट झाली.

हा हल्ला कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याने घड्वून आणला होता. ह्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण भारत देश हादरून गेला होता आणि जनजीवन सुरळीत व्हायला अनेक महिने गेले.

 

२) कोयंबतूर येथील इ.स. १९९८ मधील बॉंबस्फोट :

 

coimatore blast inmarathi
medium.com

 

१४ फ़ेब्रुवारी १९९८ या दिवशी कोयंबतूर येथे ११ वेगवेगळ्या ठिकाणी १२ बॉंबस्फोट घडवून आणण्यात आले होते.

ह्यात सरासरी ५८ माणसं मारली गेली होती आणि २०० पेक्षा जास्त लोकं जखमी झाली होती.

जिलेटिन वापरलेली ही स्फोटके टायमर सेट करून मोटारसायकल, कार, फळांच्या गाड्या इत्यादींमध्ये लपविलेले होते.

 

३) इ.स. २००१ मधील संसदेवरील हल्ला :

 

parliament attack inmarathi
hindustantimes.com

 

दि. १३ डिसेंबर २००१ रोजी संसदेवर अल्-उम्माह् ह्या दहशतवादी संघटनेने हल्ला केला होता. ह्या हल्ल्यामुळे सुरक्षा यंत्रणा धोक्यात आली.

ह्यात ५ दहशतवादी ठार झाले. दिल्ली पोलिसांचे ६ जवान, २ संसद सुरक्षा सेवा कर्मचारी आणि १ माळी मृत्युमुखी पडले.

हा हल्ला सुरक्षेचा भंग करण्यासाठी करण्यात आला. ह्यासाठी संसद आणि गृह मंत्रालयाच्या बनावट स्टिकरचा वापर करण्यात आला होता.

त्यावेळी संसदेत लालकृष्ण अडवाणी ह्यांच्यासह जवळ जवळ १०० राजकीय व्यक्ती होत्या.

 

४) २००२ अक्षरधाम मंदिरावरील दहशतवादी हल्ला :

 

akshardham temple attack inmarathi
scroll.in

 

२४ सप्टेंबर २००२ रोजी गुजराथ मधील गांधीनगर येथील अक्षरधाम मंदिरावर हल्ला करण्यात आला.

एन्.एस्.जी. ने घेराव घालून दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यापूर्वी ३० जण ठार झाले आणि ८० जणं जखमी झाले.

हा हल्ला गुजरात दंगलीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आला होता अशी माहिती दहशतवाद्यांनी एका पत्राद्वारे दिली होती.

ह्या पत्रातूनच लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद ह्यांनी ह्या बॉंबस्फोटाची जबाबदारी स्वीकारली होती.

 

५) २००५ दिल्ली मधील साखळी बॉम्ब स्फोट :

 

delhi blast inmarathi
finance.yahoo.com

 

दि. २ ऑक्टोबर २००५ रोजी दिल्ली येथे लष्कर-ए-तोयबा च्या अतिरेक्यांनी साखळी बॉंबस्फोट घडवून आणले होते.

३ स्फोट झालेल्या ह्या हल्ल्यात ६२ लोकं ठार झाली आणि १०२ लोकं जखमी झाली होती. ह्या हल्ल्याने भारताची राजधानी दिल्लीच नाही तर आख्खा देश हादरला होता.

दिवाळीच्या २ दिवस आगोदर हे हल्ले झाले होते. सरोजिनी नगर, पहाडगंज आणि गोविंदपुरी येथील एक बस असे एकूण ३ बॉंबस्फोट झाले ज्यामुळे अतोनात नुकसान झालं.

 

६) २००६ मधील मुंबई रेल्वे ट्रेनमधे झालेले बॉंबस्फोट :

 

2006 train blast inmarathi
thehindu.com

 

११ जुलै २००६ रोजी मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल गाड्यांमधे ११ मिनिटांच्या अवधीत ७ बॉंबस्फोट करण्याता आले होते.

रेल्वे मधे हे बॉंब प्रेशर कुकर मधे ठेवण्यात आले होते असं तपासा अंती समजलं होतं. हे बॉंबस्फोट इंडियन मुजाहिद्दिन ह्या दहशतवादी संघटनेने केले होते.

माटुंगा रोड, माहिम, वांद्रे, खार रोड, जोगेश्वर, भाईंदर आणि बोरिवली या स्थानकांदरम्यान हे स्फोट झाले होते.

 

७) २००७ समझोता एक्स्प्रेस बॉंबस्फोट :

 

samjhauta express inmarathi
rediff.com

 

१८ फेब्रुवारी रोजी दिल्ली आणि लाहोर ह्या शहरांना जोडणार्या समझोता एक्स्प्रेस मधे बॉंबस्फोट करण्यात आला होता.

हा स्फोट पानिपतजवळ दिवाण येथे एक्स्प्रेसच्या २ डब्यांत झाले ज्यामधे भरपूर प्रवासी होते. मृतांमधे आणि जखमींमधे पाकिस्तानी नागरिकांची संख्या जास्त होती.

६८ लोकं मृत्युमुखी पडली होती आणि अनेक जणं जखमी झाले होते.

 

८) २६/११ मुंबई येथील दहशतवादी हल्ला :

 

2611 attack inmarathi
youtube.com

 

मुंबई येथे २६ नोव्हेंबर २००८ मधे अतिशय भीषण दहशवादी हल्ला झाला होता, जो आत्ता पर्यंतच्या हल्ल्यामधील सगळ्यात भयंकर हल्ला होता.

१० दहशतवादी समुद्र मार्गाने मुंबईत आले आणि मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून क्रूर हल्ल्याने सुरुवात केली.

आणि त्यानंतर हे भीषण हल्ले कामा हॉस्पिटल, ताज हॉटेल, लिओपोल्ड कॅफे, मेट्रो थिएटर इथे आणि ह्याशिवाय ५ ठिकाणी हे हल्ले केले गेले.

ह्यात रेल्वे, हॉस्पिटल, हॉटेल कर्मचार्यांनी प्रसंगावधान राखत अनेक लोकांचे प्राण वाचवले. पोलिसांनी आणी लष्करी जवानांनी कौतुकास्पद कामगिरी केली.

अजमल कसाबला जिवंत पकडले तर बाकी दहशदवाद्यांना कंठस्नान घातले. ह्यामागे लष्कर-ए-तोयबा या दहशदवादी संघटनेच्या हाफिज सईद ह्याचा हात होता.

ह्या दहशतवादी हल्ल्यांमुळे संपूर्ण देश ढवळून निघाला होता. पण ह्याही परिस्थितीतून मार्ग काढत आपला भारत देश पुन्हा सावरला.

परत सगळं सुरळीत व्हायला निश्चितच खूप वेळ लागला पण आपल्या नागरिकांनी न डगमगता सरकारला सहकार्य करत आपले एकीचे बळ दाखवून दिले.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?