' ना गॅस, ना ओव्हन : ‘हे’ पौष्टिक पदार्थ घरातील कोणतीही व्यक्ती बनवू शकते – InMarathi

ना गॅस, ना ओव्हन : ‘हे’ पौष्टिक पदार्थ घरातील कोणतीही व्यक्ती बनवू शकते

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

===

एक काळ असा होता की, स्वयंपाकघरात फक्त महिलाराज असायचं. पुरुष माणसं अपवादात्मक परिस्थितीत स्वयंपाक करायची. जवळ जवळ नाहीच म्हणता येईल इतपत.

एकत्र कुटुंब पद्धती होती. सतत कुणी काकू, आत्या, वहिनी, आजी या हजर असायच्याच त्यामुळं सहसा पुरुष स्वयंपाकघरात जेवायलाच यायचे. पण जसं जसं एकत्र कुटुंबं विभक्त होऊ लागली तसं तसं किरकोळ कामं पुरुष करु लागले.

यातही एक वर्ग असा होता की ही बायकी कामं.. ती पुरुषांची कामं असा भेदाभेद करणारा. पण त्याच्यापुढं आलेला काळ तर त्याहून जास्त वेगळा!!!

दोघंही कमावते…मग बायकोला मदत करण्यासाठी पुरुष पण सर्रास स्वयंपाक करु लागले. मग वेगवेगळ्या रेसिपी पण ट्राय करु लागले.

 

man cooking inmarathi

 

विशेष गोष्ट अशी की बायकांसारखे कदाचित कांकणभर सरस बल्लवाचार्य झाले आहेत. बल्लव हा सर्वात प्राचीन आचारी बरं का!!! भीमानं विराट राजाच्या मुदपाकखान्यात बल्लव नावानं स्वयंपाकी म्हणून काम केलंच होतं.

पण या लाॅक डाऊनच्या दिवसांत एक गोष्ट पक्की लक्षात आली असेल, कुणाचंही काम हलकं नाही. आणि प्रत्येकाला प्रत्येक काम थोडंफार तरी जमलंच पाहिजे.

घराची साफसफाई असो की बल्लवाचार्य होऊन थोडंफार पोटभरीचं जेवण बनवणं असो. ते करता येणं हे अतिशय गरजेचे आहे.

आज या आधुनिक बल्लवाचार्यांसाठी आम्ही एकदम वेगळ्या हटके रेसिपी घेऊन आलो आहोत. ज्यासाठी ओव्हन नसला तरी काही बिघडत नाही. गॅस ऐच्छिक आहे. जमत असेल तर गॅसवर किरकोळ काही फोडणी देणं वगैरे करा अन्यथा नाही दिली तरी चालेल.

या रेसिपीज इतक्या साध्या सोप्या आहेत की महिला, पुरुष, मुलं कुणीही करु शकतात. पाहूया अशा साध्या सोप्या रेसिपीज. ज्या सहजासहजी घरात असणाऱ्या वस्तूंमधून करता येतील. खूप खर्चिक नसतील आणि पौष्टिक सुद्धा असतील.

१.‌ दही पोहे-

 

sahi pohe inmarathi

 

आपले जाडे पोहे कांदा पोहे करायला वापरतो ते, थोडं पाणी घालून भिजवा. त्यात दही, दूध, मीठ, साखर चवीनुसार घाला. हिरव्या मिरच्यांची फोडणी द्या किंवा तसेच खा. चवदार तर लागतातच. ही एकदम सोपी डिश.

 

२. दडपे पोहे-

 

dadape pohe inmarathi

हे ही वाचा – नैराश्य, बॅड-मुड मधून बाहेर येण्यासाठी हे मस्त खाद्यपदार्थ खा आणि आनंदी राहा!

आपल्या मराठी माणसाचा आवडता पदार्थ. करायला अतिशय सोपा. पातळ पोहे घेऊन त्यात नारळाचा चव, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, मीठ साखर,आलं घाला.

शेंगदाणे घालून फोडणी करा. गार झाल्यावर पोह्यांवर ओता. एकदम झकास पोहे तयार!!!

३. ब्रेडचे दहीवडे-

 

dahi vade inmarathi

 

ब्रेडच्या कडा काढून वाटीने गोल आकार बनवून घ्या. त्यावर घोटून ठेवलेलं दही, जिरेपूड, चिंचेची चटणी, थोडं लाल तिखट, थोडं मीठ घाला आणि मस्त एंजॉय करा ही डिश!!!

४. बिस्कीट चाट-

 

biscuit chat inmarathi

 

मोनॅकोच्या बिस्कीटांवर टोमॅटो, कांदा बारीक चिरुन घाला. थोडीशी बारीक शेव, आवडत असेल तर दही, चिंचेची चटणी घालून डिश मध्ये ठेवा…एक बिस्कीट शिल्लक राहणार नाही.

 

५. बाकरवडी चाट-

 

bakarwadi chaat inmarathi

 

नांव वाचूनच तोंडाला पाणी सुटलं का?

छोट्या छोट्या बाकरवड्या डिशमध्ये घ्या. थोडं दही घाला. आवडत असेल तर चिंचेची चटणी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, बारीक शेव त्यावर पसरा. आणि डिश कशी फस्त होती बघा!!!

६. पिनव्हील सँडविच-

 

pinwheel sandwich inmarathi

 

एकदम सोपी कृती असलेले सँडविच..ब्रेडच्या कडा कापून लाटण्याने ब्रेड पातळ लाटून घ्या. चीझ, टोमॅटो सॉस, हिरवी चटणी, गाजराचे तुकडे, त्यावर पसरुन त्याचा रोल बनवून त्याचे तुकडे करुन सर्व्ह करा.

७. कोबी अॅपल स्लाॅ-

 

salad inmarathi

 

अतिशय सोपी कृती असलेलं हे सलाड.

कोबी, ढबू मिरची, गाजराचे बारीक तुकडे करुन व्हिनीगर, मीठ मिरेपूड घालून वरुन दही घालून सर्व्ह करा..फटाफट संपून जाईल.

८. पापडी चाट-

 

papadi chaat inmarathi

 

पापडी डिशमध्ये पसरुन त्यावर थोडं दही, चिंचेची चटणी, हिरवी चटणी, कांदा कोथिंबीर यांचं टाॅपिंग्ज करा.. चटपटीत डिश बघता बघता संपून जाईल.

९. राजमा सलाड-

 

rajma salad inmarathi

 

राजमा किती पौष्टिक आहे तुम्ही जाणताच!!! याचं सलाडपण तसंच छान होतं. शिजवलेल्या राजम्यात टोमॅटो, मिरेपूड,थोडंस लाल तिखट, लिंबाचा रस, टोमॅटोचे बारीक तुकडे, कांदा चिरून मिसळून सर्व्ह करा.

१०. भेळ-

 

Bhelpuri

 

चुरमुरे, फरसाण, बारीक चिरून कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, चवीप्रमाणे तिखट ,मीठ, चिंचेची चटणी हे सगळं एकजीव करून डिश बनवा. लहानथोर सगळे खुश होतील.

हे ही वाचा – इम्युनिटी वाढवायची असेल तर आजपासूनच आहारात या १४ पदार्थांचा समावेश करा!

११. आलू चाट-

 

aloo chaat inmarathi

 

शिजवलेल्या बटाट्याचे काप करुन त्यावर दही, चिंचेची चटणी, कांदा कोथिंबीर, बारीक शेव लाल तिखट, जिरेपूड घालून खाऊन पहा. बोटं चाटत राहतील सारे..

१२. मसाला ताक-

 

buttermilk InMarathi

 

ताक करुन त्यात सैंधव मीठ, जिरेपूड घालून एकजीव करून सहजासहजी तयार करता येतं.

असे एकापेक्षा एक सोपे पदार्थ आपण आरामात करु शकतो.

सुट्टीच्या दिवसात वारंवार खायला काय करायचं हा प्रश्न सगळ्यांनाच भेडसावत असतो. मग या छोट्या दिसणाऱ्या पण पोटभर होणाऱ्या आपल्या भारतीय रेसिपीज एकदा नक्की करुन बघा.

===

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?