शापित कृष्ण! महापराक्रमी कृष्ण कधीच “राजा” होऊ न शकण्यामागची अज्ञात कथा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

वाचक हो, विष्णू चा आठवा अवतार कृष्ण आणि शेषावतार बलराम ह्यांनी आधी कंस, जरासंध आणि अशा अनेक दुष्टांचा संहार करून धर्म संस्थापना केली.

अत्यंत पराक्रमी आणि साक्षात भगवंत असून ही दोघे ही कधी ही मथुरा व द्वारकेचे राजा होऊ शकले नाहीत. या मागे आहे एक कहाणी, एका बापाने आपल्याच मुलांना दिलेल्या शापाची कहाणी…

काय आहे ते जाणून घेऊया…

ययाती आणि देवयानी:

 

yayati devyani inmarathi
booksfact.com

 

कृष्णाचे वंशज राजा ययाती हे अतिशय विषयसुखाच्या आहारी गेलेले होते, स्त्री सुख हेच अंतिम ध्येय असलेल्या ययाती ला राजधर्माचा पूर्णतः विसर पडला होता.

देवयानी ला एकदा एका विहिरीतून वर काढून तिचा जीव वाचवला होता ययातीने. तेव्हा तिच्या विषयी आसक्त झालेल्या राजाने तिच्या मनात नसताना ही तिच्याशी विवाह केला.

दैत्यगुरु शुकाचार्य ह्यांनी आपल्या मुलीला देवयानी ला जिने विहिरीत ढकलले त्या शर्मीष्ठेला तीची दासी म्हणून पाठविले.

 

ययातीचा बाहेरख्यालीपणा व शाप:

 

yayati devyani inmarathi 2
vyasaonline.com

 

एके दिवशी ययाती अशोक वटीके समोरून जात असताना त्याला शर्मिष्ठा दिसली. तिला पाहून विषयासक्त ययाती तिच्याकडे आकर्षित झाले. शर्मिष्ठेशी लग्न करून ययाती च्या व तिच्या गुपचूप भेटी सुरू झाल्या.

आधीच देवयानी पासून ३ पुत्र असलेल्या ययाती ला शर्मीष्ठे पासून २ मुलं झाली.

देवयानी ला या बाबत कळताच तिने आपल्या वडिलांना शुकाचार्यांना ह्याबाबत सांगितले. संतप्त गुरूंनी ययाती ला शाप देऊन त्याचे तारुण्य काढून घेतले व आजीवन म्हातारा राहून मरशील असा शाप दिला.

 

उ:शाप व परत तारुण्य:

ययाती व देवयानीने अनेक वेळा विनंती केल्यावर त्याला उ:शाप दिला की त्याचे म्हातारपण तो दुसऱ्याला देऊन तो स्वतः पुन्हा तरुण होऊ शकतो.

ययातीला आजीवन तारुण्य उपघोगायचे होते, त्याने आपल्या पाच ही मुलांना त्यांचे तारुण्य देण्याची विनंती केली, ह्याला चौघांनी नकार दिला.

शेवटी शर्मीष्ठेचा मुलगा पुरु याने आपले तारुण्य देऊ केले. ययाती तरुण झाला पण त्याने उर्वरित चौघांना शाप दिला.

ह्यातल्या “यदु” नावाच्या मुलाला शाप दिला की तो किंवा त्याचे वंशज कधीही राजा होऊ शकणार नाहीत.

पुरुवंशी

 

पुरु ने पुढे राज्य सांभाळले व पुरुचे पुढे कुरु वंशीय कौरव व पांडव झाले. कौरव पांडवाच्या धर्म युद्धात कृष्णाने महत्वाची भूमिका निभावली तर बलराम पूर्णतः अलिप्त राहिले.

 

mahabharat-krishna-inmarathi

 

१८ दिवस चाललेल्या युद्धात कौरवांचा पराभव झाला व पांडू पुत्र युधिष्ठिर राजा झाला. ययाती चे पिता महाराज नहूष हे एका शापामुळे पाषाण झाले होते त्याने युधिष्ठिरामुळे पुढे कित्येक वर्षांनी मुक्ती मिळाली.

पांडवांनी अनेक वर्षे राज्य करून महाराज पुरुचे नाव राखले. द्रौपदी च्या सर्व पुत्रांचा मृत्यू झाला तेव्हा अभिमन्यू पुत्र परीक्षित पुढे राजा झाला.

यदुवंशी

कृष्णाचे आजोबा राजा शूरसेन ह्यांनी पूर्वजांच्या शापाला न जुमानता स्वतः राजा बनून कारभार चालवण्यास सुरुवात केली.

ह्याच राजाची मुलगी म्हणजे कृष्णाची आत्या महाराज कुंतीभोजने दत्तक घेतली, तिचेच नाव “कुंती”

त्यानंतर महाराज वसुदेव ह्यांनी मात्र राज्य पद नाकारून महाराज उग्रसेना ला राजा केले. उग्रसेनाने आपल्या मुलीचे देवकी चे वसुदेवशी लग्न लावून दिले. ह्याच देवकी चा कृष्ण आठवा पुत्र, विष्णू चा आठवा अवतार.

 

1 krishna InMarathi

 

कृष्णाने कंसाचा वध करून पुन्हा उग्रसेनाला राजा केले व पूर्वजांच्या शापाला संरून राज्यपदापासून अलिप्त राहिला.

जरासंधाने पुन्हा मथुरेवर हल्ले करण्यास सुरुवात केली तेव्हा कृष्णाने आपले राज्य द्वारकेला हलविले. तिथे ही पुन्हा कृष्ण राज्य पदापासून अलिप्त राहिला.

कृष्णाने मथुरा व द्वारके वर आलेले अनेक हल्ले परतवून लाविले, अनेक युद्धे जिंकली, अनेक योध्यांना मारले, युद्धनीती मध्ये भाग घेतला, राजकारण केले, राज्यातील अनेक महत्त्वाच्या निर्णयात सहभाग घेतला.

 

mahabharat inmarathi 2
amarujala.com

 

महाभारतात महत्वाची भूमिका निभावली परंतु आजीवन राजा म्हणून कुठल्याही राज्याचे राजपद उपभोगले नाही

पांडवांनी युद्धानंतर ३६ वर्षे राज्य उपभोगले व पांडव स्वर्ग वासी झाले. पांडवानंतर परीक्षिताने राज्य केले व त्याने अर्ध्या यदु व अर्ध्या पुरी असलेल्या वज्रनभास राजा केले.

यादवी युद्ध:

 

mahabharat_InMarathi

 

कृष्णा बद्दल अख्यियिका सांगितली जाते की त्याला ही शाप होता, जसे कौरव साम्राज्य समूळ नष्ट झाले तसेच अंतर्गत यादवी युद्ध होऊन यदु वंशाचा नाश होईल

काही खोडकर मुलांनी एक साधू ची खोड काढली व अंतर्गत यादवांचे युद्ध सुरू झाले आणि यादवांचा समूळ नाश झाला.

कृष्णाने ही एका पारध्याचा बाण लागल्याचे निमित्त साधून अवतार संपविला. 

मित्रांनो, ययाती बद्दल अनेक आख्यायिका आहेत, मत प्रवाह आहेत, दंत कथा आहेत, खांडेकर सरांच्या पुस्तकांमध्ये ह्या बद्दल सविस्तर माहिती आहे. पण ही वर सांगितलेली कहाणी कृष्णाला राजा होण्या पासून अलिप्त राहण्याचे कारण सांगते.

तसं ही भगवान कृष्ण ह्या सर्वांचा करविता होते, त्यांच्या मर्जी प्रमाणेच जे व्हायचे ते झाले. ते म्हणतात ना “आलं देवाच्या मना, तिथे कोणाचे चालेना”

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?