'देशाची शैक्षणिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे हे शहर जणू आयआयटी विद्यार्थ्यांची 'पंढरी'!

देशाची शैक्षणिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे हे शहर जणू आयआयटी विद्यार्थ्यांची ‘पंढरी’!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आयआयटीत प्रवेश मिळावा म्हणून आयआयटीच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या कुणालाही विचारा. कोटाबद्दल माहिती नाही असं त्यात तुम्हाला कुणी आढळणार नाही.

जयपूरपासून खाली दक्षिणेकडे सुमारे २५० किमी अंतरावर असलेले कोटा हे राजस्थानमधील तिसरे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे!

आणि आता हे शहर ‘कोचिंग’ या शब्दासाठी भारतभर प्रसिद्ध झालेले आहे.

देशांतील उत्तम वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाटी त्या त्या महाविद्यालयांच्या अथवा विद्यापीठांच्या प्रवेशासाठी असणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी कोटा शहरातील कोचिंग इन्स्टीट्यूट्स तयारी करून घेतात.

सध्या कोटा हे शहर त्यासाठी अधिक प्रसिद्ध झालेलं आहे. या छोट्याशा शहरात जवळपास दिड लाखाहूनही अधिक वैद्यकीय आणि अभियांत्रिकीला जाण्यासाठी उत्सुक असलेले विद्यार्थी येतात!

 

kota hub inmarathi
vasantiresidency.com

 

आणि इथल्या कोचिंग क्लासच्या मदतीने स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात.

म्हणजे शहरातील एकूण लोकसंख्येच्या एक दशांश संख्या ही बाहेरून इथं आलेल्या या विद्यार्थ्यांचीच असते.

नव्वदच्या दशकापर्यंत कोटा हे शहर औद्योगिक शहर म्हणून ओळखले जात होते. अर्थात तिथेही संघर्षच होता. १९९७ मध्ये आर्थिक अडचणीमुळे तिथल्या जेके सिंथेटिक्सचे विविध युनिट्स बंद पडले होते.

लोक बेरोजगार झाले होते. याच जेके सिंथेटिकमध्ये विनोदकुमार बंसल (विके) हे मेकॅनिकल इंजिनीयर म्हणून काम करत होते.

कंपनीची स्थिती बघता ती बंद पडण्यापूर्वीच विनोदकुमार बंसल यांनी उत्पन्नासाठी इतर मार्ग चोखाळण्याचा निर्णय मनाशी घेतला होता.

म्हणून त्यांनी १९८१ मध्ये प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी शिकवण्या घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीला हे क्लास फक्त सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी होते.

नंतर ते हळू हळू १० वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यापर्यंत वाढत गेले.

 

bansal sir inmarathi
bansalclassesajmer.com

 

१९८५ मध्ये बंसल यांचा एक विद्यार्थी आयआयटी या भारतातील टॉपमोस्ट विद्यापीठाची जेईई ही प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाला आणि बंसल यांच्या क्लासचे नाव सर्वतोमुखी झाले.

आणि १९९१ मध्ये ‘बंसल क्लासेस’ या नावाने त्यांनी क्लासेस वाढवत नेले. छोट्याशा शिकवणी वर्गाचे कोचिंग इन्स्टीट्यूटमध्ये रुपांतर झाले.

आयआयटी मद्रासचे पदवीधर आर. के. वर्मा हे सुरुवातीला बंसल यांच्या क्लासमध्ये शिकवण्याचे काम करत होते. तिथे त्यांनी बरीच वर्षे शिकवल्यानंतर आपले स्वतःचे क्लासेस ‘रिसोनन्स’ या नावाने सुरू केले.

या क्लासेसचे यश पाहून हळूहळू अनेक आयआयटीयन इंजिनिअर्सनी तिथे आपापले कोचिंग क्लास सुरू केले आणि त्यांची संख्या वाढतच गेली.

अर्थात त्या क्लासेसमध्येही स्पर्धा वाढत गेल्याने विद्यार्थ्यांना चांगले कोचिंग मिळण्याची शक्यताही वाढत गेली.

 

iit coaching inmarathi
indiatoday.in

 

आकाश ही कोचिंग इन्स्टीट्यूट वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश मिळवून देण्यासाठी स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणारी दिल्लीतली इन्स्टीट्यूट.

या इन्स्टीट्यूटच्या आता देशभरात जवळपास शंभर शाखा आहेत. या आकाश कोचिंग क्लासनेही आपले दुकान कोटा येथे उघडलेले आहे.

अशाप्रकारे आता कोटा या शहरात विविध प्रकारच्या कोचिंग क्लासेसचा सुळसुळाट झालेला आहे.

एकेकाळी औद्योगिक कंपन्यांवर अवलंबून असलेले हे शहर आज विविध कोचिंग क्लासमुळे आर्थिकदृष्ट्या भरभराटीस आलेले आहे.

पण या सगळ्या कोचिंग संस्था कोटा येथेच का निर्माण झाल्या आणि भारतभरातील अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश मिळवून देण्यासाठी कोटा शहरच महत्त्वाचं कसं काय ठरलं?

 

कोटा शहर –

तुम्ही या शहरात प्रवेश करताच तुम्हाला ठिकठिकाणी दिसतील ते या वेगवेगळ्या क्लासेसचे बॅनर्स.

 

kota city inmarathi
dailymail.co.uk

 

आणि त्यावर या कोचिंग क्लासच्या मदतीने उत्तीर्ण होऊन हव्या त्या विद्यापीठात, किंवा महाविद्यालयांत प्रवेश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे आणि फोटो.

या क्लासेसमध्ये शिकवणाऱ्या टॉप टिचर्स किंवा ‘स्टार टिचर्स’ची नावे आणि फोटो.

कोटामध्ये उत्तम आयआयटी कोचिंग का सापडते?

कोंबडी आधी की अंडं या न्यायाने आता हे सांगणं कठीण झालंय की,

कोटामध्ये चांगलं मार्गदर्शन मिळतं म्हणून देशभरातले विद्यार्थी इथं येऊ लागलेत, की देशभरातील हुशार विद्यार्थी इथं येत असल्याने इथल्या कोचिंग क्लासेसना यश मिळून त्यांची भरभराट होतेय!

तरी देखील कोटा येथेच अभियांत्रिकी आणि वैद्यकीय स्पर्धा परीक्षांसाठी उत्तम मार्गदर्शन का मिळते याची काही कारणे आपल्याला सांगता येतील. ती अशी –

१. या शहरात जवळपास १५० हून अधिक कोचिंग क्लासेस आहेत. त्यापैकी अनेक संस्था या भारतातील सर्वोत्तम कोचिंग क्लासमध्ये गणल्या जातात. या संस्था प्रवेश देताना विद्यार्थ्यांची एक प्रवेश-परीक्षा घेतात.

त्यामुळे अत्यंत हुशार असेच विद्यार्थी या क्लासेसमध्ये प्रवेश घेतात.

आता ही एक विडंबनाच म्हणायची, की एका स्पर्धा परीक्षेत पास होण्यासाठी मार्गदर्शन देणाऱ्या क्लासेसचीही आपली एक स्पर्धा परीक्षा आहे!

 

entrance exams inmarathi
aiseet.org

 

आणि तिथे प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना आधी ती उत्तीर्ण होण्यासाठी कष्ट करावे लागतात.

२. हे पूर्ण शहरच कोचिंग क्लासेसच्या भवती फिरते असे म्हटले तरी चालेल.

इथे येऊन राहणाऱ्या मोठ्या संख्येतल्या विद्यार्थ्यांना भाड्याने घरे देणे, त्यांच्य खाण्यापिण्याची सोय करणे, त्यांना लागणारी स्टेशनरी पुरवणे अशा विविध उद्योगधंद्यात गुंतलेले आहे.

शहराच्या आर्थिक नाड्या या विद्यार्थ्यांच्याच उपस्थितीमुळे आणि त्यांना लागणाऱ्या गरजा पूर्ण करणाऱ्या व्यवसायांच्या हातात आहेत.

एवढंच नव्हे, तर अत्यंत कठीण अशा या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करताना प्रचंड अशा मानसिक तणावातूनही ही मुलं जात असतात.

त्यांच्या या मानसिक तणावावर उपचार करणारे स्पेशल मानसोपचारतज्ज्ञ देखील या शहरात भरपूर आहेत. या सर्वांच्या मदतीने इथे येणारा विद्यार्थी या रॅट रेसमध्ये भाग घेऊन धावत असतो.

त्यामुळे इथे आल्यावर त्याला इकडे तिकडे वेळ घालवण्यासाठी वेळच मिळत नाही आणि विद्यार्थी आपला पूर्ण वेळ केवळ अभ्यासाला देऊ शकतात.

३. देशभरातील उत्तम आयआयटीयन्स इथं शिक्षक म्हणून काम करायला येतात. ते इथं येऊन आपले पूर्ण प्रयत्न या विद्यार्थ्यांसाठी देतात. त्यामुळे इथले टॉपमोस्ट क्लासेस आपल्या या शिक्षकांना उत्तम पगार देतात.

 

teachers in kota inmarathi
quora.com

 

वर्षाला १-२ कोटी ते अशा अनुभवी आणि मेहनती शिक्षकांना सहजपणे देतात. इतर क्लासेसमधूनही या शिक्षकांना साधारण २० – ३५ लाख वार्षिक पगार मिळतोच.

या आयआयटीयन्सना कंपन्यांमध्ये नोकरी करूनही इतका पगार मिळत नाही. उलट कंपन्यांमध्ये जेमतेम वार्षिक १२ – १५ च्या वर मिळण्याची शक्यता असते.

असा भरपूर पगार मिळत असल्याने आणि त्यांचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर त्यांचे नावही होत असल्याने इथले हे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांवर प्रचंड मेहनत घेतात.

४. इथं येणारे विद्यार्थी हे साधारणपणे सधन घरातलेच असतात. त्यांच्या पालकांनी त्यांच्या कोटा येथल्या शिक्षणासाठी भरपूर पैसा मोजलेला असतो.

हा खर्च किंवा इथल्या क्लासेसची फि ही वार्षिक लाख रुपयांहून अधिक असते. शिवाय राहण्या-खाण्याचा आणि इतर खर्च.

इतका भरमसाठ खर्च करून पालकांनी आपल्याला इथे ठेवलंय याचं एक भावनिक दडपणही विद्यार्थ्यांवर असतंच. त्यामुळे इथे आलेला प्रत्येक विद्यार्थी हा कठोर मेहनत करत असतो.

 

students in kota inmarathi
indiatoday.in

 

अशाप्रकारे ही चार कारणे इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळवून देण्यास कारणीभूत होतात. आणि हे चक्र चालू राहते.

कोटाचे नाव देशभरात कोचिंग क्लासेससाठी घेतले जाते. असा हा दोन्हीकडून परस्परावलंबी व्यवसाय आहे.

बन्सल कोचिंग क्लासेस व्यतिरिक्त आता इथे आणखीन प्रचंड क्लासेस सुरू झाले आहेत!

ऍलन करीअर, रिसोनन्स, व्हायब्रन्ट ऍकेडमी, करीअर पॉइन्ट हे त्यापैकी काही यातली लोकप्रिय आणि अग्रेसर कोचिंग क्लासेस!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?